
मी खोलीत प्रवेश केला, खोली कसली एखादे छोटे सभागृहाचं म्हणा ना ! आतमध्ये सुमारे पन्नास विद्यार्थी बसलेले, मी आजूबाजूला एक नजर फिरवली तर खोलीत तणाव जाणवला. काही विद्यार्थी त्यांच्या नोट्सची उजळणी करत होते, इतर एकमेकांशी कुजबुजत होते; नजर सारखी त्यांच्या मनगटाकडे जात होती.
कुठल्याही महत्त्वाच्या परीक्षेआधी परीक्षाहॉ लच्या बाहेर साधारण असच चिंताग्रस्त वातावरण असतं.
मी आत जाऊन माझ्या खुर्चीत बसताच पिन ड्रॉप शांतता पसरली. होय, कारण मी त्यांच्या तोंडी परीक्षेची परीक्षक होते. सगळ्यांच्या डोळ्यांत निरनिराळ्या भावना आणि चेहऱ्यावर अनेक भाव दिसत होते त्यात अविश्वास, शंका, गोंधळ, कुतूहल, वैताग काय नव्हतं ? काहींच्या चेहऱ्यावरची नापसंती तर मला उघडपणे जाणवत होती; काही विद्यार्थी शांतपणे भुवया उंचावत, माझ्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उभे करत होते. पण मी मात्र एकदम शांत होते. थोडे पाणी पिऊन मी तोंडी परीक्षेला सुरूवात केली.
त्या खोलीत मी दिसायला आणि वयाने सर्वात लहान व्यक्ती होते; बावीस वर्षांची, अगदी किरकोळ देहयष्टी असलेली, कोणत्याही गर्दीत हरवून जाईल असे नगण्य व्यक्तिमत्व भासणारी मुलगी. याउलट, माझे सर्व विद्यार्थी होते पन्नाशीच्या आतबाहेर असणारे, बहुतेक माझ्या वडिलांच्या वयाचे, मोठ्या दाढी आणि मिशा असलेले प्रौढ पुरुष.
ते 2१ व्या शतकाच्या सुरुवातीचे दिवस होते, जेव्हा बँका आणि सरकारी कार्यालयांनी संगणकीकरण सुरू केले होते. आणि त्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना विशिष्ट संगणक अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्रे घेणे अनिवार्य केले होते. एका बाजूला ज्यावेळी ‘तंत्रज्ञान’ हा शब्दच फारसा रुढ नव्हता त्यावेळी पूर्ण-वेळच्या नोकऱ्या, घरगुती किंवा वैयक्तिक जबाबदाऱ्या आणि वयामुळे येणाऱ्या अडचणी सांभाळत नवीन संगणकाचे तंत्रज्ञान शिकणे कठीण वाटणारे मध्यमवयीन स्त्री-पुरुष तर दुसरीकडे, संगणक शास्त्राचे अद्ययावत ज्ञान घेतलेली, पदवीधर, सर्व आव्हाने स्वीकारण्यासाठी कुठल्याही अतिरिक्त जबाबदाऱ्या नसलेली, कुठलेही आव्हान पेलण्यासाठी पूर्णपणे सज्ज असलेली मी.
जसजशा मुलाखती पुढे गेल्या, तसतसे त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलू लागले आणि अधिक सकारात्मक होऊ लागले. शंकेची जागा कुतूहलाने, अविश्वासाची जागा माफक हास्याने घेतलेली मला जाणवत होती.
आता तुम्हाला अगदी प्रांजळपणे सांगते, तेव्हा मला जरी त्यांबद्द्ल सहानभूती वाटत होती किंवा मी तस दाखवत होते तरी आत खोलवर कुठेतरी माझ्यातली खट्याळ आणि नाठाळ मुलगी त्यांच्या डोळ्यातली ती भीती, त्यांचं मनातल्या मनात सोपा प्रश्न येऊ दे म्हणून प्रार्थना करणं, कठीण प्रश्नाचं (त्यांच्यासाठी पण माझ्या दृष्टीने अगदीच सोपा )उत्तर देतानाच अडखळणं मस्त एन्जॉय करत होती.
