मायबोली वर्षाविहार टीशर्ट्स २०२३

Submitted by ववि_संयोजक on 16 June, 2023 - 11:22

नारद: नारायण नारायण...!
प्रभू: या नारदमुनी, कसे काय येणे केलेत?
नारद: नमस्कार देवा, जरा पृथ्वीवर जावून येतो. एक मोठा हॅपनींग सोहळा कव्हर करायचे डोक्यात आहे यंदा, महाराष्ट्र प्रांती.
प्रभू: मायबोली वविला जाताय की काय?
नारद: तुम्हाला कसं कळलं?
प्रभू: अहो, चारेक वर्षाच्या गॅपनंतर होतोय हा सोहळा. चर्चा तर होणारच.
नारद: खरंय, कोविडच्या प्रलयानंतर आत्ता कुठे सगळे स्थिरावताहेत. या वर्षीचा ववि नक्कीच गाजणार..
प्रभू: पण हे काय? तुम्ही असेच जाणार आहात वविला? याच वेशात तुमची वीणा घेवून?
नारद: असं कसं बरं? खास मायबोली टीशर्ट ऑर्डर केलाय ना मी. मागवू काय तुमच्यासाठी सुद्धा? नारायण नारायण...

मंडळी, तुमचं काय? तुम्ही केलेत का बुक टीशर्ट? वाट कसली बघताय? शुभस्य शीघ्रम...

ऐन वर्षाविहाराच्या दिवशी सकाळी सकाळी होणाऱ्या या कुरबुरी टाळायच्या असतील तर आत्ताच मोबाईल उघडा आणि तुमची ऑर्डर बुक करून टाका. आणि आपल्या आवडत्या वविला खास वविसाठी बनवलेले खास मायबोली टीशर्ट परिधान करूनच हजेरी लावा.

सादर आहे मायबोली ववि स्पेशल टीशर्ट.
टीशर्ट खालील प्रकारात उपलब्ध असतील.
1. जेंट्स राउंड नेक
2. लेडीज व्ही नेक
3. किड्स राउंड नेक

टीशर्ट -
VaViTshirts.jpeg

सुलेखनाचा झूम-
VaViTshirtZoom.jpegजेंट्स आणि लेडीज टिशर्टांची मापे पुढिलप्रमाणे:
साईज - रुंदी(२L)-उंची(H)
XXL - 46"-33"
XL - 44"-31.5"
L - 42"-30"
M - 40"-28.5"
S - 38"-27"
XS - 36"-25.5"
XXS - 34"-24"

लहान मुलांच्या टीशर्टसाठी अंदाजे साईज:
वय वर्षे १-२ साठी - २२
वय ३-४ साठी - २४
वय ५-६ साठी - २६
वर ७-८ साठी - २८
वय ९-१० साठी - ३०
वय ११-१२ साठी - ३२
आणि तिथून पुढे रेग्युलर साईज
(हे फक्त एक कोष्टक आहे जे शक्यतो मध्यम शरीरयष्टीच्या मुलांसाठी बरोबर ठरते. लहान मुलगा प्रत्यक्षात कसा आहे त्यानुसारच ऑर्डर नोंदवा.)

महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक टीशर्टच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्‍या संस्थेला देतो. त्यामुळे टीशर्ट घेऊन आपण खारीचा का होईना, पण समाजासाठी एक वाटा उचलत असतो.

यंदाची देणगी आपण कुठल्या संस्थेला देणार त्याबद्दलची सविस्तर माहिती लवकरच मायबोलीवर प्रकाशित करू.

जेंट्स व लेडिज टी-शर्टची देणगीसह किंमत असेल रु. ३५०/- (३००/- टीशर्ट + ५०/- देणगी)
लहान मुलांच्या टी-शर्टची देणगीसह किंमत असेल रु. ३००/- (२५०/- टीशर्ट + ५०/- देणगी)
XXL पेक्षा मोठा साइज असेल तर देणगीसह किंमत असेल रू. ४००/- (३५०/- टीशर्ट + ५०/- देणगी)

