अंडर वॉटर क्रोकोडाईल पार्क @ राणीबाग - (विडिओसह)

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 May, 2023 - 15:30

ज्यांना लेख वाचायचा कंटाळा आहे ते थेट विडिओ बघू शकतात Happy

विडिओ लिंक -
Under Water Crocodile Park
- https://www.youtube.com/watch?v=Mrv2ZoEnPwY

------------------------------------------

Underwater crocodile viewing gallery in Ranibaag
या सोमवारपासून जनतेसाठी खुली झाली आहे.

रात्री दोनला ही न्यूज समजली.
सकाळी नऊला आम्ही राणीबागेच्या गेटवर होतो Happy

गेटवर नऊची वेळ लिहीली असली तरी सर्वांना साडेनऊलाच आत सोडण्यात आले. का ते माहीत नाही. असो, पण आज काहीतरी वेगळे बघायला मिळणार आहे या आनंदात मुलांनी ताटकळण्याचा त्रास करून घेतला नाही.

गेटमधून आत शिरताच नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे वाघाचा रस्ता न पकडता यावेळी आम्ही मगरींकडे मोर्चा वळवला. तेथील एका सफाई कर्मचाऱ्याकडे मगरी कुठे गावतील अशी चौकशी केली. वाघ डाव्या हाताला डरकाळ्या फोडत होता, तर मगरी त्याच्या विरुद्ध दिशेला पाणपक्षी आणि कासवांसोबत नांदत होत्या. राणीबागेत आलेली सर्व जनता नेहमीप्रमाणे सरळ दिशेत वा डावीकडच्या रस्त्याने जात होती. पण आमचा प्रवास मात्र प्रवाहाच्या विरुद्ध चालू होता. आम्ही हे नेहमीच करतो. कारण पशूपक्ष्यांची खरी मजा कमी गर्दीतच अनुभवता येते.

आणि खरेच ताटकळण्याचे चीज व्हावे असा आनंद मिळाला. जे चित्र डोळ्यासमोर होते त्यापेक्षा चांगले काहीतरी बघायला मिळाले. आमच्याशिवाय तिथे कोणी चिटपाखरूही नसल्याने आणखी मजा आली. मुलांनाही हवे तसे बागडता आले. जागा नवीनच असल्याने स्वच्छही होती. तिचे भारतीयकरण झाले नव्हते. एकूणच स्ट्रक्चर, मांडणी, रंगसंगती सारे काही डोळ्याला सुखावणारे होते. तिथे जास्त काळ राहावेसे वाटावे असे होते.

खटकण्यासारखी एकच पण महत्वाची गोष्ट ही की ज्या मगरी बघायला लोकं येणार आहेत, त्या मगरींना बघायला ज्या काचा बसवल्या होत्या त्या मात्र क्लीन नव्हत्या. शेवाळ चढल्यासारखे हिरवट दिसत होत्या. त्यातून निपचित पडलेल्या मगरी दिसणे आणखी अवघड होते. पोहोतानाच छान वाटत होत्या. पण त्या तुलनेत वरच्या ओपन गॅलरीतून छान दृश्य दिसत होते. आलटून पालटून आम्ही वर खाली करत होतो. खालून मगर सुटली की तिला धावत जाऊन वर बघायला मुलांना मजा येत होती.

फोटो आणि सेल्फी काढायची आवड असणाऱ्यांचीही सोय होती. मगरींच्या तलावाचे आपले एक नैसर्गिक सौंदर्य होतेच. पण त्याला जोड म्हणून कृत्रिम, झरे, मिनी धबधबे, शांततेत ऐकू येणारा पाण्याचा खळखळाट, त्यात लोळत पडलेल्या नकली मगरी, एकूणातच एखाद्या छान नव्या जागेत आल्याचे समाधान घेऊनच परतलो.

ता.क. - उन्हाळा बेक्कार आहे सध्या मुंबईत. राणीबाग तेथील झाडांमुळे काही प्रमाणात अपवाद असेल कारण छान सावली देतो. पण हा मगर आणि पाणपक्ष्यांचा ईलाका तेथील जलाशयांमुळे चक्क गारवा देत होता Happy

अधिक काही न बोलता काय जागा आहे याचा अंदाज यायला निवडक फोटो आणि विडिओ शेअर करत आहे.

१) तळघरातल्या मगरी
01.jpg
.

२) व्यू फ्रॉम बाल्कनी
02.jpg
.

३) एंट्रीचा दरवाजा
03.jpg
.

४) चोर दरवाजा
04.jpg
.

