ब्रम्हास्त्र बघा आणि निगेटिव्ह रिव्ह्यूचे भ्रमास्त्र तोडा!

Submitted by निमिष_सोनार on 11 September, 2022 - 02:39

ब्रम्हास्त्र (पार्ट 1: शिवा) ह्या 9 सप्टेंबर 22 ला रिलीज झालेल्या चित्रपटाचे हे परीक्षण आहे. मी हा चित्रपट 3D मध्ये बघितला. हा चित्रपट ट्रायोलॉजी असणार आहे म्हणजे या चित्रपटाचे अजून दोन भाग येतील. पहिल्या भागाच्या शेवटी दुसऱ्या भागाचे नाव अनाउन्स देखील झाले आहे, त्याचे नाव असणार आहे ब्रह्मास्त्र (पार्ट 2: देव). हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन थ्रीडीमध्येच बघणे योग्य आहे. हा लेख लांबणार आहे पण माझी विनंती आहे की हा लेख शेवटपर्यंत पूर्ण वाचावा कारण यात फक्त परीक्षणच नाही तर या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक मुद्द्यांचा उहापोह केला आहे त्यातून तुम्हाला अनेक गोष्टींची माहिती मिळेल. आतापर्यंत भारतात सुपरहिरो असलेले अनेक चित्रपट येऊन गेले जसे भावेश जोशी, क्रिश, रा वन, फ्लाईंग जट्ट वगैरे. मुकेश खन्नापण आता शक्तिमानला भव्य दिव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर आणणार आहेत.

तर परीक्षण सुरु करण्याआधी मी सांगू इच्छितो की, ब्रह्मास्त्र आणि इतर अनेक बॉलिवूड चित्रपटांबद्दल सध्या सुरू असलेल्या वादग्रस्त मुद्द्यांचे पूर्वग्रह बाजूला सारून (जसे आलिया भट्ट कोणत्यातरी एका मुलाखतीत काय म्हणाली होती, ती कोणाची मुलगी आहे, तिचे वडील स्वभावाने कसे आहेत, आणि अमका कलाकार काय म्हणाला होता आणि तमक्या कलाकाराने अमक्या वर्षांपूर्वी काय केले होते, या चित्रपटाचा प्रोड्युसर कोण आहे, त्याचा स्वभाव कसा आहे वगैरे) तसेच सध्या प्रत्येक चित्रपटांत घुसलेले राजकारण हे सगळे बाजूला ठेऊन मी हा रिव्ह्यू केला आहे. एक सामान्य सिनेमा प्रेक्षक आणि रसिक या एकमेव नात्याने मी हा चित्रपट पाहिला आहे आणि त्याच नात्याने या चित्रपटाचे परीक्षण करत आहे आणि जे लोक फक्त एक कलाकृती म्हणून सिनेमा बघायला जातात त्यांच्याचसाठी हा रिव्ह्यू आहे! प्रत्येक चित्रपटाचे राजकारणच करायचे असे मनाशी ठरवून तो जर पाहिला गेला तर त्यात काही ना काही असे ओढून ताणून सापडतेच ज्याचा राजकारणाशी संबंध जोडता येईल.

हां, मात्र जेव्हा चित्रपटाची कथाच मुळात एखाद्या घडून गेलेल्या राजकीय घटनेवर आधारित असते ती गोष्टच वेगळी असते. तेव्हा तर चित्रपटात राजकारण कथेद्वारे आधीच घुसलेले असते. (उदाहरणार्थ धर्मवीर). तेव्हा राजकारण करत बसायला चांगला वाव असतो. त्यावेळेस चित्रपटाचे पूर्णपणे राजकारण झालेले असते.

