लहान मुलांना फटके मारावेत का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 September, 2022 - 12:30

लहान मुलांना फटके मारावेत का?

गेले चार वर्षे या प्रश्नाचे उत्तर शोधतोय.

मी स्वत: एकेकाळी लहान मुलांना मारू नये या मताचा होतो. सोशल साईटवरील चर्चात मी या माझ्या मताला बरेचदा डिफेंडही केले. एकेकाळी जैसे बोलावे तैसे वागावे म्हणत कधी मुलांवर हात उचलला नव्हता. पण पुढे जाणवले हे काम करत नाहीये. त्यामुळे सध्या आमच्या घरात गरजेनुसार मुलांना मारणे अलाऊड केले आहे.

मुलांना धाक राहावा असे मारणे मला जमत नाही. म्हणून आम्ही मध्यंतरी बाथरूममध्ये बंद करणे हा प्रकार सुरू केलेला. पण नंतर तो चुकीचा वाटला. मुलांच्या मनात त्याने भिती राहतेय असे वाटले. म्हणून ते बंद केले. सध्या तशीच गरज पडलीच तर मारायचे काम त्यांची आई करते. मुलांवर कोणाच्या तरी माराचा (वा कुठल्याही प्रकारचा) धाक असावा असे वाटते.

शेवटी एक पालक म्हणून आपण काय बघतो, तर मुलांना योग्य वळण लागावे, त्यांची मानसिक जडणघडण योग्य व्हावी, चांगले शिस्त आणि संस्कार त्यांच्या अंगी बाणवावेत. विचार नेहमी त्यांच्या हिताचाच असतो. फक्त प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतात. जे प्रत्येक मुलानुसार बदलू शकतात. तरी आपण जे करतो ते योग्य वा अयोग्य हे कुठेतरी पडताळून घेणे गरजेचे आहे.

लहान मुलांचे मानसशास्त्र हा फार गहन विषय आहे. पण तरीही तो आपल्या सर्वांना माहीत असणे, याबद्दल जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे. यावर विविध दृष्टीकोनातून आणि आपापल्या अनुभवांतून चर्चा झालेली आवडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मै, अमित च्र्प्स Happy . माझ्या पोस्ट नंतर इतर लोकांच्या पोस्ट वाचून मला हसाव कि रडाव तेच कळत नव्हतं. बरं झाल तुम्ही लिहिलत.

>>> " मुल त्रास देतात म्हणून त्यांना पालक मारतात हे पहिले डोक्यातून काढून टाका ">>>
मग तर आणखीणच वाईट. सोफ्यावर उड्या मारतात, कात्रीला हात लावतात म्हणुन मारायचे ?

>>>इथे टिपिकल इंडियन Vs. अमेरिकन पालक सुरू झालयं.
हे जे आम्ही मुलांना बोटही लावत नाही म्हणतायत ते मुलांबरोबर रोज किती वेळ घालवतात?
का ६ तास डे केअर-६ तास स्कुल आणि ८ तास वेगळ्या बेडरूममध्ये झोपणं ?>>>

८ तास वेगळ्या रुम मध्ये झोपले कि ते वाईट पालक का ? आणि सहा तास डे केअर मध्ये ठेवणारे पालक नोकरी करत असतील ना. कि उगाचच ठेवतील. बरं भारतात नोकरी करणारे पालक आई वडीलांना आणुन त्यांना मुलांची काळजी घ्यायला ठेवतात ते चालते?

>>>विचाराला थारा तर द्या की ओपन माइंड ठेवून ! ( इथे मान्य नका करू हवं तर Happy )>>>
मै , यातल्या बर्‍याच जणांनी लिहिलय कि स्पाउसला पटत नाही मारायचे तरी आम्ही मारतो. आणि ह्यांना माहित आहे, गिल्टी भावना आहे म्हणुनच तर बाफ काढलाय. ओपन माईंड काय आणि कसे ठेवणार ?

