गुंत्यात अडकलेली मायबोली !

Submitted by कुमार१ on 2 April, 2023 - 22:04

बऱ्याच दिवसांनी घेऊन आलो आहे खास आपल्यासाठी आपलाच खेळ ! या खेळात तुम्हाला ८ मायबोलीकरांची सदस्यनावे ओळखायचीत. त्यासाठी खालील दोन चौकटी पहा :

चौकट १
Screensho puzz 1.jpg
.....

चौकट २

Screenshot puzz 2.jpg

या दोन चौकटींमध्ये मिळून एकूण आठ नावे अडकलेली आहेत. ती हुडकून काढायची.

शोध माहिती:
• प्रत्येक नाव चार अक्षरी, सलग आणि मराठी भाषेतच.

• प्रत्येक नावाचे पहिले व तिसरे अक्षर चौकट क्रमांक १ मध्ये शोधायचे,
तर दुसरे व चौथे अक्षर चौकट क्रमांक २ मध्ये.

• उत्तर लिहिण्यापूर्वी संबंधित शब्द हे सदस्यनाम असल्याची खात्री माबोसूचीत बघून करून घ्यावी.

• प्रत्येक अक्षर एकदा आणि फक्त एका शब्दासाठीच वापरले गेले पाहिजे.

• एक बरोबर उत्तर दिल्यानंतर त्याची ४ अक्षरे पुढच्या खेळासाठी बाद होतील

• एखाद्या अपेक्षित उत्तराऐवजी जर पर्यायी उत्तर दिले गेले तर ते प्रलंबित ठेवले जाईल. खेळाच्या शेवटी ते आपोआप बाद ठरेल.
चला तर, काढा बाहेर या आठ जणांना…
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Srd Proud
मी सुद्धा आल्या आल्या पहिले ऋ कुठे दिसतेय का हे पाहिले... न दिसताच मूड ऑफ झाला Proud ऋनमेष असे झाले असते चार अक्षरी..

ऋ , छ आणि शक्यतो ठराविक जोडाक्षरे टाळली.

दोन चौकटींचा हा प्रयोग प्रथमच केला.
सूचना असल्यास जरूर सांगाव्यात म्हणजे अजून सुधारणा करता येतील.

> मी ते गुत्यात अडकलेले असे वाचले

माबो हाच एक गुत्ता आहे. टेक्निकल कारणाने माबो एक दिवस बंद राहिली तर तळीराम ड्राय डे ला गुत्त्यासमोरून येरझारा करतात तसे माबोकरांचे होते !

कुमार१ , आपण नेहेमीच असे विविध प्रयोग करून आमच्य आनंदात भर घालता व मेंदू शार्प ठेवायला मदत करता, धन्यदवाद.

वि कु
धन्यवाद !
या खेळाला "चौकटीत अडकलेले" वगैरे शब्दप्रयोग मलाच मिळमिळीत वाटला होता.
म्हणूनच गुंता घेतला व त्याचा चर्चेदरम्यान झालेला गुत्ता बघून ..... Happy Happy

ऋ , छ आणि शक्यतो ठराविक जोडाक्षरे टाळली >> गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा - असं ते ते अनुल्लेखलेले माबोकर म्हणतील.

खेळ क्र. २
या खेळात तुम्हाला मायबोलीवरील ८ कवितांची शीर्षके ओळखायचीत. त्यासाठी खालील दोन चौकटी पहा :

चौकट १
kavipuzz 1final.jpg चौकट २
kavipuzz2 final.jpg

या दोन चौकटींमध्ये मिळून एकूण आठ शीर्षके अडकलेली आहेत. ती हुडकून काढायची.

शोध माहिती:
· प्रत्येक नावअक्षरी, सलग आणि मराठी भाषेतच.

· प्रत्येक नावाचे १ले व ५ वे अक्षर चौकट क्रमांक १ मध्ये शोधायचे,
तर दुसरे व चौथे अक्षर चौकट क्रमांक २ मध्ये.
आणि
३रे अक्षर इथे दिलेले नाही. ते तुम्हीच संदर्भाने ओळखायचे..

· उत्तर लिहिण्यापूर्वी संबंधित शब्द माबो-शीर्षक असल्याची खात्री शोधसुविधेत बघून करून घ्यावी.

· प्रत्येक अक्षर एकदा आणि फक्त एका शब्दासाठीच वापरले गेले पाहिजे.
· एक बरोबर उत्तर दिल्यानंतर त्याची ४ अक्षरे पुढच्या खेळासाठी बाद होतील

· एखाद्या अपेक्षित उत्तराऐवजी जर पर्यायी उत्तर दिले गेले तर ते प्रलंबित ठेवले जाईल. खेळाच्या शेवटी ते आपोआप बाद ठरेल.
चला तर, काढा बाहेर या आठ कवितानामांना …

वरील चौकटीत नसलेले एक उदाहरण देतो. समजा,
अक्षरे १ व ५: रं , मी
अक्षरे २ व ४: ग, च

म्हणजे अपेक्षित शब्द असा असणार: रंग * चमी
म्हणून संदर्भाने तिसरे अक्षर= पं

उत्तर: रंगपंचमी
(https://www.maayboli.com/taxonomy/term/6846)

कदंबातळी
वजनकाटा
परशूराम
सहजभाव
कशिदाकाम

अरे वा सुंदर !!
अगदी बरोबर ...
आता फक्त एक राहिले