ऋन्मेषचे धागे - एक मायबोलीय समस्या??

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 October, 2022 - 06:28

ऋन्मेषचे धागे - एक मायबोलीय समस्या??

धागे काढणे ही कला आहे की रिकामटेकड्या लोकांचे धंदे आहेत हे माहीत नाही. पण मायबोलीवर काही मी एकटाच नाही जे धागे काढतो. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी मायबोलीवर किमान दहा वा दहापेक्षा जास्त धागे काढले त्या सर्वांनी मिळून हे ठरवावे. मी कोण एकटा ठरवणारा..

पण एक सत्य हे सुद्धा आहे की कोणी धागे काढलेच नाही तर जगातले कुठलेच संकेतस्थळ चालणार नाही. त्यामुळे कोणी कमी काढा वा जास्त काढा, पण धागे काढणे ही जगण्याची गरज आहे. तरीही एण्ड ऑफ द डे, ऋन्मेष एकटाच फार धागे काढतो म्हणून बदनाम आहे.

आजही दर दुसर्‍या धाग्यातील तिसर्‍या प्रतिसादात मला हि टिका झेलावी लागते म्हणून आत्मपरीक्षण करायच्या हेतूने मी हा धागा काढला आहे. ईथे सर्वांची प्रामाणिक मते स्विकारली जातील.

खरे तर गेल्या काही काळात मी स्वतःच वेळोवेळी आत्मपरीक्षण करत माझ्या धागे काढण्यावर बरेपैकी अंकुश लावण्याचा प्रयत्न केला आहे. तरी होणारी टिका काही थांबली नाही.

अर्थात, काहींना ईतर चर्चेत मुद्दे सापडले नाही तर ही टिका करणे सोयीचे पडत असावे. जसे तो कमाल खानही शाहरूख खानवर टिका करतो म्हणून शाहरूख काही चित्रपटात काम करायचे थांबणार नाही. तो त्याच्या टिकेकडे दुर्लक्षच करतो. मी देखील अश्या आयडींना ओळखून त्यांच्याकडे दुर्लक्षच करतो.

पण जेव्हा कोणी जेन्युईन आयडी या टिकाकारांमध्ये आढळतो तेव्हा मन व्यथित होते, आणि स्वतःच्या हितासाठी म्हणून पुन्हा आत्मपरीक्षण करावेसे वाटते.

आजच पुन्हा नव्याने आत्मपरीक्षण केले ज्यात मला तरी प्रामाणिकपणे काही वावगे वाटले नाही. ते शेअर करावे असेही वाटले.

सँपल साईज म्हणून गेले दोनेक महिन्याचा काळ चेक केला.

आज १६ ऑक्टोबर आहे, तर गेल्या १६ ऑगस्टपासून आजवर, म्हणजेच गेल्या दोन महिन्यात मी किती आणि कोणते धागे काढले हे चेक केले.

१) लेकीची चित्रकला - तिने काढलेले स्केचेस - https://www.maayboli.com/node/82138

२) कॉलेजचे ते मोरपिशी दिवस - ऋन्मेऽऽष - https://www.maayboli.com/node/82403

३) ब्रह्मास्त्र - एक प्रामाणिक परीक्षण - by SRK - https://www.maayboli.com/node/82466

४) लहान मुलांना फटके मारावेत का? - https://www.maayboli.com/node/82469

५) आमच्या घरातल्या भिंती बोलतात.. - https://www.maayboli.com/node/82514

-----------

दोन महिन्यात फक्त पाच धागे.

दोन पोरांच्या कौतुकात कलाविभागात काढलेले धागे. आशा करतो त्याने कोणी दुखावले नसेल वा ईरीटेट झाले नसेल.

एक चित्रपट परीक्षण. जो या दोन महिन्यातील बहुचर्चित चित्रपट होता.

एक मायबोली गणपती स्पर्धेकरता काढलेला धागा. जो नंबरातही आला. यावरही कोणाची तक्रार नसावी. जर गणपती आले नसते तर हा धागाही नसता.

आणि एक चर्चेचा धागा, याच विषयावर अजूनही एक धागा आला. हा चर्चेचा विषय गेल्या दोन महिन्यातील सर्वात हॉट टॉपिक म्हणून गाजला. हा विषय चर्चेत घ्यायचे श्रेय मला द्यायचे नसेल तर नका देऊ. पण टिका तरी करू नका ईतकी अपेक्षा मी नक्कीच करू शकतो.

