आशियाना विदाउट भटारखाना

Submitted by अनिंद्य on 27 March, 2023 - 06:03

* * *
- प्रेसेंटेशन झकास आहे. किंमत किती असणार एका फ्लॅटची साधारण ?

- सात कोटी पासून सुरु

- म्हणजे फक्त श्रीमंत लोकं राहणार ना. त्यांना चालेल असे ‘किचनलेस होम’. नवरा बायको दोन्ही मोठ्या पदांवर काम करणारे, भरपूर पैसे कमावणारे. खूप आहेत असे कपल्स आपल्या बंगळुरूत. तेच घेतील तुझे फ्लॅट.

- तसं नाही, काही व्यापारी आणि संयुक्त कुटुंब असलेल्यांनाही इंटरेस्ट दाखवलाय.

- दाखवणारच ! व्यापारी म्हणजे स्थानिक नसणारच. श्रीमंतांच्या बायका नाहीतरी कामचुकार असतात. खायचे-प्यायचे-ल्यायचे-मिरवायचे-लोळायचे हेच त्यांचे काम. पैसा भरपूर असतो ना. गरजच नसते काही काम करायची.

- कित्ती प्रिजुडाईसेस तुझे गं आक्का !

- असेनात का. बोगस आयडिया आहे तुझी किचनलेस होम ची.

* * *

- पण करायचीच कशाला अशी उठाठेव. आशियाना विदाउट भटारखाना? किचनलेस होम म्हणे. जगतो आपण पोटासाठी. स्वतःला हवे तसे करून खाता येत नसेल तर काय उपयोग अशा मोठ्या राजेशाही घराचा?

- अरे मित्रा, प्रत्येक घरात नसले तरी मोट्ठे कॉमन किचन आहे ना प्रकल्पात. चोवीस तास सुसज्ज, अत्याधुनिक रुफटॉप किचन. चहा, नाश्ता, जेवण-खावण, दारू, आईस्क्रीम, पिझ्झा पास्ता, दहीबुत्ती विथ अम्मा स्टाईल मँगो पिकल ...सगळे मिळणारी जागा. नावही तसेच ठरवलेय मी. ‘फूड कामधेनू’ ! मागाल ते मिळेल या सामायिक किचनमध्ये. मग का पाहिजे प्रत्येक फ्लॅट ला वेगळे किचन ?

- शेवटी ते हॉटेल ना ? कधीतरी घरी पटकन करून खायला किचनेट तरी हवे ना ? आणि रात्रीबेरात्री कुणी आले तर ?

- सर्व विचार केलाय माझ्या टीम नी. चोवीस तास किचन आहे. स्वतः जाऊन करायचे तर करता येईल. फोनवर सांगितले तर मागाल ते घरी आणून देईल आमचा स्टाफ. रिझनेबल रेट मध्ये. चोवीस तास. हवे तेव्हढे. जब और जितना आप चाहो. और क्या चाहिये ?

- तरी घराची सर नाही यायची या सेटअपला. हॉटेल वाटेल ते, घर नाही.

* * *

- पण हवे तेव्हढे नोकर मिळतात. पैसे टाकले की स्वयंपाक करायला घरी लोकं येतात. आपल्यासमोर आपल्याला हवा तसा स्वयंपाक करून देतात. हे काय वेगळे असणार?

- असतं. किचन म्हणजे फक्त दोनवेळा स्वयंपाक असतो का? तुमच्या मावशी ग्रोसरी आणतात की तुम्ही स्वतः ? कोण सॉर्टींग-स्टोअरिंग करतं ? भाज्या आणि फळे ? रोजचा मेन्यू स्वतःच ठरवतात की तो ठरवायला ऑफिसच्या गंभीर मीटिंगमध्ये तुम्ही असतांना मधेच फोन करतात ? टूरवर असतांना आज मुलांचे-नवऱ्याचे जेवणाचे डबे तुम्हाला आठवत असतात का ? ज्यूस कोण तयार करतं ? बर्फासाठी फ्रीजमधे पाणी ट्रे कोण लावतं ? फ्रीझ ची स्वच्छता कोण करतं ? गार्बेज कोण रिकामं करतं ? त्यात किचनशी संबंधित कचरा किती असतो? पेस्ट कंट्रोल ? ते कोण बघतं ? भांडी घासणे? त्यासाठीची उस्तवार ? किचनची स्वच्छता ? मेंटेनन्स? कुकिंग रेंज, ग्रिल-मायक्रोवेव्ह, गॅस सिलेंडर, चिमनी, मिक्सर-ग्राइंडर-ज्युसर, रोटीमेकर, डोसा मेकर ….. सगळ्यांची खरेदी सफाई दुरुस्ती, ती कोण करतं ? उद्या डब्यात काय आणि संध्याकाळी काय आणि आज त्यासाठी करायची तयारी काय हे रोज कोण ठरवतं आणि करतं ?

- ऐकतेय मी. आगे बोलो

- बाईसाहेब, तुमच्या लक्षात येतंय का ? एका किचनने तुमचे सर्व जीवन व्यापून टाकले आहे. हजारो कामे तुम्हाला येऊन चिकटली आहेत. लाईक अ मॅग्नेट. आणि आता तुम्हाला ती सोडवत नाही आहेत. वन वे ट्रॅप. अभिमन्यू झालाय तुमचा. तुमच्यासारख्या अनेक स्त्रिया हा चक्रव्यूह भेदायला उत्सुक आहेत. माझा 'किचनलेस होम' प्रोजेक्ट अशा स्त्रियांसाठी वरदान आहे. विचार करा तुम्ही.

- काही पुरुष करत असतील घरची कामं. सगळेच काही ऐतखाऊ नसतील. बऱ्याच स्त्रिया बाय चॉईस होम मेकर असतील ना ?

- असं बघा मॅडम, जगाच्या पाठीवर एकूण पुरुष ३९७ कोटी तर महिला ३९० कोटी, म्हणजे साधारण ५०% प्रत्येकी. त्यातले प्रगत, समंजस, लिंगनिरपेक्ष, घरकाम करणारे किंवा त्यात मदत करणारे दोन-पाच टक्के पुरुष सोडले तरी जगभरात आजही प्रचंड मोठ्या प्रमाणात स्त्रियांचा वेळ हा चूल आणि मूल सांभाळण्यात जातो. मूल बाजूला ठेवू थोडावेळ, तरी अर्ध्या लोकसंख्येचा चुलीपाशीचा वेळ अन्यत्र अधिक चांगल्याप्रकारे गुंतवला तर एकूणच मानवजातीचे कल्याण होईल. प्रॉडक्टिव्हिटी वाढेल, नवनवे शोध लागतील, जगणे सुकर होईल.

