नारद: नारायण नारायण...!
प्रभू: या नारदमुनी, कसे काय येणे केलेत?
नारद: नमस्कार देवा, जरा पृथ्वीवर जावून येतो. एक मोठा हॅपनींग सोहळा कव्हर करायचे डोक्यात आहे यंदा, महाराष्ट्र प्रांती.
प्रभू: मायबोली वविला जाताय की काय?
नारद: तुम्हाला कसं कळलं?
प्रभू: अहो, चारेक वर्षाच्या गॅपनंतर होतोय हा सोहळा. चर्चा तर होणारच.
नारद: खरंय, कोविडच्या प्रलयानंतर आत्ता कुठे सगळे स्थिरावताहेत. या वर्षीचा ववि नक्कीच गाजणार..
प्रभू: पण हे काय? तुम्ही असेच जाणार आहात वविला? याच वेशात तुमची वीणा घेवून?
नारद: असं कसं बरं? खास मायबोली टीशर्ट ऑर्डर केलाय ना मी. मागवू काय तुमच्यासाठी सुद्धा? नारायण नारायण...
मंडळी, तुमचं काय? तुम्ही केलेत का बुक टीशर्ट? वाट कसली बघताय? शुभस्य शीघ्रम...
ऐन वर्षाविहाराच्या दिवशी सकाळी सकाळी होणाऱ्या या कुरबुरी टाळायच्या असतील तर आत्ताच मोबाईल उघडा आणि तुमची ऑर्डर बुक करून टाका. आणि आपल्या आवडत्या वविला खास वविसाठी बनवलेले खास मायबोली टीशर्ट परिधान करूनच हजेरी लावा.
सादर आहे मायबोली ववि स्पेशल टीशर्ट.
टीशर्ट खालील प्रकारात उपलब्ध असतील.
1. जेंट्स राउंड नेक
2. लेडीज व्ही नेक
3. किड्स राउंड नेक
टीशर्ट -
सुलेखनाचा झूम-जेंट्स आणि लेडीज टिशर्टांची मापे पुढिलप्रमाणे:
साईज - रुंदी(२L)-उंची(H)
XXL - 46"-33"
XL - 44"-31.5"
L - 42"-30"
M - 40"-28.5"
S - 38"-27"
XS - 36"-25.5"
XXS - 34"-24"
लहान मुलांच्या टीशर्टसाठी अंदाजे साईज:
वय वर्षे १-२ साठी - २२
वय ३-४ साठी - २४
वय ५-६ साठी - २६
वर ७-८ साठी - २८
वय ९-१० साठी - ३०
वय ११-१२ साठी - ३२
आणि तिथून पुढे रेग्युलर साईज
(हे फक्त एक कोष्टक आहे जे शक्यतो मध्यम शरीरयष्टीच्या मुलांसाठी बरोबर ठरते. लहान मुलगा प्रत्यक्षात कसा आहे त्यानुसारच ऑर्डर नोंदवा.)
महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक टीशर्टच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्या संस्थेला देतो. त्यामुळे टीशर्ट घेऊन आपण खारीचा का होईना, पण समाजासाठी एक वाटा उचलत असतो.
यंदाची देणगी आपण कुठल्या संस्थेला देणार त्याबद्दलची सविस्तर माहिती लवकरच मायबोलीवर प्रकाशित करू.
जेंट्स व लेडिज टी-शर्टची देणगीसह किंमत असेल रु. ३५०/- (३००/- टीशर्ट + ५०/- देणगी)
लहान मुलांच्या टी-शर्टची देणगीसह किंमत असेल रु. ३००/- (२५०/- टीशर्ट + ५०/- देणगी)
XXL पेक्षा मोठा साइज असेल तर देणगीसह किंमत असेल रू. ४००/- (३५०/- टीशर्ट + ५०/- देणगी)
टीशर्ट बुक कसे कराल?
टीशर्ट ऑर्डर्स बंद करीत आहोत
तुम्हाला किती आणि कोणते टीशर्ट्स हवेत हे ठरवून “--” वर पेमेंट करायचं आहे. नंतर खालील गुगल फॉर्म वर ऑर्डरचे तपशील ट्रांसॅक्शन आयडी सह भरुन सबमीट करावे.
कृपया ऑर्डर देण्यापुर्वी वर दिलेल्या किंमतीच्या चार्टप्रमाणे आपल्या सगळ्या ऑर्डरची टोटल रक्कम स्वतः तपासून तितकी रक्कम यूपीआय द्वारे भरावी.
ज्यांना प्रत्यक्ष भेटून टीशर्ट घेणं शक्य नाही ते कुरिअर सेवा (उदा. डन्झो/ स्विगी जिनी) नोंदवून संयोजकांकडून टीशर्ट घेऊ शकतात. अशी सेवा नोंदवण्याची पूर्ण जबाबदारी आणि खर्च हा सदर मायबोलीकराला करावा लागेल. अशी व्यवस्था करून टीशर्ट घेऊ इच्छिणाऱ्या मायबोलीकरांनी संयोजकांशी संपर्क साधावा.
टीशर्ट संयोजक डिटेल्स कन्फर्म करतील आणि काही चूक आढळल्यास त्या आयडीला/ व्यक्तीला संपर्क करुन काही बदल / अडचण असेल तर ती सोडवतील.
ऑर्डर डिटेल्स चा गुगल फॉर्म -
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdRexCR5GdrliNhyV3D-Sxv7YL6SBGW...
सद्ध्या तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, तेही त्वरीत- ते म्हणजे टीशर्टची ऑर्डर नोंदवायची, कारण ८ जुलै २०२३, रात्री १२ वाजेपर्यंत ही ऑर्डर नोंदवण्याची शेवटची तारीख आहे.
