Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४

Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा

20221006_181802.jpg

20221006_181816.jpg

20221006_181905.jpg

20221006_181918.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठी bb त गशमीरला तरी आणायचे. अर्थात तो बिझी असेल म्हणा >>> अंजूताई, गश्मीर सध्या कलर्स (हिंदी) वरील झलक दिखला जा मध्ये स्पर्धक व झी मराठीवरील डान्स महाराष्ट्र डान्स मध्ये परीक्षक आहे. पण तिकडे जर स्पर्धक म्हणून हरला, तर इकडे ईतर स्पर्धकांचे परीक्षण करतांना अवघडल्यासारखे नाही का होणार?

रच्याकने 'गश्मीर' ह्या नावाचा काय अर्थ आहे?

गाश्मिर सध्या फुल छाया हुआ है झलक के सेट पर.. दोन तीन दा त्याला फुल ३०मार्क्स मिळाले आहेत.. परिक्षकांकडून खूप कौतुक.. अमृता खानविलकर आणि त्याची नोक झोक ..तिला सुद्धा ३०मार्क्स आहेत बऱ्याच वेळा.. मी तर या दोघांचाच डान्स बघते. बाकी नाही.. दोघंही जातील फायनल ला .. he deserves it..

Big boss c Marathi चे सदस्य मला कोण माहीतच नाही आहेत.. एक शेवंता ,मेघा घाडगे आणि किरण माने सोडून. ते सुध्हा कोणत्या तरी ग्रुप वर बिग बॉस च्या आधीच्या सीजन च परीक्षण लिहीत .. पण सगळं young public आहे आणि तयारीने आलंय..

अंजूताई, गश्मीर सध्या कलर्स (हिंदी) वरील झलक दिखला जा मध्ये स्पर्धक व झी मराठीवरील डान्स महाराष्ट्र डान्स मध्ये परीक्षक आहे. >>> असं एकावेळी दोन चॅनेलवर कसं करता येतंय त्याला.

झलक दीखला जा बघत नाही, तो जिंकला तर आवडेल मात्र. अमृता जिंकली तरी आवडेल.

अमृता धोन्गडे विशालसारखी स्वतःशीच बोलतेय.

यन्दा तरुण स्पर्धक खुप आहेत.

साजिद खान खोटे बोलतोय. मीटू प्रकरणात अडकला होता. त्यानन्तर त्याला कामे मिळेनाशी झाली.

यावेळी ज्येना दिसले नाही कोणी. बरंय म्हणा.
अमृता घोंगडे मधे पोटेन्शियल दिसले, समृद्धी पण प्रॉमिसिंग वाटली. किरण माने तर फुल्ल नौटंकी, आल्या आल्या एकपात्री प्रयोग सुरु केला. एन्टरटेन करतील असे वाटते. शेवंता उगीच इन्ग्रजी शब्द मारत होती पण लवकरच मुखवटा उतरेल तेव्हा कळेल खरी कशी आहे. बाकी बहुतेक मुली सारख्याच दिसत होत्या! दोन आरजे आहेत त्यामुळे घोषणा वाचणे, तिथे कार्यक्रम होस्ट करणे याला कॉम्पिटिशन असेल. फिटनेस मधे जय आणि विशाल मागच्या वेळी लगेचच दिसले होते. तसे कोणी कळले तरी नाही अजून तो एक ७ फुटी बॉक्सर सोडून , त्याच्यापुढे टास्क मधे कोण उभे राहणार Happy

योगेश जाधव नाव आहे. बोलताना अगदी साधा वाटला तो. तो नॉन सेलेब्रिटी त्रिशूल म्हणून आहे तो डोक्यात जाईल असे वाटते. लाडोबा कॅटेगरी वाटला. स्वयपाक येत नाही, साफ सफाई ची सवय नाही कामे येत नाही असेच म्हणत होता.