- समज मला आवडच आहे स्वयंपाकाची तर ?

- ज्या स्त्री-पुरुषांना स्वयंपाकाची आवड आहे ते इतरांसाठी करतील, त्यांना पैसे मिळतील आणि आवडीचे काम करण्याचा आनंदही.

- पटतंय का ?

- नाही.

* * *
AA96C183-FA63-4369-AFB8-18770A64E0BC.jpeg

* * *

- अरे आय वॉन्ट टू गिव्ह यू अ हग फॉर धिस ! तू तर स्वर्ग साकारणारा देव वाटतोस मला. तो कोण होता नवी सृष्टी रचणारा ऋषी ? वसिष्ठ ?

- नाही, विश्वमित्र होता बहुतेक.

- त्याचे होते ना सर्व कस्टम मेड ? भन्नाट आयडिया आहे - आशियाना विदाउट भटारखाना. मी जग फिरते पण कान्ट कीप अवे द किचन फ्रॉम माय माईंड. मी ठरवले तरी माझे कुटुंब मला ते विसरू देत नाही. ५-६ दिवस ‘ऍडजस्ट’ करतात म्हणे अन मी घरात पाय ठेवला की फर्माईशी कार्यक्रम चालू. डार्लिंग भाकरी ठेचा तुझ्या हातचा... ममा बटर चिकन तुझ्या हातचे...सुनबाई प्रसादाला शिरा सोवळ्यातला, तूच कर गं .. अरे मी काय मशीन आहे काय ? काय फायदा माझ्या शिक्षणाचा, लठ्ठ पगारी नोकरीचा आणि माझ्या कामातल्या हुशारीचा ? मी घरात आले की किचनमध्ये मला ढकलायला सगळे सज्ज. वर प्रेमळपणे सगळे. नाही म्हणायला मलाच गिल्ट यावा अशी नाकेबंदी. नकोच ते किचन. सर्वांना सर्व देणारी तुझी कामधेनू हवी. वा भाई वा. तूने मेरा दिल जीत लिया. मला धर रे तुझ्या बुकिंग लिस्ट मध्ये.

- जरूर. वेलकम टू अवर किचनलेस होम फॅमिली.

- स्त्री, तिचे घर, तिचे कुटुंब, कुटुंबातील स्थान झालच तर समाजातील स्थान सगळेच 'किचन' आणि स्वयंपाक याला कसे जोडता येईल ? हुषार कमावत्या बाईने घरी येताच पदर खोचून कामाला लागावे, सगळ्यांना आवडणारा गरमागरम स्वयंपाक करावा. सगळे घर कसे तृप्त होते. घराला घरपण येते. हेच काम पुरुषाने एखाद्याच दिवशी केले तर तो दिवस सणाचा, स्त्रीसम्मानाचा ? माय फुट.

- माझा एक प्रश्न आहे. हे सगळे मास्टर शेफ संजीव कपूर, रणवीर ब्रार, विकास खन्ना, कुणाल कपूर काम संपवून घरी जातात तेव्हा त्यांच्यासाठी स्वयंपाक कोण करतं ? ते तर स्वतःच एक्स्पर्ट ना ?

- यू सिंग माय सॉंग बडी. लव्ह द साउंड ऑफ युअर वर्ड्स.

- तू तर जगभर फिरतेस, अमेरिकेतही लॉन्ग स्टे. तिकडे काय आहे परिस्थिती ?

- अमेरिकेत ? सेम. थोडे सटल आहे तिकडे, पण आहे हेच. बेकिंग युअर फ्रेश कुकीज. अमेरीकानो. विथ आफ्टरनून टी / कॉफी. उत्तम अमेरिकन फर्स्ट लेडी होण्याचं क्वॉलिफिकेशन आहे ते. हिलरी क्लिंटन असो की मिशेल ओबामा. अपेक्षा असतातच त्यांच्याकडून किचन सांभाळण्याच्या. डिफेन्स काय तर म्हणे त्यांच्या दिमतीला एवढे नोकरचाकर असतात, दिले थोडे लक्ष तर काय बिघडले ?

- पण तुला माहिताय का ? याच अमेरिकेत मोठ्या शहरातल्या १९२० सालापूर्वीच्या घरांमध्ये किचन नव्हतेच. सर्वांचे एकच सामायिक किचन. सगळे लंगर का खाना वाले. नो किचनेट टू. पण पुढे रशियन असेच कम्यून बांधतात म्हणून अमेरिकेत किचनलेस हाऊसिंग ही शिवी झाली म्हणे. सामायिक किचन म्हणजे रशिया, त्यांची कम्युनिस्ट थेरं. बंद पडला तो प्रकार आणि बायका जुंपल्या गेल्या घराघरातल्या किचन कामात. ऐकलं का तू आधी कधी हे ?

- नाही ऐकले हे आधी. बराच रिसर्च केला आहेस. आय एम इन. माझं बुकिंग नक्की, पटवते मी घरात सगळ्यांना.

* * *

- चिन्नू, हा विचार वेगळा आहे बेटा. कोण ती बया ? काय तरी नाव म्हणे –

- आना पुईजानेर ..

- आर्किटेक्ट? कुठं अमेरिकेत राहते का ती ?

- नाही अम्मा, स्पेन.

- तेच ते सेमच रे. गोऱ्या लोकांची थेरं. नकोच आपल्याकडे हे.

- किती रे वय तिचं ?

- असेल तिशीची -फार तर पस्तीस.

- किचनलेस होम या कल्पनेसाठी तिने जगभर फिरून अभ्यास केला अम्मा. स्वतः तसे प्रॉजेक्ट उभारलेत. उत्तमरीत्या चालवलेत. तिला पुरस्कार मिळालेत भरपूर आणि पुढील कामासाठी फंडिंग सुद्धा.

- फार इंप्रेस झालेला दिसतो माझा बिल्डर मुलगा.

- होय अम्मा, मला तिचा विचार पटतो आहे. शिवाय किचनलेस होम हा चांगला मार्केटिंगचा मुद्दा ठरेल असे माझ्यातला बिझनेसमन मला सांगतोय अम्मा.

