महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या तीन वर्षात राजकारण प्रेमींना धक्क्यावर, धक्के बसण्याचा कालावधी होता.. शिवसेनेने सोडलेली बीजेपीची साथ, म वि आ ची निर्मिती, शिंदेच् बंड, गुवाहाटी, गुजरात, गोवा ह्या राज्यात घेतलेला आश्रय, ठरेंचा राजीनामा, म वि आ चे सरकार पडणे, शिंदे फडणवीस सरकार येणे, फडणवीसांना उपमुख्यमंत्री करणे, निवडणूक आयोगा कडून शिंदे कडे शिवसेना देणे. बऱ्याच घडामोडी अजून घडणार आहेत. ह्या घटनाचं इतक्या अनाकलनीय होत्या की एकही राजकीय ज्योतिषी तोंड उघडायला तयार नाही . आपली झाकली मुठ सव्वा लाखाची बरी. आता ह्या ज्या घडामोडी घडल्यात ह्याचा विचार करता मी पुढे काय होईल ह्याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतो. अर्थात हा अंदाज आहे भाकीत नाही . करण अंदाज खरा किंवा खोटा ठरवू शकतो भाकीत मात्र मिथ्या असते.
ह्या घडामोडी मुळे भविष्यात महाराष्ट्रातील राजकारण तर बदलेलच पण केंद्रीय राजकारणालाही दणके बसतील.
सध्या जी स्तिथी आहे ती जैसे थे राहिल्यास ह्याचे सर्वाधिक नुकसान हे भाजपला होऊ शकते. विधानसभेत पक्षीय बलाबल साधारणता असे राहील.
1) राष्ट्रवादी काँग्रेस..75 ते 80 सीट
2) भाजप- 60/80
जर म वि आ सोबत वंचित आघाडी असल्यास भाजप 60 जागांवर रोखला जाईल. नसल्यास 80 जागा मिळू शकतात.
3) काँग्रेस-42 ते 45 सीट
4) शिवसेना (ठाकरे) - 40 ते 42 सीट
5) शिवसेना(शिंदे)-2 ते 4 सीट
असे पक्षीय बलाबल राहील..
लोकसभा निवडणूक
म वि आ ..40 ते 42 सीट
भाजप - 6 ते 8 सीट
महाराष्ट्रात मुख्यमंत्री राष्ट्रवादि चा राहील.
महाराष्ट्रातील भविष्यातील निवडणूक अंदाज
Submitted by सचिन पगारे on 9 March, 2023 - 10:52
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
लाच घेतल्याशिवाय काम न
लाच घेतल्याशिवाय काम न करणाऱ्यां या कर्मचाऱ्यांना जनतेत काडीची ही सहानुभूती नसणार ...# सर, ते सगळे अहिंदू असतील नै?? ..
आणि राष्ट्रद्रोही पण असणार
आणि राष्ट्रद्रोही पण असणार
Submitted by उदय on 14 March,
Submitted by उदय on 14 March, 2023 - 04:34 >>>> काही कळले नाही हा असा प्रतिसाद का दिलाय ते ? तुम्ही तो स्वतंत्र प्रतिसाद म्हणून दिला असता तर समजले असते. पण मला कोट केल्याने काहीही संबंध लागेना.
तुम्हाला स्पेसिफिकली अटलबिहारी वाजपेयी यांची तीन सरकारे आणि २०१४ च्या निवडणुकीआधीची पक्षांतरे कुठल्या भयाने झाली हा प्रश्न केला होता. त्याचे उत्तर २०१४ नंतर काय झाले आणि स्वच्छ कसा होतो हे कसे होऊ शकते ? त्या आधीचे प्रतिसाद कदाचित तुम्ही वाचले नसावेत.
एकच आहे. अटलजींच्या वेळेला भाजपात नेते गेले पण कार्यकर्ते काँग्रेसमधेच राहिले. २००४ ला भाजपाच्या बाजूने वारे नाहीत असे वाटल्याने हे लोक परतले. २०१४ च्या आधी काँग्रेसच्या विरोधात वातावरण असल्याने हे लोक भाजपात गेले. सत्ता येण्याच्या आधी तर ईडी सीबीआयचा वापर होत नाही याच्याशी सहमत असाल ना ?