सध्या बॉलीवूडवर टीका होते आहे की, बॉलीवूड फक्त रिमेक बनवत आहे (दो बारा, विक्रम वेधा, कट्टपुत्तली, मुळशी पॅटर्नचा रिमेक "अंतिम" वगैरे). परंतु, जेव्हा ओरिजनल बनवले जाते तेव्हासुद्धा टीकाच होते हे समजण्यापलीकडचे आहे. हॉलीवूडच्या "अवेंजर्स" सीरीजमधल्या सगळ्या चित्रपटात, विज्ञानाच्या नावाखाली अनेक अशक्य (अक्षरशः जादू वाटणाऱ्या) गोष्टी दाखवल्या जातात आणि त्या आपण सहजपणे वैज्ञानिक वैज्ञानिक म्हणून खपवून घेतो. आणि इथे भारतात जेव्हा ओरिजिनल काहीतरी कोणीतरी बनवायला जातं तेव्हा त्यात भारतीय प्रेक्षक सतराशे साठ चुका काढतो. हे बरोबर नाही. हॉलिवूड मारव्हल अवेंजर्सचे सगळेच 27/28 चित्रपट भारतीय लोक बघतात (त्यातील काही तर अगदीच सुमार आहेत), परंतु भारतात एखादा चांगला नवीन ओरिजिनल प्रयोग सुरू झाला, त्यावर मात्र विनाकारण टीका करतो.

तर ब्रम्हास्त्र हा अस्सल भारतीय सुपरहिरो फॅन्टसी अँक्शन थ्रिलर चित्रपट आहे. यात जागतिक दर्जाचे हॉलिवुडच्या तोडीचे VFX (स्पेशल इफेक्ट्स) आहेत. याची कथा पूर्ण ओरिजिनल आहे. काहीजण लगेच याची तुलना हॉलिवुड अवेंजर्सशी करायला लागले, त्यांचे कन्सेप्ट कॉपी केले असे म्हणायला लागले आहेत पण तसे नाही आहे. खरे पाहिले तर ते लोक पण आपल्या (आणि ग्रीक, रोमन गॉड) पौराणिक कथांवरून प्रेरणा घेऊन चित्रपट बनवत असतात. जसे हनुमानाची गदा आणि थॉरचा हातोडा, आपला उडणारा हनुमान आणि त्यांचा उडणारा सुपरमॅन, लहान आणि मोठा आकार धारण करू शकणारा हनुमान आणि याचीच कॉपी असलेला राग आल्यावर आकार मोठा होणारा हल्क अशी अनेक उदाहरणे देता येतील.

पण काय झाले की, त्यांच्या कथा कल्पनांना पडद्यावर मूर्त रूप देण्यासाठी जे VFX तंत्रज्ञान लागते ते त्यांच्याकडे आधी आले आणि आपल्याकडे फार उशिरा आले. (क्रिश1 ने परदेशी तंत्रज्ञ वापरले होते मात्र क्रिश3 आणि रा वन ला शाहरुखच्या भारतीय कंपनीने स्पेशल इफेक्ट दिले होते. रा वन मधला मुंबई लोकल ट्रेनचा थरारक सिन ज्यात CST स्टेशन इमारत ढासळतांना दाखवली आहे तसेच क्रिश3 मध्ये शेवटी मुंबईतील इमारती कोसळत असताना स्ट्रॉलरमधल्या लहान बाळाला क्रिश कसे वाचवतो ते आठवा!)

ब्रम्हास्रला ऑस्कर विजेत्या टीम ने VFX दिले आहेत. यातही असाच एक लहान मुलाचा थरारक सिन आहे जो इंटरव्हल नंतर लगेच येतो त्या पण त्याबद्दल जास्त काही सांगता येणार नाही कारण चित्रपटातील अनेक पैकी एक रहस्य उलगडले जाईल जे चित्रपट बघायला जाण्याआधी माहिती असणे योग्य नाही. (जसे गुप्त मध्ये काजोल खुनी आहे हे आधीच माहीत पडले तर चित्रपट बघण्यात अर्थ रहात नाही)

ब्रह्मास्त्रची स्टोरी अयान मुखर्जीने लिहिली आहे. चित्रपटात एकूण नऊ अस्त्रांचा यांचा उल्लेख आहे. सर्व अस्त्रांची प्रमुख देवता म्हणजे ब्रह्मास्त्र. प्राचीन काळापासून ब्रह्मास्त्रचे रक्षण करणारी एक टीम आहे ज्यांना ब्रह्मांश म्हणतात. चित्रपटाची कथा सध्याच्या काळात घडते.

