अमरीश पुरीला आपण "बावजी" च्या रूपात अनेकदा पाहिले आहे. तो लंडन मधे ब्रिटिशांसारखा व अमेरिकेत अमेरिकनांसारखा असतो पण त्याचा भूगोल व दिशाज्ञान तसे कच्चेच. साधे लंडन मधे आपल्या घरून आपल्याच दुकानात जायला तो पुण्यातील रिक्षावाल्याने नवख्या व्यक्तीस फिरवून न्यावे तसा कोठून कोठून फिरून जातो. अमेरिकेत त्याच्या हॉलीवूड मधल्या म्हणजे समुद्रकिनार्यावरून बरेच मैल आत असलेल्या शहरातील घराखालीच समुद्रकिनारा व मरीना असतो, व त्या शहरातील "सबसे बडा पेपर" हा न्यू यॉर्क टाइम्स असतो. त्याला १८ मुले व १७ मुली असल्यातरी एक मानलेला मुलगाही असतो. व तो फावल्या वेळात भारतात आल्यावर ताजमहाल चा गाइड बनतो. तो जर भारतात राहात असला तर अमेरिकेहून शिकून भारतात आलेल्या मुलाकडे तो यायच्या दिवशीही ढुंकूनही न पाहता पेपर वाचत बसतो. तरीही तो एक यशस्वी दुकानदार्/उद्योजक गणला गेला. त्यामुळे ते आपण सोडून देऊ.
पण जेव्हा तो मोगँबो, जनरल डाँग, ठकराल, भुजंग ई. बनला तेव्हा असे यश तेथे मिळवू शकला नाही. माबोवर असल्या गोष्टींचा अभ्यास असलेल्या अनेक लोकांना वेळीच कन्सल्ट न केल्याने त्याचे नुकसान झालेच पण अनेकदा फालतू हीरो लोक जिंकून बॉलीवूडचे ही झाले. यातील अर्ध्याएक केसेस मधे तरी पब्लिक अमरीश पुरीच्या बाजूने असे पण कधी त्याचे टॅक्टिक्स, कधी चोरी/अन्याय कसा करावा याबद्दल असलेली मर्यादित समज, तर कधी त्याचा अस्थानी मेकअप्/कॉस्च्युम यामुळे तो प्रत्येक वेळेस हरला. त्या चुकांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. भावी चित्रपटांतील व्हिलन्सना यापासून बोध घेता यावा म्हणून इथे एक प्रबंधवजा बाफ उघडलेला आहे. तो पूर्ण करण्यास माबोवरील एक्स्पर्ट्सनी हातभार लावावा ही नम्र विनंती.
शानमधला शाकालपण अंगठ्या
शानमधला शाकालपण अंगठ्या वाजवतो ना?
तेवढंच नाही फा, ते लोक फक्त
तेवढंच नाही फा, भोक्तास्पर्धक फक्त भांग बदलून किंवा दिवाळीतल्या सापाच्या गोळीसारखा मस लावून यायचे पण व्हिलन्स त्या दूरदर्शनवरील 'किलबिल' शैलीतल्या मेकओव्हरला कधीही हसायचे नाही. उलट प्रोत्साहन द्यायचे व पार्टीत 'शामिल' होऊन तेवढ्यापुरतं सगळा दुरावा विसरून धीर धरत हसतमुखाने गाणं संपायची वाट बघायचे, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण रे बाबा! शेवटती फजिती होईपर्यंत त्यांच्याइतकं रूपगुणकलासंपन्न कोणी नसायचं. 'कशी डायरेक्टरने थट्टा आज मांडली' असे शीर्षक असणारा तेव्हाच्या व्हिलन्सचा सामूहिक कोतबो हवा !
सर्वच प्रतिसाद
शालिमारमध्ये प्रॉपर
शालिमारमध्ये प्रॉपर दाक्षिणात्य संगीतसभा आहे व्हीलनच्या हवेलीत. शेवटीसुद्धा तो निवांत cctv पाहत बॅकग्राउंडला वाजणारे 'मेरा प्यार शालिमार' ऐकत बसलेला असतो.
दूरदर्शनवरील 'किलबिल'
दूरदर्शनवरील 'किलबिल' शैलीतल्या मेकओव्हरला कधीही हसायचे नाही. >>>
कहर पॅरा आहे तो आख्खा. तो क्लास अॅक्शन कोतबो मस्त होईल 
शालिमारमध्ये प्रॉपर दाक्षिणात्य संगीतसभा आहे व्हीलनच्या हवेलीत. >>>
दिवाळीतल्या सापाच्या
दिवाळीतल्या सापाच्या गोळीसारखा मस लावून यायचे<<<<< फारच चित्रदर्शी वर्णन!
