Personality Development Part 1 : माणसाचं मन कायम अस्वस्थ का असतं?

Submitted by संयोग on 13 February, 2023 - 05:44

मित्रांनो, Personality Development साठी खास लेख लिहीत आहे. जरूर वाचा. जर काही शंका असेल तर जरूर विचारा. कौतुक करण्यास अजिबात संकोच बाळगू नका. काही चुकभूल झाल्यास मात्र प्रेमाने कान पिळण्यासही विसरू नका.

मनुष्य कायम अस्वस्थ असतो, माझ्याकडे हे नाही, ते नाही. पण जर त्याने नीट विचार केला, आपल्याकडे काय काय आहे तर त्याची गणतीच संपणार नाही.
आता जे पण माझा लेख वाचत आहेत त्यांना off course डोळे आहेत म्हणूनच ते वाचत आहेत. तुमच्याकडे डोळे आहेत, तुमचं शिक्षण झालंय, म्हणून तुम्ही वाचू शकता.
काही लोक म्हणतील, यात काय मोठं?
अहो, वाचक मंडळी आपल्याकडे काय आहे याची जाण माणसाला तेव्हाच होते, जेव्हा तो आजूबाजूला अशी माणसं बघतो, ज्यांच्याकडे त्या गोष्टी नाहीत.

एखाद्या आंधळ्याकडे बघितलयंत कधी? प्रत्येक गोष्टीसाठी तो चाचपडत असतो. तो जगातल्या सगळ्याच गोष्टी miss करतो, तो एखाद्या मुलाचं हसू पाहु शकत नाही, तो हे अथांग आभाळ, पाण्याचा झरा, पान, फळं, फुलं,झाडं काहीच नाही.

या गोष्टी सोडा, तो आजूबाजूच्या, टीव्हीवरच्या, मोबाइलच्या screen वर दिसणाऱ्या सुंदर नटयांचं सौंदर्य अनुभवू शकत नाही. दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, कियारा आडवाणी, दिशा पटाणी, कीर्ती सेनॉन यांपैकी कोणाचंच सौंदर्य (जर यापैकी कोणालातरी तुम्ही सुंदर मानत असाल अशी कल्पना करुन त्यांची नावं घेतलीत, चूकभूल झाल्यास माफी असावी) अनुभवू शकत नाही.

तुमच्या घरात काम करणाऱ्या अशिक्षित कामवाली कडे पाहीलंय कधी? ती किती गोष्टीं साठी दुसऱ्यांवर अवलंबून असते. अगदी बाजारात भाजी आणण्यापासून ते आपल्याला मिळालेला पगारही तिला धड मोजता येत नाही. तिला जगातला कोणताही व्यवहार करता येत नाही, काही अडचण आली तर तिला google वर, youtube वर आपल्यासारखे search करता येत नाही, मायबोलीवर येऊन तुमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांसारखे लेख वाचता येत नाही. आणि माझ्यासारख्या नवख्या लेखकाप्रमाणे लेख लिहीताही येत नाहीत .

कोणी चांगलं लिहू शकतो, कोणाचं वाचन खूप चांगलं असतं, कोणी चांगलं बोलू शकतो, तर कोणी चांगलं गाऊ शकतो, कोणाचा आवाज धारदार असतो, कोणी चांगल्या प्रकारे स्वच्छता करु शकतो.

कोणी जगण्यासाठी उत्तम कमवत असतो, कोणी गावाकडे उत्तम आणि शांत वातावरणाचा आस्वाद घेत असतो.

अशीच आपल्याकडे असलेल्या गुणांची , आणि आपण मिळवलेल्या उपलब्धींची यादी करत बसलो, तर कदाचित आपल्याला दिवसही पुरणार नाही. तर मग,मित्रांनो, मी तुम्हाला प्रश्न विचारेन, आपण का कायम दुःख करत बसतो?

कारण आपल्याला आपल्याकडे असलेल्या गोष्टींची जाणच नसते. मित्रांनों, आपण जाणतेपणी किंवा अजाणतेपणी सतत दुसऱ्यासोबत स्वतःला comparison करत असतो. दुसऱ्यासोबत कधीच Comparison होऊच शकत नाही. कारण प्रत्येक माणसाची लहानपणापासून मानसिक, शारीरिक आणि सामाजिक जडणघडण खूप वेगळ्या प्रकारे होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्ति म्हणजे पूर्णपणे वेगळं रसायन असतं.