सध्या त्या ब्रह्मास्त्रचे तीन तुकडे झाले आहेत. ते तुकडे का झालेत याची एक मोठी कथा आहे ती इथे सांगत नाही. त्या कथेचा संबंध रणवीर कपूरच्या म्हणजे शिवाच्या आईवडिलांशी आहे, ती कथा अमिताभ (ब्रह्मांशचा गुरु) आपल्याला थोडक्यात सांगतो परंतु या चित्रपटाच्या पुढच्या भागात कदाचित शिवाच्या आई वडिलांची पूर्ण कथा सांगण्यात येईल. रणबिर कपूर स्वतः सुद्धा एक अस्त्र आहे अग्निअस्त्र. मात्र त्याची पूर्ण शक्ती वापरण्यासाठी त्याच्या जीवनात आलिया भट यावी लागते. ब्रह्मास्त्रचे दोन तुकडे दोन जणांकडे सुरक्षित आहेत. एक तुकडा मुंबईत राहणाऱ्या सायंटिस्ट मोहन भार्गव (शाहरुख खान) यांच्याकडे आहे. चित्रपटाच्या अगदी सुरुवातीलाच मोहन यांचेकडून जुनून नावाची एक विलन आपल्या दोन साथीदारांसह (जोश आणि रफ्तार) तो तुकडा चोरते आणि इतर दोन तुकडे कुठे आहेत तसेच ब्रह्मांश टीम चा आश्रम कुठे आहे याबद्दल मोहन यांना बंदी बनवून विचारते. ते पूर्ण माहिती सांगत नाहीत आणि इमारतीचे टेरेसवरून उडी मारतात. दुसरा तुकडा असतो नागार्जुन म्हणजे एक आर्टिस्ट जे वाराणसीत राहत असतात त्यांच्याकडे! तिसरा तुकडा कुणाकडे असतो हे सुज्ञ वाचक येथे ओळखू शकतात पण तो ज्याच्याकडे असतो त्याला ते माहिती नसते, त्याला ते कसे माहिती पडते आणि तो तुकडा कशाच्या स्वरूपात असतो ते बघणे खूप मनोरंजक आहे.

शाहरुखच्या घरी घडलेले सगळे रणवीरला आपोआप स्वप्नात दिसत राहते. जुनून (मौनी रॉय) आणि तिची दोन साथीदार वाराणसीत नागार्जुनच्या मागे लागतात त्यांना वाचवण्यासाठी रणवीर आणि आलिया भट वाराणसी पोहोचतात. मोहन यांच्याकडे वानर अस्त्र असते तर नागार्जुन याच्याकडे नंदी अस्त्र असते. या चित्रपटात हे अस्त्र जेव्हा जागृत होतात तेव्हा ते फक्त मूळ व्यक्तीच्या पाठीमागे अंधुक स्वरूपात दिसत राहतात मूळ व्यक्ती त्या अस्त्राच्या रूपात ट्रान्सफॉर्म होत नाही. हा एक युनिक कन्सेप्ट आहे आणि ओरिजनल आहे. बरेच जण म्हणतात की हा नुसता लेझर शो आहे परंतु ते खरे नाही. चित्रपट आणि त्यामागचा कन्सेप्ट पूर्णपणे नीट समजून न घेता अनेक लोक या चित्रपटावर टीका करत सुटले आहेत. परंतु गेल्या दोन दिवसांचे कलेक्शन बघता हा चित्रपट प्रेक्षकांना आवडल्याचे दिसत आहे. असो.

जेव्हा जेव्हा ते अस्त्र जागृत होतात तेव्हा पडद्यावर भव्य दिव्य स्पेशल इफेक्ट आपले डोळे दिपवून टाकतात. तसेच हिमाचल प्रदेशातील पहाडी रस्त्यांवर कारचा थरारक पाठलाग असलेला जो सिन आहे तो तर हॉलीवुडच्याही कुठल्या चित्रपटाला लाजवेल असा आहे. तसेच वाराणसीतील शिव मंदिरातील जूनून टीम आणि रणबीर आलिया नागार्जुन यांच्यातील भव्य दिव्य फाईट सीन, बाप रे!

हे तर फक्त इंटरवल पर्यंत झाले. चित्रपट मोठा आहे. जवळपास तीन तासांचा!!

