अमरीश पुरी - एक अयशस्वी व्हिलन

Submitted by फारएण्ड on 6 October, 2022 - 18:55

अमरीश पुरीला आपण "बावजी" च्या रूपात अनेकदा पाहिले आहे. तो लंडन मधे ब्रिटिशांसारखा व अमेरिकेत अमेरिकनांसारखा असतो पण त्याचा भूगोल व दिशाज्ञान तसे कच्चेच. साधे लंडन मधे आपल्या घरून आपल्याच दुकानात जायला तो पुण्यातील रिक्षावाल्याने नवख्या व्यक्तीस फिरवून न्यावे तसा कोठून कोठून फिरून जातो. अमेरिकेत त्याच्या हॉलीवूड मधल्या म्हणजे समुद्रकिनार्‍यावरून बरेच मैल आत असलेल्या शहरातील घराखालीच समुद्रकिनारा व मरीना असतो, व त्या शहरातील "सबसे बडा पेपर" हा न्यू यॉर्क टाइम्स असतो. त्याला १८ मुले व १७ मुली असल्यातरी एक मानलेला मुलगाही असतो. व तो फावल्या वेळात भारतात आल्यावर ताजमहाल चा गाइड बनतो. तो जर भारतात राहात असला तर अमेरिकेहून शिकून भारतात आलेल्या मुलाकडे तो यायच्या दिवशीही ढुंकूनही न पाहता पेपर वाचत बसतो. तरीही तो एक यशस्वी दुकानदार्/उद्योजक गणला गेला. त्यामुळे ते आपण सोडून देऊ.

पण जेव्हा तो मोगँबो, जनरल डाँग, ठकराल, भुजंग ई. बनला तेव्हा असे यश तेथे मिळवू शकला नाही. माबोवर असल्या गोष्टींचा अभ्यास असलेल्या अनेक लोकांना वेळीच कन्सल्ट न केल्याने त्याचे नुकसान झालेच पण अनेकदा फालतू हीरो लोक जिंकून बॉलीवूडचे ही झाले. यातील अर्ध्याएक केसेस मधे तरी पब्लिक अमरीश पुरीच्या बाजूने असे पण कधी त्याचे टॅक्टिक्स, कधी चोरी/अन्याय कसा करावा याबद्दल असलेली मर्यादित समज, तर कधी त्याचा अस्थानी मेकअप्/कॉस्च्युम यामुळे तो प्रत्येक वेळेस हरला. त्या चुकांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. भावी चित्रपटांतील व्हिलन्सना यापासून बोध घेता यावा म्हणून इथे एक प्रबंधवजा बाफ उघडलेला आहे. तो पूर्ण करण्यास माबोवरील एक्स्पर्ट्सनी हातभार लावावा ही नम्र विनंती.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वार चुकवताना बच्चनचा नुसता धक्का लागून तो परत खाली पडतो आणी गळफास लागून तात्काळ मरुन जातो. >>> Lol तत्काळ मरून जातो हे खतरनाक आहे.

हो परवाच यू ट्यूबने शहेनशाह समोर ठेवल्यामुळे पाहिला होता तो सीन. त्या जजने विचार केला असेल इतक्या लोकांना फाशी सुनावली ती अशी अशी असते वाटतं Happy पुढे इतर मर्डर केस मधे जज वैतागून याला इथेच वरती लटकवा अशीही शिक्षा देत असेल.

कुठला बरं सिनेमा तो, ज्यात आपला बच्चन त्याचं तोंड कमोडमधे बुडवतो.

चकचकीत 3/4th बाथरोब, त्यावर फरचं मोठ्ठं जानवं, हाताशी दोन चमचमणा-या आणि वळवळणा-या निळ्या जांभळ्या ललना, पायाशी काळे साप, कडेला थोरली मोठी काळी कुत्री, सुरया, मादक द्रव्यं, भकाभक आग ओतणा-या मशाली वगैरे लवाजमा घेऊनच बरेचदा ह्या काकांची एन्ट्री व्हायची.

याराना?
-------
उप्स! मी हा बच्चनचा धागा समजलो.
114.gif
वरील सगळं बच्चन ने केलंय असं समजून याराना का असे विचारले.

महान नावाचा एक सिनेमा होता त्यात अमितने अशक्य आचरट पणा केला आहे. एक तर ट्रिपल रोल. त्यात झीनी बेबी. ( समंदर में नहाके और भी नमकीन हो गयी हो) पण ह्यात एक त्याचा अर्धवट राव सारख्या भावल्या बरोबर एक सीन आहे स्वीमिन्ग पूल मध्ये. त्यात यलो बनिअन व लाल बारक्या शॉर्ट घातल्या आहेत. व फारच विनोदी आहे हा सीन. कोणीतरी बघुन लिहा ना.

