
सध्या ChatGPT चा बराच बोलबाला आहे. हे खूप मोठ्या माहितीस्त्रोतावर प्रशिक्षण दिलेले कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मॉडेल आहे. याची बुद्धिमत्ता खरेच वाखाणण्याजोगी आहे. म्हणून तर सध्या ते फार चर्चेत आहे. ज्यांची उत्तरे वर्णनात्मक आहेत किंवा ज्या समस्या सोडवायला अनेक पायऱ्या (steps) असतात अशा प्रश्नांची उत्तरे सुद्धा तो देतो. संगणकाचे अल्गोरिदम लिहिण्यापासून कविता करण्यापर्यंत अनेकविध प्रश्न आपण त्याला विचारू शकतो आणि त्याची तो उत्तरे देतो. अनेकांनी आजवर असे प्रश्न त्याला विचारलेलेही आहेत. जसे कि रजेचा अर्ज कसा लिहावा, मूळ संख्या (primary numbers) शोधण्यासाठीचा अल्गोरिदम लिहून दे, तुला या xyz नेत्याविषयी काय माहिती आहे, मानवी ह्र्दय कसे काम करते ते सांग इत्यादी. हे विस्मयचकित करणारे आहे.
आता तुम्ही म्हणाल गुगल केल्याने या प्रश्नांची उत्तरे मिळतात. पण हे गुगल चे सर्च इंजिन नव्हे कि जे इन्टरनेट शोधून त्याधारे माहिती पुरवते. हा प्रशिक्षित यंत्रमानव आहे. त्याला इंटरनेटचा एक्सेस नाही. जी माहिती त्याला देऊन प्रशिक्षित केले आहे त्या आधारे तो एखाद्या मानवाने उत्तर दावे तसे उत्तर देतो ही त्याची खासियत आहे. येणाऱ्या काळात माहिती तंत्रज्ञान कोणत्या दिशेने जाणार आहे याची ही चुणूक आहे. इच्छुकांनी अवश्य लाभ घ्यावा 
मी अनेक प्रश्न विचारत असतो त्याला.
उदाहरणार्थ:
हा एक प्रश्न आणि त्याचे त्याने दिलेले उत्तर (अर्थात, हे क्रोम मधून मराठी भाषांतर केलेले आहे. ChatGPT ला अजून मराठी तितकेसे कळत नसल्याने मूळ प्रश्नोत्तर इंग्लिशमध्ये होते):
मर्यादा:
१. जसे वर उल्लेख केलाय कि याला इंटरनेटचा एक्सेस नाही. त्यामुळे चालू घडामोडींवर तो उत्तरे देऊ शकणार नाही (जसे कि आता यानंतरची मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारी फ्लाईट कधी व कोणती आहे? या प्रश्नाचे उत्तर तो देऊ शकणार नाही)
२. त्याला अजून मराठी कळत नाही. त्याचे प्रशिक्षण मुख्यत्वे इंग्लिशमध्ये झाले असल्याने तुम्ही जर त्याला मराठीत माही विचारले तर एक तर तो काहीतरी गमतीशीर उत्तर देईल किंवा मला प्रश्न समजला नाही म्हणून सांगेल.
३. हा खूप मोठ्या माहितीवर प्रशिक्षित यंत्रमानव असल्याने जसे मानवाकडून उत्तर देण्यात चुका होतात तशा याच्याकरवी सुद्धा होऊ शकतात
पण म्हणून लगेच 'मग काय उपयोग?' असे वाटून घेऊ नका. तो शिकतोय आणि तुमची उत्तरे देता देता स्वत:ला प्रशिक्षित सुद्धा करतोय. उत्तर पडताळून पहा (नेटचा वापर करून वगैरे) आणि काही चूक असल्यास तसं अभिप्राय त्याला दया

फारेंड बेसिक रिसर्च टाकाऊ
फारेंड बेसिक रिसर्च टाकाऊ नक्कीच नाही. म्हणूनच मी एकदम चपापलो. Drafts बद्दल उद्या बघून सांगतो.
function at() {
function at() {
[native code]
}उल (हे नाव नीट टंकता येत नाही हा प्रॉब्लेम आहे. चॅटजिपिटीला विचारायला हवं. अतुल.) आणि फारएण्डशी सहमत.
