मायबोली वर्षाविहार टीशर्ट्स २०२३

Submitted by ववि_संयोजक on 16 June, 2023 - 11:22

नारद: नारायण नारायण...!
प्रभू: या नारदमुनी, कसे काय येणे केलेत?
नारद: नमस्कार देवा, जरा पृथ्वीवर जावून येतो. एक मोठा हॅपनींग सोहळा कव्हर करायचे डोक्यात आहे यंदा, महाराष्ट्र प्रांती.
प्रभू: मायबोली वविला जाताय की काय?
नारद: तुम्हाला कसं कळलं?
प्रभू: अहो, चारेक वर्षाच्या गॅपनंतर होतोय हा सोहळा. चर्चा तर होणारच.
नारद: खरंय, कोविडच्या प्रलयानंतर आत्ता कुठे सगळे स्थिरावताहेत. या वर्षीचा ववि नक्कीच गाजणार..
प्रभू: पण हे काय? तुम्ही असेच जाणार आहात वविला? याच वेशात तुमची वीणा घेवून?
नारद: असं कसं बरं? खास मायबोली टीशर्ट ऑर्डर केलाय ना मी. मागवू काय तुमच्यासाठी सुद्धा? नारायण नारायण...

मंडळी, तुमचं काय? तुम्ही केलेत का बुक टीशर्ट? वाट कसली बघताय? शुभस्य शीघ्रम...

ऐन वर्षाविहाराच्या दिवशी सकाळी सकाळी होणाऱ्या या कुरबुरी टाळायच्या असतील तर आत्ताच मोबाईल उघडा आणि तुमची ऑर्डर बुक करून टाका. आणि आपल्या आवडत्या वविला खास वविसाठी बनवलेले खास मायबोली टीशर्ट परिधान करूनच हजेरी लावा.

सादर आहे मायबोली ववि स्पेशल टीशर्ट.
टीशर्ट खालील प्रकारात उपलब्ध असतील.
1. जेंट्स राउंड नेक
2. लेडीज व्ही नेक
3. किड्स राउंड नेक

टीशर्ट -
VaViTshirts.jpeg

सुलेखनाचा झूम-
VaViTshirtZoom.jpegजेंट्स आणि लेडीज टिशर्टांची मापे पुढिलप्रमाणे:
साईज - रुंदी(२L)-उंची(H)
XXL - 46"-33"
XL - 44"-31.5"
L - 42"-30"
M - 40"-28.5"
S - 38"-27"
XS - 36"-25.5"
XXS - 34"-24"

लहान मुलांच्या टीशर्टसाठी अंदाजे साईज:
वय वर्षे १-२ साठी - २२
वय ३-४ साठी - २४
वय ५-६ साठी - २६
वर ७-८ साठी - २८
वय ९-१० साठी - ३०
वय ११-१२ साठी - ३२
आणि तिथून पुढे रेग्युलर साईज
(हे फक्त एक कोष्टक आहे जे शक्यतो मध्यम शरीरयष्टीच्या मुलांसाठी बरोबर ठरते. लहान मुलगा प्रत्यक्षात कसा आहे त्यानुसारच ऑर्डर नोंदवा.)

महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक टीशर्टच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्‍या संस्थेला देतो. त्यामुळे टीशर्ट घेऊन आपण खारीचा का होईना, पण समाजासाठी एक वाटा उचलत असतो.

यंदाची देणगी आपण कुठल्या संस्थेला देणार त्याबद्दलची सविस्तर माहिती लवकरच मायबोलीवर प्रकाशित करू.

जेंट्स व लेडिज टी-शर्टची देणगीसह किंमत असेल रु. ३५०/- (३००/- टीशर्ट + ५०/- देणगी)
लहान मुलांच्या टी-शर्टची देणगीसह किंमत असेल रु. ३००/- (२५०/- टीशर्ट + ५०/- देणगी)
XXL पेक्षा मोठा साइज असेल तर देणगीसह किंमत असेल रू. ४००/- (३५०/- टीशर्ट + ५०/- देणगी)

टीशर्ट बुक कसे कराल?
टीशर्ट ऑर्डर्स बंद करीत आहोत

तुम्हाला किती आणि कोणते टीशर्ट्स हवेत हे ठरवून “--” वर पेमेंट करायचं आहे. नंतर खालील गुगल फॉर्म वर ऑर्डरचे तपशील ट्रांसॅक्शन आयडी सह भरुन सबमीट करावे.
कृपया ऑर्डर देण्यापुर्वी वर दिलेल्या किंमतीच्या चार्टप्रमाणे आपल्या सगळ्या ऑर्डरची टोटल रक्कम स्वतः तपासून तितकी रक्कम यूपीआय द्वारे भरावी.
ज्यांना प्रत्यक्ष भेटून टीशर्ट घेणं शक्य नाही ते कुरिअर सेवा (उदा. डन्झो/ स्विगी जिनी) नोंदवून संयोजकांकडून टीशर्ट घेऊ शकतात. अशी सेवा नोंदवण्याची पूर्ण जबाबदारी आणि खर्च हा सदर मायबोलीकराला करावा लागेल. अशी व्यवस्था करून टीशर्ट घेऊ इच्छिणाऱ्या मायबोलीकरांनी संयोजकांशी संपर्क साधावा.

टीशर्ट संयोजक डिटेल्स कन्फर्म करतील आणि काही चूक आढळल्यास त्या आयडीला/ व्यक्तीला संपर्क करुन काही बदल / अडचण असेल तर ती सोडवतील.

ऑर्डर डिटेल्स चा गुगल फॉर्म -
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdRexCR5GdrliNhyV3D-Sxv7YL6SBGW...

