चित्रपट कसा वाटला - ७

Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15

आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

१. मोनिका ओ माय डार्लिंग बघितला..आवडला..

२. २:१२ दोबारा बघितला ..चांगला आहे ..खिळवून ठेवणारा.
मूळ सिनेमा mirage Spanish आहे..त्याचा फक्त ट्रेलर पाहिला..नायिकेचे काम जास्त चांगले वाटले.पण तापसी ने पण चांगला अभिनय केला आहे.

३. Carrie इंग्रजी.. वायोलंस थ्रीलर..

४. Run इंग्रजी.. सायकोथ्रीलर..चांगला आहे.

2013 चा carrie जुनाच म्हणजे..पूर्वी अर्धटव पाहिला होता..परवा बघितला पूर्ण...जबरदस्त आहे..

Shawshank redemption राहिलेला बघायचा तो हि बघून टाकला..मागच्या आठवड्यात..

२:१२ दोबारा पाहिलेला होता. प्रयत्न चांगलाच आहे.
पण का कुणास ठाऊक कन्सेप्ट नाही पटली. म्हणून इथे काही लिहायचं टाळलं होतं.
खूप खूप प्रश्न आहेत.

मृणाली, 2013 चाही चांगला आहे.पण 1976 चा आवर्जून बघ.ती अभिनेती डोळ्यांनी जिंकते.
हा माझा त्यावर लिहिलेला जुना छोटा लेख(याला लेख म्हणणं ही मोठी उडी आहे पण चालवून घ्या गरीबाचं Happy )
https://www.maayboli.com/node/72294

नेटफलिक्स वर दोन मुवि पाहिले
The holiday
केट विंसलेट आणि कॅमेरून डायझ
दोन वेगळ्या क्षेत्रातील दोघी, दोघींना इमोशनल प्रॉब्लेम आणि ख्रिसमस ला दोघी एकटं राहायचं म्हणून ऑनलाइन जाहिरात देऊन जागा बदलतात आणि वेगळ्या अनुभवांना सामोऱ्या जातात आणि लाईफ सॉर्ट करतात अशी ढोबळ कथा
बऱ्यापैकी प्रेडक्तीबल पण एकदम फिलगुड मुवि
लाईट काही बघायचं असेल, मूड सेट करायचा असेल तर मस्त
एकदा नक्कीच बघण्यासारखी

Purple hearts
एक मरीन सोल्जर आणि एक होतकरू संगीतकार
दोघांना फायनाशियल प्रॉब्लेम, म्हणून दोघे खोटे लग्न करतात
त्याला लग्न झाल्याचा जास्तीचा भत्ता मिळणार असतो तर तिला मेडिक्लेम इन्शुरन्स
पण त्याचा past सतत समोर येत राहतो आणि दोघे नाटक करता करता खरेच प्रेमात पडतात अशी टिपिकल बॉलिवूड कथा
पण रंगवली छान

2013 चा carrie जुनाच म्हणजे..पूर्वी अर्धटव पाहिला होता..परवा बघितला पूर्ण...जबरदस्त आहे..

Shawshank redemption राहिलेला बघायचा तो हि बघून टाकला..मागच्या आठवड्यात..

>>>स्टीफन किंग बिंज ? Happy

HBO MAX वर ALL THAT BREATHES म्हणून डॉक्यूमेंट्री पाहिली. दिल्लीत आकाशातून पडणाऱ्या घारींचा उपचार करून पुन्हा सोडून देणाऱ्या दोन भावांच्या कामावर ही फिल्म आहे. खूप आवडली.

पाहायला अतिशय सुंदर आहे. दिल्लीमध्ये राहणाऱ्या अनेक प्राण्यांचे अधूनमधून शॉट आहेत - डुक्कर, घोडे, कासव, कुत्री, उंदीर, विविध कीटक. पक्षी सुध्दा - अर्थातच घारी, घुबड, कबुतर. शहरातल्या नव्या जंगलाचे चित्रीकरण असे केले आहे की जणू एखादी FANTASY फिल्म बघतोय असे वाटावे.

OSCAR NOMINATED आहे, आणि बऱ्याच फेस्टीव्हल मध्ये जिंकली आहे ही फिल्म.

the body इमरान हाश्मी, ऋषी कपूर वाला. नेफिवर.
इमरान हाश्मीची वाईफ सकाळी हार्ट अटैक ने मरते आणि आठ तासानंतर शवाग्रुहातून बॉडी गायब होते.. शोधाशोध, इनवेस्टिगेशन आहे..बरा आहे.. ईतका एंगेजींग नाही वाटला.

बधाई दो..नेफिवर. राजकुमार राव,भुमी पेडणेकर.. ठिक आहे.