एखादं स्किल आपण कष्टाने कमवलं आहे असं असलं तरी ते सार्वकालिक नाही. कधी ना कधी जुने स्किल्स निकालात निघणार आणि नवीन स्किल्स येणार. बदलांनुसार अपडेट होत राहणे याला पर्याय नाही. पूर्वी आपण मोठ्या कष्टाने पाढे पाठ करायचो, एकोणतीस साता किती हे पटकन सांगितलं तर पाठीवर शाबासकीची थाप पडायची आणि आपल्याला जग जिंकल्याचा आनंद व्हायचा. पण म्हणून कॅल्क्युलेटर्स आल्यावर काही जगबुडी झाली नाही. पाढे पाठ करणे हे स्किल निकामी झालं आणि गणनयंत्रे वापरता येणं हे नवीन स्किल अस्तित्वात आलं. तसंच हे आहे. चांगलं लिहिता येणं हे स्किल आहे, पण 'चांगलं' कशाला म्हणायचं या बाबतीत निदान हपिसातील कामाचे कागद, पत्रे वगैरे यांबाबतीत ठोकताळे असतील तर ते स्किल शिकण्यात वेळ घालवायची आता गरज उरणार नाही. त्यापेक्षा डोकं कितीतरी अन्य विषयांवर खर्ची घालता येईल.
जे स्किल्स व्यक्तिसापेक्ष वेगवेगळे फ्लेवर्स घेऊन येतात, उदा. कविता / ललित लेखन (चॅटजिपिटीच्या कविता या मजेशीर आहेत, पण त्यात तो फ्लेवर येत नाही), रिसर्च लिटरेचर वाचून त्यातून नेमका अर्थबोध घेणे आणि इतर पब्लिकला सोप्या शब्दात समजाऊन सांगणे, कायद्याचा अभ्यास करून किचकट आणि परस्परविरोधी कायद्यांचा अर्थ लावणे इत्यादी कामांना ठोकताळे नाहीत. त्यामुळे ही जुनी स्किल्स रिप्लेस होणार नाहीत.
एवढं सगळं म्हणतोय खरं, पण अजूनही आपल्याकडे गटार साफ करणारी मशीन्स उपलब्ध असूनही माणसांना त्यात उतरून साफ करायचा जॉब करावा लागतोय ही आपली नामुष्की आहे. काळानुसार वरिष्ठांनी/जॉब देणार्यांनी बदलत राहिलं नाही तर काही ठिकाणी ते असं अन्याय्य वर्तन म्हणून गणलं जाऊ शकेल.
एआय अमेझिंग आहे हे तर मान्यच.
एआय अमेझिंग आहे हे तर मान्यच. पण तरीही निर्णयक्षमता (योग्यवेळी, योग्य जागी आणि नेमका) हे त्याला अचूकपणे जमणार नाहीये. दुसरं म्हणजे फिनेस यायला वेळही लागेल. वरच्या उदाहरणात जसं दिलंय की बेसिक ड्राफ्ट, पॉवरपॉएंट इ. तो देइलच पण पुढे ते कुणा हूमनलाच करायला लागेल. अगदी कितीही डिटेलवार इन्सट्रक्शन्स दिल्यात तरीही. अन प्रूफरीड तर करयलाच लगेल ना, कुठल्याही फॉर्म मध्ये डॉक असेल तरीही !
चाट GPT वापरून जर एखाद्या
चाट GPT वापरून जर एखाद्या संशोधन प्रकाशित केले तर त्याचे श्रेय नामावलीत नाव द्यावे लागेल ना?..अन्यथा ते वाङ्मयचौर्य नाही का होणार?