मी सध्या दोन्ही हिंदी मराठी आलटून पालटून पाहत आहे. हिंदीमध्ये शिव अनुभवी खिलाडू आहे. हुशारीने खेळेल. ड्रॅमेबाज MLA च्या बरोबर राहत आहे.त्यामुळे स्क्रीनवर फुटेज मिळत आहे. पण त्याच्यपेकशा पॉप्युलर कलर्सच्या हिरोइन्स आहेत ज्यांचा फॅन बेस बराच आहे. सध्या तरी मला शिव खूप इर्रिटेटिंग वाटला. trying too hard..
मराठीत मला एकही जण माहित नाही. गुगल केल्यावर अक्षय केळकर व यशश्री मसुरकर आठवले. तसेच ती मिसेस मुख्यमंत्री पण. बाकी सर्व नवीन.(मलातरी)

आणि मराठीतला बिग बॉसचा आवाज यावेळी नवा आहे वाटतं . अगदीच होपलेस

तो नॉन सेलेब्रिटी त्रिशूल म्हणून आहे तो डोक्यात जाईल असे वाटते. लाडोबा कॅटेगरी वाटला. स्वयपाक येत नाही, साफ सफाई ची सवय नाही कामे येत नाही असेच म्हणत होता.>>>
+१११११

. ड्रॅमेबाज MLA च्या बरोबर राहत आहे >>> कोण आहे एम एल ए.

समीर परांजपे ऐवजी दुसरा कोणीतरी आलाय सिरियलमध्ये (प्रोमो बघितला) . मग स प इथे का नाही आला. मला वाटलं हे चार जण दारातून जातील आणि स प ला घेऊन येतील असा ट्विस्ट असेल .

ती समृद्धी किती वाईट मराठी बोलते. बिबॉं पण आज म्हणाले तो बॉक्स खोला. वाईट मराठी ऐकवत नाही. मसुरकर आणि योगेश आवडले. तो बुटका काय बोलतो कळत नाही. पळापळीच्या खेळात अपूर्वाचा निभाव लागेल असे वाटत नाही. त्रिशूलला त्रिशूळ म्हटले तर राग आला. फारच शिष्ट वाटतो तो.

पहिल्या दिवशी एंट्री मधे किरण मानेंनी बाजी मारली , भरपूर ड्रामा/राडा इ. पुरवणार ते !
सगळे पुरुष स्पर्धक एक सारखेच दिसत होते, ऑलमोस्ट सगळे दाढीवले Proud
कॉमनर म्हणून ज्याला आणलय तो ऑलरेडी फेमस आहे, मॉडेलिंग वगैरे करतो , दिसायला चांगला आहे !
मुलींमधे आत्ता तरी समृद्धी आणि यशश्री स्ट्राँग वाटल्या आणि ती अपूर्वा सर्वात अनॉयिंग वाटली, अगदीच स्नेहा 2.0
अर्थात हे फस्ट इंप्रेशन , नेक्स्ट विक मधे कोण काय रंग उधळतात बघू Happy
Btw , हिन्दी मराठी BB एकदम सुरु झालय आणि एक सारखं सिलेक्शन आहे , तिथे रिक्शेवाल्याची मुलगी इथे मुलगा , तिथे कपल, इथेही कपल, तिथे बुटका स्पर्धक इथेही बुटका !
हिन्दी मधे पुण्याच्या स्लम एरीयातून मोठा झालेला रॅपर एम्सी स्टॅन भरपूर फुटेज घेतोय, वेगळा आहे इतरांपेक्षा!
शिव होपफुली चांगला खेळेल , साजिद खान तर असतोच मेन फोकस मधे, मागच्या वर्षीच्या शमिता सारखा !

अपूर्वा खरंच अनोयिंग आहे....
मेघा घाडगे कशी आहे ते लवकर च कळेल मला एरवी ती आवडते....
तो प्रसाद पण इरिटेटिंग आहे. पण अपूर्वा ला अपु अपु करून बोलत होता , पण ही बया आल्यापासून कॉन्टेन्ट पुरवायचे म्हणून उगाच शाळेत पोरं भांडतात तशी भांडत होती....

ती टुकटुक राणी काही बोलली च नाही काल जास्त.... समृद्धी मला पहिल्या एपी त आवडली नाही पण काल बरी वाटली. अपूर्वा पेक्षा तरी सॉरटेड वाटली

यंदा मेकअप वगैरेकडे फार लक्ष देत नाहीयेत असं वाटलं. एकदमच घरेलू लुकमधे दिसल्या. मेधा धाडेच्या सीझनला खूप टकाटक असियच्या सगळ्या उ.ना सोडून.

