अंडर वॉटर क्रोकोडाईल पार्क @ राणीबाग - (विडिओसह)

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 May, 2023 - 15:30

ज्यांना लेख वाचायचा कंटाळा आहे ते थेट विडिओ बघू शकतात Happy

विडिओ लिंक -
Under Water Crocodile Park
- https://www.youtube.com/watch?v=Mrv2ZoEnPwY

------------------------------------------

Underwater crocodile viewing gallery in Ranibaag
या सोमवारपासून जनतेसाठी खुली झाली आहे.

रात्री दोनला ही न्यूज समजली.
सकाळी नऊला आम्ही राणीबागेच्या गेटवर होतो Happy

गेटवर नऊची वेळ लिहीली असली तरी सर्वांना साडेनऊलाच आत सोडण्यात आले. का ते माहीत नाही. असो, पण आज काहीतरी वेगळे बघायला मिळणार आहे या आनंदात मुलांनी ताटकळण्याचा त्रास करून घेतला नाही.

गेटमधून आत शिरताच नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे वाघाचा रस्ता न पकडता यावेळी आम्ही मगरींकडे मोर्चा वळवला. तेथील एका सफाई कर्मचाऱ्याकडे मगरी कुठे गावतील अशी चौकशी केली. वाघ डाव्या हाताला डरकाळ्या फोडत होता, तर मगरी त्याच्या विरुद्ध दिशेला पाणपक्षी आणि कासवांसोबत नांदत होत्या. राणीबागेत आलेली सर्व जनता नेहमीप्रमाणे सरळ दिशेत वा डावीकडच्या रस्त्याने जात होती. पण आमचा प्रवास मात्र प्रवाहाच्या विरुद्ध चालू होता. आम्ही हे नेहमीच करतो. कारण पशूपक्ष्यांची खरी मजा कमी गर्दीतच अनुभवता येते.

आणि खरेच ताटकळण्याचे चीज व्हावे असा आनंद मिळाला. जे चित्र डोळ्यासमोर होते त्यापेक्षा चांगले काहीतरी बघायला मिळाले. आमच्याशिवाय तिथे कोणी चिटपाखरूही नसल्याने आणखी मजा आली. मुलांनाही हवे तसे बागडता आले. जागा नवीनच असल्याने स्वच्छही होती. तिचे भारतीयकरण झाले नव्हते. एकूणच स्ट्रक्चर, मांडणी, रंगसंगती सारे काही डोळ्याला सुखावणारे होते. तिथे जास्त काळ राहावेसे वाटावे असे होते.

खटकण्यासारखी एकच पण महत्वाची गोष्ट ही की ज्या मगरी बघायला लोकं येणार आहेत, त्या मगरींना बघायला ज्या काचा बसवल्या होत्या त्या मात्र क्लीन नव्हत्या. शेवाळ चढल्यासारखे हिरवट दिसत होत्या. त्यातून निपचित पडलेल्या मगरी दिसणे आणखी अवघड होते. पोहोतानाच छान वाटत होत्या. पण त्या तुलनेत वरच्या ओपन गॅलरीतून छान दृश्य दिसत होते. आलटून पालटून आम्ही वर खाली करत होतो. खालून मगर सुटली की तिला धावत जाऊन वर बघायला मुलांना मजा येत होती.

फोटो आणि सेल्फी काढायची आवड असणाऱ्यांचीही सोय होती. मगरींच्या तलावाचे आपले एक नैसर्गिक सौंदर्य होतेच. पण त्याला जोड म्हणून कृत्रिम, झरे, मिनी धबधबे, शांततेत ऐकू येणारा पाण्याचा खळखळाट, त्यात लोळत पडलेल्या नकली मगरी, एकूणातच एखाद्या छान नव्या जागेत आल्याचे समाधान घेऊनच परतलो.

ता.क. - उन्हाळा बेक्कार आहे सध्या मुंबईत. राणीबाग तेथील झाडांमुळे काही प्रमाणात अपवाद असेल कारण छान सावली देतो. पण हा मगर आणि पाणपक्ष्यांचा ईलाका तेथील जलाशयांमुळे चक्क गारवा देत होता Happy

अधिक काही न बोलता काय जागा आहे याचा अंदाज यायला निवडक फोटो आणि विडिओ शेअर करत आहे.

१) तळघरातल्या मगरी
01.jpg
.

२) व्यू फ्रॉम बाल्कनी
02.jpg
.

