भारताच्या रेल्वे इतिहासातील सर्वात दुर्दैवी व भीषण अपघात

Submitted by ढंपस टंपू on 3 June, 2023 - 23:49

भारताच्या रेल्वे इतिहासात आजवर अनेक अपघात झाले. पण परवा बालासोर इथे झालेला दुर्दैवी अपघात हा समोरासमोर तीन रेल्वेगाड्यांची टक्कर झाल्याने भारताच्या रेल्वे इतिहासातला अत्यंत भीषण अपघात म्हणावा लागेल. या आधी ६ जानेवारी १९८१ रोजी बिहार मधे बागमती नदीत रेल्वेगाडी घसरून ७०० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. हा आजवरचा सर्वात भीषण अपघात समजला जातो.

बालासोरच्या दुर्दैवी घटनेत आता पर्यंत २९४ मृत तर ११०० प्रवासी जखमी आहेत. जस जसे मदत कार्य पुढे जाईल तसतसा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

पण ज्या पद्धतीने तीन ट्रेन्स एकमेकांना धडकल्या ते पाहता यात मानवी चूक आहे का असा प्रश्न पडतो. आतापर्यंत २९५ लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. नदीत पडल्याने मृतांचा आकडा जास्त असणार हे उघड आहे. ती घटनाही लाजिरवाणीच आहे. पण तीन गाड्या एकमेकांवर कशा काय धडकू शकतात ? यात मानवी चूक आहे का ?

रेल्वेमंत्री वैष्णव यांनी आता कवच तंत्रज्ञानामुळे रेल्वे अपघात विसरून जा असे त्यांच्या एका प्रेझेंटेशन मधे सांगितले होते. तरी हा अपघात कसा काय झाला ?

जगभरात भारताच्या रेल्वेगाड्या, इंजिन्स निर्यात करण्याची घोषणा केली होती. या अपघातामुळे आयात करणार्‍या देशांवर परिणाम होईल का ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बहुतेक अपघात सिग्नल यंत्रणेत बिघाड आणि संभाषणात डिले(पहिला अपघात झाल्यावर) आणि एकंदर दुर्दैव यामुळे.5 मिनिटांच्या आत टक्कर झालीय.सर्व बातम्यांत वेगवेगळे अकाउंट आहेत.एका बातमीने म्हटलंय की कोरोमंगल आधीच मालगाडी उभी असलेल्या लाईनवर पाठवली गेली आणि त्यामुळे धडकून डिरेल झाली.काही बातम्यांत म्हटलंय की आधी डिरेल झाली मग मालगाडी वर धडकली.यात उष्णता, प्रसरण पावलेले ट्रॅक, डब्याच्या कनेक्शन मधील बिघाड हेही निघू शकतं.सध्या तरी काही ठाम सांगता येत नाही.त्यातही ब्लेम गेमिंग होणार.छोट्यातला छोटा घटक दोषी ठरवून निलंबित होणार.
अतिशय वाईट घटना.शक्यतो असं होऊ नये भविष्यात.

खूपच भयानक दृश्य आहेत अपघाताची !
नोकरी जाण्याची भीती नसलेल्या आणि रोजगारात स्पर्धा माहित नसलेल्या कामचुकार बाबूगिरींच्या ताब्यात आपला जीव ठेवून आपल्याला प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो .
एक तर कुठे तरी निष्काळजीपणाच झाल्याची शक्यता जास्त , इतर शक्यता कमी .......

भारतीय जनता पक्षाने या आधी प्रत्येक रेल्वेमंत्र्याचा राजीनामा मागितलेला आहे. माधवराव सिंधिया आणि लालबहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता.
https://www.indiatoday.in/magazine/special-report/story/19930131-madhavr...

India Today किंवा Hindustan Times च्या बातम्या पाहा. रेल्वे रुळावरून घसरल्यानंतर आपटल्या.

