
* * *
- प्रेसेंटेशन झकास आहे. किंमत किती असणार एका फ्लॅटची साधारण ?
- सात कोटी पासून सुरु
- म्हणजे फक्त श्रीमंत लोकं राहणार ना. त्यांना चालेल असे ‘किचनलेस होम’. नवरा बायको दोन्ही मोठ्या पदांवर काम करणारे, भरपूर पैसे कमावणारे. खूप आहेत असे कपल्स आपल्या बंगळुरूत. तेच घेतील तुझे फ्लॅट.
- तसं नाही, काही व्यापारी आणि संयुक्त कुटुंब असलेल्यांनाही इंटरेस्ट दाखवलाय.
- दाखवणारच ! व्यापारी म्हणजे स्थानिक नसणारच. श्रीमंतांच्या बायका नाहीतरी कामचुकार असतात. खायचे-प्यायचे-ल्यायचे-मिरवायचे-लोळायचे हेच त्यांचे काम. पैसा भरपूर असतो ना. गरजच नसते काही काम करायची.
- कित्ती प्रिजुडाईसेस तुझे गं आक्का !
- असेनात का. बोगस आयडिया आहे तुझी किचनलेस होम ची.
* * *
- पण करायचीच कशाला अशी उठाठेव. आशियाना विदाउट भटारखाना? किचनलेस होम म्हणे. जगतो आपण पोटासाठी. स्वतःला हवे तसे करून खाता येत नसेल तर काय उपयोग अशा मोठ्या राजेशाही घराचा?
- अरे मित्रा, प्रत्येक घरात नसले तरी मोट्ठे कॉमन किचन आहे ना प्रकल्पात. चोवीस तास सुसज्ज, अत्याधुनिक रुफटॉप किचन. चहा, नाश्ता, जेवण-खावण, दारू, आईस्क्रीम, पिझ्झा पास्ता, दहीबुत्ती विथ अम्मा स्टाईल मँगो पिकल ...सगळे मिळणारी जागा. नावही तसेच ठरवलेय मी. ‘फूड कामधेनू’ ! मागाल ते मिळेल या सामायिक किचनमध्ये. मग का पाहिजे प्रत्येक फ्लॅट ला वेगळे किचन ?
- शेवटी ते हॉटेल ना ? कधीतरी घरी पटकन करून खायला किचनेट तरी हवे ना ? आणि रात्रीबेरात्री कुणी आले तर ?
- सर्व विचार केलाय माझ्या टीम नी. चोवीस तास किचन आहे. स्वतः जाऊन करायचे तर करता येईल. फोनवर सांगितले तर मागाल ते घरी आणून देईल आमचा स्टाफ. रिझनेबल रेट मध्ये. चोवीस तास. हवे तेव्हढे. जब और जितना आप चाहो. और क्या चाहिये ?
- तरी घराची सर नाही यायची या सेटअपला. हॉटेल वाटेल ते, घर नाही.
* * *
- पण हवे तेव्हढे नोकर मिळतात. पैसे टाकले की स्वयंपाक करायला घरी लोकं येतात. आपल्यासमोर आपल्याला हवा तसा स्वयंपाक करून देतात. हे काय वेगळे असणार?
- असतं. किचन म्हणजे फक्त दोनवेळा स्वयंपाक असतो का? तुमच्या मावशी ग्रोसरी आणतात की तुम्ही स्वतः ? कोण सॉर्टींग-स्टोअरिंग करतं ? भाज्या आणि फळे ? रोजचा मेन्यू स्वतःच ठरवतात की तो ठरवायला ऑफिसच्या गंभीर मीटिंगमध्ये तुम्ही असतांना मधेच फोन करतात ? टूरवर असतांना आज मुलांचे-नवऱ्याचे जेवणाचे डबे तुम्हाला आठवत असतात का ? ज्यूस कोण तयार करतं ? बर्फासाठी फ्रीजमधे पाणी ट्रे कोण लावतं ? फ्रीझ ची स्वच्छता कोण करतं ? गार्बेज कोण रिकामं करतं ? त्यात किचनशी संबंधित कचरा किती असतो? पेस्ट कंट्रोल ? ते कोण बघतं ? भांडी घासणे? त्यासाठीची उस्तवार ? किचनची स्वच्छता ? मेंटेनन्स? कुकिंग रेंज, ग्रिल-मायक्रोवेव्ह, गॅस सिलेंडर, चिमनी, मिक्सर-ग्राइंडर-ज्युसर, रोटीमेकर, डोसा मेकर ….. सगळ्यांची खरेदी सफाई दुरुस्ती, ती कोण करतं ? उद्या डब्यात काय आणि संध्याकाळी काय आणि आज त्यासाठी करायची तयारी काय हे रोज कोण ठरवतं आणि करतं ?
