मुंबई-हेरिटेज वॉक

Submitted by TI on 2 January, 2023 - 01:28

मुंबई नुसतं नाव ऐकलं तरी गजबजाट, गर्दी, सतत धावणारी माणसं, पळणाऱ्या ट्रेन्स आणि गाड्या असं चित्र डोळ्यापुढे उभं राहतं, आणि खरोखरच मुंबई अगदी तशीच आहे. सततची गर्दी असलेलं हे ७ बेटांनी बनलेलं शहर, भारताची आर्थिक राजधानी, सिमेंट काँक्रीटचं जंगल आणि घडाळ्याच्या काट्यावर धावणारी लोकं हीच मुंबईची ओळख बनली आहे, पण ऐतिहासिक वारसा लाभलेली हीच मुंबई इतकी बघणीय असेल हे ऐकून बऱ्याच लोकांना नवल वाटतं. मुंबईच देखणेपण हे इथल्या गल्ल्या-बोळात फिरल्याशिवाय कळणं तसं अवघड!

काल हेरिटेज वॉक च्या निमित्ताने साहेबाची जुनी मुंबई बघण्याचा बेत जमला. सुरुवात छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून झाली, रेल्वेने आम्ही CST स्टेशनला पोचलो, मुंबईत प्रथम येणाऱ्याला स्टेशनची हि बिल्डिंग भुरळ पाडतेच पण रोज ट्रेनने प्रवास करून येणाऱ्याला सुद्धा ह्या बिल्डिंगबद्दल तितकंच अप्रूप वाटतं.

पूर्वीचं व्हिक्टोरिया टर्मिनस आत्ताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ची हि वास्तू आता युनेस्को वर्ल्ड हेरिटेज मध्ये गणली जाते. ब्रिटिश आर्किटेक्ट फ्रेडरिक विलियम स्टीव्हज ह्याने इटालियन-गॉथिक पद्धतीने बांधलेली ही वास्तू अतिशय देखणी आहे. १८८७ साली ह्याचे बांधकाम पूर्ण झाले. अप्रतिम स्थापत्याचा नमुना म्हणून ही आजही ओळखली जाते. मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वे च्या सेंट्रल रेल्वे जाळ्याला जोडणारे मुख्य ठिकाण म्हणजे CST स्टेशन.इथून साधारण १ किमी अंतरावर हेरिटेज वॉकचा आमचा पहिला स्टॉप होता एशियाटिक सोसायटी लायब्ररी.

एशियाटिक सोसायटी लायब्ररी अथवा टाऊन हॉल हे एक राज्य केंद्रीय ग्रंथालय आहे. १८३१ साली बांधून पूर्ण झालेली ही वास्तू, नियोक्लासिकल आर्किटेक्चर शैलीत बांधलेली असून आजच्या घडीला इकडे संस्कृत, मराठी, हिंदी, प्राकृत, पर्शिअन, उर्दू, ग्रीक, लॅटिन, इंग्रजी अशा अनेक भाषांमधली पुस्तकं, ग्रंथ, हस्तलिखिते किमान एक लाखांहून अधिक ग्रंथ, १२०० हुन अधिक नकाशे आणि पोथ्या संग्रहित आहेत. एशियाटिक सोसायटी समोरच हॉर्निमन सर्कल किंवा बँक स्ट्रीट परिसर आहे. हॉर्निमन सर्कल गार्डनला त्याच्या वर्तुळाकार आकारावरून नाव देण्यात आलं होतं. गार्डनच्या सभोवती युरोपियन धाटणीच्या बिल्डींग्स आहेत. पूर्वी ह्याचं नाव एल्फिस्टन गार्डन होतं, स्वातंत्र्यानंतर या भागाला पत्रकार बेंजामिन हॉर्निमन ह्यांच्या नावावरून हॉर्निमन गार्डन असं नाव देण्यात आलं.