वर एबीपी माझा ची लिंक दिली आहे. एकाच ट्रॅक वर जर ट्रेन असतील तर इमर्जन्सी ब्रेक लावायला ८०० मीटरचं अंतर आवश्यक असतं. त्यात रात्रीची वेळ. इंजिन ड्रायव्हरला इंजिनच्या वर जो दिवा असतो त्याच्या प्रकाशात जेव्हढे दिसेल तितकेच दिसते.

एलफिन्स्टन रेल पुलावराच्या चेंगराचेंगरी आणि मृत्यूमुळे अत्यंत कार्यक्षम अशा सुरेश प्रभू ह्यांना राजीनामा द्यावा लागला होता. तो रेल अपघात नसूनही.

बीबीसीवर एक लेख आहे आजवर भारतात झालेले रेल्वे अपघात. ६ जून १९८१ रोजी रेल्वे नदीत पडून ८०० प्रवासी मृत्युमुखी पडल्याचा उल्लेख त्यात आहे. रेल्वेच्या इतिहासातील हा बहुधा सर्वाधिक भीषण अपघात असेल. त्यानंतरही अनेक अपघात झालेत. आजच्या काळात जीपीएस, मोबाईल, इंटरनेट आणि इतर अनेक इत्यादी तंत्रज्ञानं उपलब्ध असतानाही रेल्वे रेल्वेवर किंवा अन्य वाहनांवर आदळून अपघात कसे काय होऊ शकतात असे मनात येते खरे. पण या व अशा अपघातांत जेव्हा एक रेल्वे रुळावरून घसरून अचानक दुसऱ्या रेल्वेवर धडकते किंवा अचानकपणे आडवी येते तेंव्हा अपघात अपरिहार्य आहे. या केसमध्ये रुळावरून घसरणे हे मुख्य कारण होईल. या कारणामुळे पुर्वीही भीषण अपघात झालेत. मग रुळ मेंटेनन्सवाले जबाबदार की रेल्वे मेंटेनन्सवाले जबाबदार की अजून कोण जबाबदार असे ते सगळे क्लिष्ट होत जाते. आणि अखेर वरती एका प्रतिसादात म्हटल्यानुसार सर्वात दुबळा दुवा (weakest link) दोषी ठरवून प्रकरण मिटते. हे सगळे फार दुर्दैवी आहे Sad

सुरेश प्रभू यांना वेगळ्या कारणाने राजीनामा द्यावा लागला. मोदींनी त्यांचा अपघाताच्या वेळी राजीनामा स्विकारला नाही.
https://www.dtnext.in/national/2017/08/23/railway-minister-suresh-prabhu...

२०१२ कि १३ मधे रेल्वेने रूळांची क्षमता तपासली होती. त्या वेळी १६० च्या वेगाने रेल्वे जाऊ शकते असा अहवाल सादर केला होता. पण अपघाताच्या दृष्टीकोणातून रेल्वेचा सरासरी वेग ११० ते १२० ठेवण्यात आलेला होता. कित्येक ट्रेन्स ८० ते ९० या कमाल वेगाने जातात. सुपरफास्ट ट्रेन्स रात्रीच्या वेळी १४० पर्यंत वेग नेतात. पण ते ही मोकळ्या ट्रॅकवर. रोजच्या मार्गावर असल्याने सिग्नल्स आणि येणार्‍या जाणार्‍या ट्रेन्स याची माहिती ड्रायव्हरला असते.

या सरकारने वेगाला जास्त प्राधान्य दिले. ८० ते ९० च्या वेगात इमर्जन्सी ब्रेक लावल्यास रेल्वे रूळावरून घसरण्याची शक्यता कमी असते. पण १२० च्या पुढे वेग नेल्यास जर इमर्जन्सी ब्रेक लावायची वेळ आली तर डबे घसरण्याची शक्यता वाढते. त्यातही ८०० मीटरच्या आत समोर काही आले तर ब्रेक लावता येत नाही.

