चित्रपट कसा वाटला - ७

Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15

आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

तिसरा जॉन विक्क हा तीनी पैकी सगळ्यात कमी आवडला होता. पहिला सगळ्यात भारी.दुसरा तिसरा दोन्ही इतके खास नाही वाटले.

पहिल्यात जॉन चे मोटिव खूप भारी होते. की सगळे गमावलेल्या माणसाला उगाच डिवचले की काय होते बघा. आणि जॉन बद्दल क्रिमिनल जगात जे भिती आणि आदरयुक्त वलय दाखवले आहे ते सुध्दा छान लिहिले होते. खासकरून चोरीच्या गाड्यांचा डिलर जेव्हा थिऑन ग्रेजॉयला थप्पड लगावतो आणि बापाला फोनवर इतकेच सांगतो "well he stole John Wick's car sir, and killed his dog" आणि बाप नुसत "oh" म्हणून समजून फोन ठेवतो, तो सीन खूपच आवडलेला आणि मस्त लिहिलेला.

पुढच्या सिनेमात ती जादू नाही. पण चौथा सिनेमा बघणार आहे.

Finding You
नेटफ्लीक्स, इंग्लिश

कंटाळा आला म्हणून नेटफ्लिक्स शोधत होतो. काहीच खास सापडलं नाही तेंव्हा नवीन रिलीज मध्ये हा सिनेमा सापडला. रोमँटीक या कॅटेगरीत आहे म्हणजे डोक्याला कसली तसदी नाही, सलग बघायची गरज नाही या हिशेबाने बघायला सुरुवात केली. पण अचानक काहीतरी चांगले बघायला मिळाले.

रॉमकॉम म्हणून बघितला तर काहीच खास नाहीये. पण काही काही सिनेमांची नावं शेक्स्पिअरशी उभा दावा मांडतात - खूप काही सांगतात ती! नावाचा धागा पकडून सिनेमा बघायला सुरुवात केली आणि सिनेमा खूपच आवडला.

संगीतात काही करु पाहणारी पण मेहनत करुनही ते आत्मसात न करु शकणारी नायिका आणि प्रथितयश, श्रीमंत नायक! दोघांचेही ग्लास अर्धे भरलेले. एकमेकांना जाणून घेतानाच त्यांना आपल्या भरलेल्या ग्लासात काय आहे आणि काय नाही याचा उलगडा होत जातो. आपल्याकडे काय आहे पासून आपल्याला नक्की काय हवय ते कळण्यापर्यंतचा प्रवास सिनेमात सुंदर मांडलाय. जे हवंय ते मिळवण्याकरता काही सोडावं लागतं हे पण अलगद उलगडून दाखवलंय. दोन भिन्न व्यक्तिमत्वांनी घेतलेला स्वतःचा शोघ म्हणजे हा सिनेमा. कधी कधी खूप काही देउनही वाट्याला फक्त तिरस्कारच येतो हा ही मुद्दा सिनेमा मांडतो पण अशा काळोख्या आयुष्यालाही सोनेरी क्षण मिळतातच असा सकारात्मक विचारही मांडतो.

नायक आणि नायिका दोघेही माझ्याकरता नविन होते पण दोघांचाही वावर अगदी सहज आणि सुंदर होता. सोबत आयर्लंडचा निसर्ग, तिथली ती प्रसिध्द क्लिफ, बघत राहवी अशी घरे आहेत. ग्लॅमर फार कमी आहे म्हणून जे काही सांगायचंय ते आपल्यापर्यंत पोहचते.

एका रिसॉर्ट मध्ये गेलो तेव्हा तिथल्या netflix मध्ये ( ज्या कोणाचं लॉगिन असेल ) नजर अंदाज नावाचा सिनेमा दिसला.
इतर काही बघायला नसल्याने बघायला घेतला तर छान वाटला. एका आंधळ्या माणसाची स्टोरी साधी आणि सोपी आहे काही लॉजिक नसलेल्या गोष्टी आहेत. पण हलकेफुलके विनोद छान आहेत. लिड रोल केलेल्या कुमुद मिश्रा चं काम अप्रतिम आहे, तो खरोखरच आंधळा वाटतो. तो कोण आहे हे आधी ओळखताच आलं नाही इतका तो ,आंधळा सुधीर भाई वाटतो.
गुगल वर शोधून बघावं लागलं आणि लक्षात आलं की याला इतर मूव्ही मध्ये पाहिलं आहे.

एकदा बघायला खरंच छान आहे .
सध्या अचानक गुजराती कल्चर, खाद्य पदार्थ बॅकग्राऊंडला दिसणारे सिनेमे दिसायला लागलेत असं वाटलं ( यात पण आहे)

गॅसलाईट: (प्रेडिक्टेबल) मिस्ट्री आहे. मिस्ट्री उलगडल्यावर अनेक भाग फिट बसत नाहीत>>>+१
चित्रांगदा आणि विक्रांत च्या अभिनया मुळे बघवला. सारा ला काडी चा ही अभिनय येत नाही. संवाद्फेक ठीक आहे.

स्पॉइलर....
.
.
.
.
.
.
.
.
.

स्वतःची सावत्र मुलगी कशी दिसते हे ही त्या माते ला माहित नसते.. काय च्या काय दाखवलेय!