सेकंड हाफ मध्ये ब्रह्मांशचे रक्षक असलेली टीम जिथे राहते तो आश्रम दाखवला गेलेला आहे. त्याबद्दल वापरलेली कल्पनाशक्ती सुद्धा वाखाणण्याजोगी आहे. सेकंड हाफ मध्ये अमिताभची एन्ट्री होते. त्यानंतर ही बरीच कथा बाकी आहे आणि खूप गोष्टी घडतात. खूप नवी रहस्ये कळतात. चित्रपटाच्या शेवटी तर भरपूर अग्नी म्हणजे आगीने भरलेले VFX आहेत. नंतर अनेक अस्त्रांची ओळख होते जसे धनुष नाग अस्त्र, बर्फ अस्त्र, पवन अस्त्र, जल अस्त्र, प्रभा अस्त्र (प्रकाश असलेले अस्त्र) आहेत. अर्थात या सगळ्याच अस्त्रांचे धारक आणि त्यांचे उपयोग या पहिल्या चित्रपटात दाखवलेले नाहीत ते कदाचित पुढच्या दोन चित्रपटांमध्ये नीट दिसून येतील.

रणवीर कपूर आणि आलिया भटचे आणि अमिताभचे थोडेफार सीन वगळता संपूर्ण चित्रपटच स्पेशल इफेक्टने भरलेला आहे. यातील तीन गाणी चांगली आहेत. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम प्रेक्षणीय झाली आहे. जेव्हा विजुअल इफेक्ट्स नसतात तेव्हा भारतातील विविध शहरातील भव्य दिव्य पद्धतीने साजरे होणारे सण (दसरा, दुर्गापूजा, दिवाळी वगैरे) आपल्याला रणबीर आलियाच्या प्रेमकथेत बॅकग्राऊंडला दिसत राहतात ते बघायला खूपच छान वाटते. थ्रीडी मध्ये तर आणखी तिथे प्रत्यक्ष गेल्यासारखे वाटते. या चित्रपटातील बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा खूपच छान आहे. कार पाठलाग सिनच्या वेळेस असलेले बॅकग्राऊंड म्युझिक आणखी थ्रिलिंग एलिमेंट ऍड करते.

या चित्रपटातील शेवटी आपल्याला पुढील भागाची कथा काय असेल याचा अंदाज दिग्दर्शक देतो. एकूणच एक भव्य दिव्य डोळे दिपवून टाकणारा एक वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर हा चित्रपट बघायलाच हवा. आणि कोणताही पूर्वग्रहदूषित चष्मा न लावता थ्रीडी वाला चष्मा लावून हा चित्रपट बघायला हवा.

- निमिष सोनार, पुणे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

200 कोटी मधले १४० कोटी गेले आणि ६० कोटी मिळाले हा चांगला धंदा. Rofl पैसे पांढरे कसे करावे हे गूगल केलं तरी याहून चांगले उपाय सापडतील.

अरे देवा Proud
बॉलिवुडमध्ये काळा पैसा, अंडरवर्ल्डचा पैसा, राजकारण्यांचा पैसा, ड्रग आणि फ्लेश ट्रेडचा पैसा नसतो, सगळा व्हाईट्ट असतो असं स्वतःला सांगणं हे भयानक कोपिंग आहे.

निवडणुका,सिनेमा,बांधकाम उद्योग,अगदी देवळात दिल्या जाणाऱ्या मोठ्या देणग्या, पार्टी फंड,सामाजिक कार्याचा मुखवटा घेतलेले ट्रस्ट.
अशा अनेक ठिकाणी ब्लॅक मनी असतो.आणि सफेद केला जातो

बॉलिवुडमध्ये काळा पैसा, अंडरवर्ल्डचा पैसा, राजकारण्यांचा पैसा, ड्रग आणि फ्लेश ट्रेडचा पैसा नसतो, सगळा व्हाईट्ट असतो असं स्वतःला सांगणं हे भयानक कोपिंग आहे

>>>> हे सगळे इन्व्हेस्टमेंट बद्दल झाले. चित्रपटाचे शेकडो करोडचे कॅश/लहान बँक क्रेडिट्सचे कलेक्शन काळा पैसा पांढरा करण्यासाठी आहे असे सुचवून आता बेस बदलण्याचा गंमतीशीर प्रयत्न आवडला. कीप कोपिंग Happy

