महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या तीन वर्षात राजकारण प्रेमींना धक्क्यावर, धक्के बसण्याचा कालावधी होता.. शिवसेनेने सोडलेली बीजेपीची साथ, म वि आ ची निर्मिती, शिंदेच् बंड, गुवाहाटी, गुजरात, गोवा ह्या राज्यात घेतलेला आश्रय, ठरेंचा राजीनामा, म वि आ चे सरकार पडणे, शिंदे फडणवीस सरकार येणे, फडणवीसांना उपमुख्यमंत्री करणे, निवडणूक आयोगा कडून शिंदे कडे शिवसेना देणे. बऱ्याच घडामोडी अजून घडणार आहेत. ह्या घटनाचं इतक्या अनाकलनीय होत्या की एकही राजकीय ज्योतिषी तोंड उघडायला तयार नाही . आपली झाकली मुठ सव्वा लाखाची बरी. आता ह्या ज्या घडामोडी घडल्यात ह्याचा विचार करता मी पुढे काय होईल ह्याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतो. अर्थात हा अंदाज आहे भाकीत नाही . करण अंदाज खरा किंवा खोटा ठरवू शकतो भाकीत मात्र मिथ्या असते.
ह्या घडामोडी मुळे भविष्यात महाराष्ट्रातील राजकारण तर बदलेलच पण केंद्रीय राजकारणालाही दणके बसतील.
सध्या जी स्तिथी आहे ती जैसे थे राहिल्यास ह्याचे सर्वाधिक नुकसान हे भाजपला होऊ शकते. विधानसभेत पक्षीय बलाबल साधारणता असे राहील.
1) राष्ट्रवादी काँग्रेस..75 ते 80 सीट
2) भाजप- 60/80
जर म वि आ सोबत वंचित आघाडी असल्यास भाजप 60 जागांवर रोखला जाईल. नसल्यास 80 जागा मिळू शकतात.
3) काँग्रेस-42 ते 45 सीट
4) शिवसेना (ठाकरे) - 40 ते 42 सीट
5) शिवसेना(शिंदे)-2 ते 4 सीट
असे पक्षीय बलाबल राहील..
लोकसभा निवडणूक
म वि आ ..40 ते 42 सीट
भाजप - 6 ते 8 सीट
महाराष्ट्रात मुख्यमंत्री राष्ट्रवादि चा राहील.
महाराष्ट्रातील भविष्यातील निवडणूक अंदाज
Submitted by सचिन पगारे on 9 March, 2023 - 10:52
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हा धागा म्हणजे
हा धागा म्हणजे
Barkis is willin'
A phrase emphasizing one's availability or openness to a situation. It refers to Mr. Barkis, a character in Charles Dickens' novel David Copperfield, who used the phrase to express his interest in marriage.
किंवा "हम काले है तो क्या हुआ ,दिलवाले है...."ची आठवण झाली. खयालोमे!
बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी.
पुढची पाच हजार वर्षे मोदीला पर्याय नाही असे आचार्य अत्रे सांगून गेले ते खरेच आहे.
अरेच्चा! आता इतकी ती भारत
अरेच्चा! आता इतकी ती भारत जोडो यात्रा काढून जर रागा उमेदवार नसेल तर ते म्हणजे प्री वेडिंग फोटो शूटवर लाखो रुपये खर्च करून लग्नच न करण्यासारखं होईल

अदनान सामीचे 'लिफ्ट करा दे' गाणं गुप्तपणे वाजत आहे घराघरांतून.
बाकी मनमोहनांचे वारसदार डॉ रघुराम राजन highly qualified आहेत. ते असतील तर मोदींची मतंही फिरवू शकतील >>>>
हायली क्वालिफाइड माणूस राजकारणात यशस्वी होईल याची भारतात काय जगात कुठेच गॅरंटी नाही. मनमोहन सिंग पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले. कारण त्यांच्या मागे अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केल्याची पार्श्वभूमी होती. सामान्य माणसाला त्यांच्या कार्याचे महत्व माहित नसले तरी या माणसाने काही तरी चांगले केले आहे एवढा अंदाज होता. आणि तरी ते लोकसभेत निवडून नाही आले. रघुराम राजन यांना ते ऍडव्हान्टेज नाही. त्यामुळे ते राजकारणात मोदींची मते फिरवण्यात यशस्वी ठरतील याची अजिबात शक्यता नाही.