सद्ध्या तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, तेही त्वरीत- ते म्हणजे टीशर्टची ऑर्डर नोंदवायची, कारण ८ जुलै २०२३, रात्री १२ वाजेपर्यंत ही ऑर्डर नोंदवण्याची शेवटची तारीख आहे.

महत्त्वाचे-
१. टीशर्ट राऊंड नेक/ व्ही नेक प्रकारचे आहेत. हे टीशर्ट अंगाबरोबर बसतात, याची कल्पना असेलच. तर हे लक्षात घेऊन टीशर्टाचा साईझ त्याप्रमाणे ऑर्डर करा.
२. यावर्षीही टीशर्ट देशाबाहेर पाठवले जाणार नाहीत. देशाबाहेरच्या मायबोलीकरांना देशातल्या मित्र/ नातेवाईक/ मायबोलीकर मित्रांकडून टीशर्ट घेता येतील.
3. प्रत्यक्ष मिळणार्‍या वस्तूचा रंग फोटोत दिसणार्‍या वस्तूच्या रंगापेक्षा थोडासा वेगळा असू शकेल.

टीशर्ट कसे आणि कुठे मिळतील?

टीशर्ट मिळण्याची तारीख आहे २३ जुलै २०२३

मुंबई डिस्ट्रिब्युशन सेंटर्स -
ठाणे - आनंद चव्हाण आणि निलेश वेदक
दादर - कविता नवरे
बोरीवली - विनय भिडे

पुणे डिस्ट्रिब्युशन सेंटर्स - पुण्यातून नोंदवल्या जाणाऱ्या मागणीनुसार टीशर्ट कलेक्शन पॉईंट्स ठरवून जाहीर करू.

लोकहो, टी शर्ट संदर्भात काही चौकशी करायची असेल तर vavitshirt2023@gmail.com या इमेल पत्त्यावर मेल करून विचारणा करू शकता किंवा याच धाग्यावर तुमचा प्रश्न विचारा.

काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांना संपर्क साधू शकता.
१. विनय भिडे
२. हिमांशु कुलकर्णी

हे टीशर्ट आपल्याला आपल्या वर्षाविहारापर्यंत मिळणार आहेत!! वविला सर्व मायबोलीकर हे टीशर्ट घालून आले, तर काय धमाल येईल, कल्पना आली ना? तर, झटपट ऑर्डर नोंदवा !

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एनीवे मला पैशाच्या गोष्टी करण्यात अजिबात रस नाही. ते फक्त फलक यांना दिलेले उत्तर होते. इथे फुकटचा हा प्लॅटफॉर्म मला मिळतो त्यातच मी उपकृत आहे. function at() { [native code] }यलम.

एनीवे मला पैशाच्या गोष्टी करण्यात अजिबात रस नाही. ते फक्त फलक यांना दिलेले उत्तर होते.
>>> अगदीच थातूरमातूर कारण

मागच्या पानावरचा प्रतिसाद बहुतेक आता खोडता येणार नाही पण दिलगिरी व्यक्त करायला हरकत नसावी.

जमलेल्या रकमेतील एकही पै संयोजक स्वतःसाठी वापरत नाहीत.
>>>

हे न सांगताही माहीत होते, किंवा ते कळते Happy
जर मित्रांचा ग्रूप असेल तर संयोजनाची आपलीच एक मजा असते..

admin यांचा प्रतिसाद वाचला नव्हता. त्यांना विपू केलेला आहे. परत एकदा माफी मागते. हा विषय इथेच थांबवा कारण खरोखर वाईट हेतू नव्हता. असो!

दिलगिरी व्यक्त केलीत हे ठीक केलंत सामो.

माझ्या म्हणण्यामागेही तुमच्याविरुद्ध वैयक्तिक असे काहीही नव्हते / नाही.
तुमचा हेतू खरोखरच वाईट नसावा हे तुमच्या माबोवरच्या इतरवेळेच्या वावरामुळे वाटले होते.
पण सध्याच्या काळात, माणसांचे, ज्यातून आर्थिक लाभ अजीबात होणार नाहीये अशाप्रकारच्या सार्वजनिक कामाकरता निरलसपणे स्वयंसेवक म्हणून पुढे येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस घटते आहे. अशा वेळी स्वयंस्फुर्तीने कामे करणारी माणसे हतोत्साहीत होण्याची शक्यता असलेले कुठल्याही प्रकारचे जाहीर वक्तव्य अगदी गंमत म्हणूनही केले जाऊ नये किंवा तसे केल्यास ते चालून जाते असा समज पसरू नये हाच माझाही हेतू होता.

त्यामुळे दिलगिरी व्यक्त केलीत त्याबद्दल धन्यवाद सामो.

माझ्यामते माफीची गरज नव्हती. ती तुम्हाला मागावी लागली ह्याकरता खेद व्यक्त करतो.

मागच्या पानावरचा प्रतिसाद बहुतेक आता खोडता येणार नाही पण दिलगिरी व्यक्त करायला हरकत नसावी.

Submitted by हर्पेन on 28 June, 2023 - 10:05

माझ्यामते माफीची गरज नव्हती. ती तुम्हाला मागावी लागली ह्याकरता खेद व्यक्त करतो.

नवीन Submitted by हर्पेन on 29 June, 2023 - 10:18

Irony Irony म्हणतात ती हीच का?
माफी आणि दिलगिरी मध्ये फरक आहे का?

@रिया, केया आणि कुंतल, पोच द्यायला उशीर झाल्याबद्दल क्षमस्व.

तुम्ही दिलेल्या संपर्क क्रमांकावर समस / व्हॉट्स ॲपवर पोच दिली आहे.

तुमची ऑर्डर नोंदवली गेली आहे. धन्यवाद

Pages