व्हिलन्स व्हायला 'अतिशय पेशंट असणे' हाही एक महत्त्वाचा क्रायटेरिया असावा. 'राजतिलक'मध्ये 'आ गये... आ गये...' करत इतके लोक येत असतात तरी राजकिरण, वगैरे व्हिलन पार्टी 'चला ए.. बस झालं.. सेवक, दरवाजा लावून घ्या आता. एन्ट्री नाही कुणालाच.' म्हणत नाही. ते बसतात चुपचाप आ गये.. आ गये.. ऐकत आणि नाच पहात.
खरंय श्रद्धा, नायक मात्र दहा
खरंय श्रद्धा, नायक मात्र दहा बारा जणं जमली तरी 'आ गये मेरी मौतका तमाशा देखने के लिये' म्हणून चिडचिड सुरू , किंवा जो समोर आहे आधी त्याला बोलायचं सोडून 'जाओ पहले उस आदमी की साईन जिसने ...हे किया था आणि ते किया था'.... माईन्डफुलनेस आणि अगत्य म्हणून काही नाहीच.
प्राण्यांना अंडरएस्टिमेट करणे
प्राण्यांना अंडरएस्टिमेट करणे
बॉलिवूड व्हिलन्सना यशस्वी होण्याकरिता विस्तृत डोमेन नॉलेज असणे गरजेचे आहे. उदा. गुरबचन सिंगला नोकरी दिल्यास त्याचा विमा उतरवू नये, कारण तो मरतोच मरतो. निरुपा रॉयची हरवलेली मुले तिला स्वत:ची पदरमोड करून परत मिळवून द्यावीत कारण तिच्यापासून दूर गेल्यानंतर ती व्हिलन विनाशक बनण्याचे चान्सेस वाढतात इ. इ. पण या सर्वोपरी त्यांनी ध्यानात ठेवले पाहिजे की प्राणीमात्रांना, खासकरून हिरोच्या संपर्कातील पशु-पक्ष्यांना चुकूनही कमी लेखू नये. एकवेळ हिरोला तुम्ही मात द्याल पण हिरोच्या मित्रपशुला कदापि नाही. ही बाब लक्षणीय आहे कारण ही हिरोंनाही लागू पडते.
तेरी मेहेरबानियां
जग्गु दादा आणि पूनम धिल्लाँ हिरो-हिरवीण, व्हिलन म्हणून पुरीसाहेबांसोबत सदाशिव अमरापूरकर, असरानी वगैरे मंडळी. सिनेमाच्या सुरुवातीला भिडूने एका रस्त्यावरून उचलून आणलेल्या तपकिरी रंगाच्या पिल्लाची सुश्रुषा करून त्याचे काळ्या रंगाच्या कुत्र्यात रुपांतर केलेले असते. त्याचे नाव मोती. एका पॉईंटला पूनम काही किरकोळ कारणावरून रागावून मोतीला एका खोलीत डांबून ठेवते. लग्गेच अमरीश व सदाशिव येऊन जे करायचे ते करून निघून जातात. पुढे भिडू पिकनिकला जातो तर मोतीला झाडाला बांधून ठेवतो. लग्गेच अमरीश व गँग येते आणि मोतीच्या डोळ्यादेखत जग्गु दादांना ठार करते. मोतीवर दादांच्या अंत्ययात्रेत पुष्पमाळा चढवण्याची आणि आसवे ढाळण्याची (क्लोजअप मध्ये) वेळ येते. अगदी भडाग्नि देखील मोतीच देतो.
पण यातून व्हिलन अमरीश पुरी काहीच धडा घेत नाही. जो कुत्रा आपल्या मालकाचा अंत्यसंस्कार करू शकतो, त्याचे श्रद्धांजलिवजा स्मारक बनवून घेऊ शकतो, मालकाच्या खुनाचा पुरावा असलेला कॅमेरा कित्येक एकर पसरलेल्या जंगलातून शोधून काढू शकतो अशा कुत्र्याला अंडरएस्टिमेट केले तर हिरो असा वा व्हिलन तुमचा खेळ संपला.
>>>>सिनेमाच्या सुरुवातीला
>>>>सिनेमाच्या सुरुवातीला भिडूने एका रस्त्यावरून उचलून आणलेल्या तपकिरी रंगाच्या पिल्लाची सुश्रुषा करून त्याचे काळ्या रंगाच्या कुत्र्यात रुपांतर केलेले असते.