टीशर्ट बुक कसे कराल?
टीशर्ट ऑर्डर्स बंद करीत आहोत

तुम्हाला किती आणि कोणते टीशर्ट्स हवेत हे ठरवून “--” वर पेमेंट करायचं आहे. नंतर खालील गुगल फॉर्म वर ऑर्डरचे तपशील ट्रांसॅक्शन आयडी सह भरुन सबमीट करावे.
कृपया ऑर्डर देण्यापुर्वी वर दिलेल्या किंमतीच्या चार्टप्रमाणे आपल्या सगळ्या ऑर्डरची टोटल रक्कम स्वतः तपासून तितकी रक्कम यूपीआय द्वारे भरावी.
ज्यांना प्रत्यक्ष भेटून टीशर्ट घेणं शक्य नाही ते कुरिअर सेवा (उदा. डन्झो/ स्विगी जिनी) नोंदवून संयोजकांकडून टीशर्ट घेऊ शकतात. अशी सेवा नोंदवण्याची पूर्ण जबाबदारी आणि खर्च हा सदर मायबोलीकराला करावा लागेल. अशी व्यवस्था करून टीशर्ट घेऊ इच्छिणाऱ्या मायबोलीकरांनी संयोजकांशी संपर्क साधावा.

टीशर्ट संयोजक डिटेल्स कन्फर्म करतील आणि काही चूक आढळल्यास त्या आयडीला/ व्यक्तीला संपर्क करुन काही बदल / अडचण असेल तर ती सोडवतील.

ऑर्डर डिटेल्स चा गुगल फॉर्म -
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdRexCR5GdrliNhyV3D-Sxv7YL6SBGW...

सद्ध्या तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, तेही त्वरीत- ते म्हणजे टीशर्टची ऑर्डर नोंदवायची, कारण ८ जुलै २०२३, रात्री १२ वाजेपर्यंत ही ऑर्डर नोंदवण्याची शेवटची तारीख आहे.

महत्त्वाचे-
१. टीशर्ट राऊंड नेक/ व्ही नेक प्रकारचे आहेत. हे टीशर्ट अंगाबरोबर बसतात, याची कल्पना असेलच. तर हे लक्षात घेऊन टीशर्टाचा साईझ त्याप्रमाणे ऑर्डर करा.
२. यावर्षीही टीशर्ट देशाबाहेर पाठवले जाणार नाहीत. देशाबाहेरच्या मायबोलीकरांना देशातल्या मित्र/ नातेवाईक/ मायबोलीकर मित्रांकडून टीशर्ट घेता येतील.
3. प्रत्यक्ष मिळणार्‍या वस्तूचा रंग फोटोत दिसणार्‍या वस्तूच्या रंगापेक्षा थोडासा वेगळा असू शकेल.

टीशर्ट कसे आणि कुठे मिळतील?

टीशर्ट मिळण्याची तारीख आहे २३ जुलै २०२३

मुंबई डिस्ट्रिब्युशन सेंटर्स -
ठाणे - आनंद चव्हाण आणि निलेश वेदक
दादर - कविता नवरे
बोरीवली - विनय भिडे

पुणे डिस्ट्रिब्युशन सेंटर्स - पुण्यातून नोंदवल्या जाणाऱ्या मागणीनुसार टीशर्ट कलेक्शन पॉईंट्स ठरवून जाहीर करू.

लोकहो, टी शर्ट संदर्भात काही चौकशी करायची असेल तर vavitshirt2023@gmail.com या इमेल पत्त्यावर मेल करून विचारणा करू शकता किंवा याच धाग्यावर तुमचा प्रश्न विचारा.

काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांना संपर्क साधू शकता.
१. विनय भिडे
२. हिमांशु कुलकर्णी

हे टीशर्ट आपल्याला आपल्या वर्षाविहारापर्यंत मिळणार आहेत!! वविला सर्व मायबोलीकर हे टीशर्ट घालून आले, तर काय धमाल येईल, कल्पना आली ना? तर, झटपट ऑर्डर नोंदवा !

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकीच्यांनाही आज दिवसभरात कंफर्मेशन मिळेल. आजचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे एंट्री येत आहेत आणि एक्सेल अपडेट करायचे काम सुरु आहे. प्रत्येकाला कंफर्मेशनचा इमेल / समस पाठवला जाईल.
सहकार्याबद्दल धन्यवाद Happy

तुम्ही दिलेल्या संपर्क क्रमांकावर समस / व्हॉट्स ॲपवर पोच दिली आहे. >>> मला तरी अजून नाही मिळाली. मी ऑर्डर २० जून ला नोंदवली होती.