- ऐकतेय मी. आगे बोलो
- बाईसाहेब, तुमच्या लक्षात येतंय का ? एका किचनने तुमचे सर्व जीवन व्यापून टाकले आहे. हजारो कामे तुम्हाला येऊन चिकटली आहेत. लाईक अ मॅग्नेट. आणि आता तुम्हाला ती सोडवत नाही आहेत. वन वे ट्रॅप. अभिमन्यू झालाय तुमचा. तुमच्यासारख्या अनेक स्त्रिया हा चक्रव्यूह भेदायला उत्सुक आहेत. माझा 'किचनलेस होम' प्रोजेक्ट अशा स्त्रियांसाठी वरदान आहे. विचार करा तुम्ही.
- काही पुरुष करत असतील घरची कामं. सगळेच काही ऐतखाऊ नसतील. बऱ्याच स्त्रिया बाय चॉईस होम मेकर असतील ना ?
- असं बघा मॅडम, जगाच्या पाठीवर एकूण पुरुष ३९७ कोटी तर महिला ३९० कोटी, म्हणजे साधारण ५०% प्रत्येकी. त्यातले प्रगत, समंजस, लिंगनिरपेक्ष, घरकाम करणारे किंवा त्यात मदत करणारे दोन-पाच टक्के पुरुष सोडले तरी जगभरात आजही प्रचंड मोठ्या प्रमाणात स्त्रियांचा वेळ हा चूल आणि मूल सांभाळण्यात जातो. मूल बाजूला ठेवू थोडावेळ, तरी अर्ध्या लोकसंख्येचा चुलीपाशीचा वेळ अन्यत्र अधिक चांगल्याप्रकारे गुंतवला तर एकूणच मानवजातीचे कल्याण होईल. प्रॉडक्टिव्हिटी वाढेल, नवनवे शोध लागतील, जगणे सुकर होईल.
- समज मला आवडच आहे स्वयंपाकाची तर ?
- ज्या स्त्री-पुरुषांना स्वयंपाकाची आवड आहे ते इतरांसाठी करतील, त्यांना पैसे मिळतील आणि आवडीचे काम करण्याचा आनंदही.
- पटतंय का ?
- नाही.
* * *
* * *
- अरे आय वॉन्ट टू गिव्ह यू अ हग फॉर धिस ! तू तर स्वर्ग साकारणारा देव वाटतोस मला. तो कोण होता नवी सृष्टी रचणारा ऋषी ? वसिष्ठ ?
- नाही, विश्वमित्र होता बहुतेक.
- त्याचे होते ना सर्व कस्टम मेड ? भन्नाट आयडिया आहे - आशियाना विदाउट भटारखाना. मी जग फिरते पण कान्ट कीप अवे द किचन फ्रॉम माय माईंड. मी ठरवले तरी माझे कुटुंब मला ते विसरू देत नाही. ५-६ दिवस ‘ऍडजस्ट’ करतात म्हणे अन मी घरात पाय ठेवला की फर्माईशी कार्यक्रम चालू. डार्लिंग भाकरी ठेचा तुझ्या हातचा... ममा बटर चिकन तुझ्या हातचे...सुनबाई प्रसादाला शिरा सोवळ्यातला, तूच कर गं .. अरे मी काय मशीन आहे काय ? काय फायदा माझ्या शिक्षणाचा, लठ्ठ पगारी नोकरीचा आणि माझ्या कामातल्या हुशारीचा ? मी घरात आले की किचनमध्ये मला ढकलायला सगळे सज्ज. वर प्रेमळपणे सगळे. नाही म्हणायला मलाच गिल्ट यावा अशी नाकेबंदी. नकोच ते किचन. सर्वांना सर्व देणारी तुझी कामधेनू हवी. वा भाई वा. तूने मेरा दिल जीत लिया. मला धर रे तुझ्या बुकिंग लिस्ट मध्ये.
- जरूर. वेलकम टू अवर किचनलेस होम फॅमिली.
- स्त्री, तिचे घर, तिचे कुटुंब, कुटुंबातील स्थान झालच तर समाजातील स्थान सगळेच 'किचन' आणि स्वयंपाक याला कसे जोडता येईल ? हुषार कमावत्या बाईने घरी येताच पदर खोचून कामाला लागावे, सगळ्यांना आवडणारा गरमागरम स्वयंपाक करावा. सगळे घर कसे तृप्त होते. घराला घरपण येते. हेच काम पुरुषाने एखाद्याच दिवशी केले तर तो दिवस सणाचा, स्त्रीसम्मानाचा ? माय फुट.
- माझा एक प्रश्न आहे. हे सगळे मास्टर शेफ संजीव कपूर, रणवीर ब्रार, विकास खन्ना, कुणाल कपूर काम संपवून घरी जातात तेव्हा त्यांच्यासाठी स्वयंपाक कोण करतं ? ते तर स्वतःच एक्स्पर्ट ना ?
- यू सिंग माय सॉंग बडी. लव्ह द साउंड ऑफ युअर वर्ड्स.