'आ गये... आ गये >>> आठवण नको
'आ गये... आ गये >>>
आठवण नको. नुसतं आठवूनही भयंकर हसू येतं.
कमांडो नावाचा बी सुभाषचा एक पिक्चर आहे. हा तोच डान्स डान्स चा डायरेक्टर. परिणामतः या पिक्चरमधे सगळी तीच कास्ट दिसते (सरला येवलेकर सहित
) यात पुरी मार्सेलोनी लावाचा व्हिलन आहे. पण 'हमको हथियार मांगता' छापाचं हिंदी बोलायचं सोडून तो 'महोदय, शुभरात्री' अश्या शब्दांची रेलचेल असलेलं हिंदी बॉब क्रिस्टोपेक्षा डेंजर अॅक्सेंट्मधे बोलत असतो. अधूनमधून ही अॅक्सेंट गडबडते पण ते सोडून देऊ.
या मार्सेलोनीला मिटिंग़ घ्यायचा फार सोस असतो. त्यात सतत एक्स पी २ नावच्या मिशनची चर्चा होत असते. म्हणजे भारतात धार्मिक दंगे घडवून आणणे ही मिशन. मग म्हणे आपल्याला हथियार हवेत. त्यासाठी तरूणांना ड्रग्जच्या नादी लावा म्हणजे थोडाफार गोलाबारूद आपल्याला दरम्यानच्या काळात जमा करता येईल. एक ना धड टायपाचं प्लॅनिंग केल्यामुळे याला सतत मिटिंगा घ्यायला लागत असाव्यात.
सगळ्यात मोठी चूक म्हणजे हा कुठल्याश्या नो मॅन्स लँड मधे अड्डा बांधून असतो. त्यातून यायला जायला फक्त रोपवे. मग काय मिथूनच्या पथ्यावर पडतं ते आणि अमरीश पुरी रोपवेवरून खाली पडून मरतो.
या पिक्चरमधे पळून जायच्या आधी त्याने ज्या कॅज्युअली मशीनगनच्या गोळ्या चुकवल्या आहेत ते केवळ बघण्यासारखं
हे किया था आणि ते किया था'...
हे किया था आणि ते किया था'.... माईन्डफुलनेस आणि अगत्य म्हणून काही नाहीच. >>>
एकवेळ हिरोला तुम्ही मात द्याल पण हिरोच्या मित्रपशुला कदापि नाही >>>
रस्त्यावरून उचलून आणलेल्या तपकिरी रंगाच्या पिल्लाची सुश्रुषा करून त्याचे काळ्या रंगाच्या कुत्र्यात रुपांतर केलेले असते. >>>
ते बसतात चुपचाप आ गये.. आ गये.. ऐकत आणि नाच पहात. >>>
फार सुपरलोल कॉमेण्ट्स व निरीक्षणे आहेत. श्रद्धा - पेशंट बरोबर भिडस्तही असावे लागतात. अरे येताय तर या आणि नाचा गपचूप. रेल्वे स्टेशनसारखी उद्घोषणा करायची काय गरज आहे असे यांना नक्की म्हणावेसे वाटत असेल. पण काही बोलत नाहीत.
एक ना धड टायपाचं प्लॅनिंग केल्यामुळे याला सतत मिटिंगा घ्यायला लागत असाव्यात. >>>
आता मला कोणत्याही मीटिंग मधे हेच आठवेल
ड्रग्ज्स, हथियार, लाशे ई प्रत्येकाकरता एक एक जिरा बनवून अजाइल पद्धतीने स्टॅण्डिंग मीटिंग सुरू आहे. हीरोच्या कोणालातरी बांधून ठेवायच्या जिरावर सध्या कोण काम करत आहे वगैरे चौकशा सुरू आहेत.... शंभर बंदुका आणायला दहा पर्सन वीक्स... लाशे आणताना गडबड झाल्याने आपोआप आणखी लाश मिळाल्या. त्यामुळे टीम ते प्रॉमिस केल्यापेक्षा जास्त डिलीव्हर केल्याचे उत्साहाने सांगत आहे... रम्य कल्पना.
हायला 100 प्रतिसाद..
हायला 100 प्रतिसाद.. मायबोलीवर अमरीश यशस्वी ठरला तर...
तेरी मेहेरबानिया वरून एक धमाल
तेरी मेहेरबानिया वरून एक धमाल किस्सा आठवला. हा A सिनेमा होता. आणि ह्याच्याबरोबरीनंच रामतैरीगंगामैली पण रिलीज झाला होता तो U म्हणजे सर्वांसाठी होता
आमच्या ज्यु काॅलेजातल्या वर्गातली डेरींगबाज आणि बेदरकार मुलं साडेसतराव्या वर्षी मिटक्या मारत ते. मेहेरबानियां बघायला गेली आणि कुत्रं बघून आली आणि आज्ञाधारक साध्याभोळ्या मुली बाळगोपाळांसाठी असलेल्या रा.तै.गं. मै बघून आल्या.