ताकाला जाऊन लोक भांडे का
ताकाला जाऊन लोक भांडे का लपवतात काही कळत नाही.
एखादा पक्का गुलामच असले अंदाज बांधू शकतो
>>शिवसेना (ठाकरे) - 40 ते 42 सीट<<
पक्ष आणि चिन्हाविना लढणाऱ्या ठाकरे गटाला मुळात इतक्या जागा लढायला तरी देईल का मविआ? काल डोळा मारलेला बघितला नाही का?
>>शिवसेना(शिंदे)-2 ते 4 सीट<<
शिंदेंबरोबर असलेले बऱ्याचश्या आमदारांचे स्वताचे फॉलॉइंग तगडे आहे. स्वताचे मतदार + शिवसेनेचे चिन्ह/यंत्रणा + भाजपाचा पाठिंबा हे बघता २ ते ४ हा आकडा अगदीच उचलली जीभ टाईप्स वाटत नाहिये का?
उरलेल्या दीड वर्षात ते सत्तेच्या मदतीने आपापल्या मतदारसंघात करणारी कामे हा अधिकचा बोनस!!
माझे कामाच्या निमित्ताने पुणे-मुंबई आणि इतरही महाराष्ट्रभर फिरणे होते .... वेगवेगळ्या थरातल्या लोकांबरोबर बऱ्याचदा कामाच्या पलिकडेही चर्चा होतात..... राजकारणावरही होतात पण अजुनतरी सत्ता गेल्यामुळे उठा साहेबांबद्दल सहानुभूती असलेला माणूस मला प्रत्यक्षात तरी भेटलेला नाही. आभासी जगात चिक्कार आहेत पण प्रत्यक्षात "चुकून राजकारणात आलेला माणूस" यापलीकडे फारसा वेगळा सूर या माणसाबद्दल ऐकिवात नाही त्यामुळे निवडणूकीत उठांबद्दल सहानुभूती हा मुद्दा फारसा प्रभावी ठरेल असे वाटत नाही.
बाकी भाजपा सत्तेचा माज वगैरे गोष्टी बोलणाऱ्यांना आव्हाड, भास्कर जाधव, संजय राऊत वगैरेंचा माज दिसत नाही याची भारी मौज वाटते
फडणवीस इतर राजकारण्यांना का नकोयत याची तीन उघड कारणे आहेत..... आणि तरीही ते सगळ्यांना पुरुन उरतायत याबद्दल त्यांचे प्रचंड कौतुक
? काल डोळा मारलेला बघितला
? काल डोळा मारलेला बघितला नाही का? >>>>>>>
मस्त !
अजित दादा ने उठा ला बकरा केला
मनमोहन सिंग पंतप्रधान
मनमोहन सिंग पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले. कारण त्यांच्या मागे अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केल्याची पार्श्वभूमी होती. >> चूक . म्याडमला बाळराजे मोठे होईपर्यंत तात्पुरती व्यवस्था हवी होती.
खर म्हणजे मायनो ने त्या वेळी
खर म्हणजे मायनो ने त्या वेळी हट्टाने बाळराजांना पंतप्रधान पदी बसवायलाच हवे होते !
एका येड्याच्या हाती तुणतुणं दिल्याचे खापर खांग्रेस च्या आयुष्यभर बोकांडी बसले असते ...
मनमोहन सिंग पंतप्रधान
मनमोहन सिंग पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले. कारण त्यांच्या मागे अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केल्याची पार्श्वभूमी होती.
राजकीय पाठिंबा हीच महत्त्वाची गरज असते पंतप्रधान होण्यासाठी.
बाकी गाढव पण पंतप्रधान होवू शकते आणि खूप वर्ष सत्तेत राहू पण शकते.
आज पर्यंत एक दोन सोडले तर कोणते पंतप्रधान. .
हुशार,राज्यकारभार योग्य रीती नी चालविण्यास सक्षम,देशाची अर्थ व्यवस्था,इत्यादी इत्यादी ह्याचे ज्ञान असणारा पंतप्रधान होवून गेला.
गाढव हा शब्द तुम्ही समजता त्या अर्थाने वापरला नाही.
तर गाढव म्हणजे आपल्या मालक प्रती प्रामाणिक.
मालक जे काम सांगेल ते कमचोरी न करता पूर्ण करणे ह्या अर्थाने वापरला आहे.