- तू तर जगभर फिरतेस, अमेरिकेतही लॉन्ग स्टे. तिकडे काय आहे परिस्थिती ?
- अमेरिकेत ? सेम. थोडे सटल आहे तिकडे, पण आहे हेच. बेकिंग युअर फ्रेश कुकीज. अमेरीकानो. विथ आफ्टरनून टी / कॉफी. उत्तम अमेरिकन फर्स्ट लेडी होण्याचं क्वॉलिफिकेशन आहे ते. हिलरी क्लिंटन असो की मिशेल ओबामा. अपेक्षा असतातच त्यांच्याकडून किचन सांभाळण्याच्या. डिफेन्स काय तर म्हणे त्यांच्या दिमतीला एवढे नोकरचाकर असतात, दिले थोडे लक्ष तर काय बिघडले ?
- पण तुला माहिताय का ? याच अमेरिकेत मोठ्या शहरातल्या १९२० सालापूर्वीच्या घरांमध्ये किचन नव्हतेच. सर्वांचे एकच सामायिक किचन. सगळे लंगर का खाना वाले. नो किचनेट टू. पण पुढे रशियन असेच कम्यून बांधतात म्हणून अमेरिकेत किचनलेस हाऊसिंग ही शिवी झाली म्हणे. सामायिक किचन म्हणजे रशिया, त्यांची कम्युनिस्ट थेरं. बंद पडला तो प्रकार आणि बायका जुंपल्या गेल्या घराघरातल्या किचन कामात. ऐकलं का तू आधी कधी हे ?
- नाही ऐकले हे आधी. बराच रिसर्च केला आहेस. आय एम इन. माझं बुकिंग नक्की, पटवते मी घरात सगळ्यांना.
* * *
- चिन्नू, हा विचार वेगळा आहे बेटा. कोण ती बया ? काय तरी नाव म्हणे –
- आना पुईजानेर ..
- आर्किटेक्ट? कुठं अमेरिकेत राहते का ती ?
- नाही अम्मा, स्पेन.
- तेच ते सेमच रे. गोऱ्या लोकांची थेरं. नकोच आपल्याकडे हे.
- किती रे वय तिचं ?
- असेल तिशीची -फार तर पस्तीस.
- किचनलेस होम या कल्पनेसाठी तिने जगभर फिरून अभ्यास केला अम्मा. स्वतः तसे प्रॉजेक्ट उभारलेत. उत्तमरीत्या चालवलेत. तिला पुरस्कार मिळालेत भरपूर आणि पुढील कामासाठी फंडिंग सुद्धा.
- फार इंप्रेस झालेला दिसतो माझा बिल्डर मुलगा.
- होय अम्मा, मला तिचा विचार पटतो आहे. शिवाय किचनलेस होम हा चांगला मार्केटिंगचा मुद्दा ठरेल असे माझ्यातला बिझनेसमन मला सांगतोय अम्मा.
- पण आता आमच्यावेळसारखं नाही चिन्नू. जात्यावरचं दळण, पाटा वरवंटा, खलबत्ता जाऊन आता किती सोयीचा झालाय स्वयंपाक ? आपल्याच घरातले ग्याजेटस बघ. नाही का पुरेसे ?
- कितीही नवनवीन उपकरणे आणि सोयीसुविधा आल्या तरी महिन्याकाठी किचनमध्ये लागणार वेळ फार कमी काही झालेला नाही. घर आणि विशेषतः किचन स्वच्छ आणि टापटीप ठेवण्यामध्ये दिवसाचा आणि आयुष्याचा एक फार मोठा भाग खर्च होतो. बहुतेक जागी हा वेळ आणि हे श्रम स्त्रियांचे असतात.

- व्हॉट अबाऊट द फूड रुटीनस चिन्नू ? सच लव्हली फूड रिच्युअल्स, एज ओल्ड. डीप रूटेड इन अवर प्राउड हेरिटेज ! व्हॉट अबाऊट देम ? आपलं घर अन्नाभोवती फिरतं. सगळ्यांच्या पसंतीचे खाणे-पिणे यात मजा नाही का ?
- ते काम घरातच स्वतः एकाच व्यक्तीने आयुष्यभर करत राहावे हा हट्ट का ? आमच्या खाण्यापिण्याची आबाळ होईल म्हणून तू धड ४ दिवस माहेरी तरी राहिलीस का अम्मा ?
- एक सांगू ? वेडी आहे ती कोण आना का फाना पुईजानेर. तिला काय आम्हा सर्व बायकांपेक्षा जास्त समजतं का ? केस उन्हात पांढरे नाहीत केले हे. स्वयंपाक आणि अन्न घराला बांधून ठेवते. चार दिवस घरी स्वयंपाक नाही झाला तर बाहेरचे खाऊन आजारी तरी पडतील नाही तर कंटाळतील तरी. स्वयंपाकघराविना कसले घर? घराचे हॉटेल होईल.