पुन्हा तेच. चापटी, धपाटे, लाथा, बुक्या हे सगळे प्रकार एकाच पारड्यात कसे काय बसवतात? मुळात इथे 'आम्ही मुलांना मारतो' असं म्हणणारे लोक सकाळी उठल्यापासून हातात चाबूक, काठी किंवा लाथा तयार करूनच बसलेले असतात आणि मूल समोर आलं की बडवायला चालू करतात असा समज कसा काय करून घेतलाय तुम्ही. आणखी एक म्हणजे स्वत:चा राग शमवायला मुलांना मारहाण केली जाते या गोष्टीचं जनरलायझेशन करणं चुकीचं आहे.
आता मी लिहीलेल्या गोष्टींबद्दल, दिवा देवघरात असतो, देवघर घरातच आहे. सूरी किचनच्या ओट्यावर असते आणि ओटा घरातच आहे. आणि माझी मुलगी सुद्धा घरातच असते. तिला कुठल्या पिंजर्यात डांबून ठेवत नाही मी. तिला हवं तिथे मोकळी फिरत असते. लहान मुलांना प्रत्येक गोष्टीचं कुतुहल वाटतं आणि तिथे हात लावून बघायला जातात. त्यामूळे प्रत्येक ठिकाणी लक्ष ठेवणं आलंच. आणि म्हणूनच ती अशा गोष्टींना हात लावायला जाते हे आम्हाला दिसतं.
पुढे, मी दिवा, सूरी वगैरे वस्तू तिच्या हातात दिल्या आहेत असा स्वत:चा समज करून घेणारे आणि इतरांनाही तसाच समज करून देणार्यांची मुलं जन्माला येऊन डायरेक्ट कॉलेजमधे पोहोचली का? आणि मी चापटी मारते यापुढे ५०-६० पाप्या घेते हे दिसलं नसेलच किंवा ते महत्वाचं वाटलं नसेल. किंवा तो पण 'अत्याचार'च वाटला असेल. मुलांवर अत्याचार करायला मिळवा म्हणून मुलं जन्माला घालणारे पालक अजून दृष्टीस पडायचे आहेत. बाकी मारणारे पालक कसाई, अत्याचारी आणि न मारणारे महान वगैरे चालू राहू दे.
हा धागा इतरांचे अनुभव ऐकण्यासाठी असावा असं मला वाटतं. इथे कुणीच मारण्याचे समर्थन वा उदात्तीकरण करताना दिसत नाहीये. प्रत्येकजण स्वत:चा अनुभव सांगतोय. ज्यांना पटत नाही त्यांनी सोडून द्यावे. दुसर्यांच्या अकला काढू नये.

मुळात मुलांना मारणं हे त्यांना शारिरीक हानी करण्यासाठी नसतंच.
पालकांनी स्वतःचा राग बाहेर काढण्यासाठीही नसतंच आणि नसावंच.
पण ह्याशिवायही फटका देणं असूच शकतं.
मियाॅबिबी राजी तो क्या करेगा काझी तसं मुलं आणि पालक ओक्केमधे असतीर तर सगळं ओक्केमधे आहे समजावं.

अमानुष पने मुलांना मारहाण कोणी करत नाही.लाखात काही पालक तसे असतात मुलांना अमानुष मारहाण करतात.त्यांना लगेच फाशी द्यावी अशीच भावना होतें

मी चिन्मयी + १००
बरं झालं तुम्हीच स्पष्टपणे लिहीलं ते.

माझ्या मुलाच्या मित्राचा (त्याने मोठेपणी सांगितलेला) अनुभव:-
त्याच्या शाळेच्या पहिल्या दिवशी त्याची आई म्हणाली होती, ‘शाळेत रडलास तर फटके मारीन.’
त्या दिवशी शाळेत तो रडला नाही, पण रडणाऱ्या सगळ्या मुलांना मारत सुटला. त्याला वाटलं, कुणी रडलं की असच करायचं असतं.
पहिल्याच दिवशी त्याला शिक्षा म्हणून टीचर ने उंच कपाटावर बसवलं.

चिन्मयी +७८६

मुलांना चाकू, सुरी. आग. पाणी, झाडू, चप्पल या गोष्टींचे एक नैसर्गिक आकर्षण असतेच. आपण हे त्यांच्यापासून दूर ठेवल्यानेच बरेचदा हे आकर्षण वाढत असावे. पण तरी ते तिथे पोहोचतातच. यातले चप्पल झाडूशी खेळणे वेगळे आणि आग चाकूशी खेळणे वेगळे म्हणजेच जास्त डेंजरस यातला फरक स्पष्ट करायला हा धपाटा येतो. कोणी धपाटा मारत नसेल तर नेहमीपेक्षा मोठ्याने ओरडणे येते. वा टोन सिरीअस करते. सगळ्याच गोंष्टींसाठी एकाच सुरात समजावण्याला काही लॉजिक नाही.