असो.
तर सांगायचा मुद्दा हा की, दोन महिन्यात पाच धागे हा काही विक्रमी आकडा नाही. किंबहुना माझ्या ईमेजनुसार नीचांक म्हणावे असा आहे. दुसरे म्हणजे धाग्यांच्या विषयाबाबतही कोणाला काही आक्षेप नसावा. कोणाला काही त्रास झाला नसावा.

८२१३८ हा माझा वरच्या लिस्टमधील पहिला धागा. त्यानंतर माझे अजून चार धागे आले. पण ईतर मायबोलीकरांचे धागे मोजल्यास ८२५४२ हा आजचा लेटेस्ट धागा.
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास माझे पुढचे ४ धागे येईस्तोवर मायबोलीवर एकूण ८२५४२-८२१३८ = ४०४ धागे आले.
यातले ४ माझे ४०० ईतरांचे.
थोडक्यात मायबोलीवर धागा काढायला सुप्रसिद्ध म्हणा वा कुप्रसिद्ध म्हणा असणार्‍या आयडीचे फक्त १ टक्के धागे येत आहेत.
सँपल साईज वाढवता आकडे बदलतीलही. पण ते काय येतील. सव्वा टक्के, दिड टक्के, दोन टक्के... यावरून हा ईतका गोंधळ?

हा आजचा धागा नाहक माझी धाग्यांची टक्केवारी वाढवणार आहे. एक वरून थेट सव्वा वर जाणार आहे.
पण नाईलाज आहे.
दर धाग्यात दर प्रतिसादात जर कोणाचे या विषयावरून धागा भरकटवणारे प्रतिसाद येत असतील तर त्यांना तिथे उत्तर न देता या धाग्यावर सोक्षमोक्ष लावता येईल. तसेच या निमित्ताने मलाही वेळोवेळी आत्मपरीक्षण करता येईल.

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जसे की मला वाद घालायची आणि माझे तेच खरे करायची आवड आहे. तर हो, तो आरोप मान्य आहे. >> हे टाईमपास म्हणून लिहिले आहेस का हे पण सांगून टक लगे हाथ Wink

छे, हृतिकच्या कंगणाला आरसा कशाला
मला वाद घालायची आणि आपले तेच खरे करायची आवड आहे हे मी घरीही लहानपणापासून ऐकतोय.
ते अमान्य का करा

जागू ताई - धागे संख्या 11 पाने
दिनेश. 13 पाने
बेफिकीर 22 पाने
हे सगळे काय रिकामटेकडे होते काय. ज्याच्याकडे काही लिहिण्यासारखं असेल तोच धागे काढणार. Happy
सर इज इन गुड कंपनी.
500 धागे काढणे ही सुद्धा एक आयर्न मॅन ऍचिव्हमेंट आहे.

म्हणजे लवकरच मला १०० महिने पुर्ण होतील Happy >> बरोबर
हल्लीची मुले ईन्स्टारील्सच्या आहारी जात आहेत ही मला एक समस्या वाटत आहे. आणि यावर धागा यायला हवा. >> बरोबर

500 धागे काढणे ही सुद्धा एक आयर्न मॅन ऍचिव्हमेंट आहे.
>>> येस ... अशी एक स्पर्धा ठेवली पाहिजे... 100 कोतबो धागे, 100 लेख, 100 कथा, चार पाच पाककृती वगैरे....

Lol
ते ऋन्मेषचे प्रतिसाद या धाग्यावर मोजूया, सगळे विषय एकत्र करू नका प्लीज Proud

पाच वर्षांनंतरही हे गुऱ्हाळ चालूच आहे होय !
आता आकडेवारी आलीच आहे तर हे जुन्या (आता माजी) भजनी मंडळाकडून Proud
धागाकिंग
सगळ्या मायबोलीकरांना छळणारा(???), सतत नवनविन धागे काढणारा, दुसऱ्यांच्या धाग्यांवर जाऊन ते धागे हायजॅक करतो असा आरोप असलेला, एक 'विशिष्ट स्ट्रॅटेजी' असं ज्याच्या माबोवर वावरण्याचं नव्यानं वर्णन केलं जातंय... कोणी म्हणतंय ड्युआयडी तर कोणी धाग्यावेताळ तर कोणी धागेश्वर ! नक्की कोण आहे हा धागाकिंग?????
मला वाटतं ही एक, प्रातिनिधिक स्वरुपाची व्यक्तीरेखा आहे. आपल्या प्रत्येकामध्ये कधीकाळी वावरलेली-वावरणारी ! पण येथे सहजपणानं व्यक्त होणारी आणि आपल्या कल्पक डोक्यानं व अंगभूत चातुर्यानं सतत चर्चेत राहणारी. तो भरमसाट धागे काढतो, सुमार दर्जाचे किवा दर्जाहीन धागे काढतो असं म्हणणारे, चांगले धागे त्याच्यामुळे मागे जातात असा आरोप करणारे जसे मायबोलीवर आहेत तसेच 'तू लिही रे, आम्हाला आवडतं तुझं लिहिलेलं', 'तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही दुर्लक्ष करा' असं इतरांना सांगणारेही भरपूरजण येथे आहेत. सुमार आणि दर्जाहीन धागे काढतो असं म्हणणारेच प्रतिसाद वाढवून याचे धागे कुठल्याकुठे नेऊन ठेवतात. बघा एक झलक...

