मायबोली वर्षाविहार २०२३

Submitted by ववि_संयोजक on 23 June, 2023 - 22:31

अरे वेमांना कळवलय ना, धागा टाकायला वविचा?
ववि संयोजकचे क्रिडेंशिअल्स आले की नाही?
ते नंतर, आधी मला सांग आज कुठला टिझर फिरवू?
ए बयो, त्या तिथे स्वल्पविराम राहिलाय गं, आणि तिथे पहिली नाही दुसरी वेलांटी...!
अरे पायलट कधी करायचाय? ठिकाणे सुचवा लवकर.
जुन्या डायऱ्या उघडा, नंबर्स शोधा बसवाल्यांचे...
अब्बे, टी शर्टचे डिझाईन्स आले का?
अरे, ववि बाफचा ड्राफ्ट रेडी झाला का?
पायलटला व्हिजिट करायच्या रिसॉर्ट्स ची लिस्ट तयार आहे का?
ट्रान्सपोर्टची चौकशी कोण करतेय?

नुसता कल्ला चालू आहे मंडळी गेला महिनाभर. संयोजक मंडळींचा उत्साह ओसंडून वाहतो आहे. का नाही वाहणार?
"नेमेचि येतो मग पावसाळा" या पंक्तीबरोबर माबोकरांना हे ही माहिती असते की "पावसाळ्याची चाहूल लागली की मायबोली ववि अर्थात वर्षाविहार येणारच."

ओलाकच्च पाऊस, हिरव्यागार डोंगररांगा, त्यात अधूनमधून डोंगरातून खळखळत वाहणारे एकेकटे निर्झर आणि विकांताला गाड्या भरभरून उंडगायला बाहेर पडणारे लोक पाहिले की जातिवंत माबोकराला सर्वात आधी डोळ्यासमोर येतो, तो म्हणजे माबोकरांचा लाडका सोहळा "मायबोली वर्षाविहार"! आतापर्यंत फक्त आंतरजालावर भेटलेले व्यक्ती आणि वल्ली प्रत्यक्षात कसे दिसतात याची उत्कंठा, माबोवर कमेंट्समधून कायम वाद घालणारा नमुना प्रत्यक्षात कसा असेल? ही शंका आणि जुन्या जाणत्या (?) माबोकरासाठी मागच्या ववितला सगळा कल्ला पुन्हा एकदा नव्याने अनुभवण्याची आस. मायबोलीवरचे लेखन, इतर अनेक उपक्रम, चर्चा, गप्पा, चेष्टा-मस्करी, विनोद (आणि येथेच झडणारी तात्विक चर्चावादळे वा मतभेद) यांबद्दल मायबोलीच्या सभासदांचे कुटुंबिय रोज काहीतरी ऐकत असतातच. मायबोलीच्या वर्षाविहार उपक्रमाद्वारे त्यांनाही ती खमंग चर्चा, धमाल-मस्ती प्रत्यक्ष अनुभवायला मिळते आणि तीही इतर मायबोलीकरांसमवेत!
तो मायबोलीकर पेश - ए - खिदमत है "मायबोली वर्षाविहार २०२३".

तो पाऊस सुद्धा चार वेळा हेलपाटे घालून गेला वविची तारीख पक्की झाली की नाही हे जाणून घ्यायला. मी येतोय लवकरच, तारीख पक्की करा मग भेटून कल्ला करूच हे सांगायला. शेवटी एकदाची तारीख पक्की झाली, अगदी एकमताने. आत्ताच कॅलेंडर मार्क करून ठेवा. रविवार आहे त्यामुळे रजा नाहीये, मीटिंग आहे वगैरे ऐहिक गोष्टींना आपोआप फाटा मिळालेला आहे. जुलै महिन्यातला शेवटचा रविवार, अर्थात ३० जुलै २०२३. होवू दे खर्च, माबो आहे घरचं !

वर्षाविहाराचे (ववि) निमित्त साधून आंतरजालाच्या या आभासी जगातील अनेक आभासी आयडीज् प्रत्यक्ष रूपात एकत्र येतात, नव्या ओळखी होतात, जुन्या ओळखींचे पुनरुज्जीवन होते, काही ओळखी मैत्रीत बदलतात तर आपल्या नित्य परिचयाच्या असलेल्या मायबोलीकरांचीही एक वेगळी ओळख होते. नेहमीचे वाद, स्पर्धा, समज-गैरसमज, मतभेद इत्यादी बाजूला सारून नवीन ओळखी होतात व नवे मैत्र जुळते.