शेठ चे जसे निर्देश येतील त्या प्रमाणे सरकारी गुलाम मीडिया houses अपघात कसा झाला ह्याची माहिती तोडून,कल्पनेने प्रसारित करतील.
इंडिया टुडे, आणि हिंदुस्तान टाइम्स la शेठ चे निर्देश लवकर मिळाले वाटते.

अपघात धक्कादायक आहे.

कवच यंत्रणा या अपघाताच्या वेळी या गाड्यांमधे कार्यरत होती का? माझ्या माहिती प्रमाणे कवच यंत्रणे च्या चाचण्या सुरु आहे, implementation २०२४ मधे होणार आहे.

एका पेक्षा जास्त चूका एकाच वेळी झाल्यास असे अपघात घडतात.

१.) रेल्वे अपघात कशामुळे झाला याची माहिती नाही. पण या निमित्ताने एकूणच मानवी चुका टाळण्यासाठी होणारे आधुनिकीकरण कितपत सुरक्षित आहे याचा प्रश्न पडतो. मुंबईची लोकल आणि तिची सिग्नल सिस्टीम कित्येक वर्षे निर्दोष चालू आहे. पण त्यात सुद्धा मानवी हस्तक्षेप करता येतो.

मध्यंतरी इस्त्रो च्या सहाय्याने कवच ही यंत्रणा बनल्याचे वाचले होते. तसेच भारतातल्या सर्वच सिग्नल्स हे अ‍ॅटोमॅटीक यंत्रणेशी जोडले जाणार / जोडले असल्याचेही वाचले होते. नवीन सरकार असल्याने यांच्याकडे ट्रायल्स साठी किती वेळ आहे ही शंका आहे. एखादी नवी यंत्रणा उभारताना तिचे व्हॅलिडेशन होण्यासाठी आधी टेक्निकल ट्रायल्स घ्याव्या लागतात. या प्रत्येक ट्रायलमधे दोष दूर केले जातात. त्यानंतर युझर ट्रायल्स व्हाव्या लागतात. इथे युजर रेल्वे आहे. त्या अधिकार्‍यांचे समाधान होईपर्यंत बदल, सुधारणा कराव्या लागतात. डिफेन्स मधे ही प्रोसेस वेल सेट असते.

हे झालेय का ? कल्पना नाही.

२) फॅक्टर ऑफ सेफ्टी : - पूर्वी भारतात जड वाहने बनवताना त्याचा FOS हा दुप्पटपेक्षा जास्त असे. आमच्या सरांनी सांगितले त्याप्रमाणे टाटाच्या ट्रक्समधे तो ३ ते ४ असायचा. खखो माहिती नाही. पण अशा ओव्हरडिजाईन मुळे टाटाच्या ट्रकची क्षमता जर १२ टन दिलेली असेल तर २४ टनाचा माल लादला जात असे. टाटाच्या ट्रकला काही होत नाही ही धारणा त्यावेळी असायची.

३ ते ४ हे खूप आहे. त्यामुळे खरंच असा फॅक्टर घेत असतील तर तो खूपच जास्त आहे. म्हणजे डिजाईन लोडच्या ३०० ते ४०० टक्के. २ म्हणजे २०० टक्के किंवा दुप्पट. पुढे जपानी तंत्रज्ञान येत गेले. त्यात इकॉनॉमी हा महत्वाचा मुद्दा होता. त्यामुळे ऑप्टिमम फॅक्टर ऑफ सेफ्टी असे. निस्सान च्या ट्रक मधे १.२ हा फॅक्टर असे. अशोक लेलँड त्या वेळी १.८ इतका ठेवत असे.

कमी एफओएस मुळे या गाड्या वजनाला हलक्या, किफायतशीर, इंधन कार्यक्षम ठरत गेल्या. याचा परिणाम म्हणून टाटाच्या गाड्याही हलक्या होत गेल्या.