त्यात झीनी बेबी. ( समंदर में नहाके और भी नमकीन हो गयी हो)
- हे गाणे पुकार सिनेमात आहे.

महान नावाचा एक सिनेमा होता
- या सिनेमात आमरस पुरी नाही. अमजद खाँसाहेब आहेत.

'डान्स डान्स डान्स' नामक पिक्चरात अमरीश पुरीने जीव गमावून घेतला आहे. यात तो इतका आहारी गेलाय की समोरची डान्सर सरला येवलेकर आहे याचाही त्याला फरक पडत नाही
ती डान्सर, जेव्हा डाँग तलवार परजत तिच्या मागे येतोय तेव्हा ती सध्या फेमस असलेली दोन्ही हात मागे पुढे क्रॉस नी कंबर एकाबाजुला लचकवायची स्टेप करतेय. (फ्लॉस डान्स).

शहेनशहा बाबत सहमत... जेव्हा एखादा माणूस आपला जीव वाचवतोय तर पुरता आपला जीव वाचवला गेला नसतानाही त्या माणसाचा जीव घ्यायचा का प्रयत्न करायचा? वरती येऊन, शांतपणे बसून, पाणी पिऊन, जरा पश्चातापाने रडण्याचे नाटक करत चाकू बाहेर काढायचा ना?

का त्यांना आत्महत्याच करायची होती? नाहीतरी कबुलीजबाब दिलाच आहे, जज कोर्टात शिक्षा देणार, शहेनशहा परत बदडणार, पोलिस जेलमध्ये धुणार व नंतर फाशी होणार, हे टाळण्यासाठी आत्ताच मरून जावे असा सुज्ञ विचार तर नव्हता या मागे?

जनरिक गुंड हे महान आहे.. Lol

तात्काळ मरून जातो..... <<<<< Lol

बर, एवढं करुन त्याला जरी मारला तरी नुकतीच गुन्ह्यांची कबूली दिल्यावर, जज पोलीस आणी शेकडो लोकांच्या साक्षीने त्याला मारुन काय मिळणार होते अमरीश पुरीला? <<<<<
ज्याच्यामुळे आपल्याला शिक्षा झाली त्याला मारल्याचे समाधान! नव्हते पण त्याच्या नशिबी!!

सिनेमा - नगीना. पूर्वजांच्या पडक्या हवेलीत फार साफसफाई न करता पूजा आयोजित करून, आपल्या उपद्व्यापी लेकराला अनवाणी इकडे तिकडे बागडायला सोडून, त्याला साप चावल्यावर हे लोक आकांत करतात न करतात तोच पुढच्या मिनिटाला अमरीश पुरी तिथे हजर. फिरता मांत्रिक! 'सापाचे विष उतरविनार, नागमनी शोधनार, सापाचे प्रान मानसात न मानसाचे सापात ट्रॅन्स्फर कर्नार... चला... मांत्रिकेsssssय!' आरोळीची कमतरता आहे फक्त.

नंतर इच्छाधारी नागीण श्रीदेवीच्या सासूच्या मनात तिची सून नागीण असल्याचे सांगून हा अक्षरशः विष कालवतो. सिनेमा आहे की एकता कपूरची मालिका? बरे, त्या मनुष्य बाईला हे सांगून काय होणार आहे? ती काय लगेच नागिणीला सासूच्या नात्याने छळणार आहे? नागिणीने एक फुत्कार टाकला तर तासभर बेशुद्ध पडेल. ह्या सगळ्या प्रकरणाचे फलित म्हणजे त्याला नागिणीची सासू बंगल्याच्या हॉलमध्ये बसून बीन वाजवायची परमिशन देते. एवढ्याश्या गोष्टीला याला एवढे सायास लागत असतील, तर याला नागमणी अजिबातच मिळणार नाही, हे अगदी बालप्रेक्षकही ओळखतील.

'सापाचे विष उतरविनार, नागमनी शोधनार, सापाचे प्रान मानसात न मानसाचे सापात ट्रॅन्स्फर कर्नार... चला... मांत्रिकेsssssय!'

Rofl

'सापाचे विष उतरविनार, नागमनी शोधनार, सापाचे प्रान मानसात न मानसाचे सापात ट्रॅन्स्फर कर्नार... चला... मांत्रिकेsssssय! >>>
अक्षरशः विष कालवतो >>>
सिनेमा आहे की एकता कपूरची मालिका? >>>
ह्या सगळ्या प्रकरणाचे फलित म्हणजे त्याला नागिणीची सासू बंगल्याच्या हॉलमध्ये बसून बीन वाजवायची परमिशन देते. >>>
नागिणीने एक फुत्कार टाकला तर तासभर बेशुद्ध पडेल >>> Lol सगळेच कहर वर्णन आहे. इतर रोल्स मधे काही स्पेसिफिक चुकांमुळे तो मेला/पकडला गेला. इथे चुकीच्या प्रोफेशन मधे आल्यासारखा बेसिकमधेच लोच्या आहे अमरीश पुरीच्या.

