खुशखबर - २०२३ वर्षा विहार - संयोजक हवे आहेत.

Submitted by Admin-team on 28 March, 2023 - 02:30

नमस्कार मायबोलीकर,

एक खुशखबर. २०१७ नंतर मधल्या पाच वर्षांच्या विश्रांती नंतर यंदा २०२३ मधे वर्षा विहार पुन्हा उत्साहात करायचे ठरवले आहे. यंदाच्या ववि संयोजनाची धुरा अनुभवी आणि जाणत्या मायबोलीकरांनी उचललेली आहे. त्यांच्या मदतीसाठी ताज्या दमाच्या मायबोलीवर वावर असणाऱ्या संयोजकांची आवश्यकता आहे. तेव्हा तुम्हाला जर यात सहभागी होण्याची इच्छा असेल तर इथे नाव नोंदवा.
अधीक माहिती लवकरच कळवू.

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आबा, चालेल
महिनाभर तुमचा अभिषेकने येतो Happy

***

@ अनिरुद्ध, माझ्याकडे attract झाल्याबद्दल धन्यवाद Happy

किंमतीतील ५०/- आपण चॅरीटी करतो. (प्रत्येक टिशर्टच्या किंमतीतून ५०/-) ===>

चॅरीटी ५० ह्यात वाढ करावी , २० माझी हरकत नाही ,

जागा ठरली नसेल तर . . . .
विरार, मांडवी हिल रिझाॉट कुणी गेलं आहे का? मी ऋच्या धाग्यावर पोस्ट टाकली आहे. पावभाजी,सूप,डोसा,पापकानसह वाटर पार्क रु ७५०/- ते कमी. ग्रूप बुकिंगसाठी रु ६००/-. तीन वर्षे मुलांना फ्री . बघून या.

एसआरडी, वर्षाविहाराकरता जागा सुचवल्याबद्दल धन्यवाद!
साधारणपणे मायबोली वर्षाविहारास मुंबई आणि पुणे येथून सर्वाधिक मायबोलीकरांची उपस्थिती असते. या दोन्ही ठिकाणांहून शक्यतो मध्यवर्ती होईल अशी जागा आपण वर्षाविहारासाठी निवडत असतो.

चार दिवसांपूर्वी आमच्या ओळखीचे डोंबिवली,बोरीवलीतून मोठा ग्रूप घेऊन गेले तिथे. वीस जण होते. ६००/- घेतले. डोसे,पावभाजी चांगली होती आणि संध्याकाळी चारपर्यंत देत होते. तरी कुणी जवळ राहातं असेल तर जागा पाहून या. आणि पावसाळ्यात एन्ट्री देतात का खात्री करा. पुण्याकडून पनवेल -कल्याण-भिवंडी-अंबाडी नका- वज्रेश्वरी -(रिझॉट मार्गे) विरार रूट आहे. नाशिकवाले कल्याण मार्गे. पश्चिम उपनगरेवाले अहमेदाबाद महामार्गे /जातील.
(वेळ मिळाल्यास वाटेतलीच वज्रेश्वरीची गरम पाण्याची कुंडे, गणेशपुरी पाहता येईल.)

विरार -शिरसाड-वज्रेश्वरी -उंबरपाडा (अहमेदाबाद रोड)या रस्त्यावर आहे.
https://www.openstreetmap.org/#map=9/19.4873/73.1503

Srd
इथे एक पिकनिकचा धागा आहे. त्यावर ही माहिती टाकू शकता. नंतर मी लिंक शोधून देतो हवे तर

अरे वा! छानच

इतके संयोजक आहेत तर ती top ची पोस्ट edit करून तारीख तरी टाका.

आता भिड्यांच्या थोबाडपुस्तकावरील पोस्ट वाचून इकडे आलो. बाकीच्या शोषल मीडियात सुद्धा सोसल तेवढ्या रिक्षा फिरवा. ३० जुलै लॉक केलीय का?

आणि पैक किती लागतील त्ये पण लिवा

Pages