- आपल्याकडे नाही पण अनेकांकडे घरातले किचन म्हणजे धगधगते अग्निकुंड. ठिणगी पडायचा अवकाश की युद्ध सुरु. टीव्हीवरच्या तुझ्या त्या दळणदळू मालिकांमध्ये किचन आणि डायनींग टेबल हा कट कारस्थानाचा आणि खलबतांचा अड्डा म्हणूनच दाखवले जाते, ते उगाच नाही अम्मा. अनेक कुटुंबात, विशेषतः मोठ्या संयुक्त कुटुंबात अन्न आणि स्वयंपाक याचा एखाद्या शस्त्रासारखा वापर केला जातो. तिथे किचनचे रणांगण होते. फार दूर कशाला मुत्थुमामाकडेच बघ.
- माझ्या माहेरच्या लोकांबद्दल बोलायचं काम नाही चिन्नू. आणि ऐक, असे तर कुणीच कुणासाठी काही करायला नको मग. सगळेच मोल देऊन विकत घ्या. भावना, ओलावा, एकमेकांबद्दल प्रेम राहील का लोकांमध्ये ?
- अम्मा, प्रेम फक्त एखाद्यासाठी स्वयंपाक करून दिला तरच आणि त्यातच असतं का ?
- नॉट दॅट वे चिन्नू, पण प्रेमाचा मार्ग पोटातून जातो हे ऐकलंय ना ?
- क्लिशे.
- क्लिशे ईज क्लिशे फॉर अ रीझन चिन्नू बेटा.
* * *

- मैं हुसैन. और ये है डॉ. नफिसा, मेरी मंगेतर. वी आर गेटिंग मॅरीड नेक्स्ट मंथ. माझा एक्स्पोर्ट बिझनेस आहे आणि नफिसा नेफ्रोलॉजिस्ट, मुंबईतच मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करते. मेरे चाचा हैं मोहम्मद वाजुद्दीन जिनका आपने जिक्र किया.
- तुमचे चचाजान सांगत होते की तुम्ही आधीच ‘किचनलेस होम’ वाले आहात, खरे का ?
- हो, साधारण २००८ सालापासूनच.
- वॉव. कसे जमवले ? घरातल्या लोकांना कसे पटवले ?
- पटवायचे काय त्यात ? हिचे आणि माझे आई- बाबा दोघे डॉक्टर आहेत. फुलटाईम वर्किंग कपल्स. आमच्यासारखेच. सगळ्यांना सोयीचं आहे किचनलेस होम.
- पण मुळात ही आयडिया आली कशी ?
- मैं बताती हूं. आमचा बोहरा मुस्लिम समाज व्यापार आणि शिक्षण दोन्हीकडे आधीपासून पुढे आहे. सर्वांनीच, विशेषतः स्त्रियांनी भरपूर शिकावे आणि पूर्णवेळ व्यवसाय-नोकरी करावी यावर आमच्या समाजाचा भर आहे. मॅनेजिंग किचन अँड फुलटाईम करियर डोन्ट गो हॅन्ड इन हॅन्ड.
- मग ? तुमची संस्था FMB, त्याबद्दल तुमचे काका सांगत होते ते काय ?
- आमचे धर्मगुरू सैय्यदना. समाजाचे मार्गदर्शक, आमचे मौला, वली, खलिफा. ५२ वे धर्मगुरू सैयदाना बुऱ्हानुद्दीन यांच्या कल्पनेतून फैझ-अल-मावैद-अल-बुरहानीया म्हणजे FMB हे अन्नछत्र सुरु झाले आधी. गरिबांसाठी फुकट खाना. रोज, दिवसातून तीन वेळ. समाज श्रीमंत असल्यामुळे लोकांना 'फुकट' अन्नाची गरज कमी. सैयदना स्वतः स्रियांनी स्वयंपाकघरातून मुक्त होऊन स्वतःच्या व्यवसायाकडे आणि करियरकडे पूर्णवेळ लक्ष द्यावे या मताचे. त्यामुळे पुढे सर्वांसाठीच 'तयार' खाना दिवसातून १-२-३-४ वेळेला, जसे हवे तसे उपलब्ध करून द्यावा यावर त्यांचा भर. ब्रेकफास्ट, लंच, मिड इव्ह स्नॅक्स, डिनर. दॅट वॉज द स्टार्ट.
- सर्वांना फुकट ?
- नाही. फुकट घेणे आम्हाला कमीपणाचे वाटते. ठराविक रक्कम महिन्याला भरून ही सोय मिळवता येते आणि आर्थिक अडचण असेल तर विनामूल्य. सर्व सधन कुटुंबे पैसे देतांना स्वतःतर्फे काही जादा पैसे भरून अन्य कोणाला तेच अन्न कमी पैश्यात किंवा विनामूल्य मिळेल अशी व्यवस्था करतात. गुप्तपणे. थोडे क्रॉस सबसिडी सारखे. अन्नासाठी पैसे कमी पडलेच तर समाजाच्या संयुक्त फंडातून दिले जातात.
