मायबोली वर्षाविहार २०२३ - बस मार्ग आणि रूपरेषा

Submitted by ववि_संयोजक on 28 July, 2023 - 03:25

आपल्या ३० जुलै २०२३ रोजी होणार्‍या वर्षाविहारात सहभागी होऊ ईच्छिणार्‍या सर्व सभासदांचं पुन्हा एकदा स्वागत. Happy

ववि २ दिवसांवर आला... प्रतिक्षा संपली!
आता झटपट बस मार्ग नोंदवून घ्या आणि आपल्याला सोयिस्कर असलेल्या थांब्यावर ठरवून दिलेल्या वेळेला या बघू...

बस मार्ग मुंबई -
०५४५ माझगांव सर्कल - जीएसटी भवन
०६३० मुलुंड (पू), संभाजी पार्क, दिनदयाल रोड
०७१५ ऐरोली सर्कल
०७३० कोपरखैरणे रेल्वेस्टेशन (रिलायन्स - डिएकेसी- ला लागून असलेला हायवेवरचा स्टॉप)
०९००-०९१५ पर्यंत यशोदा रिसॉर्ट, कर्जत येथे पोहोचू

*********************************************************

बस मार्ग पुणे -
०५३० कात्रज बस डेपो
०५४५ सिटीप्राईड, सातारा रोड च्या अपोझिट
०६१५ रामसर बेकरी, पिएमसी
०६४५ नाशिक फाटा सिग्नल
०७०० पिंपरी
०९००-०९१५ पर्यंत यशोदा रिसॉर्ट, कर्जत येथे पोहोचू

आपण वर्षाविहाराला येणार्‍या सदस्यांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप केलेला आहे, निरोप देण्याघेण्याच्या सोयीकरता.
- वरिल बसमार्गात काही बदल झाल्यास संयोजक कळवतील.
- पाण्यात उतरण्याकरता शक्यतो सिंथेटिक कपडे घालावेत
- पाण्यात खेळून झाल्यावर बदलण्याकरता कपडे (गरज वाटत असेल तर अजून एखादा जास्तीचा कपड्यांचा जोड. इ.) घ्यावेत
- जरी आपण पोहोचल्यावर नाश्ता आणि निघण्याआधी स्नॅक्स घेणार असू तरी येण्याजाण्याचा वेळ, रहदारी वगैरे पाहाता; आपल्यासोबत लहान मुलं इ. असतील तर त्यादृष्टीने जरा कोरडा खाऊ सोबत असू द्यावा

वविची रुपरेषा साधारण अशी असेल...
सकाळी ०९३० वाजेपर्यंत पुणे व मुंबईच्या बसेस रिसॉर्टवर पोहोचतील
सकाळी ०९३० ते १००० न्याहारी करुया
१००० ते १०३० स्विमिंगपूलात उतरण्यासाठीचे चेंजिंग
१०३० ते १२३० स्विमिंग पूल व इतर उपलब्ध राईड्स/रेन डान्स मध्ये धम्माल मस्ती
१२३० ते १३०० परत चेंजिंग
१३०० ते १४०० जेवण
१४३० - १६३० मनोरंजन
१७०० वाजता चहा व बिस्किट्स
१७३० वाजता जड अंत:करणाने आपापल्या शहरात नेणार्‍या बसमधून प्रयाण

चला मग! तयारीला लागा... फक्त २ दिवस राहिलेत Happy

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बस मार्ग मुंबई -
०५४५ माझगांव सर्कल - जीएसटी भवन
>>>>

अरे खतरनाक...
आमच्या नाक्यावरून बस सुटणार Happy

पुण्यातल्या बस रूट चा सातारा रोडवरच्या सिटी प्राईड समोर स्टॉप आहे, याचा अर्थ त्या परिसरात राहणारे मायबोलीकर असणार आहेत. मी ही आरणेश्वर परिसरात राहतो. या परिसरात राहणाऱ्या मायबोलीकरांची ओळख करून घेऊन संपर्क साधायला आवडेल...

पशुपत

धन्यवाद हर्पेन ,
पण माझं पावसाचं फारसं सख्य नाहीये.
आणखीन सध्या सगळीकडे अतिवृष्टी सदृश परिस्थिती आहे !!
हुर्डा काळात असे काही ठरवले/जमवले तर निश्चितच येईन !

पण माझं पावसाचं फारसं सख्य नाहीये. >> ओह ओके

हुर्डा काळात असे काही ठरवले/जमवले तर निश्चितच येईन !
आपणच ठरवूया नाहीतर एक गटग तळजाई वर पेंडींग आहे केव्हाचे ते करू

मी वाळवेकर नगर ला राहते . हर्पेन, तळजाई ला गटग ठरवले तर जरूर येईन. मलाही सगळ्यांना भेटायला आवडेल. ववि ला यायची खूप इच्छा होती, पण पूर्वनियोजित कार्यक्रम मुळे जमत नाहीये.

अतुल, अश्विनी११ , हर्पेन
मी पण वाळवेकर नगर मधे रहातो.
जवळ जवळ रोजच तळजाई टेकडीवर जातो.

भेटूयात निश्चित.

अगदी भरत. Happy बसमधून हात बाहेर काढू नका. जे दिलं ते शहाण्यासारखं खाऊन घ्या.
मीच 'बेगानी शादीमें' झाले आहे इथे. Have fun, friends !! Happy

वर्षा विहार वाल्यांना भरपूर शुभेच्छा. प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार पाहिजे तसं भिजायला मिळो, उत्तम गप्पा जमून येवोत आणि येथे त्याचा वृत्तांत पाठवण्याची इच्छा होवो आणि तो वाचून आम्हालाही इथे बसून सर्व आनंद घेता येवो हीच प्रार्थना...

अतुल ,
अरण्येश्वर-सहकार नगर वगैरे परिसरातल्या मायबोलीकरांच्या साठी एक धावता धागा सुरू करून त्याची लिंक कृपया इथे टाका ना ... म्हणजे तिथे चर्चा करता येईल .

Pages