या धाग्यावर खूप आधी कुणीतरी बुलेट ट्रेन रिकमेण्ड केला होता.
धमाल आहे. एकाच ट्रेनमधे वेगवेगळे गुन्हेगार असतात. ते प्रत्येक जण काही न काही गुन्हा करण्याच्या प्रतिक्षेत असतात.
ट्रेनचा वेग, या सर्वांचे स्वतंत्र पण आपसात गुंतलेले कथानक आणि शेवटी त्यांना एक सूत्रात बांधण्याचा केलेला प्रयत्न हे खिळवून ठेवतात.
शेवटचं एक स्पष्टीकरण खटकतं. त्याकडे साफ दुर्लक्ष केल्यास मजा आणतो चित्रपट.
- नेफ्लि.

+७८६

चित्रपट एंजॉय करण्यासाठी त्याचा जॉनर समजणे गरजेचे.

जॉनर - मराठीत जातकुळी??

चित्रपट एंजॉय करण्यासाठी त्याचा जॉनर समजणे गरजेचे>>> चित्रपट चांगला आहे का वाईट हे समजायला जॉनर नाही बेसिक्स लागतात
त्यामुळे ज्यांना आवडला नाही त्यांना जॉनर कळलाच नाही असल्या मल्लिनाथी करण्यापेक्षा आपलं बेसिक्स सुधारावे असे नम्र मत

ओके Happy

अशक्य आचरट पण तरीही धमाल येते बघायला >> +१
बुलेट ट्रेन बघायला मजा आली.

जॉनर >> अश्तं हो अप्रूप नव्या नव्या गोष्टींचं. हळूहळू समज आली कि वापर कसा करावा ते पण कळेलच कि.

जंगल पाहिला प्राईमवर. २०१७ चा. सत्यघटना आहे. योस्सी नावाचा माणुस बोलिवियाच्या जंगलात सफरीवर गेल्यावर काय होते त्यावर. जंगलातला शेवटचा सीन फार मस्त घेतलाय. सर्वायवल वर आहे सिनेमा त्यामुळे तसे पहावत नसतील तर पाहु नका.

Thrille/ suspence movies-

1. Gone Girl
2. Get Out
3. Nightcrawler
4. Prisoners
5. Se7en
6. The Usual Suspects
7. Reservoir dogs
8. The Departed
10. Shutter Island

नार्निया नावाच्या अनेक पिक्चरमधला कुठलातरी एक मी शेवटी अर्धा तास बघितला, फुल tp . यंग आणि टीनेजर पोरं आवडली. तो असलन नावाचा सिंह भारी होता, त्याची आयाळ जाम भारी त्यामुळे तो देखणा दिसत होता. लढाईतल्या तोफगोळ्यानच्या मशीन्स भारी होत्या. शेवटी असलने खवळून उसळलेला समुद्र ब्रिज पाडून लढाई जिंकून देतो तेही भारी होतं, त्या झाडांनी मुळापासून उपटून लढाई जिंकायला मदत केली तेही भारी होतं, अरे हो ते rabitsही भारी होते, चित्रविचित्र प्राणीही भारी होते, हाहाहा.

वरचे निवांत बघते.

शेवटी त्यातले काहीजण एका झाडातून पुढे जाऊन, ट्रेनने जातात कुठेतरी, कुठल्या काळात जाऊन नवीन काळात येतात. त्या यंग किंगला राज्य परत मिळवून देतात जे त्याच्या काकाने बळकावलेलं असतं, मग परत जातात जिथून आले तिथे. त्यातली एक यंग मुलगी त्या यंग किंगची तेराशे वर्षापूर्वी बायको असते.

नवरा हे पिक्चर्स बघत असतो, मी येता जाता बघते पण मला शेवटी अर्धा तास बघावासा वाटला. कधी कधी मजा येते असे पिक्चर्स बघायला.

"आपल्या दोन मुलांपैकी एक तुमचे नाही" फेम अभिनेत्रीचे नाव जयमाला काळे >> ती सीमा देव. रमेश देवच्या मांडीवर डोकं ठेवून मरताना म्हणते. आपली खरी बायको खोटं खोटं चित्रपटात का होईना, मरते आहे, याचा सूक्ष्म आनंद रमेश देवच्या डोळ्यात ... वगैरे वगैरे

ह पा असल्या एका चित्रपटात वर्षा नावाची अभिनेत्री ही होती.

एनिवे दोन का तीन मराठी पिक्चर्स आहेत असे, एक पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा गाणंवाला बहुतेक. एक रमेश देव, सीमाचा असावा. असले मुलं confusing वाले पुर्वी दूरदर्शनवर बघितलेत.

Pages