कारण काही वर्ष त्यांच्या खुर्चीत बसल्यावरच मग मी ह्या खुर्चीत बसले होते ना !
"पोस्ट ऑफिस उघडं आहे " ही सोनी मराठी वरील मालिका ९० च्या उत्तर दशकात घेऊन जाते. तेव्हा सरकारी यंत्रणांचे संगणकीकरण फार मोठ्या प्रमाणावर चालू होते. आज प्राजक्ता माळी ची एंट्री बघून मला २००१-२ च्या दरम्याने घडलेला हा किस्सा लिहून काढल्याशिवाय राहवले नाही.
तुमचे अल्याडचे किंवा पल्याडचे असे काही किस्से असतील तर जरूर लिहा!
** हा उतारा आधी एका "On The Other Side..." , medium.com ह्या लेखत प्रसिद्ध झाला आहे. "सरकारी यंत्रणांचे संगणकीकरण " ह्या कल्पनेशी सम्ब्नधित उतारा त्यातून घेतला आहे.
सुरुवातीला ( म्हणजे १९९८-९९
सुरुवातीला ( म्हणजे १९९८-९९ साली), इमेल चा हेडर बदलून from च नाव आणि इमेल आयडी सहज गत्या बदलता यायचं. अर्थात थोडं डीप गेलं तर मूळ सेंडरच नाव दिसायचं पण थोड्या Technically challenged असणार्याला फसवण्यासाठी तेवढं पुरेसं असायचं. तर आमच्या ऑफिस मध्ये दोन इन्टर्न्स जोइन झाले होते. एकदम किडकिडीत असणार्या या दोघांनी ऑफिस hrs नंतर ऑफिसच्याच बाजूला असणारी एक प्रसिद्ध जिम जॉईन केली होती. साधारण एक आठवडा गेल्यावर आम्ही टवाळ कार्ट्यांनी फ्रोम इमेल जिम च्या एका फेक ईमेल आयडी ने बदलून त्यांना मेल पाठवला आणि त्यांना जिम च्या पॉलीसी नुसार येत्या दोन दिवसात येताना युरिन आणि स्टूल सॅम्प्ल आणायला सांगितले. दोघं तो मेल बघून एकदम शॉक झाले होते. पण दुसर्या दिवशी जिम मध्ये फोन करून विचारले तेव्हा त्यांना (अर्थात) असली काही पॉलीसी नसल्याचे सांगण्यात आले तेव्हा त्यांना समजले कि कोणी तरी prank केला आहे. पण ते Technically challenged असल्यामुळे तो prank कोणी केला ते समजले नाही. त्यांनी खरच जर ती सॅम्पल्स नेली असती तर काय झालं असतं हा विचार करून आम्ही बरेच दिवस ते दोघं आसपास नसतान पोट धरून हसत असू
२००१ मधील गोष्ट. तेव्हा
२००१ मधील गोष्ट. तेव्हा देवनागरी मधील टायपिंग आतासारखे कॉमन किंवा माहीतच नव्हते / नसावे.
इंडिनायजेशन ऑफ लिनक्स मधील एक छोटा भाग आम्हाला फायनल प्रोजेक्ट मध्ये करायला मिळालेला. प्रात्यक्षिक करताना आम्ही इंग्लिश कीबोर्ड्वरून आमच्या परीक्षकांच नाव टाईप केलं आणि त्याला मराठीत त्याच नाव दिसलं, एव्हढा खुश झालेला त्याला एकदम जादू केल्यासारखं वाटलं. अर्थात प्रोजेक्टला फूल मार्क्स.
विंडोज विष्टा >>
विंडोज विष्टा >>
ह्यावरून आठवले - विंडोज 8 प्री लाँच रिलिज टेस्टिंग साठी आली होती...खूपच बेकार होती...तेंव्हा मी Windows 8 should be named windows hate... असा रिव्ह्यु दिला होता...
Pages