३) एंट्रीचा दरवाजा
03.jpg
.

४) चोर दरवाजा
04.jpg
.

५) टेबलटॉप स्ट्रक्चर
05.jpg
.

६) मगरपट्टा वॉटरफॉल
06.jpg
.

७) एका निवांत क्षणी.. सुसरआई तुझी पाठ मऊ म्हणत मगरफॅमिली
07.jpg
.

८) टॉप फ्लोअर
08.jpg
.

९) स्टॉल अ‍ॅण्ड बाल्कनी
09.jpg
.

१०) अशी पाण्यात खेळायची मजा रोज रोज नशीबात नसते. त्यासाठी भल्या पहाटे वॉचमन उठायच्या आधी जावे लागते.
10.jpg
.

११) थोडी डेअरीग दाखवली तर मगरसफारीचा आनंदही लुटता येतो.
11.jpg
.

१२) मगरींकडे जाताना वाटेत कासवे लागली
12.jpg
.

१३) पण पोरं कासवांईतकीच घाईत असल्याने घाईतच फोटो काढून तिथून सटकावे लागले.
13.jpg
.

१४ - १५ - १६) शांत आणि स्वच्छ रस्त्यांतून छान झांडाच्या गार सावलीत चालायला म्हणून मला राणीबाग नेहमीच आवडत आलीय. म्हणून मुदाम हे फोटो Happy
14.jpg
.
15.jpg
.
16.jpg
.

बाई दवे,
फोटो ट्रेलर आहेत, तर विडिओ फुल्ल पिच्चर. कारण जिवंत मगरींची मजा विडिओमध्ये शूट केली आहे. तो जरूर बघा आणि गर्दी वाढायच्या आधी लवकरात लवकर राणीबागेला भेट देऊन या Happy

विडिओ लिंक -
Under Water Crocodile Park
- https://www.youtube.com/watch?v=Mrv2ZoEnPwY

धन्यवाद ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शन्यवाद सामो

अमेरीकेहून कोणी माबोकर राणीबागेत आले तर मला कळवा जरूर...

वा, फोटो भारीच. ह्यावेळेस आले की परत मुलींना घेऊन जाईन राणीबागेत. सकाळी नऊच्या आधी लाडू सम्राट आणि मग राणीची बाग Happy

चांगलं काम करताहात. राणीबाग तुम्हाला जवळच असल्याने शांतपणे वेगवेगळ्या गोष्टी पाहून फोटो , विडिओ यातून दाखवत आहात.
आपण जेव्हा दुसऱ्या शहरांत जाऊन पर्यटन करतो तेव्हा तिथली स्थळं 'उरकतो' कारण वेळ थोडा असतो. बाहेरून ,दुरून मुंबईत येणाऱ्यांसाठी चांगली सोय. मुलंही मजा करत आहेत.

Srd धन्यवाद आणि हो,
मागे राणीबागेतल्या वाघाचा विडिओ बघून त्या रिफरन्सने माझ्या ऑफिसातले जवळपास दहाबारा कलीग्स आपल्या पोरांना घेऊन तिथे जाऊन आलेले.
काल मी हे फोटो शेअर केले तेव्हा त्यांच्यात हीच चर्चा होती की आता हा पुन्हा एकदा आपल्याला जायला लावणार Happy

हपा, धन्यवाद आणि हो. तो दिसायला माझ्यासारखा होईल असे सध्या वाटतेय तरी.
मुले कोणासारखी दिसतात हा नेहमीच एक मनोरंजक चर्चेचा विषय असतो. नवीन धाग्याचा विषय म्हणून नोंद करून ठेवतो Happy

@ म्हाळसा, रात्री तुलाच मेसेज टाकला असता तर बरे झाले असते. लाडू सम्राट आणि नाश्ता वगैरे आयड्या माझ्या डोक्यात आली असती. तसेही पहाटेपासून आम्ही जागेच होतो.
येनी वेज, जाऊन ये नक्की आणि कळव Happy

मस्त . सगळे फोटो ही छान.
११ व्या फोटोचं कॅप्शन Lol
पण फक्त अमेरिकेतल्या माबोकरानाच तेवढं स्पेशल आमंत्रण का बरं. आम्ही काय घोडं मारलंय. Uhoh

रमजान ईद च्या दिवशी आम्ही गेलो होतो खूप मज्जा आली। पण तेव्हा क्रोकोडाईल पार्क न्हवते ओपन झालेले .