- वा. म्हणजे घरी किचन नाहीच ? किती लोक वापरतात ही सोय ?
- भरपूर. साधारण १ लाख बोहरा मुंबईत राहतात. फोर्ट भागात बद्री महल हे समाजाचं मुख्यालय आहे, तेथून हे कामकाज चालते. आम्ही लोकं स्वतःच्या कामातून वेळ काढून 'सेवा' म्हणून काम करतो. अन्न शिजवायला, त्याचे पॅकिंग आणि वाटप करायला पगारी सेवक मोठ्या प्रमाणात ठेवलेले आहेत, त्यामुळे काम सोपे आणि व्यावसायिक पद्धतीने होते. आहारतज्ञ महिन्याचा मेन्यू बनवून देतात, समाजातील लोक वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाच्या, स्वच्छतेच्या आणि एकूणच कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याचे काम करतात.
- जास्त कमी नाही होत का ? वेस्टेज वगैरे ?
- त्यासाठी एक 'दाना कमिटी' आहे. सर्व लोकांना जेवण पाठवले की उरलेल्या अन्नाचा एकही कण वाया जाऊ देत नाही. ते अन्न गोरगरिबांना विनामूल्य वाटतो, अगदी खाली सांडलेल्या अन्नाचे कण नीट गोळा करून मांजरी आणि पक्ष्यांसाठी ठेवतो आम्ही.
- मुंबईबाहेरच्या लोकांचं काय ?
- जिथे जिथे समाजाची पुरेशी संख्या आहे तिथे आहे ही सोय. गुजरातमध्ये राजकोट सारख्या छोट्या शहरात २२०० बोहरा परिवार आहेत आणि त्यांना सोयीच्या ठिकाणी ५ वेगवेगळी कम्युनिटी किचन आहेत. राजस्थानातल्या कोटा शहरात १५०० बोहरा एकाच भागात राहत असल्याने एकच मोठे किचन त्यांना पुरेसे आहे. सुरत, खंबात, पाकिस्तानात कराची, श्रीलंकेत कोलंबो, सब जगह शुरू है. दिन में चार दफे. घरमें किचन नही है, किचनलेस होम इज अ रियालिटी !
- अरे यार. माझे 'किचनलेस होम' वाले अपार्टमेंट्स म्हणजे काही नवीन नाही. यू गाईज आर ऑलरेडी डुईंग इट लाईक अ प्रो. आशियाना विदाउट भटारखाना !
* * *
तर मित्रांनो, बिल्डर चिन्नू उर्फ चिन्नासामी आणि त्याच्या गोतावळ्यातला हा संवाद संपला नाहीये अजून. जितने मुंह उतनी बातें. चर्चा सुरूच आहे, ती तुम्ही पुढे न्या; तुमचे, तुमच्या मित्रांचे, कुटुंबियांचे, कल्पनेतल्या मित्रांचे मत - संवाद लिहा. थोडे विचारमंथन होईल, झाली तर चिन्नूला मदतच होईल. व्हॉट से ?
* * *
हिहीही
हिहीही
पूर्वीच्या काळी लोकांच्या घरातून थेट गुहेत उघडणारी भुयारं असायची.शत्रूचा हल्ला झाला की त्यातून राणी किंवा दासी आणि बाळ पाठवायचे.
आता सकाळाचा चहा करताना
आता सकाळाचा चहा करताना किचनलेस होम असतं तर काय यावरून बरेच प्रश्न पडले. एका घरात चार माणसं असतील तर प्रत्येकाच्या चहाच्या (किंवा सकाळच्या पेयाच्या ) चार तर्हा असतात. तो कसा हवा, केव्हा हवा , कुठे हवा, किती वेळा हवा, इ. हे या किचनलेस होम्समध्ये कसं जमेल?
शिवाय मूळ कन्सेप्टमध्ये लोकांनी कम्युनिटी डायनिंग एरियात जायचं आहे. इथे काय पद्धत असणार आहे? हे +
अन्न म्हणजे शरीर आणि जीवन चालवण्यासाठी लागणारं इंधन यापेक्षा अधिक काही नाही, असं वाटणार्यांसाठीच हे असेल का?
आपण हॉटेल ला थांबलो की सर्व
आपण हॉटेल ला थांबलो की सर्व कुटुंब आपल्या खाण्याच्या प्रथा आणि नखरे मोडून बरे कपडे घालून ब्रेकफास्ट ला एकत्र जातं तसं.
(त्यातही फुकट बुफे ब्रेकफास्ट असला तर अचानक अनेकांना 'मला बाई फक्त ब्रेड बटर मध आणि चिरलेलं अव्होकाडो किंचित ऑलिव्ह ऑइल भुरभुरूनच लागतं हो ब्रेकफास्ट ला' असे घरी अनेक वर्षं न लागलेले अनोखे शोध लागतात.)