- पण आता आमच्यावेळसारखं नाही चिन्नू. जात्यावरचं दळण, पाटा वरवंटा, खलबत्ता जाऊन आता किती सोयीचा झालाय स्वयंपाक ? आपल्याच घरातले ग्याजेटस बघ. नाही का पुरेसे ?

- कितीही नवनवीन उपकरणे आणि सोयीसुविधा आल्या तरी महिन्याकाठी किचनमध्ये लागणार वेळ फार कमी काही झालेला नाही. घर आणि विशेषतः किचन स्वच्छ आणि टापटीप ठेवण्यामध्ये दिवसाचा आणि आयुष्याचा एक फार मोठा भाग खर्च होतो. बहुतेक जागी हा वेळ आणि हे श्रम स्त्रियांचे असतात.

9009E5EC-FB61-4100-A1D6-4E52E675E1F2.jpeg

- व्हॉट अबाऊट द फूड रुटीनस चिन्नू ? सच लव्हली फूड रिच्युअल्स, एज ओल्ड. डीप रूटेड इन अवर प्राउड हेरिटेज ! व्हॉट अबाऊट देम ? आपलं घर अन्नाभोवती फिरतं. सगळ्यांच्या पसंतीचे खाणे-पिणे यात मजा नाही का ?

- ते काम घरातच स्वतः एकाच व्यक्तीने आयुष्यभर करत राहावे हा हट्ट का ? आमच्या खाण्यापिण्याची आबाळ होईल म्हणून तू धड ४ दिवस माहेरी तरी राहिलीस का अम्मा ?

- एक सांगू ? वेडी आहे ती कोण आना का फाना पुईजानेर. तिला काय आम्हा सर्व बायकांपेक्षा जास्त समजतं का ? केस उन्हात पांढरे नाहीत केले हे. स्वयंपाक आणि अन्न घराला बांधून ठेवते. चार दिवस घरी स्वयंपाक नाही झाला तर बाहेरचे खाऊन आजारी तरी पडतील नाही तर कंटाळतील तरी. स्वयंपाकघराविना कसले घर? घराचे हॉटेल होईल.

- आपल्याकडे नाही पण अनेकांकडे घरातले किचन म्हणजे धगधगते अग्निकुंड. ठिणगी पडायचा अवकाश की युद्ध सुरु. टीव्हीवरच्या तुझ्या त्या दळणदळू मालिकांमध्ये किचन आणि डायनींग टेबल हा कट कारस्थानाचा आणि खलबतांचा अड्डा म्हणूनच दाखवले जाते, ते उगाच नाही अम्मा. अनेक कुटुंबात, विशेषतः मोठ्या संयुक्त कुटुंबात अन्न आणि स्वयंपाक याचा एखाद्या शस्त्रासारखा वापर केला जातो. तिथे किचनचे रणांगण होते. फार दूर कशाला मुत्थुमामाकडेच बघ.

- माझ्या माहेरच्या लोकांबद्दल बोलायचं काम नाही चिन्नू. आणि ऐक, असे तर कुणीच कुणासाठी काही करायला नको मग. सगळेच मोल देऊन विकत घ्या. भावना, ओलावा, एकमेकांबद्दल प्रेम राहील का लोकांमध्ये ?

- अम्मा, प्रेम फक्त एखाद्यासाठी स्वयंपाक करून दिला तरच आणि त्यातच असतं का ?

- नॉट दॅट वे चिन्नू, पण प्रेमाचा मार्ग पोटातून जातो हे ऐकलंय ना ?

- क्लिशे.

- क्लिशे ईज क्लिशे फॉर अ रीझन चिन्नू बेटा.

* * *

15445DD4-7299-4384-8FBC-D41E1DC7B4F9.jpeg

- मैं हुसैन. और ये है डॉ. नफिसा, मेरी मंगेतर. वी आर गेटिंग मॅरीड नेक्स्ट मंथ. माझा एक्स्पोर्ट बिझनेस आहे आणि नफिसा नेफ्रोलॉजिस्ट, मुंबईतच मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करते. मेरे चाचा हैं मोहम्मद वाजुद्दीन जिनका आपने जिक्र किया.

- तुमचे चचाजान सांगत होते की तुम्ही आधीच ‘किचनलेस होम’ वाले आहात, खरे का ?

- हो, साधारण २००८ सालापासूनच.

- वॉव. कसे जमवले ? घरातल्या लोकांना कसे पटवले ?

- पटवायचे काय त्यात ? हिचे आणि माझे आई- बाबा दोघे डॉक्टर आहेत. फुलटाईम वर्किंग कपल्स. आमच्यासारखेच. सगळ्यांना सोयीचं आहे किचनलेस होम.

- पण मुळात ही आयडिया आली कशी ?

- मैं बताती हूं. आमचा बोहरा मुस्लिम समाज व्यापार आणि शिक्षण दोन्हीकडे आधीपासून पुढे आहे. सर्वांनीच, विशेषतः स्त्रियांनी भरपूर शिकावे आणि पूर्णवेळ व्यवसाय-नोकरी करावी यावर आमच्या समाजाचा भर आहे. मॅनेजिंग किचन अँड फुलटाईम करियर डोन्ट गो हॅन्ड इन हॅन्ड.

- मग ? तुमची संस्था FMB, त्याबद्दल तुमचे काका सांगत होते ते काय ?

- आमचे धर्मगुरू सैय्यदना. समाजाचे मार्गदर्शक, आमचे मौला, वली, खलिफा. ५२ वे धर्मगुरू सैयदाना बुऱ्हानुद्दीन यांच्या कल्पनेतून फैझ-अल-मावैद-अल-बुरहानीया म्हणजे FMB हे अन्नछत्र सुरु झाले आधी. गरिबांसाठी फुकट खाना. रोज, दिवसातून तीन वेळ. समाज श्रीमंत असल्यामुळे लोकांना 'फुकट' अन्नाची गरज कमी. सैयदना स्वतः स्रियांनी स्वयंपाकघरातून मुक्त होऊन स्वतःच्या व्यवसायाकडे आणि करियरकडे पूर्णवेळ लक्ष द्यावे या मताचे. त्यामुळे पुढे सर्वांसाठीच 'तयार' खाना दिवसातून १-२-३-४ वेळेला, जसे हवे तसे उपलब्ध करून द्यावा यावर त्यांचा भर. ब्रेकफास्ट, लंच, मिड इव्ह स्नॅक्स, डिनर. दॅट वॉज द स्टार्ट.