●धागाकिंगचा मायबोलीवरचा वावर- २ वर्ष ११* महीने (तिन वर्ष पूर्ण होण्यास थोडेच दिवस बाकी आहेत.)
●एकूण धागे - २६३ (प्रत्येक ४ दिवसाला १ धागा)
●धाग्यांवरील एकूण प्रतिसाद - २१,८५६ (प्रत्येक धाग्याला सरासरी ८३ प्रतिसाद)
●प्रतिसाद-
●०-४९― १३० (३५६८)
●अर्धशतके― ६५ (४४५०)
●शतके― ४४ (५९७६)
●द्विशतके― १३ (३१६०)
●त्रिशतके― ५ (१६५२)
●४००-५००― ३ (१३२५)
●५००-६००― २ (१०९८)
●६०० च्यावर― १ (६२७)
●एक आकडी प्रतिसाद― फक्त ९
●निचांकी प्रतिसाद― १
●उच्चांकी प्रतिसाद― ६२७

मी हा धागा काढण्याचं कारण―
आपल्या मायबोलीकरांच्या आवडत्या, नावडत्या अशा संबंधीत व्यक्तीरेखेचा कालचा धागा क्रमांक ६२,९७८ वरील खालील प्रतिसाद आणि आवाहन... 
"७) अवांतर - हे अवांतर कारण या धाग्याशी नाही तर माझ्याशी संबंधित आहे. तुम्ही जी "माझी स्ट्रॅटेजी" (असे काही खरेच असेल तर याचे मी पेटंट घ्यायला हवे) मांडली आहे तशी आधीही काही जणांनी आपल्यापरीने मांडली आहे. आता यापैकी सर्वांचीच विवेचने बरोबर नसणार, किंवा असतीलच असे नाही. पण प्रत्येकाला आपणच या स्ट्रॅटेजीची केलेली उकल बरोबर वाटते. जर आपण वेगळा धागा काढलात तर तिथे तुम्ही सारे आपापल्या परीने लिहाल आणि मग त्यावर ईतर मायबोलीकरांची मते एकाच ठिकाणी जाणून घेता येतील. अश्याने आपण इथे तिथे सर्व धाग्यात तेच तेच लिहील्याने ईतर धागे भरकटणार नाहीत. अर्थात यातून मलाच प्रसिद्धी मिळेल या भितीने जर आपण स्वतंत्र धागा काढणार नसाल तर मग त्याला अर्थ नाही. नवा धागा काढलात तर मला तिथे लिहायला आवडेल,"

तुझ्यामुळे आमचे धागे भरकटतात असा आरोप करणार्यांना त्यानं प्रामाणिकपणे केलेलं हे आवाहन,"माझ्याविषयी चर्चा करायला स्वतंत्र धागा काढा म्हणजे तुमचे इतर धागे भरकटणार नाहीत." ...तर ज्यांना कोणाला धागाकिंगबद्दल त्याच्या तथाकथित स्ट्रेटेजी बद्दल चर्चा करायची असेल त्यांनी येथे येऊन ती करावी.
-३/७/२०१७

ज्याला वाटते त्याने वाचावे
न वाचण्याचे पण स्वातंत्र्य आहे की.>>>>
प्रतिसादरूपी घाणीचं काय करायचं?

ऋन्मे ss ष ह्या आयडीचे लिखाण ' घाण ' नसते. बहुतेक करून स्वच्छच असते. पण काही प्रतिसाद देणारे मात्र अनेक वेळा उर्मट आणि तिरकस लिहितात.

प्रतिसादरूपी घाणीचं काय करायचं?
>>>
इग्नोर
मी तेच करतो Happy
आणि जो प्रतिसाद रिप्लाय योग्य समजतो तिथेच रिप्लाय देतो.