दुस-या दिवशी सर्व डेरींगबाज चेहेरा लपवत होती
इथे घाउक प्रमाणात हसवून मिळेल
इथे घाउक प्रमाणात हसवून मिळेल असा बोर्ड लावा धाग्यावर.
सगळे चित्रपट चिरफाड एक्स्पर्ट एकाच धाग्यावर दणादण हास्यस्फोट घडवत आहेत.
सगळे चित्रपट चिरफाड एक्स्पर्ट
सगळे चित्रपट चिरफाड एक्स्पर्ट एकाच धाग्यावर दणादण हास्यस्फोट घडवत आहेत. >>+11
माईन्डफुलनेस आणि अगत्य म्हणून
माईन्डफुलनेस आणि अगत्य म्हणून काही नाहीच.<<<<
तरी ते प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत...
तेरी मेहरबानियां ची अख्खी पोस्ट -
पण 'हमको हथियार मांगता' छापाचं हिंदी बोलायचं सोडून तो 'महोदय, शुभरात्री' अश्या शब्दांची रेलचेल असलेलं हिंदी बॉब क्रिस्टोपेक्षा डेंजर अॅक्सेंट्मधे बोलत असतो. <<<<<
हा असाच प्रकार 'विश्वात्मा'मध्ये आहे. केनयातल्या शाळांमध्ये तेव्हा पूर्ण हिंदी, पूर्ण संस्कृत आणि हिंदी+संस्कृत पर्याय असावेत आणि त्यातून तपस्वी गुंजालने हिंदी+संस्कृत पर्याय घेतला असावा, हे त्याचं बोलणं ऐकून सहज कळतं.
सगळ्यात मोठी चूक म्हणजे हा कुठल्याश्या नो मॅन्स लँड मधे अड्डा बांधून असतो. त्यातून यायला जायला फक्त रोपवे. <<<<< गेम ऑफ थ्रोन्स मध्ये बॅलोन ग्रेजॉयच्या कॅसलमधले टॉवर्स झुलत्या पुलांनी कनेक्टेड असणे यामागची प्रेरणा तो रोपवेवाला अड्डा असावा.
मोगॅम्बो अजून जगला असता तर
मोगॅम्बो अजून जगला असता तर अंगठ्या वाजवल्याने सुपरपॉवर येऊन नंतर नंतर त्या गोलांत भविष्य दिसू लागले असते. >>>>>> अमरीश पुरींना ब्रम्हास्त्रामध्ये जरूर रोल मिळाला असता।
धमाल चालू आहे इथे!
सगळे चित्रपट चिरफाड एक्स्पर्ट एकाच धाग्यावर दणादण हास्यस्फोट घडवत आहेत. >>+11
Btw फारएन्ड, सर च्या
Btw फारएन्ड, सर च्या चर्चेवरून मला तू पोस्ट केलेलं 'कटी लाश' आणि 'सर कटी लाश' आठवलं.
'कटी लाश' आणि 'सर कटी लाश'
'कटी लाश' आणि 'सर कटी लाश' आठवलं >>>
हे मी लिहीलं होतं? मलाच लक्षात नाही 
सगळेच...
तर हॅरिसन फोर्डाची बाईल त्याला विचारते "Have you ever seen anything like this before?" तो डोळ्याची पापणी न लवता "Nobody's seen this for 100 years." म्हणतो. समोर दात पडकी, मुडदूस झाल्यागत मोठ्ठं डोकं नि हातापायाच्या काड्या असलेली काली माँ असते. बरीच लोकं "शीघ्रम शीघ्रम" म्हणत असतात नि डोक्यावर कबीर बेदीचा मोहेंजोदारोतला टोप घालून अमरिश पुरी बाहेर येतात. मग एक नरबळी आणतात. तो "ओम numb शिव A" असा जप करत असतो. अमरिश पुरी त्याचे काळीज काढतात. हॅरिसनची बाईल किंचाळते. तिचं फूटेज कटाप. नरबळीला पिंजर्यात घालून अॅसिड-आग असल्या कशात तरी टाकतात... हातातले काळीज पेट घेते.. कापूर कसा आपोआप विझतो तसं काळीज विझतं अन् अमरिश पुरी आल्या पावली परत जातात.... खोट नाही - हा इंडियाना जोन्स....