मला तरी अजून नाही मिळाली. मी ऑर्डर २० जून ला नोंदवली होती>> तुम्ही दिलेल्या नंबरवर तुम्हाला दुपारी आणि आत्ता थोड्यावेळापुर्वीही sms पाठवला आहे. त्या नंबरवर व्हॉट्स ॲप दिसले नाही म्हणून समस केला होता. संपर्कातूनही इमेल केला आहे.
हे संयोजक टीम मेंबर म्हणून पोस्टत आहे.

हे टीशर्ट ववी झाल्यावर सुद्धा कडक मर्च.कॉम वर उपलब्ध करू शकाल का? मला घ्यायचे आहेत पण होम किंवा ऑफिस डिलिव्हरी मिळाली तर बरे पडेल. ववि अटेंड करणे काही शक्य नाही. पण काँट्रिब्युट करायला आवडेल.

अश्विनीमामी, आज ऑर्डर नोंदणीची शेवटची तारीख आहे. टीशर्ट घेणे आणि वविला येणे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. तुम्ही वविला येऊ शकत नसलात तरी टीशर्ट विकत घेऊ शकता.
टीशर्ट डिस्ट्रिब्युशन २३ जुलैला बोरीवली दादर ठाणे अशा तीन ठिकाणी असेल मुंबईत. या व्यतिरिक्त तुम्ही डंझो/we fast(borzo) असे पर्याय वापरूनही ते घरपोच मागवू शकता. त्याचे जे काही चार्जेस असतील ते मात्र तुम्हाला द्यावे लागतील.

ऑर्डर नोंदवण्यासाठी बाफमधे वर दिलाय त्या upi वर पेमेंट करुन मग गुगल फॉर्मवर माहिती भरायची आहे. काही अडचण आली किंवा काही शंका असतील तर नक्की विचारा Happy

संयोजक, ऑर्डर केली आहे पण थोडा उशीर झाला, त्याबद्दल मनापासून दिलगिरी.
ऑर्डर मिळाली का हे आणि ती ग्राह्य धरली जाईल का हे कृपया कळवाल का? धन्यवाद.

अंदाजे किती माबोकरांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे? बऱ्याच वर्षांनी उपक्रम होतोय म्हणून उत्सुकता.

Sorry Passwod विसरले मुळे booking करता आलं नाही, please आत्ता केलं तर चालेल का??
खूप महिने कमा मुळे मायबोली चेक करता आला नाही
Don't want to miss this chance

Sorry Passwod विसरले मुळे booking करता आलं नाही, please आत्ता केलं तर चालेल का??
खूप महिने कमा मुळे मायबोली चेक करता आला नाही
Don't want to miss this chance

धन्यवाद मायबोलीकर्स

आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी आपण शतक पार करत १०६ टीशर्टची नोंदणी संख्या गाठली आहे.

२३ तारखेला टीशर्ट डिस्ट्रिब्युशन होईल. त्याबद्दलची सविस्तर माहिती इथे आणि तुम्ही दिलेल्या व्हॉट्स ॲप नंबरवर पाठवली जाईल. कुरिअर पर्याय निवडलेल्यांना त्यासंदर्भातला मेसेजही त्याच दरम्यान पाठवला जाईल याची नोंद घ्यावी.

असाच उत्साह आणि प्रतिसाद ववि नोंदणीतही दिसेल अशी आम्ही आशा करतो. धन्यवाद

तनु स्पॅम मेलही चेक केलात का

मी स्वतः पाठवला आहे ईमेल आणि मला कॉपी आली आहे ईमेलवर

काही हरकत नाही. आता तसेही बुकिंग पुर्णच बंद झाले आहे. पुढल्या वर्षी असा धागा निघाला तर सगळ्यात आधी ठिय्याच मांडा इथे Lol

जोक्स अपार्ट, आता कोणतीही ऑर्डर स्विकारता येणार नाही हे खेदपुर्वक नोंदवत आहे.

केया, २३ तारखेला आहे टीशर्ट डिस्ट्रिब्युशन. अपडेट उद्यापर्यंत इथे/ पर्सनली मेसेज किंवा कॉंटॅक्ट करुन कळवले जातील

जर खूप जणांना अजूनही घ्यायचे असतील तर दुसरी आवृत्ती काढता येईल.

किंवा मग वर्षा विहार झाल्यावर कोणाला ते विकायचे असतील आणि कोणी निम्या किमतीत सेकंडहेंड घ्यायला तयार असेल तर तो ही एक पर्याय आहे.

Pages