डॅलस मधील चांगली कम्युनिटी

Submitted by च्रप्स on 2 February, 2023 - 23:13

डॅलस मधील मायबोलीकर- डॅलस उपनगरात एखादे अपार्टमेंट किंवा हाऊस घ्यायचा विचार आहे. चांगल्या जागा सुचवाल का जिथे रेंट ने आरामात जाईल घर... इन्व्हेस्टमेंट म्हणून घेणार आहे... मी डॅलस मध्ये आतापर्यंत कधीच राहिलो नाहीय...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपनगरे म्हणाल तर फ्रिस्को, अ‍ॅलन, मकिनी, लिटल एल्म, प्रॉस्पर. फ्रिस्को सगळ्यात महाग. लोकसंख्या भरपूर वाढली आहे, खूप कंपनीज इथे शिफ्ट झाल्या आहेत.
डॅलस मधे फारसे जाणे होत नाही , तिथली माहिती नाही.

इंटरेस्टिंग... घाट्याचा सौदा किंवा का नसेल गुंतवणूक... शिकागो सबरब - बफेलो ग्रोव्ह मध्ये मी x प्राईझ ला एक घेऊन x + बऱ्यापैकी प्रॉफिट अधिक ला विकले दोन वर्षात.. होतो प्रॉफिट मॉर्टगेज वर घेतला तरी... हौसिंग प्राईज वाढतेच...

>>इंटरेस्टिंग... घाट्याचा सौदा किंवा का नसेल गुंतवणूक... शिकागो सबरब - बफेलो ग्रोव्ह मध्ये मी x प्राईझ ला एक घेऊन x + बऱ्यापैकी प्रॉफिट अधिक ला विकले दोन वर्षात.. होतो प्रॉफिट मॉर्टगेज वर घेतला तरी... हौसिंग प्राईज वाढतेच...>>

तुम्ही दोन वर्षात घर विकले म्हणजे मूळ हेतू रेंटल प्रॉपर्टी नव्हता. मी रेंटल प्रॉपर्टी या हिशोबाने लिहिले.
अजून एक, घराच्या किमती वाढतातच असे नाही. तुम्ही कुठल्या चक्रात घर घेतले आणि कुठल्या चक्रात विकत आहात त्यावर ते अवलंबून आहे.

माझ्याच कम्युनिटित गेल्या वर्षी जे घर ५४० ला विकलेले ते काही महिन्यांपूर्वी ६२० पर्यंत विकलं जात होतं .. पण गेल्या महिनेयापासून पुन्हा भाव कमी झालेत .. शेवटची घरं राहिलीत .. पुन्हा ५५० पर्यंत विकायला काढलेयआहेत .. न्यू कंस्ट्रक्शन, २४० एरीया, २ स्टोरी टाऊन हाऊस

थोडा दम धरा च्रप्स उतरतंय टेक्सासचं मार्केट.

बजेट किती आहे आणि किती भाडे अपेक्षित आहे?>>>> +
यात डाऊन पेमेंट किती करणार आहात ? मॉरगेजपेक्षा रेन्ट जास्त ठेवावे कारण मेन्टेनन्सपण असू शकतो. कट टू कट ठेवू नका. कारण मधे एखादं दुसरा महिना घरं भाड्याने गेले नाही की आर्थिक ताण येतो. स्वतः टेनन्ट शोधणार का रेंटल कंपनीला देणार तेही आधीच ठरवा. कारण त्यांचाही बराच कट असतो. शिवाय ते पुन्हा मेंटेनन्स आपल्या कडून घेतात. फक्त बॅकग्राऊंड चेक करून भाडेकरू शोधतात एवढाच फायदा. आपण डाऊन पेमेंट खूप टाकलंय म्हणून मॉरगेज कमी झालंय आणि नुकसान काही नाही म्हणून कमी रेंटला देऊ नका. लॉन्ग टर्ममधे नुकसान होते.
शुभेच्छा तुम्हाला.

मॉरगेज भरुन केलेली रेंटल प्रॉपर्टी नगण्य वर्षिक उत्पन्न देऊ शकत असेल असं मला वाटतं. प्रॉपर्टी प्राईस मध्ये जी वाढ होईल त्यामुळे विक्री करताना जो होईल तोच मोठा फायदा. त्यातही लिस्टिंग एजंटची फी आणि टॅक्स वजा करुन जो होईल तो फायदा. तो ही प्रॉपर्टी किती वर्षे होल्ड केली त्याच्या प्रमाणात चक्रवाढ इंटरेस्ट धरुन किती होतो ते काढलं पाहिजे. अर्थात मी एक - दोन रेंटल घरं असा विचार करतोय. आख्खी बिल्डिंग वगैरे नाही.

मॉरगेज घेऊन घेतलेल्या रेंटल घराच्या भाड्यातुन : मेंटेनन्स, प्रॉपर्टी टॅक्स, प्रॉपर्टी मॅनेजमेंट फी, इतर काही फिक्स्ड चार्जेस असतील तर ते, मॉरगेज -इन्शुरन्स, मॉरगेज मधला इंटरेस्ट पोर्शन आणि मॉरगेज पेमेंटवर भरायला लागणारा पर्सनल इनकम टॅक्स निघत असेल तर वाईट नाही. प्रिंसिपल पोर्शन पण जात असेल किंवा आपण भरलेल्या डाऊन पेमेंटच्या ३-४% व्याज जरी उरत असेल तर तो फायद्याचा सौदा. अर्थात ते ही पँडॅमिक आधी घेतलेल्या घरांबद्दल. पँडेमिकमध्ये जी काही वाढ झाली आहे (किमतींत आणि व्याज दरांत) त्या नंतर प्रॉपर्टी मध्ये सध्यातरी इनवेस्टमेंट म्हणून काही करू नये असं वैयक्तिक मत आहे.
काही चुकत असेल तर सांगा.