या वेळी फरक इतकाच आहे कि अटलजींच्या वेळेप्रमाणे या वेळी परिस्थिती नाही. मोदी शाह यांनी स्थानिक लेव्हलचे , ग्रामपंचायत लेव्हलचे नेते सुद्धा साम, दाम, दंड, भेद या नीतीने भाजपात आणून इतर जिंकून येणार्या पक्षांची पाळेमुळे खणून काढली आहेत. त्यामुळे २०२४ ला जर हे नेते परतलेच तर प्रचार कुणाच्या जिवावर करायचा, निवडणुकीची यंत्रणा कुठेय असे प्रश्न आहेत. स्थानिक लेव्हलचे नेते आपापली पदं सोडून येतीलच असे नाही. अपवाद विखे पाटील, मोहिते पाटील, ग्वाल्हेरचे शिंदे अशा एकखांबी नेत्यांचा.
आज ऊठाचे सहकारी असलेले भास्कर
आज ऊठाचे सहकारी असलेले भास्कर जाधव पश्चातापाणे म्हणाले मी राष्ट्रवादी
सोडायला नको होती !
तर काल दीपक सावंत उठाला सोडून शिंदेच्या सेनेत गेले !
एकंदरीत शांत प्रवृत्तीच्या आणि मुख्यमंत्री पदासाठी हपापलेल्या उठाला या हाराकिरी मधून मार्ग दिसेल असे वाटत नाही !
मोदी सरकार आणि bjp मुळे कधी
मोदी सरकार आणि bjp मुळे कधी नव्हते इतके द्वेषाचे वातावरण तयार झाले आहे.
Bjp आणि bjp virodhi ह्यांच्यात टोकाचा द्वेष निर्माण झाला आहे ..
आणि हे विष जे bjp नी पेरले आहे ते फक्त राजकीय पक्ष पुरते मर्यादित आता राहिले नाही.
त्या मुळे 2024 ची निवडणूक bjp आणि bjp विरोधी ह्यांच्या अस्तित्वाची परीक्षा आहे.
Bjp विरोधी केंद्रात सत्तेत आले तर आक्रमक पने bjp ची पाळेमुळे ढिले करण्याचा प्रयत्न होणारच.
तेव्हा पण ed,cbi राजकीय हेतू नी सक्रिय असेल फक्त टारगेट बदलेले असेल.
Bjp सत्तेवर आली तरी तिचं अवस्था असणार आहे.
देशाची लोकशाही ची चोकट तोडून सरकार काम नक्कीच करणार.
एकंदरीत लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता च जास्त आहे
आणि ह्याला जबाबदार bjp आणि त्यांचे सरकार
आज म्या सहजी सर्च करू रायलतो,
आज म्या सहजी सर्च करू रायलतो, "rss on Indian Constitution"
एका धाग्यावर अशेच वाचले का बा संघाले काई घटना नाई ज्यमत, मंग म्हणलं बघावं तरी बा काय भेटते आनलाईन, सहज सर्च केले तर हे सापळले मले.
पैली लिंक - सीपीआय - एमएल
दुसरी - सबरंग इंडिया
तिसरी - चौथी - वायर
पाची - डेक्कन क्रॉनिकल (एकली साईट ज्याहीनं प्रश्नचिन्ह लावेल होय)
सहाई - डायरेक्ट मिल्ली गॅझेट
आता वरील मानसे / बाया मानसे/ संस्थागिंस्था बराबर हायत का नाईत हा अलग इशय होय. पर सरके तीर निर्वाळा देणार टोन इथं दिसते...
उजवे रहा का डावे आपुन जनता पश्चात सत्य सामाजात (post truth society) हाओ काय ?
असलो तर त्याचा लाभ फक्त डाव्या इचाराले काहून गा मिळावा ? उजव्याइले कामून नाई ?
नसलो तर ह्या सर्च मदी नीरक्षिर म्हणतेत तो समतोल झामलून बी काहून नाई सापळत??
जाणकारांच्या प्रतिक्रियांच्या परतिक्षेत.
- ई. ई.
Pages