काही जनतेशी प्रामाणिक असतात तर काही त्यांच्या स्वतःच्या पार्टी शी प्रामाणिक असतात.
कोण फक्त फक्त कसा सत्तेत राहील हेच बघत असतात तर काही जनता कशी सुखी ,समृध्द होईल ह्याचा विचार करतात.
नाहि हो , ते फक्त मौनी बाबा
नाहि हो , ते फक्त मौनी बाबा होते !
कुठल्याही पत्रकारांना सामोरे
कुठल्याही पत्रकारांना सामोरे ना जाणारा वाचाळवीर गाढव का?
बारामतीच्या आलमगीर ने स्वतःचे
बारामतीच्या आलमगीर ने स्वतःचे पुरोगामित्व दाखवण्यासाठी आयुष्यात कधीच महाराजांच्या स्वराज्याच्या किल्ले गड संवर्धन साठी प्रयत्न केले नाही , ना कोणत्याही सभेत महाराजांच्या कार्या बद्दल गौरवपूर्ण उद्गार काढलेत , ना एखाद्या किल्ल्यावर दिवा लावला !
पण महाराजांना मानणाऱ्या मराठी जनतेला मूर्ख बनवून तीस चाळीस आमदार निवडून आणण्याची ताकत मात्र हमेशा ठेवली .
पण इथून पुढे उठाच्या सेने सारखी अवस्था आलमगीर सेनेची देखील होईल .
पप्पू ला समाज आणि विरोधी
पप्पू ला समाज आणि विरोधी पक्षाची मान्यता मिळत नाही याचे नैराश्य डोकावतय भूंगा !

१० जनपथला जा , आणि इटालियन काकुचे संत्वान करून या ...
खरतर शिंदे गट हे भाजपच्या
खरतर शिंदे गट हे भाजपच्या गळ्यात भाजपनेच सत्तेसाठी घालून घेतलेल लोढणच ठरायची वेळ आता आली आहे आणि शिंदेसोबत कितु शिवसैनिक आहेत हेही पोटनिवडणुकीत दिसुन आलय महाराष्ट्रात जर आज निवडणूक झाली तर हा अंदाज 100 0/0 खरा ठरणारा आहे निवडणूक आयोगाने चिन्हे व पक्ष याबाबतीत केलैला पक्षपात जनतेला पटलेला नाही शिवसेना संपवण्याच्या नादात भाजपन आपल्या पायावर कुराढ मारुन घेतली आहे सहानुभूती ठाकरेंनाच मिळत आहे मी तर म्हणतो 007जेम्सबाँडच ऐकुण ईडीन ठाकरेंना जेल दाखवावी मग भाजपला फडणविसच काय पण सुसंस्कृत व सभ्य राजकारणी म्हणून जनमानसात ओळखले जाणारे गडकरीही तारु शकणार नाही आणि मोदींचा खोटा करिश्माही 【जो आता उरलाच नाही म्हणून नागालँड मधे12आणि मेघालय मधे दोन जागा आणि तीन राज्यात 179पैकि भाजपला फक्त 46 जागा मिळाल्या तरी तिन राज्यात भाजपला बहुमत अस खोट चित्र भाजपन उभ केल】भाजप आपल अपयश आणि भाजप नेते आपला सत्ताजीवीपणा कितीही लपवत असले तरीही महाराष्ट्रात भाजपसाठी अपयश ठरलेलेच आहे आणि स्वबळावर सत्तेच स्वप्न भंगलेल आहे भाजप जवळ रागा आणि नेहरु गांधीविरोध याशिवाय सांगण्याव्यतिरिक्त दुसरे काही नाही आणि तसच हिडनबर्ग अहवालाने भाजपलाही अडचणीत आणले आहे व त्यात अ डाणीतिल अ ही न उच्चारण्याच्या सरकारच्या धोरणामुळे मोदी व भाजप कुणाच हित जपतात हे जगजाहीर झालेल आहे। लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा विरोधक लावून धरणार हे निश्चित। भाजपतही सारे अलबेल अआहे अस नाही
महाराष्ट्रात जसे फडणवीस गडकरी गट आहेत तसच केंद्रात ही योगी नी शहा किंवा अस म्हणुया की गुजरात /युपी असे विभाजन आहेच की या साऱ्या परिस्थीतीची चाहुल संघाला आधीच लागली असल्यानेच संघाने खतासाठी जात विचारत डाटा गोळा करण्याचा प्रयत्न आधीच सुरु केलाय ।पण महाराष्ट्रात हा अंदाज खरा ठरेल ।
हे काई मराठी जाल इश्व मावरे
हे काई मराठी जाल इश्व मावरे धसत नोय बाप्पा राजकीय चर्चा मंदी. हट लेक बेकार होय हे.