इनव्हेस्टमेंट प्रॉपर्टी अंडे उबवल्यासारखी उबवावी लागते तरीही 'लाईफ मिलेगी या तवेपे फ्राय होगा' ही धाकधूक काही जात नाही. मलाही ऑस्टिनला घर घ्यायचंय पण भाव फारच वर चढून बसलेत, क्रॅश होणारे म्हणत आहेत. उगीच टिपी करतो अधूनमधून लिस्टिंग बघत. माझ्याच आतेभावाला कॅलिफोर्नियात काहीच्या काही फायदा झाला, मगं तो ही प्रॉपर्टी टॅक्स कमी म्हणून माझ्याच नेबरहूडमधे बघतोयं. त्यात कॅनडात असाल तर अगदी टेनन्टसाठीसुद्धा वॉकआऊट बेसमेन्ट, युएसमधे ग्रीन बेल्ट, गूड स्कूल डिस्ट्रिक्ट व मदर ईन लॉ स्वीटचा देशी मोह कुणालाही सुटत नाही. ऑस्टिनला फार फायदा झालायं लोकांचा कारण ते गुगल, टेस्ला ,अमेझॉन सगळं तिथेच आलं. Texas is the new California Wink इथली सगळीच प्रॉपर्टी आपण ईनव्हेस्टमेंट सारखीच बघतो, फक्त अॅकोमोडेशन्स तेवढे बदलत रहातात. हे अनेक दुरुस्त्यांतून आलेले शानपन आहे.

मॉरगेज भरुन केलेली रेंटल प्रॉपर्टी नगण्य वर्षिक उत्पन्न देऊ शकत असेल असं मला वाटतं. प्रॉपर्टी प्राईस मध्ये जी वाढ होईल त्यामुळे विक्री करताना जो होईल तोच मोठा फायदा. त्यातही लिस्टिंग एजंटची फी आणि टॅक्स वजा करुन जो होईल तो फायदा. तो ही प्रॉपर्टी किती वर्षे होल्ड केली त्याच्या प्रमाणात चक्रवाढ इंटरेस्ट धरुन किती होतो ते काढलं पाहिजे. अर्थात मी एक - दोन रेंटल घरं असा विचार करतोय. आख्खी बिल्डिंग वगैरे नाही.
>>> अमित मुद्दा बरोबर आहे आणि पॉईंट असा पण आहे कि विकली नाही तर प्रॉपर्टी तरी होईल ...

सामो - माझा एक मित्र आहे.. त्याने पाच जॉब चेंज केले आणि पाच शहरात राहिला अठरा वर्षात.. आणि जिथे जिथे राहिला तिथे तिथे त्याने घर घेतले.. आता चार घरे रेंट वर आहे... फक्त चांगले लोकेशन बघून घेतले स्कूल डिस्ट्रिक्ट , ट्रेन वगैरे बघून.... त्यातले एक बे एरियात आहे जे त्याने 2010 ला घेतले होते.. आता घेणे शक्यही नाही.... असे लोक बघितले कि वाटते आपण काय केले इतके दिवस... जातात कुठे सगळे पैसे तेच काळत नाही Happy

जातात कुठे सगळे पैसे तेच काळत नाही >> ईट्स ओके.. जेव्हा तो मॅार्टगेज भरत होता तेव्हा आपण लोन फ्री जगणं एंजॅाय करत होतो.

अर्थात जरी वरती म्हटले असले की 'पैशाची असोशी' वगैरे तरी तक्रार काहीही नाही. काही जण लक्ष्मीचे दास असतात तर काहीजण विद्येचे उपासक. आणि होय मला वाटतं दास व उपासक हेच शब्द योग्य आहेत. प्रत्येकाची आपली आपली पॅशन असते.
------
म्हाळसाचा मुद्दा सुद्धा आवडला.

मला वाटतं दास व उपासक हेच शब्द योग्य आहेत >> एखादा कालीचा दास विद्येचा उपासक बनून पुढे रघुवंशादि महाकाव्यांची रचनाही करतो. Wink
असा कुठला दासोपासक ज्या कम्युनिटीत सापडेल, ती कम्युनिटी चांगली असा ठोकताळा बांधायला हरकत नाही.

माहीत नाही का - ९९% कंडिशनिंग असेल, पण विद्येची उपासना ही लक्ष्मीच्या उपासनेपेक्षा श्रेष्ठ वाटते. अर्थात हट्टीकट्टी गरीबी व पांगळी श्रीमंती चा इथे काहीही संबंध नाही.
मान्य आहे प्र-ह-चं-ड जजमेंटल वाक्य आहे, वाईड बॉल आहे पण ..... तसाच ग्रह आहे माझा.

चालतंय. हम क्रिकेट स्टेडियम पे फुटबॉल लेके टेनिस के कपडे पहन के बास्केट बॉल-सदृश खेळ खेळते हैं. त्याच्यासमोर वाईड बॉल कैच नै.

चालतंय. हम क्रिकेट स्टेडियम पे फुटबॉल लेके टेनिस के कपडे पहन के बास्केट बॉल-सदृश खेळ खेळते हैं. त्याच्यासमोर वाईड बॉल कैच नै.>>> सही हर्पा Happy