- सर्वांना फुकट ?

- नाही. फुकट घेणे आम्हाला कमीपणाचे वाटते. ठराविक रक्कम महिन्याला भरून ही सोय मिळवता येते आणि आर्थिक अडचण असेल तर विनामूल्य. सर्व सधन कुटुंबे पैसे देतांना स्वतःतर्फे काही जादा पैसे भरून अन्य कोणाला तेच अन्न कमी पैश्यात किंवा विनामूल्य मिळेल अशी व्यवस्था करतात. गुप्तपणे. थोडे क्रॉस सबसिडी सारखे. अन्नासाठी पैसे कमी पडलेच तर समाजाच्या संयुक्त फंडातून दिले जातात.

- वा. म्हणजे घरी किचन नाहीच ? किती लोक वापरतात ही सोय ?

- भरपूर. साधारण १ लाख बोहरा मुंबईत राहतात. फोर्ट भागात बद्री महल हे समाजाचं मुख्यालय आहे, तेथून हे कामकाज चालते. आम्ही लोकं स्वतःच्या कामातून वेळ काढून 'सेवा' म्हणून काम करतो. अन्न शिजवायला, त्याचे पॅकिंग आणि वाटप करायला पगारी सेवक मोठ्या प्रमाणात ठेवलेले आहेत, त्यामुळे काम सोपे आणि व्यावसायिक पद्धतीने होते. आहारतज्ञ महिन्याचा मेन्यू बनवून देतात, समाजातील लोक वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाच्या, स्वच्छतेच्या आणि एकूणच कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याचे काम करतात.

- जास्त कमी नाही होत का ? वेस्टेज वगैरे ?

- त्यासाठी एक 'दाना कमिटी' आहे. सर्व लोकांना जेवण पाठवले की उरलेल्या अन्नाचा एकही कण वाया जाऊ देत नाही. ते अन्न गोरगरिबांना विनामूल्य वाटतो, अगदी खाली सांडलेल्या अन्नाचे कण नीट गोळा करून मांजरी आणि पक्ष्यांसाठी ठेवतो आम्ही.

- मुंबईबाहेरच्या लोकांचं काय ?

- जिथे जिथे समाजाची पुरेशी संख्या आहे तिथे आहे ही सोय. गुजरातमध्ये राजकोट सारख्या छोट्या शहरात २२०० बोहरा परिवार आहेत आणि त्यांना सोयीच्या ठिकाणी ५ वेगवेगळी कम्युनिटी किचन आहेत. राजस्थानातल्या कोटा शहरात १५०० बोहरा एकाच भागात राहत असल्याने एकच मोठे किचन त्यांना पुरेसे आहे. सुरत, खंबात, पाकिस्तानात कराची, श्रीलंकेत कोलंबो, सब जगह शुरू है. दिन में चार दफे. घरमें किचन नही है, किचनलेस होम इज अ रियालिटी !

- अरे यार. माझे 'किचनलेस होम' वाले अपार्टमेंट्स म्हणजे काही नवीन नाही. यू गाईज आर ऑलरेडी डुईंग इट लाईक अ प्रो. आशियाना विदाउट भटारखाना !

* * *
तर मित्रांनो, बिल्डर चिन्नू उर्फ चिन्नासामी आणि त्याच्या गोतावळ्यातला हा संवाद संपला नाहीये अजून. जितने मुंह उतनी बातें. चर्चा सुरूच आहे, ती तुम्ही पुढे न्या; तुमचे, तुमच्या मित्रांचे, कुटुंबियांचे, कल्पनेतल्या मित्रांचे मत - संवाद लिहा. थोडे विचारमंथन होईल, झाली तर चिन्नूला मदतच होईल. व्हॉट से ?

* * *

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरील लिंकमधून
The high prices of real estate and an increase in loneliness are leading people to seek new ways of living. >> बरोबर, जागेचा तुटवडा असेल किंवा जागा परवडत नसेल तर(च) हा पर्याय चाचपून बघावा, असे माझे वैयक्तिक मत आहे.

भन्नाट लेख आहे !
आणि चमकदार बिजनेस कल्पना ..

सध्या स्त्री-पुरुष समानतेच्या अनुषंगाने जे चुकीचे समज तयार होताहेत ते कॅश करून घ्यायचा प्रयत्न आहे Happy

अगदीच नगण्य लोकांना हे सोयीचे ठरेल. ते ही कायमस्वरुपी नाही. लाँग टर्मचा विचार करता गैरसोयच आहे ही.

स्त्रियांनी वा पुरुषांनी स्वयंपाकात वेळ दवडूच नये या विचारसरणीवरून लक्षात येते की स्वयंपाकातून मिळणाऱ्या आनंदाला आपल्याकडे कसे दुय्यम लेखले जाते.

घरात लहान मुले असताना कल्पनाच करवत नाही अश्या सेटअपची.
आता हेच बघा ना, काल रात्री बरे नसल्याने मी अकरालाच झोपलो. पहाटे पाचला ऊठलो. पोरे जागीच होती. मी ऊठताच भूक लागली म्हणत पास्ता बनवायला सांगितला. मी हो म्हणालो, बदल्यात त्यांच्याकडून पसारा आवरून घेतला. केर काढून घेतला. मुलीने अतिउत्साह दाखवत लादीपोछाही केला. मग मीही खुशीखुशी पास्तामध्ये एक्स्ट्रा बटर टाकले. कदाचित हा पदार्थ पौष्टिकही नसेल. पण अश्या बाहेरून मागवण्यात ती मजाही आली नसती. मग ऑर्डर करायचे काम लेकीनेच केले असते आणि त्या पसाऱ्यात बसूनच पास्ता खाल्ला असता. त्यामुळे घरात किचन हवेच. घराला घरपण त्यानेच येते. ते पैसे खर्च करून मिळवण्याचा अट्टाहास नसावा.