पुढे आम्ही बँक स्ट्रीट आणि काळा घोडाच्या गल्ल्यांमध्ये इतिहासाच्या खुणा शोधत मुक्त भटकंती केली. ज्यू समाजाचे प्रार्थना स्थळ केनेसेथ अलियाहु सिनॅगॉग, आजूबाजूचे लहान लहान कॅफेज आणि युरोपियन धाटणीच्या इमारती पाहून मला गोव्याच्या फौंटनहासची आठवण झाली, तिथल्याच एका कॅफे मध्ये मनसोक्त नाश्ता करून पुढे आमची पावलं छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाकडे वळली. पूर्वीचे हे म्युझिअम २० व्या शतकात बांधलं गेलंय. ब्रिटिश आर्किटेक्ट जॉर्ज विटेट याने हिंदू, राजपूत आणि इस्लामी बांधकाम तंत्राचा वापर केलेला दिसतो. प्रत्येक मंगळवारी विद्यार्थी आणि लहान मुलांना इथे मोफत प्रवेश आहे. संग्रहालयात अनेक दालनं आहेत. संपूर्ण संग्रहालय बघण्यासाठी कमीत कमी २-३ तास लागतात. मुळात ऐतिहासिक वास्तू आणि आतल्या ऐतिहासिक गोष्टी बघून आम्ही भारावून गेलो. मुंबईत लहानपण गेलेल्या, मुंबईत शाळेत गेलेल्या , प्रत्येकाला लहानपणी इथे सहलीला आल्याचे नक्कीच आठवत असेल. इकडे फिरताना शाळेतले आम्ही आठवून खूप मजा वाटली. सध्या बरेच आधुनिक बदल बघायला मिळाले. नूतनीकरणामुळे नक्कीच पर्यटकांची गर्दी जास्त होत असेल. काळा घोडा शिल्पापासून संग्रहालय अंदाजे ८०० मीटर वर आहे. चालत अगदी १० मिनिटांच्या अंतरावर. तसेच पुढे चालत गेल्यावर गेट वे ऑफ इंडियाला पोचलो. मुंबईची ओळख म्हणून प्रसिद्ध असणारं हे ठिकाण. १९२४ साली ह्याचे बांधकाम पूर्ण झाले. संपूर्ण बेसॉल्ट खडकात बांधलेली ही इमारत ८५ फूट उंच असून किंग जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी ह्यांच्य्या भेटीची आठवण म्हणून बांधल्याचे ह्यावर असलेल्या शिलालेखांतून स्पष्ट होते. इंडो- सरसेनिक शैलीचे बांधकाम, समोर अथांग अरेबियन समुद्र, काठाला झुलणाऱ्या लहान मोठ्या होड्या बघत आम्ही बराच वेळ तिथे थांबलो.

थोडं पुढे कोलाबा कॉजवे ला मनसोक्त खरेदी करून घेतली. फोर्ट भागात फिरण्याचा कधीही कंटाळा येत नाही, ह्याची प्रचिती प्रत्त्येक वेळी होते तशी आताही झालीच. दिवस ओसरला तसे आम्ही पुन्हा CST स्टेशनला आलो. हेरिटेज वॉक/ टूर संपली. आता परत ही वास्तू डोळ्यात साठवून निघायची वेळ झाली. पळत पळत ट्रेन न पकडता परत आलो असतो तर जणू पाप लागलं असतं त्यामुळे तेही करून झालं.

मुंबईत फिरण्यासाठीच्या बऱ्याच जागा आहेत आणि त्यासाठी असे हेरिटेज वॉक्सही बऱ्याच कंपन्या अरेंज करतात. वाळकेश्वर, बाणगंगा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तारापोरवाला मत्सालय, क्रॉफर्ड मार्केट,भुलेश्वर मार्केट, नेहरू तारांगण, एलिफन्टा लेणी या आणि अशा अनेक जागांना भेट देऊ शकतो. संध्याकाळी मरिन ड्राइव्ह वर मावळता सूर्य बघणे किंवा रात्री खूप उशिरा सुद्धा तिथे नुसतं बसून समुद्र आणि रात्रीची मुंबई बघणे हे अनुभव निव्वळ वर्णन न करता फक्त अनुभवावेच असे आहेत. गजबजाटा सोबत आयुष्य जगायला शिकवणारी मुंबई प्रत्येकाला आपलंसं करतेच आणि खऱ्या अर्थाने भरभरून आयुष्य जागायलाही शिकवते हे नक्कीच! कोणीतरी म्हंटलंच आहे ना,

ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ
ज़रा हट के, ज़रा बच के
ये है Bombay मेरी जाँ...!