अपूर्वा फक्त बोलबच्चन आहे की टास्क पण करणार आहेत डोक लावून की पलंग सवाशिण होणार आहेत ते कळेलच.पण राहिल खूप वेळ.
प्रसाद ,अक्षय पण राहतील.
लंबू टिंगूची जोडी फार नाही ठेवणार.
निखिल राजेशिर्के शांत पण मास्टरमाइंड ठरू शकेल.काल त्याच्या ग्रुपला फार बोलू न देता सरळ आरडाओरडा न करता मेधाला मामा बनवल.
तिला कळलच नसाव, नंतर गळा काढत होती मला मान्य नाही वगैरे...
मुली काल तरी डंब वाटल्या.अपूर्वा फक्त तोंडपट्टाच चालवत आहे,सोमिवर आताच निगेटिव्ह ठरत आहे.असे लोक कितीही चांगले खेळले तरी निदान मराठीत तरी विनर होत नाहीत.हे बाईंना अजून कळलेल दिसत नाही.
मराठी आणि हिंदी एकाच दिवशी, एकाच वेळी चालू करण्याचा अट्टाहास मात्र अजून कळला नाही.

अपूर्वाबाई निगेटिव होणार असे वाटले. तिला एकूण भरपूर मिडिया अटेन्शन , स्पॉटलाइट आपल्यावरच असण्याची सवय असावी. प्रसाद ने तसे फार काही अ‍ॅरोगन्ट वाटण्याइतके केल्याचे दिसले तरी नाही. पण पहिलाच दिवस त्यामुळे कोणाचेच भांडण सिरियसली घेतले नाही मी. ही सगळी कॅमेर्यात दिसण्याची घाई असणार Happy
मला छोटे मिया आणि बडे मियाँ जोडी जमली ते मजेशीर वाटले. नीट हुषारीने हँडल केले आणि सोबत राहिले तर ते टिकतील सुद्धा आणि एन्टरटेनिंगही होऊ शकतात. पण तसे मॅनिप्युलेट करण्याच्या कॅटेगरीतले वाटत नाहीत.
बाकी ४ लोकांना पहिल्याच दिवशी बाहेर काढणार वगैरे वर कुणीच फारसा विश्वास ठेवला नसावा. ते लोक बाहेर जाताना कोणी फारसे अगदी त्या रोहित ची गफ्रे पण फार हादरली वगैरे नव्हती. त्यांनी तशी चर्चा पण केली असेल तरी अर्थातच आपल्याला ती दाखवणार नाहीत. ४ दारे बघून मला आधी वाटले की प्रत्येकाने वेगवेगळे दार निवडायचेय. ते बिबॉ ला अवघड गेले असते मॅनेज करायला. त्यांचा बहुधा हेतू इतकाच होता की गट पडावेत, वाद व्हावे तो साध्य झाला थोडा फार. आता त्यांच्याच हातात नॉमिनेशन कार्य देऊन अजून वाद पक्के करणार. बाकी एलिमिनेशन तर होणारच नाही पहिल्या आठवड्यात.

प्रसाद आणि अपूर्वा ने एकत्र काम केलेलं असावं म्हणून तो अप्पू अप्पू करतो बहुतेक.

निगेटिव्ह होऊन फायनलला जाता येतं त्यामुळे नेमळेकर बाई फायनलमध्ये असतील. ती टास्क करेल असं मात्र वाटत नाही (फिजिकली नावं ठेवत नाहीये पण आळशीपणा वाटतोय, आणि स्व बढाईपणा), पण तिला रेशम सारखं नेतील सेमीपर्यंत.

कोण आहे एम एल ए. >>>त्ती एक कर्कश आवाजाची अर्चना म्हणून आहे, ती कुठलीतरी एम एल ए च्या निवडणुकीत उभी राहिली होती म्हणे. २/३ दा मेंशन केले तिने.