झाल्यास शौचालय फिरते ठेवा. बटण दाबले की आले दारात. काम उरकले आणि पुन्हा बटण दाबून तो शौचाचा डब्बा धुलाईविभागात पाठवला Happy

कमीत कमी अन्न गरम करायची तरी सोय हवी. लहान बाळ /मुले असतील घरात तर कसं करणार? प्रत्येक वेळेला कॉमन स्वयंपाकघरात जाणे शक्य नाही. स्वयंपाक नको असेल तर भारतात तरी बाई लावू शकतो दोन वेळच्या स्वयंपाकाला.
बोहरी समाजाचा डब्यामागचा उद्देश माहीत नव्हता.
आतापर्यंत सोसायटीतल्या बोहरी स्त्रीला डबा घेतांना आणि उरलेल्या वेळात गॉसीप करत टाईमपास करतांनाच पाहिलं होतं पण त्या डब्यामागे इतका छान उद्देश आहे हे माहीत नव्हतं. स्वयंपाक नाहीचा ऑप्शन असणे छान आहे पण वेळी अवेळी मुलांसाठी तरी काही करायला किचनची सोय हवीच.

बोहरी समाजाची लोकं आमच्याईथेही आहेत. त्यांच्याकडे डब्बे येतानाही पाहिले आहेत. पण याचा फायदा बायकांनी उचललाय असे आढळले नाही. कमावणारी जनता पुरुषच होती. तसेच त्यांच्या घरातही किचन होतेच. सणासुदीला छान छान पदार्थ बनवून आम्हालाही दिले जायचे.
अर्थात फायदा उचलणारे उचलतही असतील. पण एकदा या चक्रात अडकलो की अडकलो. समूहासाठी एक नियम याचसाठी नकोसा वाटतो. प्रत्येकाला मनाप्रमाणे जगणे अवघड होते.

सात कोटी खर्च करूनही घरात किचन नाही? माझ्या साध्या हैद्राबादी पेंट हाउस मध्ये बेडरूम मध्ये पण फ्रिज ठेवला होता व एक किटली. मी २६ वर्शे संसाराची व नंतरही पार लॉक डाउन नंतर मुलगी शिफ्ट होईपरेन्त किचन मॅनेज केले आहे. बायकांनीच स्वयंपाक करा वा / चाकोरीत बांधून घ्यावे अशी माझी आजिबातच अपेक्षा नसते हे सर्वत्र विदीत आहे. परंतु एक माणूस व्यक्ती म्हणून आता राहतानाही घरात किचन ची गरज भासतेच.
लोकांनी बनवलेले चारीठाव मी खाउ शकणार नाही. मच ऑफ धिस हॅज टु डू विथ कंट्रोल. मसाले/ भाज्या/ किराणा/ दूध दुभते ह्यावर आपला कंट्रोल हवा ही माझी गरज आहे. मनात आले ते मनात येइल तेव्हा खाता करता आले पाहिजे. आता माझा स्वयंपाक साधा व्हेज असतो - पुणेरी पद्धतीचा - खरंच लहान मुले आजारी ज्ये ना असतात त्या घरात तर किचन ची गरज केव्हाही लागू शकते. बारक्यांना भूक लागली तर रात्री तीन वाजता पण म्यागी बनवायला किचन लागेल ना.
मी आता गेम खेळते तेव्हा रात्री फारसे जेवत नाही . एक नॅप घेते व साडेबाराला रात्री उठते. गेम इवेंट लायनीत आणून होई परेन्त दोन अडीच वाजतात व फोन ची बॅटरी संपायला येते तेव्हा तो चार्जिन्गला लावुन गरम गरम अर्धाच कप का होईना चहा बनवते.( सोसाय टी टी, अर्धा कप साखर. ) बरोबर दोन तीन मारी. मग झोपते . असले काही कमुन्टी किचन मध्ये करता येइल का.

सकाळी उठल्या उठल्या तयार होउन डिसेंट कपडे घालून चहा बनवायला क. किचन मध्ये जायचे तर फार बोअर होईल.

सगळी घरं किचनलेस बनवा असा काही नियम येत नाहीए. ज्यांना अशी घरं हवीत, त्यांच्यासाठी ती असतील. ( तशा घरांसाठी मागणी निर्माण व्हावी म्हणून किंवख ती गळ्यात घालण्यासाठी मार्केटिंग ही होईलच)

घरी पेट्स असले तर त्यांनाही दोन तीन ला रात्री भूक लागते हा अनुभव आहे. बाहेर काहीही सुविधा उपलब्ध असल्या तरी आपण घरी स्वतःने स्वतःपुरते काही करायचे सोडत नाही तसेच आहे हे. - फार संत्रे सोलत नाही. पण बँकेत पैसे असूनही घरी थोडे ठेवतोच .

त्यातही इतके युट्युब बघून लगेच काही बनवायचे डोक्यात आले तर ते कुठे करायचे?
ही कल्पना जे लोक्स मुळातच स्वयंपाक करत नाहीत त्यांना पटेल. पण किचन म्हणजे सामान आणणे व भरणे, स्वच्छता, वेग वेगळी एप्लायन्सेस शोधून आणणे वापरणे व स्वच्छ करणे, तयारी, भरलेला फ्रिज, त्याचे व्यवस्थापन, आस्वपु, हे सर्व आले. मला तर फिरायला सुद्धा डी मार्त / बिग बझार/ व हर प्रकारची सुपर मार्केट / किराणा दुकाने आव्डतात. काय कय नवीन आले आहे ते कळते, ताजी भाज्या फळे
घ्यायला आव्डते. एक दोन अ‍ॅपल, तीन केळी चार चिक्कू पाच पेरू व थोडीशी द्राक्षे का होईना घेतेच. व घरी आल्यावर हे कापून फ्रूट चा ट बनवते
वाटीभर. कमी पण चविस्ठ खाते. वीकांताला काय बनवायचे ते ठरवून बिग बास्केटला ऑर्डर टाकते.

मला अगदी एक दीड कोटीचे घर मिळाले तरी मी ते फॅन्सी किचन बनवून घेइन व एक ग्लास फ्रेश ऑरेंज ज्युस का होईना हाताने बनवीन.

आता परिस्थितीनुसार आपल्याला किती दिवस स्वतःचे स्वतः करायला जमत आहे ते बघणे हे एक चॅलेंज आहे. ( वय प्लस आजार पणे प्लस वर्क्लोड) त्यामुळे स्वतः स्वयंपाक करणे जमेल तसा हा एक गोल असतोच रोज. कंटाळा आला/ तलफ/ हौस/ वेळ नाही ह्या प्रसंगी स्विगी आहेच.