@ हीरा, धन्यवाद

इग्नोर
मी तेच करतो Happy
आणि जो प्रतिसाद रिप्लाय योग्य समजतो तिथेच रिप्लाय देतो. >>>
ही घाण तुमचीय हे प्रतिसावाचल्यावंनंतर समजतं. तूमचं नाव वर असेल तर ओलांडून जाता येतं.

न वाचणे वेगळे आणि वाचूनही इग्नोर करणे वेगळे

मी इग्नोर करतो ते वाचून करतो. म्हणजे मला नको असलेले वेचत नाही. मला न रुचणाऱ्या त्या पोस्टना माझ्या विचारांचा ताबा घेऊ देत नाही Happy

मी इग्नोर करतो ते वाचून करतो. म्हणजे मला नको असलेले वेचत नाही. मला न रुचणाऱ्या त्या पोस्टना माझ्या विचारांचा ताबा घेऊ देत नाही Happy >> अचूक चूक.

मी इग्नोर करतो ते वाचून करतो. म्हणजे मला नको असलेले वेचत नाही. मला न रुचणाऱ्या त्या पोस्टना माझ्या विचारांचा ताबा घेऊ देत नाही >> सर हळु हळु आपण संतपदाकडे वाटचाल करत आहात. मागे आपण तो डोंगर का काय ते जाळले होते तेव्हाच आम्हाला कल्पना आली होती.

मी इग्नोर करतो ते वाचून करतो. म्हणजे मला नको असलेले वेचत नाही. मला न रुचणाऱ्या त्या पोस्टना माझ्या विचारांचा ताबा घेऊ देत नाही >>>> हे म्हणजे मी रस्त्यावरच विष्ठा करायला बसनार. तुम्ही पाय सांभाळून चाला.

नवीन अवतार >> Rofl

नंगे से तो खुदा भी डरता है|
हम वो है, जिनसे नंगे भी डरते है|
टीप: इथे हम म्हणजे मी (उपाशी बोका) न्हवे.

झम्पु दामलु आणि डीज्जे हेच ऋन्मेष आहेत अशी चर्चा आहे. नवीन आयडी आला कि तो रुन्मेषचा अवतार आहे अशी कंडी आपणच पिकवायची. मग काही दिवसांनी माझ्या नावाने आयडी काढतात असे गळे काढायचे हे पण यशस्वी एक तंत्र आहे.

डोंगराची काय स्टोरी आहे...
>>>

मी आणि माझ्या मित्रांनी मजाक मजाक मध्ये माझगावचा डोंगर जाळलेला. मोठा बवाल झालेला. म्हणून डिटेल लिहायचे टाळतोय. बरीच बर्षे झाली म्हणा आता त्याला..

<< ऋन्मे ss ष ह्या आयडीचे लिखाण ' घाण ' नसते. बहुतेक करून स्वच्छच असते. पण काही प्रतिसाद देणारे मात्र अनेक वेळा उर्मट आणि तिरकस लिहितात. >>

-------- ऋन्मेषचे लिखाण घाण नसते याबाबत १०० % सहमत. पण त्याचे लिखाण अनेकांना उर्मट आणि तिरकस प्रतिसाद देण्यासाठी प्रवृत्त करतात. Happy

पण त्याचे लिखाण अनेकांना उर्मट आणि तिरकस प्रतिसाद देण्यासाठी प्रवृत्त करतात. Happy
>>>>

हो हे शक्य आहे. मान्यही आहे.
मी याबाबत बरेचदा आत्मपरीक्षण केले आहे.
लोकांचा संयम टेस्ट होतो बरेचदा माझ्या पोस्टमधील विचार वाचून.
पण मग हे सुद्धा लक्षात आले की हे सहज घडते. मी काही ठरवून वा मुद्दामहून करत नाही. माझी शैलीच तशी आहे म्हणा, किंवा मला एखाद्या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीकोणातून बघायची सवय आहे म्हणा, किंवा मला प्रवाहाविरुद्ध पोहण्यात थ्रिल वाटते म्हणा. ते बस्स होते.
त्यामुळे जे मुद्दामहून मी करत नाही त्या बाबत मी विचाराअंती न बदलण्याचा निर्णय घेतला. कारण काहींना हे आवडते, काहींना नाही. आपण जगात एकाच वेळी सर्वांनाच खुश नाही ठेऊ शकत ना. मग त्यापेक्षा स्वत:ला खुश ठेवा, स्वच्छंदपणे जगा Happy

Pages