लहान मुलांना प्रत्येक गोष्ट प्रेमानेच समजवावे म्हणताना ईथे चर्चा करताना समोरच्याची पोस्ट समजून न घेता विपर्यास करणे हा देखील एक विरोधाभासच झाला Happy

>>>>>>
गिल्टी भावना आहे म्हणुनच तर बाफ काढलाय.
>>>>>
हा देखील असाच एक विपर्यास Happy

मला कुठलीही गिल्टी भावना नाही.
आमच्याकडे मी पोरांना मारतो तसे पोरेही मला मारतात. जशी भावंडे तुझे माझे जमेना म्हणत कुत्र्यामांजरीसारखी भांडतात आणि पुन्हा तुझ्यावाचून करमेना म्हणत एक होतात तसेच आम्ही वागतो. एकमेकांशी भांडतो, ओरडतो, मारतो, आणि याबद्दल मी माझ्या आणि त्यांच्या आईच्या शिव्याही खातो. कारण मुलांना शिस्त लावण्यात मी पालक म्हणून काही कामाचा नाही. माझ्या माराचा वा ओरडण्याचा त्यांना धाकच नाही. तर मला गिल्ट कसली Happy
सांगायचे ईतकेच की माझी केस अगदीच वेगळी आहे. तिचा या चर्चेशी काही संबंध नाही. मला ना याचे गिल्ट आहे. ना याचे समर्थन आहे..

गरजेप्रसंगी बायकोच पोरांना धपाटा देते वा ओरडते. त्याचे समर्थन आहे. ज्या केसमध्ये ती उगाच जास्त ओरडली असे वाटते तिथे नंतर मी नेहमी तिच्याशी बोलतो, की ईथे एवढे ओरडायची गरज नव्हती. पण मागाहून. पोरांसमोर आपले याबाबतचे मतभेद उघड करू नयेत. त्यांना आपण आईबाप म्हणून एक टीम वाटायला हवे. अन्यथा ते फायदा ऊचलतात Happy

वर एका पोस्टमध्ये न मारणारे पालक मुलांना वेळ देतात का हा मुद्दा आला. नक्कीच या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. यावर नंतर वेगळा धागा काढूया Happy

भारतीय पालक - अमेरीकन पालक असाही एक सूर दिसला. वरवर तो मुद्दा बाद वाटला तरी त्यात एक तथ्य आहेच. माझ्या मागच्या एका पोस्टमध्ये मी म्हटलेले की आजूबाजूची परीस्थिती काय आहे त्या बेंचमार्कनुसार आपला ओरडण्याचा/माराचा वा लाडाचा बेंचमार्क सेट व्हायला हवा. जर अमेरीकेतली जनता आपल्या मुलांना मारत नसेल तर तिथल्या भारतीय पालकांनी शक्यतो तसेच वागावे. अन्यथा मुलांच्या मनात आपल्यालाच का असे आईबाप भेटले अशी भावना तयार होऊ शकते.

पण भारतात वाढणारी लहान मुले तसा विचार करणार नाहीत. कारण अमुकतमुक केले की धपाटा खावा लागतो हे त्यांना समजते. त्यामुळे त्यांना कुठला मानसिक आघात झेलावा लागत नाही. उलट अमेरीकन पालकांसारखे ईथे वागायला गेले तर त्याचा उलट परीणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मॉरल - एक पालक म्हणून परिस्थितीनुसार जास्तीत जास्त फ्लेक्सिबल कसे बनता येईल याचा विचार व्हावा. एवरी चाईल्ड ईज डिफरंट हे सुद्धा लक्षात घ्यावे. एकच फूटपट्टी सगळीकडे लाऊ नये. सर्वात महत्वाचे म्हणजे पेशन्स लेव्हल वाढवावी. दोन्ही पालकात ज्याची पेशन्स लेव्हल चांगली आहे त्याने मुलांशी डिल करण्यात पुढे राहावे. दुसऱ्याचा वापर धाक दाखवण्यापुरता व्हावा.