आजचीच गोष्ट : हा लेख वाचून आज ऑफिसच्या कँटिन मध्ये ब्रेफा खायचा व लंच बांधून न्यायचे हे ठरवले पण आळस बाजूस ठेवून पोळ्या भाजी कोशिंबीर बनवली. एक रसभाजी रात्रीला बनवून ठेवली. गरम चार पुर्‍या तळल्या रात्री की झाले. तीन मला एक कुत्र्याला. असे फ्रीडम क कि मध्ये कसे मिळेल.

विस्कळीत प्रतिसादाबद्दल क्षमस्व

व्हेज नॉनव्हेज अशी वेगळी वेगळी किचन्स असतील का? मी मुंबईत नवीन होते तेव्हा एकदा पोळी भाजी केंद्रातून पोळी व कोबीची परतलेली भाजी आणली होती. घरी आणून प्लास्टिक पिशवी उघडल्या वर कोबीच्या भाजीला इतका फिश स्मेल येत होता की खाववेना. पोळ्या अगदी सुरेख रेशमी होत्या पण भाजी जस्ट रुइन्ड इट. मासे मी पण खाते पण व्हेन यु आर एक्स्पेक्टिन्ग व्हेज मील इट शुड बी व्हेज राइट. चीटेड वाटले मला तरी.

कुत्र्यासाठी चिकन उकडावे लागते तेव्हाही एक विचित्र वास येतो जो व्हेज व्यक्तीस सहन होणार नाही. हे असले प्रकार कुठे करायचे. भाज्या स्वच्छ धुतल्यात कि नाही. ब्रेड शिळा आहे का, दही फार आंबले आहे का ? असल्या चौकशा कोण करणार.

छान चर्चा सुरु आहे.
कन्सेप्ट आवडली असली तरी पुर्णपणे पटली नाही. बरीच कारणे वरील प्रतिसादांतून आलेलीच आहेत. बाहेरील खाणे आवडते परंतू बरेच पदार्थ स्वतःच्या हातचे जास्त आवडतात. स्वतः बनवून खाण्याची सोय या प्रकल्पात दिली आहे पण मलातरी दुसरीकडे स्वयंपाक करताना पदार्थाला जी चव माझ्या किचनमध्ये येते ती दुसरीकडे साधत नाही. इव्हन माझ्या माहेरीसुद्धा. इकडे तर आजूबाजूला प्रो शेफला बघूनच माझा निम्मा कॉन्फिडन्स लो होईल Lol त्यामुळे असाच एखादा स्वतः बनविलेला पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास इथल्या घरांमध्ये एक छोटासा का होईना पण किचन असावा. एरव्ही मला आयतं बसून खायला आवडेल. बाहेर जाताना घरातल्यांच्या ४ वेळच्या खाण्याचे काय? हा प्रश्न पडणार नाही.
कितीही प्रगत, प्रेमळ सासर असले तरी आज मला कंटाळा आला आहे, जेवण बाहरुन मागवू हे सांगताना जिभ जड होतेच. या कन्सेप्ट मध्ये तो प्रश्नच उद्भवणार नाही. Wink
बाकी ते अन्नाची क्वॉलिटी, हायजिन वैगरे तपासावे लागेल.

किचनलेस घर आणि कम्युनिटी किचन हा काही नवा प्रकार नाही. ही कल्पना बरीच जुनी आहे आणि या ना त्या रुपात अधून मधून पुढे येत असते.
मला स्वतःला जेवणाची आयती सोय आणि जोडीला घरात ग्रोसरी-हाउसकिपिंगला मदत असलेले छोटे का होईना स्वतंत्र किचन आवडेल. इतके पैसे टाकल्यावर मला स्वतःला स्वयंपाक करावासा वाटला तर त्यासाठी पर्सनल स्पेस हवीशी वाटेल. कधीतरी मजा म्हणून ठीक पण नेहमीसाठी कम्युनिटी किचन वापरायला नाही आवडणार.
माझ्या मुलाने काही वर्षं रुमीज सोबत अपार्टमेंटचे किचन शेअर केले. छान मैत्री होती तरी किचन बाबत अ‍ॅडजस्ट करणे प्रत्येकालाच थोडेसे जाचक वाटे. स्वतंत्र रहायचे ठरले तेव्हा किचनचे म्हणून एक वेगळेच स्वातंत्र्य मिळाले. स्वतःचा काँडो घेतला तेव्हा किचनची जागा, ओटे-सिंक किती, भांडीकुंडी आणि वाणसामान ठेवायला कपाटे किती, फ्रीज किती मोठा, ग्रोसरी स्टोअर्स पासून अंतर हे मुद्दे विचारात घेतले होते. कारण त्याचे मोठे सेविंग आठवड्याचे फूडप्रेप आणि स्वयंपाक यात असते. त्याशिवाय आवड म्हणून स्वयंपाक करणे असते तसेच कामाचा ताण कमी करणे, त्या संबंधीत एखाद्या प्रश्नावर विचार करणे यासाठीही स्वयंपाक करणे चालते. एकंदरीत त्याच्यासाठी स्वयंपाकघर महत्वाचा मुद्दा होता.

आर्थिक कारणास्तव किचन नसलेल्या खोल्यांतून रहावे लागते अशांसाठी कम्युनिटी किचनची सोय असेल तर बाहेरचे किंवा पाकिटातले मायक्रोवेव जेवण याला अजून एक पर्याय असेल. स्वतःची ग्रोसरी वापरुन रांधता आल्याने बचतही होईल. ज्यांना काही कारणाने अन्न रांधणे शक्य नाही अशांसाठीही पोषक अन्नाची सोय माफक दरात कम्युनिटी किचनमधून झाली तर आरोग्य चांगले रहायल मदत होईल.

इथे बर्‍याच युनिवर्सिटीजच्या डॉर्म्सना कॅफेटेरीया/डायनिंग हॉल सोयीव्यतिरिक्त बेसमेंटमधे कम्युनिटी किचनची सोय असते.
सिनीयर लिविंग असते तिथे त्यांचा कॅफेटेरीया असतो, त्या शिवाय खोलीला छोटे स्वतंत्र किचन हवे असल्यास वेगळे दर असतात. आमच्या गावात स्वतःच्याच घरात, ओळखीच्या परीसरात म्हातारपण घालवता यावे म्हणून घरपोच जेवण मिळायची सोय आहे. त्याशिवाय घरी एकटे जेवायचे नसेल तर सिनियर सेंटरमधेही जेवायची सोय आहे. ही सोय हॉस्पिटलच्या सहकार्याने आहे. मात्र असे असले तरी ग्रोसरी करायला मदत, घरी येवून अन्न शिजवायला मदत/ अन्न शिजवून देणे वगैरे सुविधाही सिनीयर्ससाठी माफक दरात उपलब्ध केल्या जातात, कारण त्यातले स्वातंत्र्य लोकांना आवडते.

