Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
स्वस्ति, गॅसलाईट बद्दल +१
स्वस्ति, गॅसलाईट बद्दल +१
अपेक्षाभंग
चला गॅसलाईट बघायला नको,
चला गॅसलाईट बघायला नको, hotstar सुरू केल्यावर सारखा समोर येतोय, कसा आहे ते कोणी लिहिलं का वाचायला आले, कंमेंट्स वाचून हायसे वाटलं, वेळ वाचला, धन्यवाद त्याबद्दल लिहिलेल्या सर्वांना. आधीची स्वस्ति यांची कमेंट मिस्ड, आत्ता वाचली.
नेटफ्लिकसवर ‘आय सी यु’ नावाचा
नेटफ्लिकसवर ‘आय सी यु’ नावाचा चांगला थ्रिलर, सस्पेन्स सिनेमा आहे. २०१९ चा आहे म्हणजे पाहिला असेल खूप जणांनी. नसेल तर पहायला हरकत नाही.
हा सारा अली खानचा गॅसलाईट
हा सारा अली खानचा गॅसलाईट जुन्या (1950 च्या काळातल्या) हॉलिवूड सिनेमा चा रिमेक आहे का ?
RRR (का) पाहीला !
RRR (का) पाहीला !
सध्यातरी 'किती तो काळोख ' हे
सध्यातरी 'किती तो काळोख ' हे एकच फिलींग आहे. >>>> नंतर मग , "काय उजेड पाडला ??? !! " असं फिलींग येईल
सातशे खिडक्या , आठशे दारं असलेल्या महालात जेमतेम ४ माणसं आहेत .
एकदा रुक्मिनी म्हणते - , सारे लोग स्टेटमेन्ट देने गये है .
एक कूक आणि एक ड्रायवर सोडून ईतर कोणी फारसे दिसले नाही.
चित्रपटाच्या शेवटाचा अंदाज जर तुम्हाला पहिल्या १५ मिनिटात आला नाही , तर मग ईतकी वर्श रहस्यकथा वगैरे बघण्यात फुकट घालवलतं आयुश्य . काही शिकलात नाही म्हणावं लागेल.
साऊथचा अजून एक ब्लॉक डिजास्टर
साऊथचा अजून एक ब्लॉक डिजास्टर हॉरर पाहिला. वो जरूर आयेगी.
सुरूवातीला भीती वाटावी म्हणून एका ओसाड ठिकाणी कार बंद पडते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला एक कुत्रे दिसते. ते बॉनेटच्या मागे दिसेनासे होते. हिरविन उतरते तेव्हा ते डिकीपर्यंत पोहोचते. ती फोनवर डॅडींशी (तिच्या) बोलत असते तेव्हा ते कुत्रे चार पावले खाली उतरून खायला हुडकत असते. हिरवीन गायब झाली म्हणून कारचालक कम कारमालक खाली उतरतो. तिला शोधून परत येतो तरी कुत्रे तिथेच!
म्हणजेच एकही रीटेक नाही. मधे गॅप नाही. स्क्रीन वर जितका वेळ प्रसंग घडतो तितकेच शूटिंग टाईम!
रस्त्यावर मागून येणाऱ्या कार्स, स्ट्रीटलाईटस तसेच ढाणढाण दिसत राहतात.
बॅकग्राऊंड म्युझिक म्हणजे शिकाऊ अननुभवी लोकांनी कसलीही माहिती नसताना "चला वेगळे काही तरी करु" या विचाराने दिलेले वाटते. ते भजन, करूण प्रसंग आणि इंटीमेट सीन साठी सुद्धा वापरता येऊ शकते. अर्थात रोमॅन्टिक सीनला जे संगीत दिलेय ते कुठे चालू शकते हे अजून लक्षात आले नाही.
संपूर्ण पिक्चर असाच स्वतः शिकत प्रेक्षकांना शहाणे करून सोडणारा आहे.
आपणच आपली भीती वाटून घ्यायची.
सध्यातरी 'किती तो काळोख ' हे
सध्यातरी 'किती तो काळोख ' हे एकच फिलींग आहे. >>>> नंतर मग , "काय उजेड पाडला ??? !! " असं फिलींग येईल >>>>
अगदी खरं !
संपवला एकदाचा पुढे ढकलून ढकलून.
गोविंदा नाम मेरा बघितला
गोविंदा नाम मेरा बघितला हॉटस्टारवर.
सुरुवात बोअर आहे..सेकंड हाफ चांगला आहे..
आपणच आपली भीती वाटून घ्यायची.