अगदी जुळ्या बहीणभावांच्या जडणघडणीतही कमालीचं अंतर असतं. त्यामुळे Comparison कोणाचंच कोणाशी होऊ शकत नाही.
त्यामुळेच, मित्रांनो मी तुम्हाला सांगेन, एक दिवस मुद्दामहून वेळ काढा, ठरवून बसा आणि एखादा कागद-पेन किंवा Digital Wordpad घेऊन आपल्याकडे असलेल्या गुणांची आणि उपलब्धींची यादी बनवा. आपल्यालाच कळून चुकेल, की माझ्याकडे काय काय आहे, शिवाय याचा मानसिक, शारीरिक', वैचारिक आणि कार्य स्तरावर फायदा मिळतोच.

यामुळे कायम uncontrolled आणि negative विचार करणाऱ्या मनाला आपण Positive विचार करण्यासाठी प्रेरित करतो आणि जर आपण नियमितपणे उजळणी करत राहिलो, (जर ठरवून, बसून, कागद-पेन घेऊन यादी बनवली तर उत्तमच, पण अगदीच वेळेअभावी किंवा काही कारणाने शक्य नसल्यास मनातल्या मनातही अशी यादी बनवू शकतो.) तर सतत Positive Thinking ची मनाला सवय लागते.

शिवाय अशा Positive thinking मुळे आपल्या मेंदूत Dopamine, Serotonin, Oxytoxin, Endorphins सारखी संप्रेरकं कमी अधिक प्रमाणात स्त्रवतात, ज्यामुळे आपल्याला आरोग्यविषयक फायदे मिळतातच, शिवाय आपल्याला उत्तम कार्य करण्यासाठी ही रसायने उद्युक्त करतात, आपल्या मनात आणि शरीरात उत्साह निर्माण करतात. ज्यामुळे आपण करत असलेले कार्य अजून उत्तम करण्याचा उत्साह वाढतो.

अशी यादी बनवण्याचे फायदे सांगावे तितके कमीच. त्यामुळे अजून काही लिहिण्यापेक्षा एकच सांगेन, वेळ काढून शांतपणे बसा, कागद-पेन किंवा Digital Wordpad घ्या आणि आपल्याकडे असलेल्या गुणांची आणि उपलब्धींची यादी बनवून पहाच, आणि त्याची नियमितपणे उजळणी करा, ज्यामुळे त्याची आपल्याला सवय लागेल. यामुळे आपलं आरोग्य सुधारेल, शिवाय आपल्याला आयुष्यात विविध स्तरांवर याचा फायदा होईल.

शेवटी, समर्थ रामदासांनी म्हटले आहेच ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.’

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या घरात काम करणाऱ्या अशिक्षित कामवाली कडे पाहीलंय कधी? ती किती गोष्टीं साठी दुसऱ्यांवर अवलंबून असते. अगदी बाजारात भाजी आणण्यापासून ते आपल्याला मिळालेला पगारही तिला धड मोजता येत नाही. तिला जगातला कोणताही व्यवहार करता येत नाही, काही अडचण आली तर तिला google वर, youtube वर आपल्यासारखे search करता येत नाही, मायबोलीवर येऊन तुमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांसारखे लेख वाचता येत नाही. आणि माझ्यासारख्या नवख्या लेखकाप्रमाणे लेख लिहीताही येत नाहीत . >>>>>>कामवाल्या मदतनीसांबद्दल कोणत्या काळातले लिहिलं आहे ? ट्रेन मधून प्रवास करत असाल तर (कंदाचीत ) मुंबई साईडला बंगले किंवा अपार्टमेंट्स मध्ये काम करणाऱ्या बायकांकडे स्मार्ट फोन्स असतात आणि त्या त्यावर मस्तपैकी रील्स पाहत असतात यावरून त्यांची लिटरसी सिद्ध होत नाही पण त्या आधुनिक आहेत व आधुनिक जगातल्या (सोशल मीडिया ) वस्तू त्यांना आपल्यापेक्षा चांगल्या प्रकारे वापरता येतात हे सांगायचे आहे। अंबानी किंवा मोठाल्या उद्योग पतींकडे अडाणी बायका काम करत असतील का ? राहिले मायबोलीवर येऊन लेखन किंवा वाचन करण्याकडे तर त्यांना हि साईट सजेस्ट करा त्या तीही वाचतील आणि त्यांचा असा उल्लेख केला म्हणून (म्हणजे अडाण्यात गणती केली म्हणून ) धागे काढतील। .

