चित्रपट कसा वाटला - ७

Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15

आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

Everything everywhere all at once! हे नाव आपल्याकडच्या अनेक पिक्चर्स ना खपून जाईल
>>>>> अशक्य हसतेयं. Lol

ब्रिटिश ॲक्सेंटचं काय कौतुक 'डुगना लगान डेना पडेगा' हे खरे ब्रिटिश ॲक्सेंट Proud मला तर आपल्या डिस्पिकेबल मी मधल्या Gru चे ईस्टर्न युरोपियन (?) ॲक्सेंट आवडतात.

'डुगना लगान डेना पडेगा' हे खरे ब्रिटिश ॲक्सेंट >>> Lol
माझे पण गृ आणि त्या फिनियस अँड फर्ब मधला डॉ. डूफिन्श्मर्त्झ हे लयच फेवरेट अ‍ॅक्सेन्ट्स !! Happy

Everything everywhere all at once! हे नाव आपल्याकडच्या अनेक पिक्चर्स ना खपून जाईल >> Lol

एकंदरीत प्रयत्न चांगला होता पण कुठेतरी सगळंच कमी पडलं.> अर्र... बरं जाऊदे मग नाही बघत. याआधी लपाछापीच आवडला होता हॉरर मधे.
हॉरर आणि सस्पेन्स थ्रिलर मधे फरक काय?

याआधी टाईपराईटर पण आवडलेला. तो हॉरर म्हणायचा का सस्पेन्स थ्रिलर माहित नाही.

ओके. मला दोन्ही जॉनर आवडतात असेही.

आधी मला माझं मं गळसूत्र काढून ठेवू दे, असं सांगते. ती ते भिंतीवरच्या खुंटीला टांगते.>>>>>>>>>>>> खरंच अवघड. Lol Lol

कॉमी धन्यवाद. मला वाटले शेवटाला काहीतरी पॉझीटीव्ह घडेल असो..

हॉरर आणि सस्पेन्स थ्रिलर मधे फरक काय?>> हॉरर मधे वेगळ्या जगातल्या व्यक्तींचा वावर्/त्रास असतो. ससपेन्स/थ्रिलर मधे खून, कीडनॅप रहस्यमय घटना ह्यांचे मिक्स असते.
काही चित्रपटात खून + हॉरर मिक्स पण असते..जसे की राज. मला आवडलेला तो त्या काळी Happy

हॉरर आणि थ्रिलर / सस्पेन्स थ्रिलर अशा व्याख्या तर नाहीत.
पण एक अनुभवी Lol प्रेक्षक म्हणून असे वाटते कि हॉरर मधे एखादी राक्षसी अमानवी शक्ती असते जिच्या असण्याबद्दल दिग्दर्शक / प्रेक्षक यांच्या मनात बिलकुल शंका नसते. या शक्तीपासून सुटका किंवा मग तिच्या हातून सर्वांचे मरण हा क्लायमॅक्स असतो.

सस्पेन्स थ्रिलर म्हणजे हॉररच पण त्यात अमानवीय शक्ती आहे कि नाही याबद्दल संदेह असतो. असलेच तर मग त्याची बॅक स्टोरी महत्वाची असते. यात सुद्धा उपजॉनर आहेत. काहींमधे दचकवणारे प्रसंग असतात. काहींमधे अमानवीय शक्तींचा आभास निर्माण करून खलपात्रे आपले कटकारस्थान तडीस नेत असतात. क्लायमॅक्सला या सर्वांचा उलगडा, दुष्टांचा नायनाट इत्यादी असतो.

तर द ओमेन सारख्या चित्रपटात अमानवीय शक्ती असते पण तिच्याबाबतच रहस्य असते. संपूर्ण चित्रपटात अस्वस्थतेचा अनुभव येतो. असे चित्रपट ताण निर्माण करून संथ हाताळणीद्वारे तो वाढवत नेतात. यात भूताचे हिडीस दर्शन यावर जास्त फोकस नसतो.

हॉरर मध्ये अमानवी शक्ती असतेच असे नाही - स्लॅशर मुव्हीज ( सॉ, हॉस्टेल) असे सुद्धा हॉरर आहेतच की ज्यात अमानवी शक्ती नाही.

जुन्या काळातला कब क्यों कहां किंवा तिसरी मंजील हे थ्रिलर / सस्पेन्स आहेत की ज्यात काही हॉरर / भितीदायक नाही फक्त खून कोणी केला हे रहस्य आहे आणि त्यानुसार येणारे धक्के.

निव्वळ रहस्यपट वेगळा. हल्ली हॉरर सस्पेन्स असे न म्हणता थ्रिलर म्हणतात. व्याख्या नाहीच ही.
जॉज, पिर्हाना हे सुद्धा भयपटच आहेत. त्यात सुद्धा अमानवी राक्षसी शक्ती आहे, पण भूत नाही.
https://www.lafilm.edu/blog/subgenres-of-horror-films-explained/

ओमेन कसला रॉयल सिनेमा होता, एकदम राजबिंडा …. खूप भिती वाटली होती लहानपणी.