बाकी स्त्रीवर स्वयंपाकाचे ओझे नको म्हणून घराला किचनच नको हा काही उपाय नव्हे. त्याऐवजी प्रत्येकालाच वयानुरुप स्वयंपाक आणि इतर घर चालवण्याचे शिक्षण द्यावे. स्वयंपाक हे काहीतरी फालतू काम आहे असा माईंडसेट असलेली बरीच जनता बघण्यात आहे. त्यात पुन्हा गंमत अशी की संसार मांडल्यावर एक पार्टी पारंपारिक साचा पुढे करत हे फालतू काम माझे नाहीच असे म्हणते आणि दुसरी पार्टी नाईलाजाने पारंपारिक साच्यात अडकते. थोडक्यात ओझे वाहाणे तसेच रहाते. ज्या लाईफ स्कीलमुळे तुमचे भरणपोषण होते, कच्चे खाण्यासाठी योग्य नसलेले घटक खाण्यायोग्य होतात, काही नाशिवंत घटक टिकावू बनवू शकल्याने अन्नाची उपलब्धता वाढते ते फालतू कसे? ही नकारात्मकता बाजूला सारून मुलगा-मुलगी भेद न करता लहानपणापासून हळूहळू जबाबदारी घ्यायची सवय लावावी. पुढे तुमचे कामाचे स्वरुप, उपलब्ध असलेल्या आणि परवडणार्‍या सोयी-सुविधा यानुसार आऊटसोर्स करायचे स्वातंत्र घेता येइलच पण ते शक्य नसल्यास घरातील सर्व सदस्यांनी जबाबदारी घेतल्याने एकट्या स्त्रीवर ओझे येणार नाही. पानात वाढलेल्या अन्नामागच्या कष्टाची जाणीव असली की नखरे करणेही आपोआप कमी होते.
घरातील कुणालाच अन्न शिजवणे शक्य नाही अशा वेळी सोय म्हणून कम्युनिटी किचनमधून माफक दरात चांगले अन्न मिळायची सोय असावी, असे अन्न आणणे याकडे नकारात्मक दृष्टीने बघू नये मात्र त्याचवेळी घरी शिजवलेले अन्न याकडेही नकारात्मकतेने बघू नये.

अमा, अर्धा कप नसेल साखर Happy
अर्धा चमचा असेल
(खूप इमेल्स वाचली की अशी छिद्रानवेषी (हा शब्द चुकीचा लिहिल्याबद्दल त्रिवार माफी) सवय लागते.)सगळे कंस बंद केले आहेत.

मी पण अर्धा कप वर अडखळलेलो. पण अमांची पोस्ट आहे म्हणून हसुन पुढे गेलो. Proud हवा असेल तर Light 1
वा! वा! कंसांची काळजी घेतल्याबद्दल पेशल धन्यवाद. Happy Proud

हा धागा आणि ईथली चर्चा वाचून मला राजू बन गया जंटलमॅन या पिक्चरमधील शाहरूखचा हा सीन आठवला.
पर्रफेक्ट बसतोय ईथे

https://www.youtube.com/watch?v=gFHQ-C1SW0o&t=3377s

>>- सात कोटी पासून सुरु<<
धागा रुळावर आणण्याचा प्रयत्न करतोय..

सात कोटिच्या फ्लॅट्मधे रहाणार्‍याला बाकिचे फुटकळ प्रश्न पडत नसावेत... Proud

भरपूर मुद्दे गोळा झाले आहेत इथे. प्रॅक्टिकल अडचणी काय येऊ शकतील याबद्दल प्रतिसाद जास्त आहेत.

खूप खूप आभार मंडळी !

बिल्डर चिन्नूसाठी लवकरच समराईझ करतो.

@ किचनलेस होम श्रीमंत लोकांनाच आवडण्याच्या-परवडण्याच्या मुद्द्यावर एक अनुभव -

अधोहस्ताक्षरीत व्यक्तीस मंगलोरला एका भव्य बांधकाम प्रकल्पाला भेट देण्याचा योग आला. साधारण २६०० बांधकाम मजूर कामाला. राहायलाही तिथेच, पत्र्याच्या घरात. त्यात एक ३००-४०० मजुरांचा गट ओरिसाचा, जास्तकरून नवरा-बायको अशा जोड्याच. त्यांची एक वेगळीच तऱ्हा. सक्काळी ७ वाजता दूध-अंडी खाऊन सर्व बायकापुरुष कामावर. जेवणाच्या सुट्टीत सर्व सोबत. एकही मजूर स्त्री स्वयंपाक करतांना किंवा भांडी घासताना दिसली नाही. मग भोचक चौकश्याअंती कळले की त्यांनी त्यांच्यातल्याच २-३ जणांची एक टीम स्वयंपाकपाण्यासाठी ठेवलीय. त्यांचे काम किचन सांभाळणे, शिधापाणी बघणे. गरोदर असलेल्या/ अंगावर पाजणाऱ्या मजूर स्त्रियांची नियुक्ती कामावर देखरेख करायला !

ही ओरिया टीम इतरांसारखी रोजंदारीवर काम न करता Lump -sum बेसिस वर (जास्त दराने) काम करते आणि सर्वात जास्त आउटपुट देणारी टीम आहे असे तिथल्या सुपरवायझरने सांगितले.

जस्ट सांगिंग द अनुभव.

Women are enjoying their womanhood, motherhood and most importantly their careers and lives even after they stopped cooking babies in their bellies. (Read:- Surrogacy by freezing eggs at an early age). This life changing scientific innovation has been serving everyone involved very well. More women and their male/female partners who cannot go through pregnancy phase for various different reasons, are increasingly benefiting from this.

I am sure on similar lines, homes without kitchens will find their place in society sooner or later. This may not be a phenomenon for masses but a certain class will definitely grow accustomed to it.