There really is no way to validate the numbers given by karan johar.
सामान्य लोकांना कलेक्शन पडताळून पाहण्याचा एकमेव उपाय म्हणजे बुकमायशो , पेटीएम etc. जर बुकमायशोवर लालसिंगप्रमाणेच empty theaters दिसत आहेत तर लोक एकवेळ 40-50 फारतर १०० करोड जमवले यावर विश्वास ठेवतील- 300 करोड वगैरे काहीही रक्कम सांगितली तर प्रश्न पडणारच.
लोकांनी trade analyst मंडळी आणि बॉलिवूड वेबसाईट्सची जुनी ट्विट्स वगैरे उकरून काढली आहेत ज्यात फेक नंबर्स दिले जातात असं स्पष्ट म्हटलं आहे. जुनी म्हणजे बॉयकोट-करोना-सुशांत टाईमलाईनच्या आधीची. Happy

There really is no way to validate the numbers given by karan johar.

.....

कन्स्पायरसी थियरीस काय बोलणार ? चालू द्या. आकडे काही करणं जोहर ह्या व्यक्तीने दिले नाहीत. काहीतरी व्यवस्था असते, त्यातून आले असतात.

सामान्य लोकांना कलेक्शन पडताळून पाहण्याचा एकमेव उपाय म्हणजे बुकमायशो , पेटीएम etc.
......

विदा आणि anecdotes ह्यामध्ये गडबड दिसते तुमच्या मनात. काय बोलणार कप्पाळ ?

अर्थात, तुमच्याकडे भारतभराचा स्क्रीन दाखवणारे पेटीएम ऍप असेल, माहित नाही बुवा.

मी माझे सांगतो. बुकमायशो वर फारसे भरलेले नव्हते. त्यामुळे आम्ही स्पॉट वर बुक करून जादाचा चार्ज वाचवला. थिएटर विकडे असूनही ६०% - ७०% भरलेले होते. मला दिसेल तो व्यक्ती सिनेमा पाहून शिव्या घालताना दिसतोय. मग, हे अनेकडोट्स चालवून घ्याल का ?

खुद्द मायबोलीवर कितीतरी लोकांनी पाहिलाय.

आणि कसल्याही अकड्यांवर विश्वास नाही, फक्त पेटीएम बुकमाय शो वरच्या ऐकल्या दुकल्या स्क्रीनवर विश्वास ठेवणार म्हणत असाल तर इतक्या टुकार विनोदी लाईनवर चर्चा शक्य नाही ब्वा.

काहीतरी व्यवस्था असते, त्यातून आलेली असते म्हणजे काय? How to verify? Trade analyst ची २०२० पूर्वीची ट्विट्स आहेत त्यात ते सांगतायत की फेक कलेक्शन दाखवणं एकदमच सोपं आहे.
बुकमायशोवर पूर्ण शहराचा त्या त्या दिवशीचा स्नॅपशॉट दिसतो. त्यात संडे नाईटला एकही शो हाऊसफुल नाही, थोडे शो partially भरलेले बाकीचे ग्रीन असं चित्र दिसत असेल तर मुव्ही सुपरहिट कसा मानावा, it's average. त्यातून word of mouth वाईट आहे हे तुम्हीच म्हणताय. सो ते नंबर्स लॉजिकल वाटत नाहीत.

कलेक्शन साठी हाऊसफुल होण्याची गरज नसते... स्क्रिन काउंट खूप आहे ब्रह्मास्त्र चा... आणि हा दुसरा आठवडा आहे...

5000 स्क्रीन्स वर रिलीज झाला आहे... प्रत्येक थेटर मध्ये दोनशे ते तीनशे सीट्स असतात... आपण दीडशे पकडू...फक्त 30% बुक असेल तरी प्रत्येक थेटर मध्ये पन्नास सीट्स होतात( लोवर साईड पकडून)... असे तीन शो रोज( 4 ते 5 असतात) ... टोटल 150 टिकेट्स ...
प्रत्येक तिकिट ची किंमत दोनशे पकडू अवरेज...
टोटल एका दिवसाचे कलेक्शन = 150 * 200 * 5000= 15 करोड

Pages