मी चिन्मयी - तुमचे उत्तर काहींना चपखल वगैरे वाटते आहे पण ते खरोखर हास्यास्पद आहे. सॉरी.
आम्ही काय सकाळी उठल्यापासून मारतो का? आम्ही फक्त चापट्या च मारतो , चाबकाने मारतो का, या वाक्यांना काहीही अर्थ नाही. तुम्ही मारण्याचे समर्थन करता ना. दॅट्स वॉट मॅटर्स. त्यात आणि एखाद्या अ‍ॅडल्ट ने लाथा मारण्याचे समर्थन करणे हे लॉजिकली एकच आहे. तुम्हाला कितीही अतिशयोक्ती वाटले तरी लॉजिकली " मी चापट्या मारते पण ते त्यांच्या भल्यासाठीच आहे. " या वाक्याचा आणि "घातली एक लाथ तर लगेच मरत नाही तो. त्याला अक्कल यावी म्हणुनच घालतो" ही दोन्ही वाक्ये सेमच आहेत. ते तुमच्या आणि इथे बर्‍याच लोकांच्या लक्षात येत नाहीये हाच प्रॉब्लेम आहे.
सुर्‍या कात्र्या वगैरे फार फारच किरकोळ उदाहरणे आहेत. असे गृहित धरू चला, की तुम्ही तेवढे बेजबाबदार नाही. तरी मूळ मुद्दा राहतोच. मुलांना मारणे आणि वर त्याचे समर्थन करणे का इतके गरजेचे वाटतेय ?
"मियाॅबिबी राजी तो क्या करेगा काझी " हे लॉजिक डिस्टर्बिंग आहे. शर्मिलाने लिहिलेले उदाहरण पुरेसे बोलके आहे , मुलांना नक्की काय मेसेज जातो हे दाखवणारे. पण त्यात कुणाला गैर दिसत नसेल तर बोलणेच खुंटले.
एकूणात कोणीही मारण्याचा हेतू काय ? अल्टिमेट एम काय आहे? त्यासाठी मारण्याव्यतिरिक्त दुसरे काय करता येईल? हा विचार सुद्धा चर्चेत आणताना दिसत नाहीये. बहुतेक जण मारणे हीच क्रिया कशी महत्त्वाची आणि अपरिहार्य आहे हेच रेटताना दिसत आहेत. या लेवल वर मी तरी नाही डिस्कस करू शकत. चालू द्या.

मैत्रेयी, तुम्हीपण हा एकच विचार धरून चालला आहात की मारण्याशिवाय इतर कोणत्याही पर्यायाचा वापर किंवा विचार आम्ही (म्हणजे मारणारे सगळे लोक) करत नाही. तुम्हीच हे डोक्यात फिट्ट बसवलेलं आहे की हे मारतात म्हटलेय मग रोज आणि सारखेच मारत सुटतात. मुलांना शिस्त लावताना पालक अनेक उपाय करताना दिसतात. त्यातला कुठलाच उपाय कुणावरही बंधनकारक नसतो. ज्याची त्याची चॉईस आहे. माझं उत्तर तुम्हाला हास्यास्पद वाटलं तर तिही तुमची चॉईस आहे, इतर लोकांना पटलं तर ती त्यांची चॉईस आहे. सतत आपलीच बाजू दुसर्याला पटली पाहिजे हा अट्टहास करून कसं चालेल ना.
आणि मारणारे आईबापही मुलांवर प्रेम तितकंच करतात जितके न मारणारे करत असतील. आपण जो फटका मुलाला मारतोय त्याचा त्याला त्रास होऊ नये, पण चूक लक्षात यावी हाच उद्देश असतो. सगळ्याच पालकांचा बहुधा.
यापेक्षा जास्त उगाळण्यात आता मला रस नाही. ज्याला जे वाटेल, त्याला ते लाभो.

अजून एक म्हणजे मुलांना शिस्त लावताना मारणारे पालक आपल्या वृद्ध पालकांना नाही मारत. तेवढं भान असतं त्यांना

यात आपण एक गोड गैरसमजूत करून घेतली आहे की जे पालक मुलांना हातही लावू नका असं म्हणतायंत त्यांनी मुलांना कधीही मारले नाहीय.
हे कदाचित त्यांचं नकाश्रु ढाळणं, दांभिकपणाही असू शकतो.