बाळराजे मोठे होईपर्यंत ममो.
बाळराजे मोठे होईपर्यंत ममो.
कधी व्हायचे ते मोठे?
____________
कॉन्ग्रेसचा खरा प्रश्न त्यांच्याच पक्षातला आहे. निवडून आलेले एकत्र ठेवायचे असे? आणि ते रागांपेक्षा हुशार नकोत. राजेशx पायलट कधीही जागा बळकावेल.
दुरुस्ती: सतीश पायलट.
सचिन पायलट म्हणायचे आहे का
सचिन पायलट म्हणायचे आहे का तुम्हाला ?
काँग्रेसने पुर्वीच माधवराव
काँग्रेसने पुर्वीच माधवराव शिंदे, सचिन पायलट यांना महत्व द्यायला हवं होतं, ते दोघेच काही चांगलं, ठोस करु शकले असते. शिंदे गेले आता पायलटना सांभाळा.
सध्यातरी पुढच्या निवडणूकीत देशात भाजपच येईल असं वाटतंय. महाराष्ट्रात शिंदे शिवसेना, भाजप वाटतंय. मविआतला रा काँ चांगल्या सीटस मिळवेल पण नागालँड सारखा गेला नाही भाजपबरोबर तर बघायचं काय ते .
आपल्याला न आवडणारे सगळे
आपल्याला न आवडणारे सगळे 'जनतेच्या' नावावर खपवण्याची वाईट सवय असते काही लोकांना
जनतेच्या मनात रोष, जनतेत सहानभुतीची लाट वगैरे..... आपल्या गल्लीचा तरी कानोसा घेतलेला असतो की नाही या लोकांनी कुणास ठाऊक 
काही बेसिक प्रश्न:

*ठाकरे गटाला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून किती जागा सोडतील असे वाटते तुम्हाला? जिथे ह्यांचे विद्यमान आमदार आहेत त्यांचा विषयच सोडा पण जिथे ह्यांचा निसटता पराभव झालाय किंवा कॉंग्रेस राष्ट्रवादीचे पारंपारिक मतदारसंघ आहेत, घराणी आहेत त्या जागा कॉंग्रेस राष्ट्रवादी ठाकरे गटाला सोडेल असे खरेच वाटतेय? जिथे आघाडी धर्म म्हणून जागा सोडल्या जातील तिथे बंडखोरी होणार नाही याची पक्की खात्री आहे?
*नुकत्याच झालेल्या पोटनिवडुकीत ना शिवसेनेचा उमेदवार होता ना ठाकरे गटाचा त्यामुळे कोण किती पाण्यात आहे हे पोटनिवडणुकीच्या निकालावरुन ठरवणाऱ्यांचे राजकीय आकलन धन्यवाद आहे!!
*गटतट राष्ट्रवादीत नाहीत का? कॉंग्रेसमध्ये नाहीत का? सत्यजित तांबे प्रकरणांनंतर पटोले आणि थोरातान्मध्ये जे काय झाले ते काय होते म्हणे? बाकी ज्यांच्या नाकाखालून ४० जणांचा गट बंडखोरी करुन बाहेर पडतो त्यांनी इतरांच्या पक्षातील कपोलकल्पित गटातटांवर बोलावे म्हणजे विनोदच आहे
*ते जे काही खतांसाठी पोर्टल बनवले होते त्यात संघाचा काय संबंध? केंद्र सरकार म्हणालात तर एकवेळ समजू शकतो..... पण संघ?
केंद्राने केलेल्या चांगल्या कामाचे क्रेडीट संघाला देता का? मग केंद्राच्या चुका का संघाच्या माथी मारता?