हॉररमधे वाईट्ट पद्धतीने खून पाडणारे सिनेमे पण येतात की. तसे सिनेमे मी पहातच नाही. (तरी स्क्रीम-६ ला जाईन परवा).

प्राईमवर ‘मॅग्निफिसंट ७‘ आलाय. चांगलाय का? शोलेसारखा दिसतोय.

‘मॅग्निफिसंट ७‘ आलाय. चांगलाय का? शोलेसारखा दिसतोय. >>>
शोले मॅग्निफिसंट ७ चा रीमेक आहे. मॅग्निफिसंट ७ हा सेव्हन सामुराईचा रीमेक.

शोले हा १९६०च्या मॅगनिफिसंट सेव्हनवर बेतला आहे किंवा प्रेरित आहे यात शंकाच नाही. आणि मॅगनिफिसंट सेव्हन हा अकिरा कुरोसावाच्या सेव्हन समुराईवर बेतला आहे. सेव्हन समुराई अफलातून पिक्चर आहे. पाहिला नसल्यास नक्कीच बघा. (शोले पण चांगलाच आहे. त्याचं भारतीयीकरण फार भारी केलं आहे.)

२०१६चा मॅगनिफिसंट सेव्हन हा जुन्या पिक्चरचा रिमेक आहे म्हणे. पाहिला नाहीये, पण आता पाहीन म्हणतो. प्राईमवरचा क्राईमपट.

Everything everywhere all at once! हे नाव आपल्याकडच्या अनेक पिक्चर्स ना खपून जाईल Happy धरमवीर एक आठवला.
>>> Rofl

अमितव, Everything everywhere all at once प्राइमवर आहे हे वाचून लगेच तिकडे धाव घेतली, पण भारतात नाहीये.

सेव्हन समुराई नाही पाहिला. जुना मॅ७ किंवा नवा मॅ७ पण पहायला हरकत नाही आता.
शोले, दणदणीत खणखणीत नाणं आहे.
रघुआ. कसलेकसले सिनेमे पहाता हो? Lol

काल 'लिव्हिंग' हा सिनेमा बघितला. १९५२ सालच्या अकिरा कुरोसावांच्या 'इकिरू' या जपानी सिनेमाचं हे इंग्रजी adaptation आहे. हा चित्रपट गेल्या वर्षीचा आहे.
दुसरं महायुद्ध संपून जास्त काळ न लोटलेलं लंडन. तिथल्या सरकारी खात्यात काम करणारी ठराविक पठडीतली माणसं. त्यांच्यातले एक ज्येष्ठ साहेब म्हणजे मि. विल्यम्स. रोजच्या रोज 'तेच ते' करत राहणारे. सरकारी खात्यांमधली नमुनेदार चालढकल सगळ्यांच्या अंगात मुरलेली. एकंदरीत कंटाळवाणं, चाकोरीबद्ध वातावरण. मि. वेकलिंग नावाचा एक तरूण नव्याने तिथे रुजू होतो आणि त्याच्या नजरेतून आपल्याला ही सगळी पार्श्वभूमी दिसते.
लंडनच्या एका गल्लीतल्या काही स्त्रिया एक मागणी घेऊन या कचेरीत खेटे घालत असतात. त्यांना त्यांच्या परिसरात मुलांना खेळण्यासाठी एक पार्क बनवून हवं असतं. पण ही साधी मागणी किती तरी दिवस सगळ्या खात्यांकडून एकमेकांकडे टोलवली जात असते.
मि. विल्यम्सना एके दिवशी समजतं की आपल्याकडे आता सहाआठ महिन्यांचंच आयुष्य शिल्लक आहे. आणि मग त्यांच्या लक्षात येतं की अरेच्चा.. आपण जगलोच नाही की काय! आपण ठराविक चाकोरीत राहून राहून आयुष्यात मजा घ्यायचीच विसरून गेलो. त्यानंतर ते उरलेलं आयुष्य कारणी लावण्यासाठी जे करतात, किंवा करून पाहतात, ते म्हणजे हा चित्रपट. सगळे संवाद, सगळी दृश्यं कोरून काढल्यासारखी, नेमकी, भिडणारी आहेत. सगळ्यांचे, अगदी बारीकसं काम असणाऱ्यांचेही अभिनय उत्कृष्ट आहेत.

मूळ चित्रपट महायुद्धानंतरच्या जपानमधला. पण इंग्रजी चित्रपट बघताना तो १००% इंग्लिश वाटतो. महायुद्धात जपान आणि इंग्लंड एकमेकांच्या विरुद्ध लढले असले तरी शेवटी माणसांचे स्वभाव-विभाव सारखेच.
आपल्या आयुष्याचीच असं नाही, सगळ्याच गोष्टींची क्षणभंगुरता समजूनही आपल्याला जमेल तितकं करत राहणं यातून माणूस खूप काही मिळवतो हे मला वाटतं या चित्रपटाचं सार आहे.

Pages