आपणच आपली भीती वाटून घ्यायची. >>>
dungeons and dragons मस्त आहे
dungeons and dragons मस्त आहे. खास करून स्पेशल ईफेक्ट्स. कथा काय फँटसीच पण वेगात आहे. स्पेशल इफेक्ट्सकरता आयमॅक्समधे पहा. खूप वेगवेगळे आहेत. मजा येते पहाताना.
D & D नक्कीच पाहणार.
D & D नक्कीच पाहणार.
D D गोष्टी आवडत असतील तर Critical Role म्हणून एक ग्रुप D D गोष्टींची सिरीज ८ वर्षांपासून बनवत आहे. ती थेट युट्यूब वर बघणे काय मला झेपले नाही, पण त्यावर आधारित लेजेंड ऑफ वॉक्स माकिना ही अमेझॉन प्राईम वरची animated सिरीज एकदम भारी आहे.
जॉन विक 4 -
जॉन विक 4 -
विकेंड ला थेटरात जाऊन पहिला. फुल्टू पैसा वसूल.
पहिले 3 सिनेमे आवडले असतील तर नक्की पहा.
कॉमी, पहिले ३ डीडी पहायला
कॉमी, पहिले ३ डीडी पहायला मिळतात का शोधत होते तर ते सपाटुन आपटले होते असं कळलं. पण हा मात्र कष्ट घेऊन बनवलाय. १५० मिलिअन बजेट ओतलंय. आणि आधीच्या सिनेमाशी संबंध नाही म्हणे.
जॉन वीकचे पहिले २ भाग न पहाता तिसरा भाग पाहिला होता. त्याचा अजुनही पश्चाताप होतो. दर तिसर्या सेकंदाला तो कोणालातरी मारत असतो. त्यामुळे चौथा भाग पहायची हिंमत नाही.
सई परांजपेंचं पुस्तक वाचून
सई परांजपेंचं पुस्तक वाचून झाल्यावर परत एकदा 'कथा' पाहिला. (प्राइम, यूट्यूबवर पण आहे.)
काय मजा येते आज पण बघायला. साधा, सरळ, मार्मिक सिनेमा.
जॉन विक चालू केले बघायला.
जॉन विक चालू केले बघायला.
नेटफ्लिक्सवर कुत्ते बघितला,
नेटफ्लिक्सवर कुत्ते बघितला, ठिकठाक आहे.भारी सिनेमा बनवायचाय असा आव आणलाय.या धर्तिचे अनेक सिनेमे येवुन गेलेत त्यातलच थोड इथल थोड वेबसिरिज मधल अस करुन तिच भेळ आहे.
कमीने च्या नंतर आलाय का?
कमीने च्या नंतर आलाय का?
>> फुल्टू पैसा वसूल.<< +१
>> फुल्टू पैसा वसूल.<< +१
संपुर्ण फ्रॅंचाय्ज पैसा वसुल आहे. इट्स ऑल अबौट स्टोरी टेलिंग. रिटायर्ड हिटमन परत त्या विश्वात ओढला जातो याची चित्तथरारक कथा आहे. व्हायलंस आहे पण तो बिभित्स, किळसवाणा वाटत नाहि. इट इज नाइस्ली ब्लेंडेड इन्टु द स्टोरीलाइन. तुम्हाला रिझर्वॉयर डॉग्जचा "इअर सिन" पचनी पडला असेल तर जॉन विक खटकणार नाहि...
१५० मिलिअन बजेट ओतलंय. आणि
१५० मिलिअन बजेट ओतलंय. आणि आधीच्या सिनेमाशी संबंध नाही म्हणे. >> त्यापेक्षाही पटकथा स्ट्राँग नि संवाद क्वर्की आहेत त्यामूळे ए<गेज्ड राहतो प्रेक्षक हे मह्त्वाचे ठरते.
जुना लॅबिरींथ पाहिला.
जुना लॅबिरींथ पाहिला.
जेनिफर कोनेली आणि डेव्हिड बोवी. लहान मुलांचा असला तरी आवडला.
डेव्हिड बोवि रॉक्स.
पटकथा स्ट्राँग नि संवाद
पटकथा स्ट्राँग नि संवाद क्वर्की आहेत >> हो नाहीतर वाया जाऊ शकतं सगळं.
puss in boots चांगलाय का? काही केल्या थेटरातुन जात नाहिये. हल्ली अॅनिमेशन पहाण्यात रुची गेलीये.
Puss in boots मस्त आहे.
Puss in boots मस्त आहे.
Netflix वर ' फराज ' पाहिला.