एआय खरच हुषार आहे. केवळ हाच
एआय खरच हुषार आहे. केवळ हाच धागा अनुक्रमणिकेत डबल दिसतो
(No subject)
चाट GPT वापरून जर एखाद्या
चाट GPT वापरून जर एखाद्या संशोधन प्रकाशित केले तर त्याचे श्रेय नामावलीत नाव द्यावे लागेल ना?..अन्यथा ते वाङ्मयचोर्य नाही का होणार? >> होय. काही संशोधन प्रकाशने आता अश्या chatbots ची मदत घ्यायला परवानगी देत आहेत (अर्थातच श्रेय देऊन), तर काहींनी अजिबात चालणार नाही असं म्हटलं आहे.
काही विद्यापीठात शिक्षक assignments देताना एक assignment chatbot वापरून आणि एक न वापरता सोडवा - असे प्रश्न टाकत आहेत. Chatbot वापरता येणे ही आता काळाची गरज असणार आहे.
>> "एआय तुमचा जॉब घेणार नाही.
>> "एआय तुमचा जॉब घेणार नाही. पण एआय वापरणारे घेतील"
हे सुद्धा थोड्या काळासाठी सुरू राहील. कारण मुळात "जॉब" म्हणजे आपले कौशल्य वापरून सेवा देणे. सगळीच कौशल्ये उद्या जर एआय ने रिप्लेस केली (भावनिक सुद्धा) तर माणसाला माणसाच्या कोणत्याही सर्विस ची गरज पडणार नाही (?)
अगदी अगदी 100% सहमत.
काही संशोधन प्रकाशने आता
काही संशोधन प्रकाशने आता अश्या chatbots ची मदत घ्यायला परवानगी देत आहेत (अर्थातच श्रेय देऊन), तर काहींनी अजिबात चालणार नाही असं म्हटलं आहे.))))
समजा, एखादे प्रकाशन किंवा विद्यापीठाने chat bot वापरसंदर्भात असा कोणताही निकष ठेवला नसेल (म्हणजे वापरा/वापरू नका/श्रेय द्या/ देऊ नका) आणि वापरकर्त्याने संशोधनातील एखादा अहवाल, प्रकरण, किंवा निष्कर्ष chatbot वापरून तयार केला तर ते कसे ओळखणार.
आपण नव्याने निर्माण किंवा प्रोसेस करून वापरकर्त्याला दिलेल्या माहितीचे रेकॉर्ड chat bot ठेवतो का ?
म्हणजे समजा अ ने एखादा निबंध chatbot वापरून लिहिला तर तोच निबंध जसाच्या तसा ब ला chatbot कडून उपलब्ध होईल का? किंवा तो अ ने chatbot कडून घेतला आहे याचे पुरावे सापडतील का ?
तसं ओळखणे कठीण आहे. एखाद्या
तसं ओळखणे कठीण आहे. एखाद्या विद्यार्थ्याच्या गुणांमध्ये अचानक वाढ दिसली तर त्याची समोरासमोर परीक्षा घेणे किंवा त्याने सोडवलेलाच एखादा प्रश्न आपल्यासमोर पुन्हा सोडवायला सांगणे हे करता येईल आणि मग पितळ उघडं पडेल. पण गुणांमध्ये फार काही फरक पडला नसेल तर सांगता येणार नाही.
शोधनिबंध लिहिणे सध्या तरी chatbot ला एकहाती शक्य नाही. मी काही तसे लिहिलेले निबंध पाहिले, ते फारच बाळबोध किंवा विकी दर्जाचे होते. योग्य संदर्भ शोधून काढणे आणि त्याचा योग्य तो अर्थ लावणे - हे अजूनतरी माणूस जास्त चांगलं करू शकतो. पण यापुढे लिहिणे ही कला संशोधकाला आवश्यक राहणार नाही. कित्येक संशोधक हे चांगले शास्त्रज्ञ असून त्यांना चांगलं लिहिता येत नाही म्हणून मागे पडतात. त्यांचं संशोधन प्रसिद्ध व्हायला या chatbots ची मदत होईल. त्या अर्थी हे जास्त डेमॉक्रॅटिक टूल आहे.
त्यांचं संशोधन प्रसिद्ध
त्यांचं संशोधन प्रसिद्ध व्हायला या chatbots ची मदत होईल. त्या अर्थी हे जास्त डेमॉक्रॅटिक टूल आहे. ))))
खरंय हपा..