तर यावेळी ३० जुलै २०२३ रोजी, स्वर्गाचा वेन्यू ठरलाय...
यशोदा फार्म अँड रिसॉर्ट
वंजारवाडी, मुरबाड रोड, हायवे, कर्जत, महाराष्ट्र, ४१०२०१.

https://g.co/kgs/aqaq5D

पाऊस दरवर्षी असतोच, यावेळी तुम्हीदेखील या त्याच्याशी स्पर्धा करायला. कोण जास्ती कल्ला करतो, पाऊस की माबोकर !

मंडळी, हा दिवस साजरा करण्याची पूर्वतयारी म्हणून काही गोष्टी नियमानुसार आणि ठराविक दिवशी करणे गरजेचे आहे.

त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे वविला येणार्‍यांची नावनोंदणी.

वविला registered मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबिय (पति/ पत्नी/ मुले/ आई - वडील) येऊ शकतात. आपले इतर नातेवाईक/ मित्र-मैत्रिणी यांनाही वविला यायची इच्छा असेल तर त्यांनी स्वतंत्रपणे मायबोलीचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे.

- नावनोंदणीची अंतिम तारीख आहे रविवार, २३ जुलै २०२३

योग्य ते शुल्क ysk2006-1@okhdfcbank (Yogesh Kulkarni) या upi वर भरावे व त्यानंतर सगळ्यात खाली दिलेला गुगल फॉर्म भरुन त्यात नोंदणीसाठी आवश्यक ती माहिती नोंदवावी. तुमची वर्गणी आणि गुगल फॉर्म जमा झाल्यावर संयोजक तसे संपर्कातून पोचपावती देतील.
काही शंका/प्रश्न असल्यास याच धाग्यावर विचारा किंवा mbvavi2023@gmail.com या पत्त्यावर ईमेल करा.

वर्षाविहार २०२३ ची वर्गणी खाली दिल्याप्रमाणे आहे:

मुंबईसाठी:
प्रौढ : रु. 1700/- प्रत्येकी. (रिसॉर्ट: रु. 1150/-, बस: रु. 500/-, सांस्कृतिक समिती: रु. 50/-)

पुण्यासाठी:
प्रौढ : रु. 1700/- प्रत्येकी. (रिसॉर्ट: रु 1150/-, बस: रु. 500/-, सांस्कृतिक समिती: रु. 50/-)

मुले (वय 3 ते 12 वर्षे) : रु. 550/- प्रत्येकी (रिसॉर्ट फी) आणि बसमध्ये बसायला स्वतंत्र जागा हवी असल्यास बसचे वर दिल्याप्रमाणे मुंबईसाठी रु. 500/- आणि पुण्यासाठी रु. 500/-

- 3 वर्षांपर्यंतच्या मुलांना काहीही शुल्क नाही.
- 12 वर्षापासून पुढे रिसॉर्टचा पूर्ण आकार लागेल.
- रिसॉर्टच्या खर्चात सकाळचा चहा नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा चहा यांचा समावेश आहे.
- वरील प्रवास खर्च हा मुंबईहून आणि पुण्याहून प्रत्येकी ३० माणसांप्रमाणे धरला आहे. संख्या कमी झाली तर प्रवास खर्च कदाचित जास्त येऊ शकेल.
- समजा पैसे भरून जर आयत्यावेळी काही कारणाने वविला येणं रद्द केले तर बसचे भाडे वजा करून उरलेले पैसे परत करण्यात येतील.
- स्वतंत्र येणार्‍यांनी बसभाडे देण्याची अर्थातच गरज नाही.
- मुंब‌ई आणि पुणे सोडून इतर ठिकाणच्या तसेच भारताबाहेरील कोणालाही वर्षाविहारास येणे शक्य असेल तर त्यांनी जरूर यावे.

गुगल फॉर्म लिंक:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc_-rBkxeKUMMhBv5BUAFAdJfwVNwDv...