माझाही मुलगा देवघराकडे जायचा. दिवा लावलेला असायचा. मग तो मोठा होईपर्यंत छोटासा देव्हारा भिंतीवर टांगला. कारण सतत लक्ष कोण ठेवणार? ओट्यावरच्या वस्तूंना हात लावायची सवय त्यालाही होती. एकदा चुकून ओट्याच्या कडेला गरम पातेलं ठेवलं गेलं आणि मग त्याला चटका बसला. तेव्हापासून आवर्जून ओट्यावरच्या गोष्टी त्याच्या हाताला येणार नाहीत अशा पद्धतीने ठेवायला लागले. मी एकदा दोनदा पाठीत धपाटा घालून बघितला. तो रडायचा पण करायचं तेच करायचा. मग परत कधीच हात उचलला नाही. अर्थात अगदीच दोन वर्षाच्या लहान बाळाला मारून काहीच उपयोग होत नाही असं मला वाटते. मोठी झाली की आपोआप समजूतदार होतात.

अजुन एक बहुतेक आम्ही मारत नसल्याने मुलगाही बाहेर इतर मुलांना मारत नाही. त्याचे जे जे मित्र घरी मार खातात ते सगळे बाहेर इतर मुलांना मारतात असं माझे निरीक्षण आहे.

त्यांनी मुलांना कधीही मारले नाहीय. >
या उलट मी जरी स्वतःच्या अपत्याला कधी मारले नाही, मारणार नाही, तरी नॉर्मल, सुशिक्षित, सुसंस्कृत पेरेंट्सनी आपल्या पोटच्या मुलाना कशी शिस्त लावावी यावर भोचक सल्ले द्यायला जाणार नाही. प्रत्येकाची रिॲलिटी वेगळी असते. काही प्रतिसाद फारच जजी आणि आक्रस्ताळे वाटले. त्यामानाने सरांचे संयत प्रतिसाद आवडले.
दवे बाई, अमेरिकन पेरेंट्स फारच आदर्श असतात असा कोणी उगीच समज करून घेऊ नये. भले आपल्या मुलांना मारले नाही तरी मुलांकडे अजिबात लक्ष नाही, अशा केसेस पण असतात. नेक्स्टडोअर वर इथल्या टीनेजर्स चे प्रताप वाचून जबडा वासायला होतं. यांच्या आईवडिलांना आपली मुलं कुठे आहेत, काय करतायत याची माहिती कशी नाही, याचं आश्चर्य वाटतं. याचेच एक्स्ट्रीम टोक म्हणजे उवाल्डे, सॅंडी हूक सारख्या घटना.

चापट का होईना, रोजच मारली जातेय, म्हणजे मारण्याचा उद्देश सफल होत नाहीये. त्यामुळे तरी मारणं योग्य का ह्याचा फेर विचार व्हावा...

मैत्रेयी,
एखाद्या जवानाने बॉर्डरवर युद्धात शत्रूची केलेली हत्या आणि कसाबने केलेला हल्ला या दोन्ही हिंसा एकच झाल्या का?
मांसाहार करायला एखाद्या प्राण्याचा जीव घेणे, अंगावर बसलेला आपल्याला चावणारा मच्छर मारणे, शिकारीचा छंद जोपासायला म्हणून एखाद्या निष्पाप प्राण्याचा जीव घेणे.. हे सगळे एकच झाले का?

यापैकी कुठल्याही एका हत्येचे समर्थन केले म्हणून तुम्ही हत्येचे समर्थन करता असा सरसकट निष्कर्श काढण्यात काय अर्थ आहे?
..

<<<<<<
मारण्याव्यतिरिक्त दुसरे काय करता येईल? हा विचार सुद्धा चर्चेत आणताना दिसत नाहीये.
>>>>>

नक्कीच यावरच चर्चा व्हायला हवी ईथे की मुलांना न मारता किंबहुना त्यांच्यावर न चिडता, किंबहुना कुठल्याही प्रकारची पनिशमेंट न देता त्यांना कसे समजवावे...

आणि जे मारू नका म्हणत आहेत त्यांनी सर्वात पहिले यावर लिहायला हवे.
पण ते काय करत आहेत?. तर जे मारतात ते कसे चुकीचे वागत आहेत, कोवळ्या पोरांना मारत आहेत, क्रूरपणा करत आहेत म्हणून केवळ समोरच्यांना गिल्टी फिलींग द्यायचा प्रयत्न चालू आहे.
याला प्रत्युत्तर म्हणून अर्थातच समोरून त्या माराचे समर्थन करणारे प्रतिसाद येणारच. कारण तुमचे हे एवढे निगेटीव्ह शेड दिलेले आरोप कोण खपवून घेणार..