असा फरक आहे:
असा फरक आहे:
१. साधी यंत्रे: एकच काम करणारे. यांना सूचना वगैरे देता येत नव्हत्या.
२. संगणक: विविध सूचना देऊन विविध कामे करणारे. पण शिकण्याची क्षमता नव्हती.
३. कृत्रिम बुद्धिमत्ता: शिकवल्या नंतर त्यानुसार योग्य त्या सूचना निर्माण करून (किंवा आधीच्या सुचनांमध्ये योग्य ते बदल करून) काम करणे.
ChatGPT हा सध्या सप्टेबर २०२१ च्या नॉलेजवर सुरु आहे. पण स्वत:हून शिकणारे बॉट सुद्धा आहेत.
महिन्याभरापूर्वी बिजनेस इनसाईडर मध्ये जो लेख प्रकाशित झालाय त्यानुसार काही जॉब धोक्यात येऊ शकतात.
>> chatbots वापरून संशोधन... हे जास्त डेमॉक्रॅटिक टूल आहे.
सहमत आहे.
>> गटार साफ करणारी मशीन्स उपलब्ध असूनही माणसांना त्यात उतरून साफ करायचा जॉब करावा लागतोय
होय, दुर्दैवाने हे खरे आहे. Social aspects.
>> हाच धागा अनुक्रमणिकेत डबल दिसतो
एकाहून अधिक ग्रुप्समध्ये (तंत्र आणि मंत्र, विज्ञान, गुलमोहर - ललितलेखन, संगणक) असल्यामुळे दिसतो
अतुल, चाट जीपीटी।ने केलेली
अतुल, चाट जीपीटी।ने केलेली कविता हहपुवा आहे.मला उगीच तो जुन्या मराठी सिनेमात अशोक सराफ 'प्रोफेसर धोंडं' असतो त्याने कविता केली तर अशी असेल असं वाटलं.
काही ठिकाणी चाट जीपीटी ने भांग प्यायलीय किंवा नशापाणी केलंय असंही वाटतंय.
Chat Gpt वापरून तयार केलेला
Chat Gpt वापरून तयार केलेला शोध निबंध Turnitin या
वाङ्मयचौर्य शोधणाऱ्या सॉफ्टवेअर मध्ये पकडला जातो.
>> चाट जीपीटी।ने केलेली
>> चाट जीपीटी।ने केलेली कविता हहपुवा
>> Turnitin या वाङ्मयचौर्य शोधणाऱ्या सॉफ्टवेअर
Interesting!!
फारेंड मी ते ड्राफ्ट बघितले.
फारेंड मी ते ड्राफ्ट बघितले. जुजबी पार्श्वभूमी द्यावी लागते आणि ड्राफ्ट मिळतो अगदी प्रेयर सकट. त्याला अजून एक थोडा किचकट arbitration वरचा प्रश्न विचारला होता (related to different locations of seat and venue) त्यावर पण चांगले उत्तर दिले
थँक्स लंपन
थँक्स लंपन
हे पहा बरं- https://chat
हे पहा बरं- https://chat.openai.com/share/a368ba29-a424-4a4c-9db0-7d2d09c8cece
सो, मराठी तरी ठीकच आहे...
एक नंबर योकु. तुमचा प्रतिसाद
एक नंबर योकु. तुमचा प्रतिसाद इथे आणखी भर घालेल. (रिक्षा आहे, पण डायवर तिथलाच आहे)
>> शिव्या म्हणजे रामरक्षा
>> शिव्या म्हणजे रामरक्षा स्तोत्र, शिव तांडव स्तोत्र, शिव पंचाक्षर स्तोत्र, आदी
अरे बापरे! पळा पळा पळा

अरेरे बिचारं नवाशिकं बाळ ते!!
अरेरे बिचारं नवशिकं बाळ ते!! अळू धुवून त्यात लाल रंग घालायला सांगतंय.त्याला तिखट म्हणायचंय का?
नम्रपणा आवडला.
ते रायटेल वाचून किती डोक
ते रायटेल वाचून किती डोक खाजवलं मी.