1. एशियाटिक सोसायटी लायब्ररी
WhatsApp Image 2023-01-02 at 11.01.35 AM.jpeg

2. हॉर्निमन सर्कल
१.
WhatsApp Image 2023-01-02 at 11.01.34 AM (1).jpeg

२.
WhatsApp Image 2023-01-02 at 11.01.35 AM (1).jpeg

3. बँक स्ट्रीट, हॉर्निमन सर्कल

WhatsApp Image 2023-01-02 at 11.01.34 AM.jpeg

4. लहान गल्ल्या, बँक स्ट्रीट

WhatsApp Image 2023-01-02 at 11.01.32 AM.jpeg

5. केनेसेथ अलियाहु सिनॅगॉग

१.
WhatsApp Image 2023-01-02 at 11.01.32 AM (1).jpeg

२.
WhatsApp Image 2023-01-02 at 11.01.33 AM.jpeg

6. बेकहाऊस कॅफे, काळाघोडा

१.
WhatsApp Image 2023-01-02 at 11.01.31 AM (2).jpeg

२.
WhatsApp Image 2023-01-02 at 11.01.31 AM (1).jpeg

7. काळाघोडा शिल्प

१.
WhatsApp Image 2023-01-02 at 11.01.30 AM.jpeg

२.
WhatsApp Image 2023-01-02 at 11.01.30 AM (1).jpeg

8. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय

१.
WhatsApp Image 2023-01-02 at 11.01.29 AM (1).jpeg
२.
WhatsApp Image 2023-01-02 at 11.01.29 AM (2).jpeg

३.
WhatsApp Image 2023-01-02 at 11.30.27 AM.jpeg

9. Kalaghoda-lanes resembling Fountainhas, Goa

१.
WhatsApp Image 2023-01-02 at 11.01.33 AM (1).jpeg
२.
WhatsApp Image 2023-01-02 at 11.01.30 AM (2).jpeg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Aho mafi kai lagta, tumhi jevha mumbait alat tya weli unfortunately traffic madhe adaklat, ani he agdich usual ahe sadhya, fakta mumbaicu nahi tar saglikadech. Pan baryachwela sundays la mumbait nivanta fir ta yeta, specially town side. Roj che chakarmane naslyamule kadachit. Please mafi vagre naka mhanu aho!

मुंबईचं जियो वर्ल्ड ट्रेड सेंटर हे सुद्धा फारच झगमगीत , चकचकीत इ.इ. आहे. फोटोच पाहिलेत.

गेल्या मार्चमध्ये मुंबईचे तेव्हाचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी संडे स्ट्रीट्स हा उपक्रम सुरू केला होता. मुंबईतले सहा रस्ते रविवारच्या सकाळचे चार तास वाहतुकीला पूर्णपणे किंवा अंशतः बंद करून नागरिकांनी तिथे योग, सायकलिंग, स्केटिंग, संगीताचे कार्यक्रम इ. करावेत अशी कल्पना होती. उपक्रमा खालील रस्त्यांची संख्याही वाढवण्यात आली होती. मात्र ते आयुक्त गेल्यावर तो उपक्रम चालू आहे का त्याची कल्पना नाही.

वेगवेगळ्या भागांतले आहेत. मरिन ड्राइव्ह आहे. आमच्या शेजारच्या प्रभागातही स्थानिक नगरसेवकाने पुढाकार घेऊन एका रस्त्यावर रविवार साजरा केला होता.

जियो वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये २ - ३ exhibitions ला गेलो आहे, हो झकपक आहे फार लॅव्हिश आहे, पण का कुणास ठाऊक बी के सी मध्ये मन कधी रमत नाही, फार रक रक वाटतं, त्या पेक्षा नेस्को बरं वाटतं, तिथे ही फार ट्राफिक असतं, पण आता सवय झाली आहे.

जियो वर्ल्ड ट्रेड सेंटर मधला लिफ्ट (एलिव्हेटर) चं काही तरी रेकॉर्ड आहे, It has a capacity of carrying more than 200 people at a time. It’s the worlds largest elevator.

गेल्या मार्चमध्ये मुंबईचे तेव्हाचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी संडे स्ट्रीट्स हा उपक्रम सुरू केला होता. मुंबईतले सहा रस्ते रविवारच्या सकाळचे चार तास वाहतुकीला पूर्णपणे किंवा अंशतः बंद करून नागरिकांनी तिथे योग, सायकलिंग, स्केटिंग, संगीताचे कार्यक्रम इ. करावेत अशी कल्पना होती.<<<< हो हे मी बघितलंय (२०१४ / २०१५ मध्ये), ईट वॉस फन . वांद्रा च्या एस व्ही रोड ला, लिंकिंग रोड ला वळायच्या आधी.

sundays la mumbait nivanta fir ta yeta,

पण बऱ्याच कचेऱ्या बंद असतात. त्यापेक्षा मुंबईत शनिवारीच भटकावे. अगदी ओसाड नाही आणि गर्दी नाही. खाण्याच्या टपऱ्यांवर दुपारी एक ते दोन झुंबड असते पण ती वेळ टाळून निवांत खाता येतं. शाळा कॉलेजे सुरू असतात. जिवंतपणा असतो.

छान लेख आणी सुंलर छायाचित्रे ‌‌. 'बघणीय' हा लेखातुन व 'विकांत' हा प्रतिक्रियेतुन माझ्य मराठी शब्दकोशात भर झाली , धन्यवाद.

Pages