सापाचे विष उतरविनार, नागमनी शोधनार, सापाचे प्रान मानसात न मानसाचे सापात ट्रॅन्स्फर कर्नार... चला... मांत्रिकेsssssय! >> Rofl Rofl

श्रद्धा ...भन्नाट लिहीलेयं. हहपुवा...

वाटतंय की अमरीश पुरी आता वरून खालती येऊन फारएण्ड साहेबांची बकोटी धरतील. का हा धागा काढला म्हणून...

नीट विचार केल्यावर लक्षात आले की काही चित्रपटात अमरीश पुरींवर अन्याय सुभाष घईंनी केला आहे. त्यांना व्हीलन म्हणून ग्रो व्हायचा स्कोपच ठेवला नाही.

उदा :
विधाता मध्ये अमरीश पुरींना मेन व्हीलन म्हणून दाखवायला सुरूवात केली न केली तोच दिलिप कुमार यांना स्मगलिंग मध्ये टाकून मोठा डॉन केलेयं. दिलिप कुमार यात स्मगलिंगचा वारसा मानस बाप सर मिझ्या (श्रीराम लागू) कडून घेतात... काय तो बॉस...!!! शाळामास्तर, गंजलेला बाप असे रोल करणार्‍या माणसाकडून स्मगलिंग शिकून मोठ्या झालेल्या दिलिपकुमारांपुढे अमरीश पुरींना कमी लेखणे म्हणजे काय बोलायचे आता...?

रामलखन मध्येही अमरीश पुरी व्हीलन बॉस म्हणून मोठे होत आहे न आहे तोच सर जॉन (रझा मुराद) यांना चित्रपटात अजून मोठा बॉस म्हणून आणून परत अमरीश पुरींवर अन्याय केला आहे. जोडीला आचरटपणा साठी गुलशन ग्रोव्हरला पण आणले आहे व अनिल कपूरला ही थोडी निगेटीव्ह रंगवले आहे. पुरींना मग जास्त स्कोप ठेवलेलाच नाही.

सौदागर मध्ये राजकुमार यांचा मेव्हणा म्हणून अमरीश पुरींना व्हीलन केले आहे. आता राजकुमार ज्या चित्रपटात असतात त्यात इतर हिरो, हिरॉईन, छोटे मोठे कलाकार, स्पॉटबॉय, दिग्दर्शक, निर्माता यांना काहीच करायचे नसते. तेथे पुरींची व्हीलनगिरी कशी चालेल बरे?

एवढे जर अन्याय होत असतील तर अमरीश पुरी अपयशी झाले याचे आश्चर्य वाटायला नको बहुतेक.

अवांतर
सुभाष घईंच्या चित्रपटातील मोठ मोठ्या व्हीलनला "सर" ही उपाधी देण्याचे प्रयोजन काय? सर मिझ्या, सर जॉन वगैरे. अमरीश पुरींना पण एकदाही सर उपाधी घईंनी दिली नाही हे सुद्द्धा सांगावे वाटते. हे ही एक अपयशच त्यांचे.. Sad

'सापाचे विष उतरविनार, नागमनी शोधनार, सापाचे प्रान मानसात न मानसाचे सापात ट्रॅन्स्फर कर्नार... चला... मांत्रिकेsssssय! >>
अक्षरशः विष कालवतो >>
ह्या सगळ्या प्रकरणाचे फलित म्हणजे त्याला नागिणीची सासू बंगल्याच्या हॉलमध्ये बसून बीन वाजवायची परमिशन देते. >>
कहर लिहीलंय Lol

>> दिलिप कुमार यांना स्मगलिंग मध्ये टाकून मोठा डॉन केलेयं. दिलिप कुमार यात स्मगलिंगचा वारसा मानस बाप सर मिझ्या (श्रीराम लागू) कडून घेतात

चक्क??? Lol अरे ही तर उलट गंगा झाली. मास्तर श्रीराम लागूंकडून स्मगलिंगचा वारसा घेतेलेले दिलीपकुमार, स्मगल्ररोंके सरताज अमरीश पुरीं पेक्षा मोठे होतात.... अरे सुभाष घई साब, हे सगळे स्क्रिप्ट आणि बजेट नुसार योग्य असले तरी..... कुठे फेडाल हे पाप Biggrin
थांबा बघतोच आता विधाता चा सुरवातीचा भाग

आता राजकुमार ज्या चित्रपटात असतात त्यात इतर हिरो, हिरॉईन, छोटे मोठे कलाकार, स्पॉटबॉय, दिग्दर्शक, निर्माता यांना काहीच करायचे नसते >>> Lol

सगळी पोस्टच धमाल आहे. पुरीसाहेबांवरच्या अन्यायाला वाचा फोडणारी. हे सह्या मोहिम घ्यायला हवी स्क्रिप्ट-नाइटहूड साठी.