बंगले, आपार्टमे़ंट्सच नाही आमच्या मध्यमवर्गीय कॉलनीतल्या कामवाल्यांकडेही स्मार्टफोन असतात.

अशिक्षित कामवालीला पगार मोजता येत नाही हे चित्र सुद्धा वास्तवापासून बऱच दूर आहे.

Ajnabi, भरत, देवकी यांना उद्देशून,
संपूर्ण भारतामध्ये अजूनही average 27% लोकं अशिक्षित आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्येच 25% स्त्रिया अशिक्षित आहेत. मुंबईमध्येच 14% स्त्रिया अशिक्षित आहेत.
अशिक्षितचा अर्थ अजिबात लिहिता वाचता न येणं. या स्त्रियांना अगदी जुन्या Nokia 3310 mobile कसा वापरायचा, यासाठीही घरातल्या मुलांना विचारावं लागतं. त्यांना कोणत्याही प्रकारचा व्यवहार नीटपणे करता येत नाही. अहो, ज्यांचं शिक्षण खूप चांगलं झालं आहे, (गणित चांगलं नसल्यामुळे) , अशांनाही हिशोब नीट जमत नाही, तर ज्यांचं शिक्षण कमी आहे अशांबद्दल तर विचारुच नका.

आता मुंबईचंच उदाहरण घेऊ. मुंबईमध्येसुद्धा 14% स्त्रिया अशिक्षित आहेत. आणि अंबानी आणि अदानीसारखे मोठाले उद्योगपती किती आहेत? आणि त्या सगळ्यांकडे काम करणाऱ्या कामवाल्या अशा कितीशा असतील.

आता त्यांच उदाहरण घेऊ ज्यांच्याकडे Smartphones आहेत. हो, मुंबईसारख्या शहरात काही कामवाल्या थोड्याफार शिकलेल्याही आहेत आणि त्या Smartphone वापरतातही आणि Ajnabi यांनी सांगितल्याप्रमाणे त्या Reels ही बघतात.

पण Reels बघणं म्हणजे आधुनिक असणं असतं का हो? आणि Reels बघणं म्हणजे आधुनिक जगातल्या वस्तू चांगल्या प्रकारे वापरता येतात, हे म्हणणं खूपच हास्यास्पद आहे आणि कोणत्याही प्रकारचे आकलन न करता केवळ टीका करण्यासाठी केलेले विधान वाटते. Technology ही माणसाच्या सोईसाठी बनली आहे. Entertainment हा त्यातील एक भाग असू शकतो. पण केवळ Reels बघणं, म्हणजे Technologyचा सुयोग्य वापर करणे असा कधीच होऊ शकणार नाही.

IT Engineers मोबाईलचा वापर Coding, Design, hacking या गोष्टी शिकण्यासाठी करतात. विविध क्षेत्रातील व्यक्ति मोबाईलचा वापर त्या त्या क्षेत्रातील गोष्टी शिकण्यासाठी करतात. शिवाय शिक्षण झाल्यामुळे ते आपली आयुष्यातली समज किंवा व्यासंग वाढवण्यासाठी, Business साठी किंवा आपला छंद जोपासण्यासाठीही करतात.

परंतु कामवाल्या मदतनीस यांचं शिक्षण कमी असल्यामुळे त्यांच्या वापरण्यालासुद्धा एक मर्यादा येते.
Ajnabi सर/मॅडम, आपल्याला कामवाल्यांबद्दल आपुलकी आहे, हे वाचून फारच छान वाटलं. पण Sir/Madam, मी त्यांना कुठेच ‘अडाणी’ म्हणालो नाहीये. तो आपणच प्रतिक्रियेत लिहीला आहे. अडाणी हा शब्द मनाला दुःखावणारा शब्द आहे, त्यामुळेच मी अशिक्षित हा सौम्य शब्द वापरला आहे, आणि आपणही तसेच शब्द वापरावेत, हेही आग्रहाने सांगीन.
आणि त्यांना कोणी ही Site Suggest केलीच, तर इथे मी कामवाल्यांची वास्तव, खरीखुरी व्यथा लिहिली आहे. त्यांची योग्य प्रकारे दखल घेतली म्हणून त्यांना कुठेतरी छानच वाटेल आणि त्या माझ्या लेखांचं कौतुकच करतील आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे माझे धागे जरी काढले, (शक्यतो आपलेच धागे निघतील) तरी मला छानच वाटेल, कारण maayboli वर केवळ आपल्यासारखे वाचकच येत नाहीत तर घरी काम करणाऱ्या मदतनीसही येतात आणि माझा लेख वाचतात, ही माझ्या महाराष्ट्रासाठी अभिमानाचीच गोष्ट असेल.

