मायबोली - २६ वर्ष पूर्ण

Posted
1 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
1 वर्ष ago

आज इंग्रजी तारखेनुसार मायबोलीला २६ वर्षे पुर्ण झाली. गणेश चतुर्थीच्या दिवशी, (सप्टेंबर १६, १९९६) मायबोलीची सुरुवात झाली होती.

मायबोलीच्या २६ व्या वाढदिवसाच्या या आनंदाच्या दिवशी, सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा!!. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि सहभागामुळे हा प्रवास सुरु आहे आणि राहिल.

-अ‍ॅडमीन टिम

विषय: 
प्रकार: 

अभिनंदन आणि शुभेच्छा!

मायबोलीने खुप काही दिले. देशोदेशींच्या मायबोलीकरांशी ओळख होऊ शकली, वेगळे विचार कळले, एकाच गोष्टीकडे अनेकांनी वेगवेगळ्या दृष्टीने पाहुन दिलेले प्रतिसाद वाचुन असेही दृष्त्टीकोन असु शकतात हे भान दिले,
त्यामुळे माझ्यातला जजमेंटलपणा काही अंशी कमी झाला असावा असे वाटते. +११११

मायबोलीला नि मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा.

मायबोलीने मला अनेक चांगले मित्र सर्व जगभर दिले. अश्या एखाद्या मराठी व्यासपीठाची अत्यंत गरज होती. माझे अनेक दिवस फार आनंदात गेले.
अजय, समीर आणि इतर अनेक स्वयंसेवक यांचे परिश्रम. प्रणाम.

एकीकडे उपक्रम, मनोगत वगैरे संकेतस्थळे बंद होत गेली असताना मायबोली नेटाने चालू ठेवणे, नवीन सदस्यांना आकृष्ट करणे आणि विविध मतमतांतरे असलेल्या सदस्यांना सांभाळून तांत्रिक बाबींशी कायम दोन हात करत इतके वर्षे टिकून राहणे सोपे काम नाही. कौतुक आणि अभिनंदन.

मायबोलीला शुभेच्छा. ह. पा यांच्या प्रमाणेच विचार.
द्रुपल बेस संकेतस्थळ अनेक वर्षे सातत्याने चालू ठेवणे, त्याबरोबर इतर माध्यम प्रायोजक विस्तार.अतिशय मोठी आणि कौतुकास्पद झेप आहे.पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.
मायबोलीच्या चाळीशी पन्नाशीला आपण सगळे धडधाकट आणि समाधानी असू आणि अश्या धाग्यावर परत प्रतिसाद देऊ ही आपल्या सर्वांसाठी सदिच्छा.

खूप मोठा प्रवास पार पडला आहे . पण हा तर एक विसावा . अजून पुढचा पल्ला गाठण्यासाठी माबोला खूप खूप शुभेच्छा !
अन सर्व सदस्य , वाचक , रसिक , लेखक , ऍडमिन टीम , साऱ्यांना देखील खूपच शुभेच्छा !

मायबोलीला २६ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !
मायबोली यापुढे ही अशीच प्रगती करत राहो !

मायबोली केवळ website किंवा पोर्टल नाही, तर एक अनुभव आहे, तो घ्यावाच लागतो!
हैप्पी बड्डे माबो <३

समस्त माबोकरांचं मनापासून अभिनंदन!
माबोनं अनेक जाणिवा आणि उत्तम मित्र-मैत्रिणी दिलेत. मुख्य म्हणजे प्रचंड आनंद दिलाय.
वीसेक वर्षं तरी माबोचा प्रवास बघतेय, ही प्रदीर्घ आणि यशस्वी वाटचाल अशीच अखंड होत राहो, ही मनःपुर्वक शुभेच्छा.

अभिनंदन आणि शुभेच्छा! मायबोली मधे एक आगळाच जिव्हाळा आहे Happy

वेगळे विचार कळले, एकाच गोष्टीकडे अनेकांनी वेगवेगळ्या दृष्टीने पाहुन दिलेले प्रतिसाद वाचुन असेही दृष्त्टीकोन असु शकतात हे भान दिले,
त्यामुळे माझ्यातला जजमेंटलपणा काही अंशी कमी झाला असावा असे वाटते. मलाही थोडीफार ओळख मिळवुन दिली >>> साधना च्या पोस्ट ला +१

Pages