जात विचारणे वाईटच मग ती खत देताना असो वा ॲडमिशन देताना असो! एके ठिकाणी जात नुसती विचारणे गुन्हा आणि दुसऱ्या ठिकाणी ती विचारुन त्यानुसार एखाद्याला ॲडमिशन देणे किंवा नाकारणे; नोकरी देणे किंवा नाकारणे/ बढती देणे किंवा नाकारणे हे योग्य हे म्हणणाऱ्यांगनी कधीतरी आपल्या भुमिकांचा मनातल्या मनात तरी प्रामाणिक धांडोळा घ्यावा
बाकी ज्यांच्याकडे मतदारसंघांची पान अन पान माहिती आहे आणि त्यांचे अधिकृत पन्नाप्रमुख आहेत त्यांना ही माहिती जमवण्यासाठी खतखरेदीसाठी वापरल्या जाणाऱ्या POS चा आधार घ्यावा लागतो या पुडीवर ज्यांचा विश्वास बसतो त्यांच्या राजकीय 'ढ'पणाला जगात तोड नाही
पायलट वरून आठवलं !
पायलट वरून आठवलं !
इंदिरा गांधींचा मृत्यू देखील अहमद पटेल चौकडी ने कॅश केला होता .
त्यावेळी उपलब्ध असलेल्या आणि कसलेल्या नेत्यांना
पुढे न करता पायलट असलेल्या आणि राजकारणाचा गंध नसलेल्या राजीव गांधींना पंतप्रधान पदी बसवले .
नंतर बोफोर्स सारख्या किरकोळ आरोपात राजीव गांधींनी
सत्ता गमावली .थोडक्यात सत्ता टिकवण्यासाठी राजकारण कोळून प्यालेला व्यक्ती हवाच !
मोदीनी उगीचच दुसरी टर्म देखील पूर्ण केली का ?
आमचे उठा देखील वन्य जीव फोटोग्राफर होते , करावी त्यातच कारकीर्द ना !
फार तर शिववडा , शिवथाळ्याच्या फ्रेंचायाजी देण्याचे पराक्रम करायचे .
पण आता संपादक आणि आलमगीर च्या नादी लागल्यामुळे तमाम महाराष्ट्राला सेनेच्या हिंदुत्व नकली की असली चे स्पष्टीकरण द्यायची वेळ आली , माजी मुख्यमंत्री चा मान मिळवला पण सेनेचे पानिपत झाले ना ?
माहिती जमवण्यासाठी
माहिती जमवण्यासाठी खतखरेदीसाठी वापरल्या जाणाऱ्या POS चा आधार घ्यावा लागतो या पुडीवर ज्यांचा विश्वास बसतो त्यांच्या राजकीय 'ढ'पणाला जगात तोड नाही >>>>>>>>>
शालजोडे.
बाकी राजकारणात सर्वच
बाकी राजकारणात सर्वच राजकारण्यांनी (राजकीय पक्षांनी) पाय जमिनीवर ठेवायची गरज आहे, भाजपनेही.
भाजपने नाशिक पदवीधर प्रतिष्ठेची करत, नागपुरकडे दोन सीटस गमावल्या. पुण्यात कसबा गमावली.
बाकी उद्धव ठाकरे यांच्या मनात
बाकी उद्धव ठाकरे यांच्या मनात मुख्यमंत्री होण्याचं बीज त्यांच्या वडलांनीच रुजवलं असं वाटतं, निदान सुरुवात तरी कारण मला आठवतंय, पहिल्यांदा युती सरकार महाराष्ट्रात आलं तेव्हा मनोहर जोशींना कोर्टाच्या एका निर्णयाने (निर्णय विरोधात गेला असता तर) कदाचित लगेच राजीनामा द्यायला लागला असता तर बाळासाहेब उद्धव यांना मुख्यमंत्री करणार होते, असं पेपरात ठळकपणे वाचल्याचे आठवतं, रा ठा एका केसमध्ये अडकलेले त्यामुळे लगेच तात्पुरता हा पर्याय होता. दुसरी कुठली नावं वाचली नव्हती तेव्हा, नंतर काही वर्षांनी राणे मुख्यमंत्री झाले तरी त्यांचंही नाव नव्हतं चर्चेत.
देशात bjp सरकार च येईल.
देशात bjp सरकार च येईल.
देश म्हणजे अखंड यूपी, अखंड बिहार, मध्य प्रदेश,
इतकाच भाग .
इथेच फक्त bjp आहे.
आणि गुजरात.
हिंदी भाषा राज्यात ram नाम चालते.
आणि गुजरात मध्ये दाम नाम.