Netflix वर ' फराज ' पाहिला. 2016 मधे ढाका मधे Holey Artisan बेकरी वर साधारण जर्मन बेकरी सारखाच टेररिस्ट अटॅक झाला होता. जर्मन बेकरी, पुणे मधे बॉम्ब स्फोट, तर ढाका मधे लोकांना ओलीस ठेवल होतं. काही अपवाद वगळता बांगला देशी मुसलमानांना सोडुन देण्यात आलं, तर सगळे परदेशी पाहुणे मात्र गोळीबारात मारण्यात आले. गुगल आणि चित्रपटात दाखवल्याप्रमाणे हा Islamic attack होता.
राज बब्बरची मुलगी जुही बब्बर, शशी कपुरचा नातु आणि परेश रावलचा मुलगा असे तीन नविन स्टार्स उदयास आले आहेत. बब्बर आणि रावल दोघांनी उत्तम अभिनय केला आहे. जहान कपूर ठीक ठीक (किंवा या सिनेमात फारसा स्कोप नाही मिळाला) बाकी चित्रपट ठाकठीक.
puss in boots चांगलाय का?>>हो
puss in boots चांगलाय का?>>हो, मस्त आहे. माझ्या लेकाने (वय ५) थेटरात पाहिल्यावर घरी ३ वेळा पाहिला.
घर बंदूक बिर्याणी पाहिला.
घर बंदूक बिर्याणी पाहिला. कुठेच प्रादेशिक वाटला नाही. सुरूवात चुकली. मराठीत उत्तम अॅक्शनपट बनवला आहे.
विनोदाची पेरणी सैराट सारखीच आहे. मात्र दिग्दर्शक हेमंत अवताडे आहेत. नागराज क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे.
आकाश ठोसर, नागराज आणि सयाजी शिंदे या तीन प्रमुख व्यक्तिरेखा ग्रे शेडस मधे आहेत. कुणीच काळे नाहीत कि पांढरेही नाहीत.
नागराजच्या रूपाने मराठीला एक अॅक्शन हिरो मिळाला...
अॅक्शन रोहित शेट्टीने दिली असावी. ते टाळायला हवं होतं. पण उगीचच अॅक्शन घुसडलेली नाही.
जंगलाचे सीन्स छान आहेत. ड्रोन शॉट्स, लॉंग शॉट्स प्रभावी आहेत. त्यामुळे जंगलाचं अस्तित्त्व जाणवत राहतं. सयाजी शिंदे कॉमेडी व्हिलन आहे. आकाश ठोसरचं पात्र शेवट पर्यंत कन्फ्युज्ड आहे.
अर्थात व्हिलन हा शब्द वापरता येत नाही. व्यावसायिक पण प्रायोगिक चित्रपट असंच वर्णन करावं लागेल.
शेवटी दुसरा भाग येईल अशी शक्यता वाटते. अन्यथा चित्रपट अर्धवट वाटेल.
धन्यवाद कॉमी, सोनाली एसेल.
धन्यवाद कॉमी, सोनाली एसेल.
प्राईम वर Brunt(2015) पाहिला.
प्राईम वर Brunt(2015) पाहिला. आवडला.
Adam Jones (Bradley Cooper) एके काळच सुप्रसिद्ध आचारी. दारू-नशेच्या आहारी जाऊन सगळं नाव घालवून बसतो. व्यसनाशी लढून तो पुन्हा नव्याने सुरूवात करू पाहतो.
सगळं एकदम ऊत्कृष्ठच असायला हवे यासाठी केलेला थयथयाट जर बघितला तर ते तयार जेवण कोणाला आनंदाने जेवावेसे वाटेल असा प्रश्न पडला. त्यामुळेच शेवट जास्त आवडला.
जॉन विक -१/२ प्राईमवर बघितले.
जॉन विक -१/२ प्राईमवर बघितले. ठीक आहेत. स्टोरीच्या कंगोर्यांवर पोसलेल्या जिवांना एका सरळ रेषेतील, शून्य साईड स्टोरीज असलेली स्टोरी बघुन काय होणार ते झाले.
तिसरा पैसे देऊन बघावासा वाटला नाही. चौथा थेटरात जाऊन काही बघणार नाही. स्ट्रीमिंगवर आला की बघू कॅटेगरी आहे.
गॅसलाईट: (प्रेडिक्टेबल)
गॅसलाईट: (प्रेडिक्टेबल) मिस्ट्री आहे. मिस्ट्री उलगडल्यावर अनेक भाग फिट बसत नाहीत, काही पात्रं फक्त मिस्ट्रीत गोंधळ हवा म्हणून टाकलेली आहेत, साईड स्टोरी अजिबात फिट होत नाहीत. गॅसलाईट व्हायची हौस असेल तर बघा असा आहे.
Pages