वर्णिता Proud
तुम्हाला आता देतो आमंत्रण
मी निशाचर असल्याने, तेव्हा रात्र असल्याने, अमेरीकावाले जागे असतात म्हणून त्यांना दिलेले. ते ही एक पद्धत असते म्हणून. अन्यथा सामो आणि क्षितिजा सोडून एवढ्या लांबून राणीबाग बघायला कोणी येईल असे वाटत नाही Wink

योगेश धन्यवाद,

@ अजनबी
पण तेव्हा क्रोकोडाईल पार्क न्हवते ओपन झालेले
>>>>
हो, आता लायन द सिंह सुद्धा येईल लवकरच असे वाटते. तुम्ही एकदमच बघा दोन्ही.

पण बरंय, एकेक प्राणी आणतील तर एकेक धागे निघतील Happy

तसे असेल तर मग पावसाळ्यातील मधला वार पकडा. पशूपक्षी आणि निसर्गाच्या सानिध्यात छान सहल होईल.
लोकं गर्मीत आणि गर्दीतही खुश दिसतात तिथे असे पाहिलेय. पण तरी पावसाळी वातावरण आणि शांतता दिसली की माझा तरी पाय हलतच नाही तिथला Happy

१) याप्रमाणेच इतरही शहरांतील लोकांनी तिथल्या गमतीजमती पाहून सविस्तर लिहावे. उदाहरणार्थ दिल्लीतील राष्ट्रपती भवन हे फक्त फेब्रुवारीला पाहता येतं म्हणे. नंतर कळलं की आता वर्षभर संध्याकाळी पाहता येतं . पण त्याची परवानगी वगैरे कळावी.

२)मुंबईतील राजभवनाखाली तळघरातील म्युझियम - नेटवर त्याची वेळ सोमवारसोडून सकाळी सहा ते आठ आहे हे कळलं. ओनलाइन तिकिटे कुठे मिळवायची? तसं इतक्या लवकर तिथे पोहोचणे दादरपुढे राहणाऱ्यांना कठीणच आहे.

३)मुंबईतल्या इले. -डबलडेकरने जायचं आहे. सीएसएमटी ते बॅकबे डेपो (१३९). पण ती मिळायला ऑफिसटाईम गाठणे कठीण आहे.
क्रमांक २ आणि ३ चे काम आता ऋन्मेऽऽष वर सोपवत आहे.

खूप खूप धन्यवाद कॉमी.. फायनली कोणी वर्णन आणि फोटोच्या पलीकडे जात विडिओबद्दल बोलले Proud

@ Srd,
हो प्रयत्न करतो. तसे अजून दोन जागांबद्दल लिहायचे डोक्यात आहे. तिथले विडिओ नाहीत पण फोटो आहेत.

>>>>>>>>अन्यथा सामो आणि क्षितिजा सोडून एवढ्या लांबून राणीबाग बघायला कोणी येईल असे वाटत नाही Wink
Happy होय मी येइन. बरोबर. निसर्ग function at() { [native code] }इप्रिय.

मस्त वर्णन आणि व्हिडीओ.
पार्क पण छान दिसतोय.क्रिस्टल मेझ सिरीयल ची आठवण आली.(स्वगत: आता आमच्या मुंबईच्या भाच्याना कधी नेल्यास याच्यापुढे कात्रज सर्पउद्यान खूपच फुफु वाटणार.अजून काय दाखवावं बरं?)

Runmesh, मी पण गेल्या वेळेस मुलांना घेऊन गेले होते तुझे फोटो baghun. नंतर बाजूच्या दिल्ली दरबार मध्ये kepsa बिर्याणी खाल्ली. Teva तुझी, Mhalsa चि आठवण आलेली

छान आहे आता राणीची बाग. हेही फोटो छान आहेत. परत जायला lavnar तू.

सुंदर वर्णन आणि नविन दालन खुपच छान. राणी बागेत जाउन बरीच वर्ष झाली. परत एकदा जायला पाहिजे. >>> +10000

राणीचा बाग सुंदर दिसतोय. ववि तिथेच करा
>>
सामो,
अहो ववि म्हणजे वर्षाविहार. पावसात भिजणे अपेक्षित असते. पण नाहीच आला तर भिजायला म्हणून स्विमिंगपूल लागतो. पण त्याहून महत्वाचे म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम खेळ वगैरे असतात त्यासाठी जागा लागते म्हणून रिसॉर्टमध्ये होतो.

Pages