खुशखबर - २०२३ वर्षा विहार - संयोजक हवे आहेत.

Submitted by Admin-team on 28 March, 2023 - 02:30

नमस्कार मायबोलीकर,

एक खुशखबर. २०१७ नंतर मधल्या पाच वर्षांच्या विश्रांती नंतर यंदा २०२३ मधे वर्षा विहार पुन्हा उत्साहात करायचे ठरवले आहे. यंदाच्या ववि संयोजनाची धुरा अनुभवी आणि जाणत्या मायबोलीकरांनी उचललेली आहे. त्यांच्या मदतीसाठी ताज्या दमाच्या मायबोलीवर वावर असणाऱ्या संयोजकांची आवश्यकता आहे. तेव्हा तुम्हाला जर यात सहभागी होण्याची इच्छा असेल तर इथे नाव नोंदवा.
अधीक माहिती लवकरच कळवू.

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठे नाव नोंदणी करायची आहे ? ते की समजलं नाही मला... कोणी सांगेल का?? कारण मला यात सहभागी व्हायला आवडेल

कारण मला यात सहभागी व्हायला आवडेल
>>>>व वि साठी की संयोजक म्हणून

संयोजक >>>> याच धाग्यावर पोस्ट करा इच्छुक आहे म्हणून

ववि >>>> अजुन वेळ आहे, धागा निघेलच वेगळा

कुठे नाव नोंदणी करायची आहे ? ते की समजलं नाही मला... कोणी सांगेल का?? कारण मला यात सहभागी व्हायला आवडेल>>> @मधुरा कुलकर्णी, इथेच नोंदवा तुम्हाला संयोजनात येण्याची इच्छा आहे असे. आणि कुठे राहता सध्या ते ही नमूद करा

संयोजक टिम ॲडमीन फायनल करतील आणि योग्य वेळी बाफ उघडतीलच तसा

वर्षा विहार ला शुभेच्छा.

आमची भूमिका प्रोत्साहनाची तेव्हा
जोरदार होऊ द्या ववि.

-दिलीप बिरुटे
(शुभेच्छूक ववि वाचक मित्रमंडळ.)

मुंजाबाच्या बोळीत ववि ठरत असेल तर मी येतो.
घरून बुचाला छिद्र पाडलेल्या पाण्याच्या बाटल्या आणूयात.

ठरवा तारीख आणि कळवा लवकर
मे उजाडला.. आंबे खाऊन संपले.. बघता बघता पाऊस येईल आता.. मला महिनाभर आधी तरी तारीख बूक करावी लागते.

गेल्या वेळेच्या काळा घोडा गटग पासून मी 'बेगानी शादीमे अब्दुल्ला....' बनण्याचे पूर्ण बंद केलेले आहे. झले गटग झाले - नाही झाले तर नाही झाले. स्थितप्रज्ञ.

सामो, असे आले मनात ठरवले गटग केले की ते फेल जाण्याची शक्यता जास्त असते. काही मेंबर्स पर्सनल चॅटवर नक्की करून मग धागा काढणे योग्य राहते. हे वर्ष संपायच्या आत मायबोलीवरील शाखाप्रेमींचे एक मन्नत गटग करायचा विचार आहे. त्यासाठी अंतर्गत पातळीवर जुळवाजुळवही चालू आहे Happy

ऋन्मेष तू संयोजनात भाग घे मग काय ती पळव गाडी फुल स्पीडने.

सामो ऐसा डरने का नै जी. तू पण घे भाग संयोजनात. गटग वेगळे आणि ववि वेगळा. जो येईल तो धमाल करेलच Wink

हो गटग वेगळे, ववि वेगळा.
मिसळता आले तर नक्कीच छान धमाल असते.

कविन, अहो जुने अनुभवी संयोजक असतीलच. त्यांच्यात नवीन चेहरे पुढच्या वर्षी जोडा. यावर्षी पहिले थांबलेली गाडी सुरू तर करा. माझे म्हणाल तर मला संयोजन बिलकुल जमत नाही. झाल्यास वविच्या दिवशी पाऊस नाही पडला तर दोनचार टॅंकरची सोय करू शकतो.

आचार्य, शाखावरचे विनोद राखून ठेवा. आपण त्या गटगच्या धाग्यात मारूया Happy

यंदाचं वर्षा विहार संयोजक मंडळ खालील प्रमाणे आहे आणि ही मंडळी जोमात कामाला देखील लागली आहेत. सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
****
विनय भिडे, हिमांशु कुलकर्णी, विशाल कुलकर्णी, दीप्ती जोशी, मनोज हातळगे, योगेश कुलकर्णी, निलेश वेदक, आनंद चव्हाण, मंजिरी कान्हेरे, कविता नवरे, मुग्धा कुलकर्णी.

बाई दवे,
ववि श्रावणात ठेवता येईल का?

विनय भिडे, हिमांशु कुलकर्णी, विशाल कुलकर्णी, दीप्ती जोशी, मनोज हातळगे, योगेश कुलकर्णी, निलेश वेदक, आनंद चव्हाण, मंजिरी कान्हेरे, कविता नवरे, मुग्धा कुलकर्णी. >>

अरे , किती सही संयोजन समिती आहे , धमाल ववि होणार नक्की . Happy

आम्ही तिघे (मी , कविता आणि ओवी ) २९ जुलैला संध्याकाळी भारतात येणार आहे .

३० जुलैला आमच्या नशीबाने ववि असेल तर १००% येऊ आम्ही तिघेही Happy

<<<<बाई दवे,
ववि श्रावणात ठेवता येईल का?

नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 23 May, 2023>>>

इथे दवे बाई नाहीत कोणी...
ते "बाय द वे" असे लिहिण्याची सवय लावून घ्या.
दर वेळेस ते वाचताना दाताखाली खडा आल्यासारखे टोचते.

या पोस्टचा उपयोग होईल का नाही हे माहीत नाही, पण ते विचित्र वाचणे असह्य झालेय मलातरी....

Pages