वर्षाविहार २०२३ संयोजन समिती:
मुंबई
कविता नवरे (कविन)
मुग्धा कुलकर्णी (मुग्धानंद)
मंजिरी कान्हेरे (मंजूडी)
विनय भिडे (विनय भिडे)
आनंद चव्हाण (आनंदमैत्री)
निलेश वेदक (नीलवेद)

पुणे
हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल)
विशाल कुलकर्णी (विशाल कुलकर्णी)
मनोज हातळगे (अतरंगी)
योगेश कुलकर्णी (योकु)

चला तर मग, आजच नोंदणी करा!!!

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद मायबोलीकर्स. आता नोंदणी बंद करत आहोत.

ववि नोंदणी केलेल्यांना बस रुट बद्दल माहिती वविच्या दोन दिवस आधी प्रत्यक्ष फोन करुन / मेसेज करुन कळवण्यात येईल.

भेटूयात वविला Happy

ज्यांच्याशी आपण interaction करतो माबो वर त्यांच्यापैकी कुणी आहे का हा एक criteria असतो बुकिंग साठी. +१२३४५

गूगल फॉर्म मध्ये जेवणात वेज/नॉनवेज असा पर्याय निवडायचा पर्याय नव्हता. जेवण शुद्ध शाकाहारी असणार का?

गूगल फॉर्म मध्ये जेवणात वेज/नॉनवेज असा पर्याय निवडायचा पर्याय नव्हता. जेवण शुद्ध शाकाहारी असणार का? >> तू येणारेस का?

केदार जाधव,
२०१७ वविला १७ जणच का हा तुमचाच धागा होता ना
यावेळी बूकिंगच्या आधी हेड काऊंट कन्फर्म केले का Happy

यावेळी बूकिंगच्या आधी हेड काऊंट कन्फर्म केले का Happy>> यावेळी तारीख कंफर्म व्हायच्या आधी त्याचा मेसेज होता, "तुमची तारीख पक्की झाली की कळव. त्यादरम्यान देशात असलो तर आम्ही तीन मेंबर कंफर्म" Happy

एक सूचना करावीशी वाटते. विशेषतः जे स्वतःच्या गाडीने ट्रॅव्हल प्लॅन करत आहेत अशांसाठी (आणि बसने येणाऱ्यांसाठी सुद्धा लागू आहेच अर्थात)

घरून निघण्याआधी मॅप वर पाहून घ्या. पावसाळ्यामुळे कैक कारणास्तव ट्रॅफिकजाम होत असते. त्यानुसार नियोजन करायला बरे पडते. आयफोन, विंडोजफोनचे माहीत नाही पण मला गुगलवर पहायची सवय असल्याने लाल भडक मार्ग दिसला की मी त्यानुसार नियोजन करतो. (अर्थात अगदी लास्ट मिनिटला नजरेसमोरच काही घडले नी ट्रॅफिकजॅम झाले तर तो भाग वेगळा)

हो, ते कट्टर वविकर आहेत हे त्या धाग्यात कळलेलेच.. >> जेव्हा दिवस खराब होते तेव्हा मायबोली आणि ववि दोन्हीनी बराच मानसिक आधार दिलाय . त्यामुळे इमोशनल कनेक्ट आहे नक्कीच Happy

Mumbai Rains: मुंबईत विनाखंड मुसळधार पाऊस, उद्या शाळांना सुट्टी; गरज असेल तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना
...
इथे नवी मुंबई मध्येही उद्या शाळांना सुट्टी आहे. गेल्या आठवड्यात सुद्धा गुरुवार शुक्रवार सुट्टी होती. गेले दोन तीन आठवडे मी घरी बसून खिडकीतून बाहेर पाऊसच बघतोय..

ववि सुद्धा याला अपवाद नसणार असे वाटत आहे. म्हणून सर्वांनी कपड्यांचे अतिरिक्त जोड आणि दोन टॉवेल घेऊन या.

ववि नोंदणी केलेल्यांना बस रुट बद्दल माहिती वविच्या दोन दिवस आधी प्रत्यक्ष फोन करुन / मेसेज करुन कळवण्यात येईल.
>>>
हे साधारण कधी पर्यंत कळेल?

रिया मायबोलीवर मगाशीच धागा काढला आहे याबद्दलचा

व्हॉट्स ॲप गृपवरही ॲड केलेत डिटेल्स

तू गृपच invite accept कर. एकदा चेक कर आणि काही शंका असतील तर पिंग कर

Pages