खुशखबर - २०२३ वर्षा विहार - संयोजक हवे आहेत.

Submitted by Admin-team on 28 March, 2023 - 02:30

नमस्कार मायबोलीकर,

एक खुशखबर. २०१७ नंतर मधल्या पाच वर्षांच्या विश्रांती नंतर यंदा २०२३ मधे वर्षा विहार पुन्हा उत्साहात करायचे ठरवले आहे. यंदाच्या ववि संयोजनाची धुरा अनुभवी आणि जाणत्या मायबोलीकरांनी उचललेली आहे. त्यांच्या मदतीसाठी ताज्या दमाच्या मायबोलीवर वावर असणाऱ्या संयोजकांची आवश्यकता आहे. तेव्हा तुम्हाला जर यात सहभागी होण्याची इच्छा असेल तर इथे नाव नोंदवा.
अधीक माहिती लवकरच कळवू.

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धनवन्ती,
मी सुद्धा माबोवर नवीन होतो तेव्हा मलाही ते बाय द वे ला रच्याकने वाचताना असेच वटायचे. काय तर म्हणे रस्त्याच्या कडेने. पण म्हटले आपण सांगून कोण ऐकणार नाही. म्हणून मग मी माझाच शब्दकोष तयार केला. आता झेला म्हणत Happy

बाई दवे,
आता तर मी ऑफिस कामकाजातही हा शब्द वापरतो ईतका तोंडी बसलाय Proud आता मेल्याशिवाय ही सवय सुटणार नाही Happy

एकदा सतीश शहाच्या अनुपस्थितीत वर्षा उसगावकरने फिलीप्स टॉप टेन हा कार्यक्रम सादर केला होता.
तोडून बोललेले संवाद, विनोद करताना लाडात मान वेळावून बोलणे , मराठ मोळे हिंदी, सदोष उच्चार, मोनोटोनस आवाज या कौशल्यावर तिने तो कार्यक्रम तुफान बेरंगतदार केला.

तेव्हांपासून वर्षा नावाच्या स्त्रीसोबत विहार करायचा ही कल्पनाच(आयडिया) धडकी भरवते.

हायला बरेच मोठे दिसतेय संयोजक मंडळ.. कोणी आले नाही तरी हिच गर्दी चिकार आहे>>>
खरंच असं वाटतंय का? त्यांचं काम इतकं सोप्पं 2-4लोकं पण करू शकतील असं वाटतंय का?

ऋन्मेऽऽष येणार असेल तर गर्दी नक्की वाढेल.

तो येणार असेल तर मी पण नक्की येणार ( अभिषेकला बदडून काढायचे आहे)
असे म्हणणार्‍या लोकांनी हात वर करा Wink Proud

( हा प्रतिसाद वविला गर्दी वाढवण्यासाठी नसून जेन्युईन समस्या आहे).

माझ्या दोन्ही टंचनिका ( मिस मदनिका आणि मिस उफाडकर) या वविला येण्यासाठी इंटरेस्टेड आहेत. पण ती आली तर मी येणार नाही हे दोघींनीही कळवलेले आहे. आता एकीला घेऊन गेले की दुसरी मुद्दाम तिला नेले कारण मी नकोच होते ना, असे शंभर टक्के म्हणणार. आणि दोघींनाही नेले नाही तर अजूनच पंचाईत. दोघींची समजूत काढण्यासाठी चांदोबातली एखादी आयडिया केली तरी वविला एव्हढे एकेक देखणे पुरूष बघून दोघी पाघळल्या तर माझी स्थिती मदनिकाही गेली उफाडकरही गेली आणि हाती धुपाटणे राहिले अशी होईल.

काहीच समजेना काय करावे ते !
तरीही सौंदर्याचा अ‍ॅटमबाँब मदनिका आणि मादकतेचे क्षेपणास्त्र मिस उफाडकर या दोघींनाही आणण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. ( तरीही येणार्‍यांनी सहकुटूंबच यावे ही विनंती).

खरंच असं वाटतंय का? त्यांचं काम इतकं सोप्पं 2-4लोकं पण करू शकतील असं वाटतंय का?
>>>>>

कश्याला हवीत दोन चार लोकं तरी?
मी एकटा पुरेसा आहे. आणि हे सिद्धही करू शकतो.
ववि तुम्ही करा
त्यानंतर शाहरूख चाहत्यांचा मन्नत गटग मी करतो.
जगाच्या कानाकोपऱ्यातून लोकं येतील.
वविच्या शंभरपट गर्दी जमेल. चेंगराचेंगरीचा धोकाही उद्भवेल. पण त्या उत्सवाला जरा गालबोट लागू देणार नाही याची जबाबदारी माझी Happy

तो येणार असेल तर मी पण नक्की येणार ( अभिषेकला बदडून काढायचे आहे)
Proud
हो या नक्की. मार खाणे रोजच्या सवयीचे आहे मला. त्याचे टेंशन नाही मला..
बाकी अभिषेकच्या जागी ऋन्मेषला बदडून काढायचे बोलला असता तर ऐनवेळी पोरालाच पुढे करता आले असते Proud

बाकी अभिषेकच्या जागी ऋन्मेषला बदडून काढायचे बोलला असता तर >>>

तुला पुरता ओळखून आहे मी Wink

मुलाला पुढे करतो होय रे
दुप्पट मार खा आता माझ्या हातचा

अरे व्वा, छान! Happy
शुभेच्छा संयोजकांना आणि मायबोलीकरांना. आमच्यासाठी वृत्तांत लिहायचं विसरू नका.

टीशर्ट कोणी स्पॉन्सर करते की विकत घ्यावे लागतात?
भाड्याने घ्यायची सोय असते का?
बाई दवे, त्यावर आपले नाव टाकून मिळते का?
तसे केले तर एक भारी राहील. शाहरूखचे नाव लिहायला सांगून एखादा टीशर्ट घेता येईल Happy

टीशर्ट कोणी स्पॉन्सर करते की विकत घ्यावे लागतात?>> जो तो आपापला टिशर्ट स्पॉन्सर करतो Wink
इतक्या वर्षांचे टिशर्ट धागे जर शोधून पाहिलेस तर लक्षात येईल की जो तो आपापला टिशर्ट नुसता विकत घेत नाही तर त्या किंमतीतील ५०/- आपण चॅरीटी करतो. (प्रत्येक टिशर्टच्या किंमतीतून ५०/-)

टिशर्ट डिझाईन,रंग, किंमत सगळ्याची माहिती संयोजक झगा घालून संयोजक लवकरच देतील तोपर्यंत इथे येत जात रहा Wink

टीशर्ट कोणी स्पॉन्सर करते की विकत घ्यावे लागतात?

>>>> मायबोलीवर एक महिना तू एकही पोस्ट नाही टाकलीस तर तुझा टी शर्ट मी स्पॉन्सर करतो Wink

मायबोलीवर एक महिना तू एकही पोस्ट नाही टाकलीस तर तुझा टी शर्ट मी स्पॉन्सर करतो Wink>> आबा तुम्ही आधीच एका टिशर्टचा लॉस केलात. तो टिशर्ट आता तसाच पडून रहाणार दुकानात Sad Lol

Pages