५) टेबलटॉप स्ट्रक्चर
05.jpg
.

६) मगरपट्टा वॉटरफॉल
06.jpg
.

७) एका निवांत क्षणी.. सुसरआई तुझी पाठ मऊ म्हणत मगरफॅमिली
07.jpg
.

८) टॉप फ्लोअर
08.jpg
.

९) स्टॉल अ‍ॅण्ड बाल्कनी
09.jpg
.

१०) अशी पाण्यात खेळायची मजा रोज रोज नशीबात नसते. त्यासाठी भल्या पहाटे वॉचमन उठायच्या आधी जावे लागते.
10.jpg
.

११) थोडी डेअरीग दाखवली तर मगरसफारीचा आनंदही लुटता येतो.
11.jpg
.

१२) मगरींकडे जाताना वाटेत कासवे लागली
12.jpg
.

१३) पण पोरं कासवांईतकीच घाईत असल्याने घाईतच फोटो काढून तिथून सटकावे लागले.
13.jpg
.

१४ - १५ - १६) शांत आणि स्वच्छ रस्त्यांतून छान झांडाच्या गार सावलीत चालायला म्हणून मला राणीबाग नेहमीच आवडत आलीय. म्हणून मुदाम हे फोटो Happy
14.jpg
.
15.jpg
.
16.jpg
.

बाई दवे,
फोटो ट्रेलर आहेत, तर विडिओ फुल्ल पिच्चर. कारण जिवंत मगरींची मजा विडिओमध्ये शूट केली आहे. तो जरूर बघा आणि गर्दी वाढायच्या आधी लवकरात लवकर राणीबागेला भेट देऊन या Happy

विडिओ लिंक -
Under Water Crocodile Park
- https://www.youtube.com/watch?v=Mrv2ZoEnPwY

धन्यवाद ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साहील शहा, अनु, स्वस्ति आणि शर्मिला धन्यवाद

क्रिस्टल मेझ सिरीयल ची आठवण आली >>> हो, स्टेटसवरचे फोटो बघून काही जणांनी हे भारतात आहे का अशीही विचारणा केली Happy

नंतर बाजूच्या दिल्ली दरबार मध्ये kepsa बिर्याणी खाल्ली. Teva तुझी, Mhalsa चि आठवण आलेली
>>>>

दिल्ली नाही ग्ग पर्शिअन दरबार. दिल्ली बहोत दूर है Happy

बाई दवे,
आम्हीही कधीतरी एक केप्सा गेट टूगेदर प्लान करायचा विचार करतच होतो. तर त्याला केप्सा + राणीबाग असेही करता येईल. बघूया कसे जमतेय. अजून वेळ आहे फार Happy

कात्रज सर्पोद्यानातल्या मगरींची तिसरी पिढी इथे आणली असावी
(तेथे 30 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला मगरींना येऊन)

आणि ते कात्रज प्राणिसंग्रहालय झालंय आता जेंव्हापासून पेशवे पार्कातून प्राणी शिफ्ट केले.

@srd:

राष्ट्रपती भवन वर्षभर पाहता येते.

Additional मुघल गार्डन वर्षातील काही महिनेच पाहता येते.

आगाऊ booking करावे लागते. गूगल वर साईट आणि साईट वर तपशील उपलब्ध आहे.

फलक से जुदा धन्यवाद

ट्युलिप, धन्यवाद आणि हो, खरे तर रात्री दोन वाजता पोरांना ही न्यूज दाखवली तेव्हाच सकाळी डोंगरावरचा मॉर्निंग वॉकचा प्लान कॅन्सल करून राणीबागेतच जाऊया म्हणून मुलेच हट्ट धरून बसली. त्यामुळे ते आधीपासूनच एक्सायटेड होतेच ..
होपफुली हा विडिओ बघून अजून काही मुले आधीच अशी चार्ज होतील Happy

ॲज एक्स्पेक्टेड..
या विकेंडलाच आमच्या ऑफिसमधील दोघे जण आपल्या पोराबाळांसह राणीबागेत जात आहेत. अजून एक जण त्यांना जॉईन व्हायची शक्यता आहे. म्हणून आता जायचेच आहे तर एकत्र वन डे पिकनिकसारखेच जाऊया म्हणत ते सकाळीच माझ्याकडे आजूबाजूच्या ईतर बघण्यासारख्या ठिकाणांची आणि खादाडीची चौकशी करायला आलेले. ते देखील नॉनवेजप्रेमी असल्याने मी त्यांना जवळच्याच पर्शिअन दरबार आणि रेनॉल्टचा पर्याय सुचवला Happy

मगर साथ देगा
तो विडीओ बनेंगे
Sir
कसे आहात. काळजी करू नका. आम्ही मगरीला बघून घेऊ.