पुढे हे कमीत कमी एफओएस चे तंत्र सगळीकडेच शिरले. पूर्वीचे रेल्वे कोचेस पाहिले तर पत्रा किती जाड आहे हे दिसेल. आता अगदी पातळ पत्रा असतो.

पूर्वी डिजाईन कॅल्क्युलेशन केली जात नसत असे बिल्कुल नाही. एव्हढा जास्त सेफ्टी फॅक्टर घेण्यामागे भारतातल्या युजरचा वापर , अनफोरसीन फॅक्टर्स हे विचारात घेतले जात. त्यामुळे ओव्हरडिजाईन केले जाई. आजही रेल्वेच्या टपावर प्रवासी बसून जातात. एका डब्यात ६४ प्रवासी बसून प्रवास करू शकतात. प्रत्यक्षात एका डब्यात आरक्षित + अनारक्षित मिळून २०० प्रवासी गर्दीच्या वेळी कोंबलेले असतात. हा लोड डिजाईनच्या वेळी विचारात घेणे शक्य नसते.

तेच सिग्नल यंत्रणेच्या बाबतीत. वीज जाणे, पावसाचे पाणी शिरणे, उंदराने कुरतडणे अशा कित्येक गोष्टी डिजाईन तेबलवर विचारात घेणे शक्य नसते. त्यामुळे १००% ऑटोमायजेशन शक्य असूनही ते केले जात नाही. मानवी हस्तक्षेप ठेवला जातो.

वर वेगाचा मुद्दा आलेला आहे. जर १६० प्रतितास ही क्षमता असूनही ८० च्या वेगाने ट्रेन्स चालत असतील तर एफओएस २ ठेवला आहे असे समजायचे. याच्यामागे एकच भीती आहे ती म्हणजे विचारात न घेतलेल्या घटकांमुळे होणारी दुर्घटना टाळणे.

गेल्या काही दशकात हा अ‍ॅप्रोच हास्यास्पद असल्याचे मत व्यक्त होते. त्यामुळे कमीत कमी सेफ्टी फॅक्टर हे अचूक डिजाईनचे निदर्शक मानले जाऊ लागले आहे. पण याचीच दुसरी बाजू म्हणजे अपघातानंतर अमूक तमूक फॅक्टर डिजाईनच्या वेळी लक्षात घेतला नसल्याचे लक्षात येते.
याचा सुवर्णमध्य काय आहे हे सांगता येत नाही.

लाखो किमी अस्तित्वात असलेल्या रेल्वे मार्गांच्या तसेच पूलांच्या आणि सिग्नल यंत्रणांच्या दुरुस्तीची/ देखभाली ला मोठे प्राधान्य मिळायला हवे. सबंध रेल्वे ट्रॅक मोकळा आहे. वर्षाला २० हजार लोक यामधे अडकून मारले जातात. जनावरे किती मरत असतील हे कुणालाही माहित नाही.

काही वर्षा पूर्वी कुर्ला स्टेशन ला पायऱ्यांवर चकाचक लाद्या लावल्या होत्या.
पावसात लोक घासरून पडू लागली तेव्हा त्या बदलून टाकल्या.
इतके अधिकारी आणि इंजिनिअर हुशार आहेत.
सर्रास चुकीची design तुम्हाला बघायला मिळतील .
लोक तंत्र ज्ञान मध्ये पुढे जात आहेत आणि आपण मागे जात आहे.
आमच्या गावात ओढ्यावर पुल बांधले होते ते असे डिझाईन केले होते आणि अशा ठिकाणी बांधले होते की पाणी पुला खालून न जाता पुलावरून च जात होते..
Cyrus मिस्त्री ह्यांचं अपघात पण रस्त्याच्या चुकीच्या डिझाईन मुळेच झाला होता

<< Cyrus मिस्त्री ह्यांचं अपघात पण रस्त्याच्या चुकीच्या डिझाईन मुळेच झाला होता >>

------- तो अपघात over speeding (८९ kph) मुळे झाला होता असे प्राथमिक चौकशी अंती स्पष्ट झाले ना?
https://www.indiatoday.in/india/story/cyrus-mistry-death-probe-car-accid...