तुम्हाला ईथले बरेच मुद्दे हास्यास्पद वाटले आहेत. ॲक्चुअली मलाही दोन्ही बाजूंच्या काही पोस्ट पटल्या नाहीत. पण मुलांना मारणारे आपल्या आईवडीलांनाही मारतील का हा मुद्दा, हा प्रश्न जर हास्यास्पद वाटत नसेल तर खरेच हा वादाला वाद चालू आहे _/\_

जाऊ द्या.. वेळेवर सोडा सगळे.. काही वर्षांपूर्वी शाळेत मास्तर/बाई शाळेत मुलांना मारायचे.. वही घरी विसरला- मार फटके.. गृहपाठ नाही केला.. मार छड्या ... आणि त्यात काही चुकीचे वाटायचे नाही.. ना शिक्षकांना ना पालकांना...
आता कायदा आलाय.. आता तेच चुकीचे आहे हे जाणवतेय सगळ्यांना...
हे देखील जाणवेल.. काही काळ जावा लागेल...

ईतर कुठल्याही फेलो हुमन बीईंगला शारिरिक मार द्यावा ह्याचे समर्थन आपण करत नसू तर मुलांना मार दिला तर चालतो ह्याचे समर्थन कुठच्या तोंडाने करता येते हे ब्रम्हदेवालाच ठाऊक. लढाई, युद्ध, मांसाहार वगैरे मुद्दे काढणे वा त्याला समर्थन देणे तद्दन मूळ मुद्दा आजिबातच न कळल्याचे लक्षण आहे.

आपल्या मुलांप्रती त्यांच्या नाजूक वयात फेलो ह्युमन बीईंग म्हणून आदर दाखवू शकत नसाल तर त्यांच्याकडून तेव्हा आणि पुढे जाऊन आदर अपेक्षित करणे हे हिप्पोक्रेटिक बेहिविअर होत नाही का? थोडक्यात मी तुला मारू शकते हे मुलांच्या मनावर बिंबवून ते घरातील सेकंड क्लास सिटीझन्स आहेत हे त्यांना अप्रत्यक्षपणे आपण सांगत नाहीत का?
लहान मुलांनाही मान/अपमान, आदर/ अनादर ह्या भावना असतातच की, अगदी जन्मापासून. शारिरिक ईजा होईपर्यंत पालक मारत नाहीत हे मान्य पण माराचा भावनिक आघात कैकपट मोठा असू शकतो.
आपल्याला 'अमूक गोष्ट केल्यास शारिर्रिक मार पडू शकतो' ही भिती मुलांच्या मनात जागती ठेवण्यासाठी आणि त्या भितीखाली मुलांनी अमूक गोष्ट करू नये अशी अपेक्षा करणार्‍या पालकांना समूपदेशनाची आणि भितीच्या ह्या वेलीचा नकळत पुढे कसा वटवृक्ष होत राह्तो हे समजण्याची गरज आहे असे वाटते.

बालसंगोपन आणि भावनांशी प्रामाणिक, आत्मविश्वासाने भारलेली मुले वाढवण्याबाबत मॅग्डा गर्बर आणि मरिया माँटेसरी ह्या पायोनियर स्त्रियांचे विचार पालकांनी जरूर वाचावेत.

आमच्या आईने आम्हाला धपाटे घातलेत. पप्पांनी नाही मारलं कधीच. ( आता मारलंय लिहायला नको) तरी आम्ही तिचा आदर करत नाही आहोत का? आताही आमची काय बिशाद आहे तिच्यासमोर उद्धटपणा करायची.
तत्सम मी ही माझ्या मुलांना कधीकधी एखादी चापट एखादा धपाटा देते आता पुढे ते माझा अपमान करतील का? आणि न मारणार्या पप्पाला खुप आदर देतील का? देखेंगे.

हा धागा मजेशीर झालाय..
म्हणून माझ्याकडून एक सोपा उपाय:
टीवी/मोबाईल/गेमिंग चां बेबी सिटर सारखा वापर करा - मार न देता सगळेच आनंदात जगू शकता Wink

त्यात मुलांचे मूलभूत नुकसान हो ई ल -pan असूद्या :p
: दिवा: घ्यालच सगळे

अर्थात अगदीच दोन वर्षाच्या लहान बाळाला मारून काहीच उपयोग होत नाही असं मला वाटते. मोठी झाली की आपोआप समजूतदार होतात. >> साधारण तीन वर्षांपर्यंत त्यांचा स्वतः: च्या हातावर वगैरेही कंट्रोल नसतो. मग त्यांना शिस्त लावत बसण्यापेक्षा समजावून सांगून मग वस्तू उचलून ठेवणे हा उपाय योग्य.