नेफिवर A man called otto बघितला !
टॉम हँक्स ने पुन्हा एकदा अख्खा सिनेमा ओढला आहे .
टॉम ने सर्किट म्हाताऱ्याचा रोल छान केला आहे .
दोन महिन्यांपूर्वी त्याच्या बायकोचे निधन झालेले असते , आयुष्यात जगण्यासाठी असे काहीही राहिलेले नाही .
मग व्हीं आर एस घेतो , घरी फाशी घेवून आत्महत्या करणार तेव्हड्यात शेजारी राहायला आलेल्या भाडेकरू गाडी नीट पार्क करता येत नाही म्हणून टॉम फाशी घ्यायचा प्रोग्रॅम पुढे ढकलून शेजाऱ्याला गाडी लावण्यात मदत करतो .
एक दोन असेच प्रसंग भरले आहेत .
आजू बाजूच्याना इच्छा नसताना मदत करण्यामुळे त्याचे आणि शेजारच्याचे ऋणानुबंध जुळण्याचे प्रसंग छान खुलवले आहेत . निराश करणार नाही , वेळ वाया जाणार नाही असा हा सिनेमा .
हलके फुलके प्रसंग छान विणले आहेत ...

नेफिवर A man called otto बघितला !
टॉम हँक्स ने पुन्हा एकदा अख्खा सिनेमा ओढला आहे .>> अगदी
प्रचंड आवडलाय हा सिनेमा

नेफिवर A man called otto बघितला !
टॉम हँक्स ने पुन्हा एकदा अख्खा सिनेमा ओढला आहे .>> अगदीच
खूप आवडला.
ती नवीन शेजारीण मारी पण मस्त आहे एकदम.
तरुणपणीचा otto टॉम हँक्स चा मुलगा आहे.

आला का नेफिवर? तो दिसत नव्हता म्हणून मूळ सिनेमा A man called Ove पाहिला होता. छान आहे तो सिनेमा.

प्राईमवर Ticket to Paradise (2022 film) पाहिला. फॅमिली ड्रामा. आवडला. लोकेशन- बाली.. एकदम सुंदर आहे.

प्रेमासाठी झुकले खाली धरणीवर आकाश ना? >>> हाहाहा. हा चक्क मी थेटरात पाहिलेला. तो ठोकळा हीरो, का आले पैसे खर्च करून वाटलेलं. अगदी कमी वेळा थेटरात जाऊन पिक्चर बघणारी मी.

A man called atto तर rent वर दिसत आहे. 249 rent आहे. तुम्ही लोकांनी पैसे भरून पाहिला काय?

Realms प्राईमवर आहे. बँकॉकमधे कथानक घडते. पहायला सुरू केल्यावर समजले हॉरर आहे. बँक डकैती करून ओलिस ठेवलेल्या मुलींसहीत पळून जाताना ते चार जण एका निर्जन जंगलात एका हवेलीत पोहोचतात. इथे उत्सुकता होती पुढे पहायची, पण ओलीस ठेवलेल्या निरपराध मुलीच्या बाबतीत दरोडेखोर असलेली मुलगी ज्या क्रूरपणे हिंसा करते त्यामुळे पुढे पहायची इच्छाच मेली.

गंमत म्हणजे त्यानंतर थलाईवा मधे हिंसा असूनही पूर्ण पाहिला. Lol
दक्षिणेच्या काही आया मुलांना व्हॅनेडियम, कार्बन आणि आयर्न खाऊ घालतात. मॉलिब्डेनमचा रस प्यायला देतात. त्यामुळे त्यांची टोटल (Tensile, Compressive, Shear, Torisonal, आणि Yield ) जगातल्या कोणत्याही स्ट्राँग पोलादापेक्षा हजारपटीने जास्त होते. तसेच त्यांचा हार्डनेस पण हिर्‍यापेक्षा जास्त असतो. फटिग स्ट्रेंग्थ सुद्धा असामान्य असते. त्यामुळेच खडगासारखे हत्यार आरपार होऊनही ते मारामारी करू शकतात. एक शर्ट पोटाच्या जखमेला बांधला कि पुरे असतं. दंडात शस्त्र खुपसले जाणे ही अत्यंत सामान्य बाब असते. म्हणजे एक असे सुपर अलॉईड कॉम्पोझिट स्टील जे कि लवचिक सुद्धा आहे, त्याची रचना सिलिकॉन सारखी सुद्धा आहे आणि त्याच वेळी ते स्ट्रॉंग सुद्धा आहे.

जर या साऊथच्या हिरोंनी देहदान केले तर त्यांच्या शरीरापासून उत्तम लढाऊ फायटर जेट्स बनू शकतील ज्यांच्यावर मिसाईल्सचा काहीही परिणाम होणार नाही. मागच्याच पिढीतले नायक अजून दणकून हाणामारी करत आहेत. त्यांच्या जोडीला या पिढीचे नायक आहेत. थोडी वाट पहावी लागेल. तोपर्यंत आपल्याला राफेल सारखी विमाने विकत घेणे भाग आहे.

तरुणपणीचा otto टॉम हँक्स चा मुलगा आहे. >>> इंटरेस्टिंग !!

हा सिनेमा वॉचलिस्टवर आहेच.
ते पुस्तक फार सुंदर आहे. 'अ मॅन कॉल्ड ऊवे'.

ती नुसती फाईट नाही करणार जेट पण

त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बेंबी दाखवत, काजळ मिश्रित डोळ्यांनी त्यांच्याकडे प्रेमभरे बघणारी लेडीज जेट पण सोबत द्यावी लागतील Happy

तसेच मारामारी आधी डायलॉग मारण्यासाठी एक मेगाफोन

Pages