'त्यांच्या आयुष्यात 'लाइफ'
'त्यांच्या आयुष्यात 'लाइफ' होतं का पण? सगळी लढाई सर्वायवलचीच.'
आजही तीच लढाई आहे. आणि त्या बायका जे जगत आहेत ते ' life' च आहे. जसे आनंद हा ' स्टेट ऑफ माईंड ' आहे तसेच जगण्यासाठीचा संघर्ष हाही तुम्ही कसा घेता त्यावर आहे.
त्या बायका सदैव हसतमुख असतात. वेळ असेल तर गिऱ्हाईकाशी
हास्यविनोद करतात, जिव्हाळ्याचे नाते जोडतात, एकदोन दिवसाचे ' outing ' ठरवतात. एकमेकांकडे एकत्र येऊन ' पार्टी ' करतात. धंदा सांभाळायला कोणी substitute असेल तर चक्क चार आठ दिवसांची तिरुपती, चारधाम, गंगोत्री वगैरे ' टूर 'ही करतात. आमच्या इथल्या बाया दिल्ली आगरा आणि दुबई इथे विमानाने जाऊन आल्या! त्यातल्या एस एस सी किंवा बारावीपर्यंत शिकलेल्या एखाद दोघी बुकिंग ऑनलाईन करतात.
मुख्य म्हणजे धर्मशाळेत राहाणं, तिसरा दर्जा, थोडी अस्वच्छ प्रसाधनगृहे, अगदी साधे हॉटेल, जेवण हे सगळे त्या 'enjoy ' करतात. परत आल्या आल्या लागलीच ओढणी बांधून किंवा बाजूला सारून झपाट्याने कामाला लागतात.
हे अर्थात शहरातल्या कामवाल्या ,भाजीवाल्या, कोळणी ह्यांच्या संदर्भात आहे.
थोडक्यात काय तर मायबोलीकरांना
थोडक्यात काय तर मायबोलीकरांना कुठे न्यायची म्हणून सोय नाही. ७ कोटीच्या घरात तर मुळीच नाही.
(No subject)
: हाहा:
(No subject)
(No subject)
सायो
सायो
मस्तच सायो बेन.
मस्तच सायो बेन.
कालच बातमी होती एका फॅमिलीने मुंबईतील सर्वात महाग अपार्ट मेंट ३६९ कोटीला एका फॅमिलीने घेतले आहे. ट्रिप्लेक्स आहे. तीन मजले १.०८ एकर एरिआ. हे ही नो किचनच असावे. इतके शिरीमंत लोक्स व त्यांच्या बायका थोडी च स्वयंपाक आपल्या हाताने करतील. त्यांच्याकडे मोबाइल चार्ज करायला पण माणसे असतील. ( माझी श्रिमंतीची कल्पना इतकीच आहे.)
चिन्नू ह्यांस एक प्रश्न आहे. इतक्या मोठा सात कोटी प्रत्येकी अपार्ट मेंट कॉम्प्लेक्स मध्ये खाली बेसमेंटात वॉचमेन व त्यांच्या फॅमिलीसाठी एक एक खोल्यांची घरे असतील का? त्यांच्या साठी व स्टाफ / मोलकरणींसाठी प्रशस्त व स्वच्छ टॉयलेट्स असतील का? त्या साठी बजेट उरले आहे का? का तू १ ३ देख!!!
स्टाफ / मोलकरणींसाठी प्रशस्त
स्टाफ / मोलकरणींसाठी प्रशस्त व स्वच्छ टॉयलेट्स ?
हे इतके दुर्मिळ नसावे.
मुंबई उपनगरातल्या आमच्या (मध्यमवर्गीय लोकांसाठीच्या, हाय फाय नाही) २० वर्ष जुन्या संकुलात वॉचमन आणि मदतनीस महिलांसाठी टॉयलेट्स आणि चेंज रूम्स आहेत. सोसायटी स्वच्छ ठेवण्याबद्दल जागरूक आहे.
पुण्यात थोड्या मोठया घरात (३ + BHK ) राहणाऱ्या परिचितांकडे फ्लॅटच्या आतच स्टाफ साठी वेगळी रूम+ टॉयलेट असणे नॉर्मल आहे. Nothing special about it
'सात कोटीचे घर' / श्रीमंत लोक
'सात कोटीचे घर' / श्रीमंत लोक आणि त्यांचे नखरे वगैरे मुद्द्यावर भरपूर प्रतिसाद आहेत.
बोहरा समाजाच्या - ज्यात श्रीमंत आणि वर्किंग क्लास मध्यमवर्गीय दोन्ही टाईपचे लोक आहेत आणि ओरिसाच्या मजुरांनी केलेल्या किचनलेस होमच्या समव्हॉट यशस्वी प्रयोगाकडे बहुतेकांनी दुर्लक्ष केलेले दिसते
असे का झाले असावे ?