बाकी ठिकाणी ना bjp आहे ना पुढे असणार आहे ..
ज्या राज्यात सरकार चालवणाऱ्या लोकांचा दर्जा बघितला जातो.त्या राज्यात bjp आज पण नाही
दुर्दैव हे आहे की ram नाम चालणाऱ्या राज्यांची लोकसंख्या प्रचंड आहे.
सर्व राज्यांना समान प्रतिनिधित्व दिले तर मला नाही वाटत bjp भारतात कधीच सत्तेवर येईल.
मले फक्त एकच गोठ म्हण्याची
मले फक्त एकच गोठ म्हण्याची होय, आपापले राजकीय आवड गिवड भारे बांधून साईडले फेकसा तरच काई गमते चर्चा कऱ्याले, नाई तर हायच जय जय मोदी बी अन् हाय हाय मोदी बी.
अंदाज आणी स्वप्नरंजन यात फरक
अंदाज आणी स्वप्नरंजन यात फरक करायला हवा. रा काँ सर्वात मोठा पक्ष हे वाचूनच हसू आले. काँ-राकाँ मधून नेते भाजप मध्ये येण्याचा ट्रेंड अजूनही सुरू आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल. रा काँ आता आहेत तितक्याच सीट्स थोड्या फार फरकाने मिळवेल.
शिवसैनिक,माझा शिवसैनिक. पण
शिवसैनिक,माझा शिवसैनिक. पण सत्तांतर करतांना यांना विचारलं होतं का मी जाऊ का?
(अवांतर - इलंन मस्कने मागच्या महिन्यात मत घेतलं ट्विटरकरांचं -'मी ceo राहू का?' साठ टक्के
ट्विटरकरांचं मत पडलं -'सोडा.' मत घेतलं हे सुद्धा विशेषच.)
आपापले राजकीय आवड गिवड भारे
आपापले राजकीय आवड गिवड भारे बांधून साईडले फेकसा तरच काई गमते चर्चा कऱ्याले
व्हयनू दादा.
Srd भाऊ,
Srd भाऊ,
माणसाच्या बोलण्यावरून तो मोदी भक्त होय का राहुल भक्त हे उमगले का मंग कायच्या अन् कायले चर्चा करावं लागते सांगा लेक तुमीच मले.
बरं, जालावर चर्चा करून लोक बदलते अशे मानाचे आपले वय बी रायले नाही न राजेहो आता. काहाले आई बापानं बाराखडी वर खर्च केल्याच्याने आपून अटी फल फल करा.
आपली तर ओपन ऑफर अन् वृत्ती होय, वाचाल तर वाचाल ! लोकसभेच्या साईट वरी constituent assembly ते लेटेस्ट अधिवेशन सारे काही रेडी असते वाच्याले, कोणी सांगा पूर्ण वाचले अशीन त नाहीतर बाबानं सांगतलं राजू गांधीच्या पोराले मत द्या म्हनून देतो वाली जनता नाई त बाबानं सांगतलं म्हनून म्या मोदी भगत हाओ, अश्या दोन्ही टाईपच्या लोकायच्या तोंडी लागून का होते गा चर्चा !
प्री वेडिंग शूट उर्फ भारत
प्री वेडिंग शूट उर्फ भारत जोडो यात्रेत महात्मा गांधींच्या पणतू तुषार गांधीनेही भाग घेतला होता. गांधींचा पणतू म्हणून या इसमाला एक आदर, स्पेशल स्टेटस टाईप असतं जनरली.
या माणसाची २००९, १०, ११ सालची ट्विट्स सध्या व्हायरल झाली आहेत. So much misogyny and indecent content in his tweets.
इथे शेअर करणार नाही कारण गांधींच्या पणतूची ट्विट्स माबो स्टँडर्डमध्येसुद्धाही बसणारी नाहीत.
वाचले ते ट्विट !
वाचले ते ट्विट !
शेवटी नातू कोणाचा आहे ?
पण त्याचे दुःख एकच की काँग्रेस तुषार गांधी ला महात्मा करणार नाही ......
ज्या राज्यात सरकार चालवणाऱ्या
ज्या राज्यात सरकार चालवणाऱ्या लोकांचा दर्जा बघितला जातो.त्या राज्यात bjp आज पण नाही>> जरा स्पष्ट करून सांगाल का सर? की नेहमी सारखी बॅटींग आहे.
Pages