महत्त्वाचे-
१. टीशर्ट राऊंड नेक/ व्ही नेक प्रकारचे आहेत. हे टीशर्ट अंगाबरोबर बसतात, याची कल्पना असेलच. तर हे लक्षात घेऊन टीशर्टाचा साईझ त्याप्रमाणे ऑर्डर करा.
२. यावर्षीही टीशर्ट देशाबाहेर पाठवले जाणार नाहीत. देशाबाहेरच्या मायबोलीकरांना देशातल्या मित्र/ नातेवाईक/ मायबोलीकर मित्रांकडून टीशर्ट घेता येतील.
3. प्रत्यक्ष मिळणार्या वस्तूचा रंग फोटोत दिसणार्या वस्तूच्या रंगापेक्षा थोडासा वेगळा असू शकेल.
टीशर्ट कसे आणि कुठे मिळतील?
टीशर्ट मिळण्याची तारीख आहे २३ जुलै २०२३
मुंबई डिस्ट्रिब्युशन सेंटर्स -
ठाणे - आनंद चव्हाण आणि निलेश वेदक
दादर - कविता नवरे
बोरीवली - विनय भिडे
पुणे डिस्ट्रिब्युशन सेंटर्स - पुण्यातून नोंदवल्या जाणाऱ्या मागणीनुसार टीशर्ट कलेक्शन पॉईंट्स ठरवून जाहीर करू.
लोकहो, टी शर्ट संदर्भात काही चौकशी करायची असेल तर vavitshirt2023@gmail.com या इमेल पत्त्यावर मेल करून विचारणा करू शकता किंवा याच धाग्यावर तुमचा प्रश्न विचारा.
काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांना संपर्क साधू शकता.
१. विनय भिडे
२. हिमांशु कुलकर्णी
हे टीशर्ट आपल्याला आपल्या वर्षाविहारापर्यंत मिळणार आहेत!! वविला सर्व मायबोलीकर हे टीशर्ट घालून आले, तर काय धमाल येईल, कल्पना आली ना? तर, झटपट ऑर्डर नोंदवा !
कुंतल, आपण ठाण्यात दरवर्षी
कुंतल, आपण ठाण्यात दरवर्षी गडकरी रंगायतनपाशी भेटतो. यंदाही तिथेच भेटणार आहोत. ठाणे संयोजक तुम्हाला वेळ कळवतील. तुम्हाला तसा व्हॉट्स ॲप मेसेजही केला आहे
धन्यवाद
धन्यवाद
अद्याप वैयक्तिक मेल अथवा
अद्याप वैयक्तिक मेल अथवा व्हाॅटसॲप वर निरोप आलेला नाही. इथेही वेळ कळवलेली नाही.
कृपया वेळ कळू शकेल का त्यानुसार उद्याचे बाकी कार्यक्रम/Schedule ठरवता येईल.
ठाणे टीशर्ट डिस्ट्रिब्युशन :
ठाणे टीशर्ट डिस्ट्रिब्युशन : गडकरी रंगायतन कट्टा आज संध्याकाळी ५.३० वाजता. आनंद चव्हाण (आनंदमैत्री) यांचा नंबर व्हॉट्स ॲप वर पाठवत आहोत. काही अडचण आल्यास त्यांच्याशी संपर्क साधावा
दादर टीशर्ट डिस्ट्रिब्युश : कोहिनूर स्क्वेअर फुड कोर्ट संध्याकाळी ६ वाजता.
बोरीवली आणि पुण्याचे संयोजक डायरेक्ट संपर्क करत आहेत.
पावसामुळे संयोजकांकडे पार्सल मिळायला वेळ लागल्यामुळे सॉर्टिंग पुर्ण झाल्यावर इथे अपडेट देत आहोत म्हणून उशीर झाला आणि त्याबद्दल क्षमस्व.
धन्यवाद
लॉग आऊट लॉग इन चा कंटाळा आला
लॉग आऊट लॉग इन चा कंटाळा आला म्हणून माझ्या आयडीने लिहिते
सगळ्या टीशर्ट ऑर्डर केलेल्या मायबोलीकरांना व्हॉट्स ॲपवर संपर्क साधून डिस्ट्रिब्युशन संदर्भात तपशील दिलेले आहेत.
पुण्यातील माबोकरांना हिमांशु कुलकर्णीचा नंबरही दिला आहे संपर्कासाठी.
बोरीवलीकरांना विनय भिडेचा नंबर दिला आहे
दादरकरांना माझा नंबर दिला आहे आणि ठाण्यात संपर्कासाठी आनंद चव्हाणचा नंबर दिला आहे.
एका वेळी चार ठिकाणी गटगसाठी
एका वेळी चार ठिकाणी गटगसाठी शुभेच्छा. गटगचे वृत्तान्त येऊ द्या.
बोरिवलीत गटग होणार का?
बोरिवलीत गटग होणार का?
>>बोरिवलीत गटग होणार का?
>>बोरिवलीत गटग होणार का?
हेच विचारतो
चहा सदरा मस्त आहे ! धन्स !
चहा सदरा मस्त आहे ! धन्स !
नमस्कार वविकर्स! ववि दणक्यात
नमस्कार वविकर्स! ववि दणक्यात झाला, सगळ्यांमुळे फार धमाल आली. तुमच्या सहभागाकरता आभार!
तर जमा झालेली यंदाची देणगी आपण मैत्री संस्थेला दिली आहे.
मैत्रीचे कोऑर्डीनेटर हर्पेन यांच्याकडे देणगी रक्कम (टीशर्ट देणगी जमा ५३००/- + वविची शिल्लक रक्कम ५२०/-) सुपूर्त केली आहे.
पावती मिळाल्यानंतर इथे स्कॅन करुन पोस्ट करु.
--
धन्यवाद
Pages