रस्त्याच्या डिझाईन मधे काय दोष होते? अपघातामधे तो एक फॅक्टर असेल.

चकाचक पायर्‍या इत्यादी गोष्टी राजकारण्यांच्या दबावामुळे होतात. अगदी ढ अभियंत्याला सुद्धा अ‍ॅण्टी स्कीड डिजाईन माहिती असते. गावखात्यात कसलेही डिजाईन नसते. ठेकेदार बांधेल ती पूर्वदिशा. ग्रामपंचायत किंवा जिपच्या कामात डिजाईन असल्याचे दाखवून द्या. सगळा भ्रष्टाचार.

खरं आहे भ्रष्ट्राचार याच नेत्यांचा जीव घेतो तरी सुधारत नाही.
बी अर् टी विरोधात सामान्य नागरिक होतेच , पण त्याच बी अर् टी च्या जीवघेण्या मार्गात काँग्रेसच्या माजी महापौर च्या पुतण्याच्या जीव गेला तर तो माझी महापौर पण नागरिकांच्या बाजूने निदर्शने करत होता.
पुण्यातील बी अर् टी कुचकामी आणि पैशांची नासाडी करणारी आहे हे सामान्य पुणेकर ला देखील माहित होते .पण राष्ट्रवादी आणि काँग्रेस च्या पुढाऱ्यांनी केंद्रातून मिळणाऱ्या हजारो कोटींच्या निधीवर डोळा ठेवून राबवली , पुढे भाजप च्या नेत्यांनी तीच री ओढली आणि आजतागायत ती यशस्वी झाली नाही .
>>>>>>>>
चकाचक पायर्‍या इत्यादी गोष्टी राजकारण्यांच्या दबावामुळे होतात. >>>>>>>>
आमच्या भागातील आम्हीच निवडून दिलेल्या (२०१४ ला मोदींच्या नावाखाली कचरा निवडून दिला होता तो २०१९ ला पडला ) राष्ट्रवादीच्या आमदाराने फक्त एका कर्नाटकी कॉन्ट्रॅक्टर च्या घरापाशी २०० फुटी लांब सिमेंट चा रस्ता अंडर ग्राउंड ड्रेनेजसह आमदार निधीतून केला. त्या भागाच्या ३ किलोमिटर रेडीअस मध्ये कुठेही सिमेंट रस्ता आणि ड्रेनेज नाही तरी सुद्धा केलाच.

एक साधा प्रश्न आहे. हा अपघात जर २०१४ पूर्वी झाला असता तर भाजप आणि समर्थकांनी काय केलं असतं ?

रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा मागितला असता कि टेक्निकल गोष्टींवर चर्चा केली असती ? प्रामाणिकपणे सांगा. इथे वेगळा धागा पण निघाला. Lol

छान! एका दुर्दैवी अपघाताचा धागा राजकारणाकडे वळवण्यात यश मिळालेले दिसत आहे.

आता त्यात कुठूनतरी पाकिस्तान connection दाखवून, हाही पुलवामाप्रमाणेच मुद्दाम घडवून आणलेला प्रकार आहे हे वाचायची सवय लावून घ्यावी लागेल.

=====

दुर्दैवी जीवांना श्रद्धांजली, जखमी लवकर बरे होवोत, एकमेकांपासून लांब गेलेले एकमेकांना भेटोत.

=====

अजून तरी 'मानवी चूक झाली' अश्या अर्थाच्या बातम्या येत आहेत.

छान! एका दुर्दैवी अपघाताचा धागा राजकारणाकडे वळवण्यात यश मिळालेले दिसत आहे. >>> २०१४ च्या आधी भाजप दुर्दैवी घटनांचं काय करत होतं ? नवीनच जगात आल्यासारखे वागताय का ?

Pages