लष्कराच्या भाकऱ्या(२) : जागरूक वाचक मंच

Submitted by कुमार१ on 1 January, 2023 - 20:22

भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.

नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.

शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

… हस्तलिखिताचे डायरेक्ट ocr …

मग ते “ हस्तलिखित” काय असेल कल्पना करवत नाही Lol
एकदा एडिटायचे तरी किमान !

थोडे तरी चांगला चांगले फेट्टन ध्यायचे ना ?

Lol

महान
आर्यन बॅटरी काय..
अचकूता काय Lol

किचन टीप्स भयंकर आहेत. चविष्ट हा शब्द च विष्ट अस निदान किचन टिप्स च्या पानावर तरी तोडू नकात रे बाबानो !

अचकूता Rofl
बॅटरीचा साठा _/\_ Lol

शिवाय ते आर्यन काय आहे? राज आर्यन की कार्तिक आर्यन? Wink का थेट आर्यांबद्दलच आहे म्हणायचं? Proud

बरणी >> खरंय
.. ..
पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत संबंधित सर्व पाट्यांवर
" गॅस दाहिणी " असे लिहिले आहे.
इथे न चा ण करायची काय आवश्यकता होती ?

(दाहन >>> दाहिनी )

बटणी, वरणी >>> Lol दोन प्रयत्नांनंतर तिसर्‍या प्रयत्नात मात्र यश आलेलं दिसतंय त्यांना

सुटसुटीत पोह्यांची कृती नक्की कसली आहे? Lol कोरड्या पोह्यांवरच प्रयोग चाललेत का सगळे?

>>> इथे न चा ण करायची काय आवश्यकता होती ?

ण चा न करणाऱ्यांवर टीका करणाऱ्यांवर उगवलेला सूड आहे तो!

एवढे कांदे चिरले की चिरणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यातील पाणी त्यात पडते, त्यामुळे पाणी घालण्याची आवश्यकता नाही.

लोकसत्ता ॲपवर पुण्यात खड्ड्यात पडलेल्या ट्रॅकची बातमी आली आहे. त्यातील शेवटची ओळ.

अखेर, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या अधिकाऱ्यांनी या खड्ड्याची पाहणी केली आणि सांगितले, की या संदर्भात अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे तोवर खड्ड्याची जागा बंदिस्त आणि तेथे जाण्यास प्रतिबंध! हे सगळे सुरू असताना शनिवारी दिवसभरात अनेक पुणेकर येऊन खड्डा पाहून गेले आणि त्यांनी आश्चर्याने तोंडे बोटात घातली, ते वेगळेच!

Pages