शाळामास्तर, गंजलेला बाप असे रोल करणार्‍या माणसाकडून स्मगलिंग शिकून >>> लोल. पण श्रीराम लागू कोणत्याही रोल मधे सहज फिट्ट व्हायचे. फाटका बेवडा (लावारिस), किंवा गडगंज इस्टेटवाला धनाढ्य (मुकद्दर का सिकंदर, दो और दो पाँच), गरीब शाळामास्तर (सामना), अट्टल राजकारणी (सिंहासन). त्यांनाही ते सर द्यायचे राहिले. पण ते झाले असतील एखाद्या रोल मधे नॉन-व्हिलन अर्थाने सर.

सुभाष घईंच्या चित्रपटातील मोठ मोठ्या व्हीलनला "सर" ही उपाधी देण्याचे प्रयोजन काय? सर मिझ्या, सर जॉन वगैरे.<<<<<
सर जूडा.. (कर्ज)

रच्याकने, सर जुडा जितक्या सफाईने ग्लासवर अंगठी वाजवून कम्युनिकेट करतो, ते पाहता तो व्हीलनगिरीकडे वळण्याआधी आरडी बर्मन यांच्याकडे वाद्यमेळासाठी काम करत असावा आणि 'चुरा लिया है तुमने..' मध्ये सुरुवातीला त्यानेच ग्लासवर चमचा वाजवला असावा. पण योग्य ते क्रेडिट न मिळाल्याने त्याने व्हिलन व्हायचे ठरवले असावे. Proud

Lol हो श्रद्धा. जे दिल नाही चोरू शकले ते पैसा चोरू लागले. इस जालिम समाज ने इनको ऐसा बनाया.

या व्हिलन लोकांचा अंगठीने काही वाजवण्याचा काही कोड असावा. मोगँबो सुद्धा करत असे बहुधा. आता बरीच वर्षे झाली पण त्याचा इण्ट्रो सीनच होता बहुतेक तो हे कोड वाजवताना.

हो ते त्याच्या सिंहासनाच्या हातांना काहीतरी काचेचे गोल (पृथ्वीगोल!) असतात, त्यावर वाजवतो अंगठ्या. मोगॅम्बो अजून जगला असता तर अंगठ्या वाजवल्याने सुपरपॉवर येऊन नंतर नंतर त्या गोलांत भविष्य दिसू लागले असते.
मिस्टर इंडियात अंगठ्या, तहलका मध्ये सतार, विश्वात्मा मध्ये आफ्रिकन वाद्ये... अमरीश पुरी खरा संगीतप्रेमी व्हिलन!

पृथ्वीगोल >> तिकडे हर्क्युलिस आल्प्समधे गेला असता संन्यास घेऊन हा पिक्चर आल्यावर. इतक्या जिकीरीने पृथ्वीगोल उचलला त्याने. इथे लिटरली बोटावर नाचवतोय मोगॅम्बो.

अमरीश पुरी खरा संगीतप्रेमी व्हिलन! . >> हो. भोक्तास्पर्धेत अमजद व ज्वेल थीफमधल्या व्हिलनला कधीच बीट केले हरवले त्याने. संगीतप्रेमी म्हंटल्यावर बीट चा अर्थ वेगळाच होईल म्हणून खोडले.

* भोक्तास्पर्धा - क्लायमॅक्सला (किंवा एरव्ही) व्हिलनसमोर लोक वेष पालटून, आवाज बदलून वगैरे करून जातात आणि गातात, नाचतात. काही व्हिलन्स नंतर डिक्लेअर करतात की ते लोक कोण आहेत हे त्यांना आधीपासूनच माहीत होते. मग हे इतका वेळ (आणि कधी कधी इतकी बोअर गाणी होईपर्यंत) शांत का बसले? तर त्याचे कारण श्रद्धाने लिहीले आहे की तो व्हिलन या कलांचा भोक्ता असणार आणि केवळ त्याचा आस्वाद घ्यायला म्हणूनच तो इतका वेळ थांबला. हे एकदम परफेक्ट आहे.

Pages