माझं दोन्ही बाजूंबद्दल काही निगेटिव्ह मत नाही कारण प्रत्येकाचं मत त्या त्या परिस्थती नुसार ठरते.

मला बाळ होण्यापूर्वी माझं मत फटक्यांशिवाय मुलं ऐकत नाहीत हे होतं. मग मला मुलगा झाला. मग माझं मत अजिबात फटाके देऊ नये असं झालं कारण तो तसा शहाणा बाळ होता. पण आता माझं मत परत बदलतंय. शाळेत जायला लागल्यापासून बाळा शहाणं राहिलं नाहीये.

आजपर्यंत मी त्याला मोजून 3 वेळा फटका दिला आहे. बाकी वेळेला आवाज आणि डोळे काम करतात. हे तिन्ही फटके गेल्या काही महिन्यातले आहेत.

पण काल तोच त्याच्या आजीला सांगत होता मला आईच्या डोळ्यांची भीती वाटते, तिला सांग मला एक फटका दे पण रागावू नकोस.आजीने विचारलं फटका कशाला? तर म्हणे आई हळूच मारते, मला लागतच नाही म्हणून. सो बेसिकली मी ज्या कारणासाठी फटका दिला ते तर वायाच गेलं.

मी अगदीच बालवाडीतली पालक आहे त्यामुळे माझी मतं पूर्णपणे चुकीची असू शकतात तरी मांडते.
अमेरिकेतली time out concept मला फार आवडते. पण माझ्या मुलावर ती चालत नाही तेच हात नुसता उगारला तरी काम होतं.
एकदा मी त्याला म्हणाले मी दहा पर्यंत आकडे मोजते तू हे हे काम कर त्यावर त्याने मला 'जर मी नाही केलं तर तू काय करशील' असं विचारलं. यात उद्धटपणा नव्हता तर खरंच क्युरिअसिटी होती की काय करेल आई बुवा. अमेरिकेत माझ्या भाचीला मी याच वयात पाहिलं आहे पण time out ची भीती होती तिला त्यामुळे अगदी 7 पर्यंत आली तरी रडत खरडत सांगितलेलं ऐकायची.
जनरलाईज्ड विधान असू शकतं पण अमेरिकेत मुलं मुळात time out ही शिक्षा आहे हे daycare मध्ये / शाळेत शिकून येतात.
भारतात शाळेत शिक्षक छडी घेऊन बसलेले असतात. भले ते त्याने मारत नाहीत पण माराला घाबरणे हे ते बाहेरून शिकून येतात.

आता मुलांच्या दृष्टीने काय बरोबर काय चूक हा मुद्दा दोन मिनिटं बाजूला ठेवू पण मुलांना वळण लावणं आणि त्यासाठी कशाचा तरी धाक दाखवणं हे दोन्ही बाजूचं मोटिव्ह दिसतंय पद्धत वेगळी असली तरी.

अमेरिकेत मुलांना ग्राऊंडेड केलं जातं हे इथे काहींना अमानुष वाटू शकेल.
भारतात फटका दिला जातो हे तिथे काहींना चुकीचं वाटत असेल.

अमेरीकेत मुलाला फटका दिला तर बद्दल मी काही बोलत नाही कारण ते सगळ्यांना माहीत आहे काय होईल पण त्यांना घरात बसवून ठेवलं तर त्यांना बहुदा धाक बसण्याइतकीच शिक्षा वाटत असेल. तसंच भारतात मुलाला फटका दिला तर सायकलॉजिकल परिणार फार असतील असं वाटत नाही पण हेच घरात डांबून ठेवलं तर होतील (स्वानुभव) माझे बाबा मला मारायचे पण आणि कधी कधी शिक्षा म्हणून घरात बसायचं, कुठेही जायचं नाही, अगदी शाळा- क्लासला पण ही शिक्षा ही द्यायचे. मला माराचं काही वाटायचं नाही पण असं forcefully घरात बसवणं अपमानास्पद वाटायचं.