मजुरांचा प्रकल्प स्त्युत्यच
मजुरांचा प्रकल्प स्त्युत्यच आहे. इथे कोणी बांधकाम मजुर/ त्या सोशिओ इकॉनॉमिकल स्तरातील लोक नसल्याने त्यावर फार फोकस गेला नसेल कदाचित. तसेच त्या स्तरातील लोकांना मध्यमवर्गीय चोचले परवडत नाहीत, ते एकसंध (म्हणजे एकाच जमातीचे, एकच फूड कल्चर असलेले इ. इ. ) असल्याने तिकडे ते जास्त रोधकांविना शक्यही असावे. इथे येणारे लोक मुख्यतः शहरी मध्यम / उच्च मध्यमवर्गीय असल्याने आपल्या परिघात हे प्रयोग कितपत शक्य आहेत याची पडताळणी करत असावेत. प्रतिसाद नखरे प्रकारचे नसून ते आपल्या परिघात प्रॅक्टिकली किती फारफेच्ड आणि अशक्य आहेत अशा प्रकारचे आहेत.
कारण चिन्नूचा प्रोजेक्ट सात
कारण चिन्नूचा प्रोजेक्ट सात कोटीवाल्यांसाठी आहे. तिथे मजूर, बोहरा हे स्पष्टीकरण लागू का व्हावं? त्यांना आपल्याच घरात अद्यावत किचन अधिक स्टाफसह हवं ते करणं सहज शक्य आहे.
मजुरांसाठीचं कम्युनिटी कीचन अगदी प्रॅक्टिकल आहे. मूळ कन्सेप्टमधला विचारही चांगला आहे.
सायो
सायो
इथे येणारे लोक मुख्यतः शहरी मध्यम / उच्च मध्यमवर्गीय असल्याने आपल्या परिघात हे प्रयोग कितपत शक्य आहेत याची पडताळणी करत असावेत. >>> +१
दिवसभर काम करावे लागणारे मजूर, विशेषतः बायका - यांच्याकरता हे उपयोगी आहे यात काहीच वाद नाही. पहिल्या पोस्टमधेही ते लिहीले होते.
Please check and confirm
Please check and confirm chinnu s plans about facilities for the facilities staff and security. Leave other builders and buildings alone. Or may be there will be Robots and AI?! See a great idea overall.
Please check and confirm
Please check and confirm chinnu s plans about facilities for the facilities staff and security. Leave other builders and buildings alone
???????
Discussion here is about staff toilets or kitchenless home ? I think later
ओडिशातील मजूर एकत्र जेवतात
ओडिशातील मजूर एकत्र जेवतात यामागे फारशी आदर्श व्यवस्था नाही. शोषणाचा, कायदे न पाळण्याचा तो उत्तम नमुना आहे.
उद्या सविस्तर लिहितो.
…. शोषणाचा, कायदे न पाळण्याचा
…. शोषणाचा, कायदे न पाळण्याचा तो उत्तम नमुना….
कसा ते समजून घ्यायला आवडेल.
काल +१ शी बोलले किचनलेस होम
काल +१ शी बोलले किचनलेस होम आणि कम्युनिटी किचन बद्दल. त्याने देशात होस्टेलच्या मेस चालवत शिक्षण पूर्ण केले.आणि इथेही युनिवर्सिटी कॅफेटेरीयाचा थोडक्यात कमर्शिअल किचनचा अनुभव. त्याचे म्हणणे - 'अशा सेटअप मधे 'हवे ते हवे तेव्हा' हे फिझिबल नसते. आठवड्याचा/महिन्याचा मेनू ठेवावा लागतो. जोडीला घटक पदार्थांतही चौकटीत रहावे लागते. आपल्याकडे साधा पांढरा भात म्हटले तरी तांदळाचेच इतके प्रकार. त्यामुळे हवे ते हवे तेव्हा मिळेल वगैरे कुणी क्लेम केल्यास माझा पास. अजून एक म्हणजे जे किचन सर्वांचे जेवण करायला प्रोफेशनल्स वापरणार तेच गरज पडल्यास रहिवाश्यांनीही वापरणे शक्य नाही, तिथे सतत काम सुरु असणार. रहिवाश्यांना गरज भासल्यास वापरायला दुसरे कम्युनिटी किचन लागेल, त्याचे स्लॉट बुकिंग वगैरे मॅनेज केले तरी मुळात किचन ही तशी धोकादायक जागा - 'अ' सदनिकेतील व्यक्तीच्या वावरातून 'ब' सदनिकेतील व्यक्तीला अपघात - त्यामुळे त्याची एक वाढीव लायबिलिटी असणार .'
ह्या धाग्यामुळे पूर्वी आलेले
ह्या धाग्यामुळे पूर्वी आलेले एक कायप्पाचे फॉरवर्ड आठवले. ते शोधून खाली देत आहे. माफ करा मजकूर इंग्रजीत आहे.
Let America be a lesson to us
What happened in the United States when home cooking stopped?