आयेम कन्फ्युज्ड! सरोगसी मुळे वुमनहुड, मदरहुड, करिअर करायला मिळतं अ‍ॅट द कॉस्ट ऑफ डेलिगेटिंग (रीडः फोर्सिंग) समवन एल्स कुक योर बेबीज मेकिंंग इट देअर सोल करिअर? मुलं गर्भाशयाबाहेर वाढत असतील तर समजू शकतो. माझा सरोगसीला अजिबातच विरोध नाही पण त्यामुळे हे सगळं होतंय हे ही खरं असू शकेल. फक्त अ‍ॅट द कॉस्ट ऑफ काय?
हे म्हणजे प्रगत देशांत कचरा नाही, सगळं सगळं रिसायकल होते म्हणजे काय? तर सगळा कचरा एक्सपोर्ट करतात. लोकल रिसायकल चेक मार्क पुरतं, बाकी ते ही एक्सपोर्ट. बास!
किंवा इलेक्टिक कार कित्ती कित्ती छान. अ‍ॅट द कॉस्ट ऑफ ती बनवायला दृष्टी आड पर्यावरणाची अक्षरशः वाट लावून टाकायची. पण कुठल्या पर्यावरणाची? आमच्या सबर्बन नाही, वाळवंटातील पर्यावरणाची. किंवा एशिअन देश आहेतच. पण वापरताना बघा बघा! बिलकुल धूर सोडत नाही. असा उफराटा कारभार आहे.

Having a baby through surrogacy vs. carrying a healthy baby full term, giving birth . That's the difference.

Ultimately it is individual choice. Do you have the freedom and independence to exercise your choices.

विचार करते आहे. त्रिकाळ पोटात अन्न जायचं तर त्रिकाळ कोणीतरी रांधणं आणि प्लॅनिंगपासून क्लीनिंगपर्यंत कोणीतरी करायला हवंच. त्यातलं कायकाय आणि किती वेळा डेलिगेट करता येऊ शकतं हा खरा प्रश्न. मूल होऊ द्यायचं की नाही ही मुळातच ऐच्छिक विषय आहे, अन्नप्राशन हा (अजूनतरी) नाही.

सरोगसी मुळे वुमनहुड, मदरहुड, करिअर करायला मिळतं अ‍ॅट द कॉस्ट ऑफ डेलिगेटिंग (रीडः फोर्सिंग) समवन एल्स कुक योर बेबीज मेकिंंग इट देअर सोल करिअर?

+१
मज्जा म्हणजे सरोगसी हे त्या दुसऱ्या बाईचं exploitation आहे हा विचारही या अशा लिबरल लोकांच्या मनात येत नाही. उलट आम्ही दमड्या मोजून त्या गरीब बाईचा उद्धार करतोय असं वाटतं.

ही चर्चा इथे फारच ओढून ताणून वाटतेय पण तरी Happy
सरोगसी म्हणजे दुसर्या बाईवर ते मातृत्व फोर्सच केले जाते किंवा exploitation च असते असे थोडीच आहे? बाय चॉइस कुणी ते काम पैसे घेऊन करत असेल तर आपण कोण जज करणारे?कोण कुणाचा उद्धार करतेय असं नाही पण त्या कामासाठी पैसे देणारे आहेत तसे ती सर्विस देऊन पैसे मिळवण्याचा मार्ग कोणाला तरी निवडावासा वाटला. ते इल्लीगल पण नाही. मग काय इश्यू आहे?

>>> मग काय इश्यू आहे?
मज्जा, दमड्या, गोणपाट वगैरे नाट्यमय चित्रदर्शी शब्द वापरून तुच्छता व्यक्त केली की एकही दमडी न मोजता गोणपाटावर बसल्याजागी मज्ज्ज्ज्जा येत असेल का? Happy Light 1

किचनलेस होम च्या चर्चेत आतापर्यंत संस्कृती, कपडे, अर्थार्जन, संडास, सरोगसी, customisation, Privilege, choice, शोषण इ. पर्यंत आपण आलो.

आता पुढे ?

Submitted by अनिंद्य on 29 March, 2023 - 04:05>>
यात त्या सर्वांना एकाच प्रकारचे जेवण मिळत असणार ना आणि ते ही ठरलेल्या वेळेच्या तुकड्यात. आज मला अमुक हवे ते ही इतके वाजता असे नसणार. अमेरीकेत पूर्वी Chuck Wagon असत. त्यातही त्याचा फिक्स्ड मेनू असे.

सरोगसी आणि रोजचे अन्न याची तुलनाच पटली नाही. त्याशिवाय सरोगसी, स्वतः मूल जन्माला घालणे, दत्तक घेणे वगैरे जे काही आहे त्या योगे अपत्य प्राप्ती झाल्यावर पुढे मूल वाढवणे हा प्रकार असतोच की! म्हणजे किती जरी नॅनी वगैरे ठेवून आऊटसोर्स केले तरी पालक म्हणून जबाबदारी असतेच ना! म्हणजे पूर्ण वेळ मूल संभाळायला हायर्ड हेल्प असली तरी मुलाला आईबाबांची गरज उरतेच.

अन्नाच्या सोईबद्दल बोलायचे तर हाऊसकिपर + कुक असा दोन जणांचा स्टाफ हे काम तुमच्याच घराच्या स्वयंपाकघरात करतात की! अगदी काही बघायला लागत नाही. म्हणजे आजोळी, बाबांच्या माहेरी, अजून काही नातलगांकडे असे चालायचे. आत्ताही नात्यातील बर्‍याच घरांत हे पार्शली चालते.
मला स्वतःला घराला छोटेसे देखील किचनच नाही हे इंस्टिट्यूशनल वाटते. मात्र ज्या लोकांना कामाच्या स्वरुपामुळे बरेच काळ प्रवास असतो, कामाचे तास पक्के नाहीत, कामही तसे शरीर-मन थकवणारे आहे अशांसाठी स्वत:चा हाउसकिपर+ कुक असा स्टाफ बाळगण्यापेक्षा लेखात लिहिले आहे तसे सोयीचे वाटेलही.

किचनलेस होम च्या चर्चेत आतापर्यंत संस्कृती, कपडे, अर्थार्जन, संडास, सरोगसी, customisation, Privilege, choice, शोषण इ. पर्यंत आपण आलो.

आता पुढे ?>>
सार्वजनिक न्हाणीघर अशीही संकल्पना राबवता येईल या संकुलांमध्ये.
सांडग्यांच्या चाळीत भगिनींना याचा विशेष फायदा होत असे.
(ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी: लहान मुलांना सार्वजनिक अंघोळी घालण्यासाठी)

Pages