Dragon Fruit, south/ central America मध्ये होणाऱ्या फळांचे , एका रात्रीपुरते उमलणारे फुल!

Submitted by छन्दिफन्दि on 15 April, 2023 - 23:48

जुलै २०२१ मधील अनुभव

आज सकाळी नवर्याने घाईघाईने बाहेर बागेत बोलावले. बघते तर कोपर्यातल्या निवडुन्गाला एक भले मोठे फ़ुल आले होते. पांढरे शुभ्र. जवळ गेल्यावर खूप छान सुगंध आला.
आम्ही ह्या घरात रहायला येऊन तीन महीने होतील. त्यामुळे येथील झाडांशी पूर्ण परिचय नाही झाला अजून. कोपर्यात 2-3 निवडुंग होती, काहिशी दुर्लक्षितच. मला निवडुन्गाची फारशी आवड नाही. आणि त्या ओबड दोभडं दिसणाऱ्या निवडुंगाला इतके सुंदर आणि सुगंधित फुल. क्षणभर डोळ्यांवर विश्वासच बसेना.

dragonflwr1.jpg

येवढया सुन्दर फ़ुलाचा फोटो न घेतला तरच नवल. cactus ला येवढं मोठं फ़ुल कधिच ऐकल किंवा पहिलं नव्हतं. मन तिथेच रेंगाळत राहिलं.
मग लगेच google लेन्स वरुन बघितल तर कळलं की हे तर Costa Rican Pitahaya / Costa Rica nightblooming cactus आहे.
थोडसं आपल्या ब्रम्ह्कमळासारखं दिसणारं पण एकदम वेगळ्या जातिचं फुल. अजुन google / You tube वर थोडा वेळ घालवल्यावर कळलं की हे Dragon Fruit चं फुल आहे . माझ्या खवय्या मुलामुळे मला Dragan fruit ट्रॉपिकल आणि इकडे दुर्मिळ असल्याचे माहित होते. एका कुठल्याशा दुकानात सहा dollars ना एक छोटसं फळ घेतले होते म्हणजे नक्कीच खास होते.
तर हे कॅक्टस जातीचेच झुडूप असते. तीन-चार वर्षा नंतर ह्या झाडांना फुले येण्याची शक्यता असते. मोठ्या फुलात एक छोटे फ़ुल दिसते तो त्याचा stigma (female part ) असतो. खाली जे पराग कण दिसतात (pollens ) तो male part.
सुर्यस्ताच्या दरम्याने ती कळी उमलायला लागते. रात्री ते फुल अगदी चांगले बहरते. रात्रिच्या वेळी जे कीटक , bats त्याच्यावर बसतील ते pollination घडवून आणतात .फुल सेल्फ़् pollinating असेल आणि हे घडलं तर पुढे त्या फुलाचे फळ बनते. नाहीतर फुल गळुन पडते . मग ह्यावर दुसरा उपाय म्हणजे फुल उमललं असताना hand pollination करणे.
ही सगळी माहिती गोळा करून परत बागेत गेले.

dragonflwr5.jpg

बघितले तर दुपारी बारा वाजता फुल बंद व्हायला लागले. आणि अर्ध्या तासात बंदच झाले.मलुल झाले. इतक स्पेशल फुल आणि ते फुलताना आपल्याला बघायला नाही मिळालं, मन उगाच खट्टू झालं.
पण बाजुच्या फांदीवर एक अजून कळी बघीतली आणि हुश्श वाटलं. आज हीचं काय होत ते बघूया .

dragonflwr6_1.jpg

रात्री साडे आठच्या दरम्याने फुल उमलले. रात्रीच्या मंद चांदण्यात ते पूर्ण उमललेले पांढरे शुभ्र फुल, त्याचा मंद सुवास, आणि हवेतील गारवा वेगळीच अनुभूति होती.
आम्ही ह्यावेळी पूर्ण तयारीत होतो. रंगवायचा ब्रश घेउन hand pollination केले, उगाच किटकांच्या भरवशावर Dragon Fruit चे भविष्य का सोडा.
राहून राहून नवल वाटलं, रात्री इतक्या दिमाखात अगदी राजासारख मिरवणारं फुल दुपार होई पर्यंत अगदीच गलितगात्र होऊन मान टाकते, ह्या दिमाखदार फुलाचं आयुष्य अवघे काही तासांपुरतेच, निसर्गाच्या मनात आलं तर त्या फुलाचं पुढे फळ होणार नाहीतर मग ते गळून पडणार. खरंच किती क्षणभंगुर आहे सारे!
बघा कसा दिवस गेला?
सकाळी ज्याची सुतराम कल्पनाही नव्हती त्या Costa Rican Pitahaya भोवती अख्खा दिवस गेला. एक दुर्मिळ ( आमच्यासाठी तरी) अनुभव मिळाला. Technology ह्या वेळी एक वरदान बनुन आम्हाला निसर्गाच्या जवळ घेऊन गेली आणि निसर्गाची किमया अनुभवता आली.
Fingers crossed. बघुया काय होतयं पुढे Dragon Fruit येत का ते!

https://youtube.com/shorts/CkeCKajpytw?feature=share

तळटीप - ड्रॅगनफ्रुट नाही आलं

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाड लागल्यावर म्हणजे फळ पूर्ण तयार होवून पिकण्याची प्रक्रिया झाडावर च सुरू होते तो काळ.
तेव्हा फळ झाडावरून उतरवायची असतात.
ती फळ खूप गोड आणि चविष्ट असतात.
पण त्यांचे आयुष्य कमी शिल्लक राहिलेले असते.
म्हणून कच्ची च फळ झाडावरून काढून कृत्रिम रित्या पिकवली जातात
त्यांना खरी चव येत नाही.
हापूस आंबे बाजारात मूळ चवी चे मिळणे आता त्या मुळे च मुश्किल झाले आहे

Pages