शिव असे शो खेळण्यात खूप हुशार आहे व अनुभवी आहे त्यामुळे टॉपच्या ६/७ जणत जाईल नक्की पण हिन्दीत जिंकणे खूप सोपे नाही. सध्यातरी तो सर्व right moves करत आहे.

मराठी बिबी:
अपेक्षी प्रमाणे अपूर्वा अनॉयिंग, तिचं काम पाहिलं नसल्यामुळे काहीच सॉफ्ट कॉर्नर नाही, स्क्रीन प्रेझेन्स पण प्लेझन्ट नाही वाटला.
अपूर्वामुळे तो प्रसाद मात्रं खूप फुटेज घेऊन पॉझिटिव वाटला पहिल्याच दिवशी !
टास्क्स सुरु झाल्यावर समजेल कोण कसे आहे Happy
मलाही समृद्धी स्मिता गोन्दकर सारखी वाटते , खूप पोटेन्शिअल आहे !
बडे मिया छिटे मिया आयडिआ गुड !

बिबॉ हिन्दी:
शिव इज डुइंग रिअली गुड इन हिन्दी , कॅमेरा अटेनशन, फुटेज घेणे बरोबर जमते त्याला, टास्क्स सुरु हितील तेंव्हाही दिसेलच उठून, मेघा सारखी माती नाही खाणार असं वाटतय !
त्याचा पुढचा गेम प्लॅन म्हणजे ताई , भाऊ, गफ्रे सगळे रिलेशनशिप हळुहळु तयार करत जायचे.. सध्या साजिद खान आणि अर्चानाला पकडलय , छोट्या अब्दूलाही !
साजिद खान वर खूप फोकस असतो आणि त्याला फिल्म मेकिंग्/इंडस्ट्रीतल्या एक्स्पिरिअयन्स मुळे चांगलं माहितेय पब्लिकला काय पहायचे असते ते !
हिन्दी बिगबॉस चक्क कॉन्टेस्टन्ट्सना कन्फेशन रुम मधे बोलावून भांडणं लावतायेत या सिझनला, चुगली बुथ बाय बिगबॉस हिमसेल्फ Biggrin
टिव्ही वर्सेस नॉन टि.व्ही रायव्हलरीही सुरू करून दिली बिगबॉसनीच !
Btw मला ती हिन्दी बिबी मधली सौंदर्या पाहिली कि विशाल निकमच आठवतो Proud

आरती थँक्स, अर्चना कोण ते लक्षात येत नाहीये, बघते जाऊन.

हिंदी बघत नसले तरी शिव नॉमिनेशनमध्ये आला कधी तर लिहा, वोट्स देईन. लव्हस्टोरी भानगडीत पडू नये त्याने, शिव वीणा आवडणाऱ्या लोकांची वोट्स मिळणार नाहीत, मी देईन म्हणा.

मराठी bb

समृद्धी म्हणजे ती स्लिम, ग्लॅमरस का, ती मलाही आवडली. चेहेरा थोडा लांबट आणि आकर्षक आहे, ती परवाच आवडली होती, नवऱ्याला नाव विचारलं पण त्याला सांगता आलं नाही.

प्रसादने जाम इरिटेट केलं आज.

अमृता देशमुखला ठरवून टार्गेट केलं बहुतेक इतरांनी. डॉक्टर निखिललाही.

सतत वाद आणि टास्कमध्ये मारामारी, यंदाही हेच.

अपूर्वा, प्रसाद नावडत्या लिस्टमध्ये गेलेत सध्यातरी.

वोटिंग लाईन्स बंद, एकंदरीत यावेळी पचका होणार.

प्रसाद डोक्यात गेला यार आज..किती किटकीट.. त्याच्यामुळे आज अपूर्वा सुसह्य वाटली. समृद्धी बिचारी त्याला मदत करायला गेलेली तिच्याशी पण भांडला प्रसाद. शिव्या खातोय आता.

इथे लोक हिंदी बिबॉ चं का लिहितायत. त्यासाठी वेगळा धागा काढा ना प्लीज. हा फक्त मराठी बिबॉ साठी असुदेत. सगळ्या कमेंट मिक्स होतायत ते वाचायला त्रास होतोय.

Pages