@अतुल
@अतुल
मी आज हा धागा उघडला. आणि ट्वीन पॅॅराडॉक्सवर अडखळलो. नाही समजलंं आणि नाही पटलंं. आता नेटवर जाऊन बघतो. रिक्वेस्ट तुम्ही पण बघा.
On second thought I think you are pulling chatGPT Legs.
आता माझ्या बालबुद्धीला जे
आता माझ्या बालबुद्धीला जे समजले ते लिहितो.
आपण जे "गैरसमज" म्हणता ते गैरसमज नसून करेक्टसमज आहेत.
chatGPT जे लिहितोय ती "twin paradox"ची व्याख्या आहे. ह्या paradoxचे सिम्प्लीफाईड resolution नेटवर मिळेल.
का तुम्ही हे टंग-इन-चिक लिहिले आहे? I am totally confused.
@केशवकूल, नाही हो ते
@केशवकूल, नाही हो ते स्पष्टीकरण बरोबर आणि तर्कसंगत आहे. जोवर गती भिन्न असते तोवर ते दोघे वेगळ्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये असतात त्यामुळे सापेक्षतेच्या सिद्धांतानुसार time dilation भिन्न असते (जशी गती भिन्न असते). त्यामुळे ते दोघे एकमेकांना स्वत:पेक्षा तरुण दिसतात. याठिकाणी वरकरणी "दोघेही एकमेकाला स्वत:पेक्षा तरुण कसे दिसतील" असे वाटल्याने तो paradox वाटतो. पण ते जसे एकमेकांना स्वत:पेक्षा वेगवान दिसतात. तत्व तेच. इथे फक्त 'वेग' ऐवजी 'वेळ' आहे इतकेच. हे आपण लक्षात घेतो तेंव्हा हा परिणाम खरेतर paradox नाही हे ध्यानात येते.
जेंव्हा त्यांची गती एकच असते/होते तेंव्हा त्यांच्यात time dilation उरण्याचे कारण नाही कारण गती एकच असल्याने आता ते एकाच फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये येतात. गती कमी/जास्त होताना त्वरण आल्याचे बरेचदा ध्यानात घेतले जात नाही म्हणून तो paradox वाटतो. विकिपीडियावर सुद्धा त्वरणाच्या सहायाने याचे स्पष्टीकरण दिलेले आहे:
https://en.wikipedia.org/wiki/Twin_paradox
खरे तर काळ, अवकाश, सापेक्षता, पूंजभौतिकी या व्यापक विषयावर खूप छान चर्चा करण्यासारखे आहे. तुम्ही, अस्मिता व अजूनही काही सदस्य आहेत. आपण सारे विविध अंगांनी चर्चा करू शकतो. मध्यंतरी "अवकाशाशी जडले नाते" असा एक धागा सुरु करायचे घातले होते पण ते राहूनच गेले.
ह्या वरच्या पोस्ट बद्दल मला
,,,,
Chat GPT: विचारा तर खरं. Bard
Chat GPT: विचारा तर खरं. Bard आणि Bing यांना विचारलं का? विचारा तर खरं?
अरे वाह! गुगल आणि
अरे वाह! गुगल आणि मायक्रोसॉफ्ट सुद्धा आले का यात? हे अपेक्षित होते. इंटरेस्टिंग! आताच दोन्ही ट्राय केले पट्कन. मायक्रोसॉफ्टने तर चित्रं काढणारा रोबोट सुद्धा त्यातवंग इंटिग्रेट केलेला दिसतोय (?) अजून खोलात नाही गेलो पण खूपच रोचक. शेअर केल्याबद्दल धन्यवाद Revati1980

रेवती १९८० यांनी सांगितलेले
रेवती १९८० यांनी सांगितलेले खरे आहे. Turnitin सॉफ्टवेअर हे सारे पकडते, त्यामुळे मी माझ्या रिसर्च scholors ना हे आधीच चालणार नाही असे सांगितले आहे.
लवकरच सर्व उच्च शिक्षण
लवकरच सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये हा नियम येईल किंवा यावा असे वाटते.
Pages