तो नुसत्या हाताने काळीज फाडून
तो नुसत्या हाताने काळीज फाडून काढण्याचा सीन अतिशय घाणेरडा आहे. एखाद्याच्या 'काळजाला हात घालणं' म्हणतात तेव्हा तो सीन आठवतो मला. ते माझ्या मनावर ठसवण्यात अमरीश पुरी यशस्वी झाला आहे.
इंडीयांना जोन्स च्या अमरीश
इंडीयांना जोन्स च्या अमरीश पुरी सीन्स ने जाम करमणूक केली होती.
लोना , माझा बळी गेला हसून.
गुहेत कुठे सूर्यप्रकाश मगं कालीला 'ड' जीवनसत्त्वाभावी मुडदूस झाला ते काय नवल. अमेरिकन उच्चारात 'बॅचावो' किंकाळणाऱ्या नरबळीने बिना सेडेटिव्ह शब्दशः ओपन हार्ट सर्जरी सहन केली म्हणून तो नंतर तरी वेदना बधिर व्हाव्यात यासाठी 'हे शिव ए, मला नम्ब कर' म्हणतोय.मोहंजोदोरोचा टोप हा 'नेटिव्ह इंडियन धैर्य' व 'झिंगालाला-हो शौर्य' या दोन्हींचा सुवर्णमध्य आहे.
पायस , तेरी मेहेरबानीयां
श्रद्धा, पायस, rmd, अस्मिता
श्रद्धा, पायस, rmd, अस्मिता तुमचे प्रतिसाद एक सो एक आहेत. धागाकर्ता फारएण्डने चांगल्या विषय सर्वांसमोर ठेवलाय.
'कशी डायरेक्टरने थट्टा आज
'कशी डायरेक्टरने थट्टा आज मांडली' असे शीर्षक असणारा तेव्हाच्या व्हिलन्सचा सामूहिक कोतबो हवा !
सर्वच प्रतिसाद Lol
Submitted by अस्मिता. on 14 October, 2022 - 14:18 >>>>>>>>>>>> कोणीतरी काढाच याचा धागा । हा हा हा हा हा हा
तेरी मेहरबानियां ची अख्खी
तेरी मेहरबानियां ची अख्खी पोस्ट >>

एक ना धड टायपाचं प्लॅनिंग केल्यामुळे याला सतत मिटिंगा घ्यायला लागत असाव्यात. >>
केनयातल्या शाळांमध्ये तेव्हा पूर्ण हिंदी, पूर्ण संस्कृत आणि हिंदी+संस्कृत पर्याय असावेत आणि त्यातून तपस्वी गुंजालने हिंदी+संस्कृत पर्याय घेतला असावा >>
रच्याकने, सर जुडा जितक्या
रच्याकने, सर जुडा जितक्या सफाईने ग्लासवर अंगठी वाजवून कम्युनिकेट करतो, ते पाहता तो व्हीलनगिरीकडे वळण्याआधी आरडी बर्मन यांच्याकडे वाद्यमेळासाठी काम करत असावा आणि 'चुरा लिया है तुमने..' मध्ये सुरुवातीला त्यानेच ग्लासवर चमचा वाजवला असावा. पण योग्य ते क्रेडिट न मिळाल्याने त्याने व्हिलन व्हायचे ठरवले असावे. Proud
धन्यवाद श्रद्धा.. सर जुडाची आठवण करून दिल्याबद्दल...!! ही पोस्ट म्हणजे लोल... आरडी बर्मन यांनी व्हीलन लोकांनाही संधी दिली होती तर. मग आमच्या अमरीश भाईनी काय यांचे घोडे मारले होते (की ग्लास फोडला होता) ? कारण अमरीश पुरींना आरडींनी कधीच संधी दिली नाही.
सर मिझ्या, सर जॉन यांचा बाप म्हणावा असा सर म्हणजे सर जुडा होता. (ह्याला कसा विसरलो मी?) ते ग्लासावर अंगठी वाजवून कम्युनीकेट करणे इतके भारी होते की खुद्द रोहीत शेट्टीला पण हे कॉपी करायचा मोह आवरला नाही. त्याने एका चित्रपटात जॉनी लिव्हरला विनोदी मुका गुंड टोबी दादा बनवून तो ग्लासात चमचा वाजवून कम्यूनीकेट करतो असे दाखवले आहे. टोबी दादांना काय सांगायचे आहे हे त्यांचा चमचा (म्हणजे ग्लासातला नव्हे तर दुसरा चमचा भाई) हे लोकांना सांगत असतो. अर्थात जॉनी भाईंनी हा रोल पण मस्तच केला आहे.
Pages