किशोर धन्यवाद Happy

केशवकूल तुम्ही या नक्की. पण एकटे येऊ नका.

हाहा, अरे हो, Persian दरबार नाही का ते! चांगले होते जेवण! पुढच्या वेळी लाडू सम्राट ट्राय करेन.

हो Proud
आणि लाडू सम्राटला हवे तर म्हाळसाची आठवण काढ. तिने पर्शिअन दरबारचा केप्सा नाही खाल्लाय. माझगावच्या अफजलचा खाल्ला आहे.

Lol

(राणीबागेतील) मगरपट्ट्याची बच्चे कंपनी बरोबर छान सफर. ऋन्मेष तुला राणीबागेचा ब्रँड ऍम्बॅसॅडर हा नवीन रोल देण्यात येत आहे.
राणीबागेत बऱ्याच वर्षात जाणे झाले नाही. तिथली विविध प्रकारची झाडे हे एक विशेष आकर्षण होते. अजूनही ती असतील अशी आशा आहे.

राणीबागेचा ब्रँड ऍम्बॅसॅडर >>> हा हा धन्यवाद.. पण राणीबागेच्या यशानंतर अजूनही काही जागांबद्दल धागे काढायचे आहे मनात Happy

तिथली विविध प्रकारची झाडे हे एक विशेष आकर्षण >>>> हो एकेकाळी मी सुद्धा प्राणी बघायला नाही तर झाडांसाठीच जायचो. कारण प्राणी होतेच कुठे. आता आले आहेत तर लोकं प्राणी बघायलाच गर्दी करत आहेत. झाडे बघायला आवडतात पण त्यातले काही कळत नाही. अन्यथा एक धागा त्यावरही काढला असता. बघूया किंवा जमते का हे कधी..

>>>>> झाडे बघायला आवडतात
+१००१ मलाही प्रहचंड!!!
मी वेड्यासारखी पक्षी, झाडे बघत बसते. काल कार्डिनल्स पक्ष्यांची जोडी दिसली होती. कडेला भरधाव गर्दी, कोणाला थांबायचा वेळ नाही आणि मी फूटपाथवर मंत्रमुग्ध होउन पहात होते. जर्सी सिटीच्या तुलनेत इथे (न्यु यॉर्क उपनगर) उंच उंच वॄक्ष आहेत.

धन्यवाद कविन

@ सामो,
कोणाला थांबायचा वेळ नाही आणि मी फूटपाथवर मंत्रमुग्ध होउन पहात होते.
>>>>>>
हो अगदी. रस्त्यात मध्ये अचानक अनपेक्षित कुठलाही पशूपक्षी दिसला की छान वाटते. मलाही आता मुलांसोबत फिरतो त्यामुळे न्याहाळायची सवय लागली. मग ते रंगीबेरंगी पक्षी असो की आपले नेहमीचे खारूताई, सरडा, बेडूक, खेकडा, गोगलगाय किंवा जमिनीवर रेंगाळणारा किडा असो.. तिथेच रस्त्यात बसून बघतो Happy

फ्रायडे आला, सकाळपासून तीन नवीन लोकं मला राणीबागेची चौकशी विचारून गेले .. फार महत्वाची व्यक्ती झाल्यासारखे वाटतेय. अन्यथा माझ्या माणूसघाण्या स्वभावामुळे कोणी मुद्दामून आणि स्वतःहून माझ्याशी फार बोलायला येत नाही.:)

माझ्या माणूसघाण्या स्वभावामुळे>>> सर यावर आम्ही पामर काय बोलणार!
अखिल सुसर आणि मगर समाजातर्फे सादर प्रणाम घ्यावा.

धन्यवाद प्राचीन Happy

@ केशवकूल
सुसर मधेही सर.
>>>
हो, कणकण मे सर, हर घर मे सर, घर मे रहने वाले लोगों के सर मे भी सर..
देवासारखेच आहे हे. पण आपण हे स्वतंत्र धाग्यावर बोलूया. ईथे अवांतर नको Happy

धन्यवाद प्राचीन Happy

@ केशवकूल
सुसर मधेही सर.
>>>
हो, कणकण मे सर, हर घर मे सर, घर मे रहने वाले लोगों के सर मे भी सर..
देवासारखेच आहे हे. पण आपण हे स्वतंत्र धाग्यावर बोलूया. ईथे अवांतर नको Happy

Pages