सो आपण एकमेकांना जज करतो आहोत तेंव्हा कल्चरल नि सामाजिक फरक लक्षात घेत नाही आहोत का? मानसिक परिणाम होण्यासाठी ती गोष्ट वेगळी मोठी भयानक काही वाटली तरच होतील ना? एकाला शाळेत एक छडी मारली आणि मित्राला 2 मारल्या types असेल तर दोघंही मित्र हसत खेळत घरी येताना दिसतात.त्यामुळे इथे मुलांना एक चापट मार मोठं काही वाटतंय का हा पण मुद्दा तितकंच महत्वाचा आहे.

अमेरिकेत नि भारतात दोन्हीकडे टीनेजर मुलं पाहिली आहेत. अमेरिकेत grounded ची भीती खरी खुरी असते तेच भारतात what do you mean by बाहेर जायचं नाही? मी जाणार म्हणणारे टिना पाहिले आहेत.
अमेरिकन जीवनशैली नुसार आपण आई वडिलांवर 'dependant' आहोत म्हणून नीट वागायला हवं कारण त्यांनी बाहेर काढलं तर कुठे जाणार आपण ही thought process असू शकते तेच भारतात मला कुठे घरा बाहेर काढणार आहेत. मीच म्हातारपणाचा आसरा आहे त्यांच्या हे असतं

थोडीशी माझी पोस्ट विस्कळीत आणि जनरलाइझड वाटेल पण हे फक्त माझ्या अजुबाजूच्या घरांमधलं निरीक्षण आहे (दोन्ही देशातल्या)

अर्थात मायबोलीवर कोणीही अमानुष मारहाणीला पाठिंबा देत नाहीत आहे.

तेंव्हा तुम्ही तुमच्या मुलाला नीट ओळखता त्यामुळे तुम्हा दोघांसाठी जे योग्य आहे ते करावं हा माझा सल्ला.

टाईम आऊट असे वर बरेच पोस्टमध्ये वाचले. माझ्यासाठी हे नवीन आहे. म्हणून गूगल केले तर सुरुवातीलाच हे असे काही काही सापडले

Parenting experts have criticized the timeout technique in recent years, saying that it might neglect a child's emotional needs. Most experts agree that punishment is harmful to a child's emotional development and that isolation — the defining quality of the timeout technique — is a form of punishment.

--------

time-outs increase emotional dysregulation, fail to teach children distress tolerance skills, isolate them when they need support, and may re-traumatize children who have experienced abuse.

---

यात जरा जरी तथ्य असेल तर प्लीज थांबवा हा प्रकार.. निदान याचे समर्थन तरी बिलकुल करू नका _/\_

मुलांना धाक राहावा असे मारणे मला जमत नाही. म्हणून आम्ही मध्यंतरी बाथरूममध्ये बंद करणे हा प्रकार सुरू केलेला. पण नंतर तो चुकीचा वाटला.>> हे इंडियन स्टाईल टाईम आऊट आहे

मुलं फटके मजेत खातात पण टा. आऊटला डेंजर घाबरतात. मुलांसाठी जास्त क्रूर काय मग?

एक माहिती वाचली होती मागे. विषय निघालाय म्हणून लिहीते.
आईनः जर अबोला धरला तर मुलं म्हणे जास्त खोड्या काढतात तिचा तोल जाऊन मग तिनं फटका द्यावा म्हणून. कारण फटक्याच्या निमित्तानं का होईना, त्यांना आईचा स्पर्श, हवा असतो, तिच्या जवळ जायचं असतं.

फटक्याच्या निमित्तानं का होईना, त्यांना आईचा स्पर्श, हवा असतो, तिच्या जवळ जायचं असतं.
>>> आवरा !!!!!

आवरा》》》》
Happy हरकत नाही आवरायला. आपलं काही नाही त्यात.

आमच्या आईनं आम्हाला भरपूर दणके घातलेत. मीही वेळप्रसंगी जरा माइल्ड..पण दिले आहेत मुलीला.

तीनही पिढ्यांना त्याबद्दल खंत नाही. आणि आम्ही मार खाल्लाय म्हणून आम्ही वर्गातल्या किंवा आजुबाजूच्या मुलांना अजिबात मारलं नाहीये.

त्यालट आईवडीलांनी अंगाला हातही लावला नाहीये आणि अती लाडानं मुलं वाया गेली अशीही उदाहरणं पाहीली आहेत. त्यामुळे ह्या प्रश्नाला रेडीमेड उत्तर नाही. ज्यानं त्यानं आपल्या मताप्रमाणं ठरवावं.

Pages