Famous American economists of the 1980s warned the people
The kitchen has been handed over to private companies, and if the elderly give the child care also to the government, family responsibilities and it's relevance will be destroyed. ”
But very few people listened to their advice
cooking is stopped at home
and the habit of ordering outside thus led to the almost extinction of American families as they warned.
Cooking with love means connecting the family with affection.
Culinary art is not alone. The focal point of family culture.
If there is no kitchen, just a bedroom, it's not a family, it's an hostel.
What about American families who closed the kitchen and think the bedroom alone is enough?.
In 1971, 71 percent of U.S. households had a husband and wife with children.
By 2020, it has fallen to 20 percent.
Families that lived then are now living in Nursing homes (old age homes).
In the United States, women now make up 15 percent of single households
Men make up 12 percent of single-family
19% of homes are owned by dad or mom only.
6% of households are male-female shelters (living together).
41% of all babies born today are born to unmarried women.
Half of them are girls going to school,
About 50 percent of first marriages in the United States end in divorce because of this mess.
67% of second marriages, and
74% of third marriages are also problematic.
The bedroom is not just the family.
If there is no kitchen and only a bedroom,
The United States is an example of the breakdown of marriage.
Our feminists will buy sweets in the shops and celebrate if the families here are destroyed like there.
Mental and physical health deteriorates when families are destroyed.
Eating outside causes the body to become fat.*and susceptible to infection and unnecessary spending
So cooking in the kitchen is not the only reason for family well-being.
Physical health and mental health are also essential to the economy.
That's why elders in our house advised us to reduce/ Avoid eating outside
But today we eat with our family in the restaurants ... ",
Ordering and eating online like Swiggy, Zomato, uber eats,
Is becoming fashionable even among the highly educated, middle class people.,
This habit will be a disaster ...
If those online companies that psychologically decide what we should eat ...
Our ancestors before going to pilgrimage and outings used to cook and carry
So cook at home, eat together and live happily
Must THINK about this.
He he so plans are not final.
He he so plans are not final.
हे जे बदल आणि परिणाम वरती
हे जे बदल आणि परिणाम वरती लिहिले आहेत, त्यांचा कार्यकारणभाव स्पष्ट आहे का? ते परिणाम ह्याच कारणांमुळे आहेत ह्याबद्दल काही अभ्यास झाला आहे काय?
टक्केवारी परीणाम कारणे
टक्केवारी परीणाम कारणे व्हॉटसप पोस्टचे मनावर घ्यायचे नसतात. पण हे वाक्य पटले.
If there is no kitchen, just a bedroom, it's not a family, it's an hostel.
घर बेडरूमच्या चार भिंतींनी बनत नाही. त्यात स्वयंपाकघर हवेच.
खरे तर उलटे एकवेळ चालेल.
खरे तर उलटे एकवेळ चालेल.
किचन सर्वांचे सेपरेट आणि प्रायव्हेट. झोपायला एकत्र यायचे. छान गप्पा मारत, हसत खेळत झोपायचे. लोकसंख्याही नियंत्रणात राहील.
कशासाठी तर म्हणे बायांवर काम
कशासाठी तर म्हणे बायांवर काम कमी पडावं? अजिबात पटलं नाही.>>> पण ज्यांना पटत नसेल त्यांनी हा पर्याय निवडूच नये. हे इतकं सोपं आहे.
मी तर नक्की हा पर्याय निवडला असता तितके मोल देता येणार असेल तर.
झोपायला एकत्र यायचे.
झोपायला एकत्र यायचे. लोकसंख्याही नियंत्रणात राहील...
अद्भुत !!
जर बायांवर काम पडू नये हा
जर बायांवर काम पडू नये हा विचार मुळातच एखाद्या जोडप्याचा असेल तर तो राबवायला सात कोटी खर्च करायची गरज आहे का?
हेच एका अर्थाने असेही म्हणू शकतो की ज्यांना ईतके पैसे खर्च करणे शक्य नाही त्यांच्याकडच्या बायकांना नाईलाजाने राबावेच लागेल का?
हेच पुढे जाऊन असेही म्हणू शकतो की सात कोटी हुंडा द्या. तुमच्या मुलीला न राबवता राणीसारखे ठेवतो
'अ' सदनिकेतील व्यक्तीच्या
'अ' सदनिकेतील व्यक्तीच्या वावरातून 'ब' सदनिकेतील व्यक्तीला अपघात - त्यामुळे त्याची एक वाढीव लायबिलिटी असणार .'>> अगदी खरं. आणि आपल्याकडे 'स्वयंपाक घरातील कामाच्या पद्धती न पटणे' हे सासू - सून वादाचे प्रमुख कारण पिढ्यांपिढ्या आहे. सोसायटीच्या सदस्यांमधील वादाचे हेच कारण होऊ शकेल.
आपल्या कडे घरगुती वादांसाठी 'भांड्याला भांडे लागणे' हा चपखल वाक्प्रचार काही उगीचच आला नाही.
Pages