तुम्ही का वाचता?

Submitted by सामो on 7 June, 2023 - 11:22

काही लोक वाचनाची अजिबात आवड नसलेले तर काही वाचनाशिवाय जगूच न शकणारे. पैकी मी या स्पेक्ट्रममध्ये कुठे तरी पडते. पुस्तकवेडी आहे मी. लहानपणीच्या माझ्या आठवणी म्हणजे - वाचनात गढलेल्या, आई किंवा बाबांच्या शेजारी पडून त्यांचे नीरीक्षण करणे. मासिकांत तर चित्र नाहीत मग ही मोठी मंडळी पान का उलटत नाहीत - हा प्रश्न मला पडलेला लख्ख आठवतो. पुढे अक्षरांशी ओळख झाल्यानंतर, अक्षरक्षः दुकानावरच्या पाट्यांपासून ते भेळेच्या कागदापर्यंत सर्वाहारी वाचक अशी मी अमेरीकेत येउन हरवुन गेले होते. काही काळ मराठी वाचनापासून वंचित राहील्याने कठीण गेला. त्यातून मग मराठी संस्थळे सापडत गेली. मराठी संस्थळांच्या संस्थापकांचे ऋण मानावे तितके थोडे आहेत. आता तर किंडलवरही मराठी, हिंदी पुस्तके उपलब्ध आहेत. अनेकानेक ब्लॉग्ज आहेत तेव्हा आता मराठीची उपासमार राहीलेली नाही.

मला मराठी खालोखाल हिंदी वाचन फार आवडते. शुद्ध हिंदी, संस्कृतप्रचुर हिंदी function at() { [native code] }इशय गोड व रुबाबदार भाषा आहे. अनेक कविता, लेख, उपन्यास(कादंबरी), नाटकख, प्रवासवर्णने, व्यंग (विनोदी लेखन). जालावरती भरभरुन हे साहित्य आता उपलब्ध आहे. वाचनाने मला मनःपूत आनंद तर मिळतोच परंतु आय अ‍ॅम पुट टुगेदर. मला विस्कळीत, दिशाहीन वाटत नाही. बरेचदा तर राग, घॄणा, कटकट आदि नकारात्मक विचारांपासून एक सुटका म्हणुन मी वाचते. वाचन माझ्याकरता अमॄतमय आहे, मला 'सेन' ठेवण्याकरता , फन्क्शनल ठेवण्याकरता गजेचे आहे. हां मग आपल्याला जगाची ओळख होते, माहीती मिळते, आत्मविकास होतो, आदि रुक्ष गोष्टी नंतर. आधी महत्वाचे मला पात्रांमध्ये परकाया प्रवेश करुन त्यांचे जीवन जगता येते. मला माझ्यापासून एक सुटका मिळते.

बुक्स ऑइल अवर ब्रेन. वंगणाचे काम करतात पुस्तके. विचारक्षमतेला, बुद्धीला गंज लागू देत नाहीत.

एकदाच मला चोरी करण्याची इच्छा झालेली होती. तीव्रतेने. पण अर्थात करु शकले नाही - तेही बरेच झाले. १९९६- भारतात, 'लायब्ररी सेक्रेटरी' नात्याने, हॉस्टेलवरती मीच लायब्ररीचे काम पाही. म्हणजे कोणी काय पुस्तके नेली/ परत केली वगैरे. त्यात मी एक पुस्तक घेउन वाचले होते ते म्हणजे 'द शॉर्ट स्टोरीज ऑफ गाय द मोपासा'. मला ते पुस्तक विलक्षण आवडले होते. तेव्हा भारतात , परदेशी पुस्तके सहजासहजी उपलब्ध नसत. त्यामुळे ते पुस्तक चोरण्याचा प्र-ह-चं-ड मोह झालेला होता. अर्थात चोरले नाही.

सर्वात सुंदर चेहरा कोणता तर वाचनामध्ये गढून गेलेल्या, हरवुन गेलेल्या व्यक्तीचा - हे माझ्यापुरता सत्य उत्तर आहे. ग्रंथालयात सर्वात सुंदर चेहरे पहायला मिळतात तर कधी प्रवासात.

'तुम्ही का वाचता? तुम्हाला वाचनामधुन काय मिळते?' या प्रश्नाचे उत्तर ऐकायला खूप आवडेल. तुमचे वाचनासंबंधी उत्कट विचार ऐकायला आवडतील. अन्य पेरिफेरल विषय स्पर्श केलेत जसे वाचनाची गोडी कशी लागली, त्या अनुषंगाने झालेल्या गंमती - तर तेही ऐकायला आवडेल. पुस्तके न आवडणार्‍या लोकांना , वाचन या छंदाविषयी काय वाटते तेही ऐकायला आवडेल. त्यांना वाचन ओव्हररेटेड छंद वाटतो का? लोक त्यांना वाचन आवडत नाही म्हणुन कमी लेखतात का वगैरे वगैरे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

का वाचते? वाचायचे व्यसन आहे, जे सोडवण्याचा कुणी प्रयत्नच नाही केला. कारण आजूबाजूला समव्यसनी नातेवाईक, मित्र-मैत्रिणी आणि आता तुमच्यासारखे सोशल मिडीआवर साथी मिळत गेले.

ह पा...आता वाचायला पुन्हा चालू करा. गटणेच पाणी वाहतं झालं.... आपलंही होऊ द्या.

--x--
केकू:

प्रोग्राम मधे अजून एक टाका:

६====पु भा प्र

मी आधी खूप वाचत असे. आता ते १० टक्क्यावर आले आहे.

आता कर्मबाह्य वाचनाची अजिबात गरज वाटत नाही. वाचन खूपच ओव्हररेटेड गोष्ट आहे.

आता नवीन तंत्रज्ञानामुळे पाहिजे त्या प्रकारचे चवीचे बौद्धिक खाद्य मिळायची सोय होत आहे.

शिवाय मुळातच मानवी मन हे स्थिर राहू शकत नाही त्याला दोन तीन तास एखाद्या एकांगी गोष्टीत गुंतुवून ठेवणे मला अन्यायकारक वाटते.

>>>>आता नवीन तंत्रज्ञानामुळे पाहिजे त्या प्रकारचे चवीचे बौद्धिक खाद्य मिळायची सोय होत आहे.
१००% खरे आहे. परंतु ऑनलाइन माहीती फार शॅलो असते. पुस्तकांसारखी सखोल व संपूर्ण आढावा घेत नाही.

>>>शिवाय मुळातच मानवी मन हे स्थिर राहू शकत नाही त्याला दोन तीन तास एखाद्या एकांगी गोष्टीत गुंतुवून ठेवणे मला अन्यायकारक वाटते.
हम्म्म रोचक मुद्दा आहे. पण मला अगदी उलटे वाटते.

ह पा...आता वाचायला पुन्हा चालू करा. गटणेच पाणी वाहतं झालं.... आपलंही होऊ द्या. >> नक्कीच Happy

साहित्याशी एकनिष्ठ रहा या संदेशाची गरज गटणेपेक्षा मला होती. सध्या पुस्तकं वाचायला जमत नसली तरी ऐकायला सुरुवात केली आहे. ऑडिओ बुक्स.

Pages