माझ्या लेखाचं मर्म हे आहे की, आपण आपल्याकडे काय नाही याचा विचार करुन रडत बसण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे, हे पहावे. ज्यामुळे मन प्रसन्न होते, आणि आपल्याला नवीन गोष्टी करण्याची, शिकण्याची उभारी मिळते.
माझ्या लेखाचे मर्म समजून घेऊन, त्याचे नीट आकलन करुन मग आपण त्यातले धागे काढले असते, तर मला जास्त छान वाटलं असतं. असो.

जनरलायझेशन नको. आमच्या भागात येणार्‍या अनेक मोलकरणी शाळा शिकलेल्या आहेत.

स्वतः आजी असलेली पेशंट केअरचं काम करणारी बाई आपल्या मोबदल्याचं गणित मांडून त्यासाठी भांडताना पाहिली आहे.

अशिक्षित व्यक्तीला हिशोब करता येत नाही, हाही गैरसमज आहे.

तुम्ही म्हणताय अशिक्षित व्यक्ती स्मार्टफोनचा उपयोग फक्त री ल्स पाहायला करते. मुंबईच्या रस्त्यांवर , बसेस आणि ट्रेन्समध्ये कॉलेज विद्यार्थी, ऑफिसात जाणारे लोक फोनवर सिरीज, टीव्ही मालिका, चित्रपट पाहत असतात. गाणी ऐकत असतात. गेम्स खेळतात.

वर उल्लेख केलेल्या मोलकरणी आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून धडपडतात. परवडत नसूनही इंग्रजी माध्यमाच्या शाळांत घालतात, शिकवणीचे वर्ग लावतात.

किती पिढ्यांपासून भाज्या, मासे विकण्याचा व्यवसाय स्त्रिया करत आहेत ? त्या किती शिकल्या असतील? करतात ना त्या हिशोब?

भरत यांना उद्देशून,
इथे जनरलायझेशन कुठे केले आहे? मोलकरणी शाळा शिकत नाहीत, असं कुठेही म्हटलं नाही.

आणि मी वरील प्रतिसादात हेही म्हणालो आहे की, शिकलेल्यांनाही बरेचदा हिशोब जमत नाहीत. कोणत्याही गोष्टीचा पुरेसा सराव केला, तर ती गोष्ट जमतेच, मग तिथे शिक्षण कमी की जास्त हे matter करत नाही.

मोलकरण्यांना job करणाऱ्या इतर लोकांपेक्षा बरीच मेहनत करावी लागते, कारण त्यांचं शिक्षण पुरेसं नसतं. जर त्यांचं शिक्षण झालं असतं, तर कमी मेहनतीत त्यांना पुरेसा मोबादलाही मिळाला असता, आणि आयुष्य थोडं अजून सुकर झालं असतं. त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून त्यांना धडपडावं लागलं नसतं. त्याबतीत आपण खरंचं सुदैवी आहोत. आपल्याला प्रतिसाद देता देता माझ्या मूळ लेखाचे मर्म (आपल्याकडे already बरंचं काही आहे.) पटवून देण्यासाठी मला अजून एक उदाहरण देता आलं, त्याबद्दल खरंचं धन्यवाद.

आणि मुंबईतही बरीचं लोकं फोन मनोरंजनासाठी वापरतातच, यात दुमत असण्यासारखं काहीच नाही.
Note: प्रत्येक शब्दाचा आणि वाक्याचा अर्थ संदर्भानुसार बदलतो, त्यामुळे प्रत्येक शब्द आणि वाक्याचा अर्थ संदर्भानुसार समजून घ्यावा, तरच लेख आणि प्रतिसाद नीट समजेल.