ब्रम्हास्त्र बघा आणि निगेटिव्ह रिव्ह्यूचे भ्रमास्त्र तोडा!

Submitted by निमिष_सोनार on 11 September, 2022 - 02:39

ब्रम्हास्त्र (पार्ट 1: शिवा) ह्या 9 सप्टेंबर 22 ला रिलीज झालेल्या चित्रपटाचे हे परीक्षण आहे. मी हा चित्रपट 3D मध्ये बघितला. हा चित्रपट ट्रायोलॉजी असणार आहे म्हणजे या चित्रपटाचे अजून दोन भाग येतील. पहिल्या भागाच्या शेवटी दुसऱ्या भागाचे नाव अनाउन्स देखील झाले आहे, त्याचे नाव असणार आहे ब्रह्मास्त्र (पार्ट 2: देव). हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन थ्रीडीमध्येच बघणे योग्य आहे. हा लेख लांबणार आहे पण माझी विनंती आहे की हा लेख शेवटपर्यंत पूर्ण वाचावा कारण यात फक्त परीक्षणच नाही तर या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक मुद्द्यांचा उहापोह केला आहे त्यातून तुम्हाला अनेक गोष्टींची माहिती मिळेल. आतापर्यंत भारतात सुपरहिरो असलेले अनेक चित्रपट येऊन गेले जसे भावेश जोशी, क्रिश, रा वन, फ्लाईंग जट्ट वगैरे. मुकेश खन्नापण आता शक्तिमानला भव्य दिव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर आणणार आहेत.

तर परीक्षण सुरु करण्याआधी मी सांगू इच्छितो की, ब्रह्मास्त्र आणि इतर अनेक बॉलिवूड चित्रपटांबद्दल सध्या सुरू असलेल्या वादग्रस्त मुद्द्यांचे पूर्वग्रह बाजूला सारून (जसे आलिया भट्ट कोणत्यातरी एका मुलाखतीत काय म्हणाली होती, ती कोणाची मुलगी आहे, तिचे वडील स्वभावाने कसे आहेत, आणि अमका कलाकार काय म्हणाला होता आणि तमक्या कलाकाराने अमक्या वर्षांपूर्वी काय केले होते, या चित्रपटाचा प्रोड्युसर कोण आहे, त्याचा स्वभाव कसा आहे वगैरे) तसेच सध्या प्रत्येक चित्रपटांत घुसलेले राजकारण हे सगळे बाजूला ठेऊन मी हा रिव्ह्यू केला आहे. एक सामान्य सिनेमा प्रेक्षक आणि रसिक या एकमेव नात्याने मी हा चित्रपट पाहिला आहे आणि त्याच नात्याने या चित्रपटाचे परीक्षण करत आहे आणि जे लोक फक्त एक कलाकृती म्हणून सिनेमा बघायला जातात त्यांच्याचसाठी हा रिव्ह्यू आहे! प्रत्येक चित्रपटाचे राजकारणच करायचे असे मनाशी ठरवून तो जर पाहिला गेला तर त्यात काही ना काही असे ओढून ताणून सापडतेच ज्याचा राजकारणाशी संबंध जोडता येईल.

हां, मात्र जेव्हा चित्रपटाची कथाच मुळात एखाद्या घडून गेलेल्या राजकीय घटनेवर आधारित असते ती गोष्टच वेगळी असते. तेव्हा तर चित्रपटात राजकारण कथेद्वारे आधीच घुसलेले असते. (उदाहरणार्थ धर्मवीर). तेव्हा राजकारण करत बसायला चांगला वाव असतो. त्यावेळेस चित्रपटाचे पूर्णपणे राजकारण झालेले असते.

सध्या बॉलीवूडवर टीका होते आहे की, बॉलीवूड फक्त रिमेक बनवत आहे (दो बारा, विक्रम वेधा, कट्टपुत्तली, मुळशी पॅटर्नचा रिमेक "अंतिम" वगैरे). परंतु, जेव्हा ओरिजनल बनवले जाते तेव्हासुद्धा टीकाच होते हे समजण्यापलीकडचे आहे. हॉलीवूडच्या "अवेंजर्स" सीरीजमधल्या सगळ्या चित्रपटात, विज्ञानाच्या नावाखाली अनेक अशक्य (अक्षरशः जादू वाटणाऱ्या) गोष्टी दाखवल्या जातात आणि त्या आपण सहजपणे वैज्ञानिक वैज्ञानिक म्हणून खपवून घेतो. आणि इथे भारतात जेव्हा ओरिजिनल काहीतरी कोणीतरी बनवायला जातं तेव्हा त्यात भारतीय प्रेक्षक सतराशे साठ चुका काढतो. हे बरोबर नाही. हॉलिवूड मारव्हल अवेंजर्सचे सगळेच 27/28 चित्रपट भारतीय लोक बघतात (त्यातील काही तर अगदीच सुमार आहेत), परंतु भारतात एखादा चांगला नवीन ओरिजिनल प्रयोग सुरू झाला, त्यावर मात्र विनाकारण टीका करतो.

तर ब्रम्हास्त्र हा अस्सल भारतीय सुपरहिरो फॅन्टसी अँक्शन थ्रिलर चित्रपट आहे. यात जागतिक दर्जाचे हॉलिवुडच्या तोडीचे VFX (स्पेशल इफेक्ट्स) आहेत. याची कथा पूर्ण ओरिजिनल आहे. काहीजण लगेच याची तुलना हॉलिवुड अवेंजर्सशी करायला लागले, त्यांचे कन्सेप्ट कॉपी केले असे म्हणायला लागले आहेत पण तसे नाही आहे. खरे पाहिले तर ते लोक पण आपल्या (आणि ग्रीक, रोमन गॉड) पौराणिक कथांवरून प्रेरणा घेऊन चित्रपट बनवत असतात. जसे हनुमानाची गदा आणि थॉरचा हातोडा, आपला उडणारा हनुमान आणि त्यांचा उडणारा सुपरमॅन, लहान आणि मोठा आकार धारण करू शकणारा हनुमान आणि याचीच कॉपी असलेला राग आल्यावर आकार मोठा होणारा हल्क अशी अनेक उदाहरणे देता येतील.

पण काय झाले की, त्यांच्या कथा कल्पनांना पडद्यावर मूर्त रूप देण्यासाठी जे VFX तंत्रज्ञान लागते ते त्यांच्याकडे आधी आले आणि आपल्याकडे फार उशिरा आले. (क्रिश1 ने परदेशी तंत्रज्ञ वापरले होते मात्र क्रिश3 आणि रा वन ला शाहरुखच्या भारतीय कंपनीने स्पेशल इफेक्ट दिले होते. रा वन मधला मुंबई लोकल ट्रेनचा थरारक सिन ज्यात CST स्टेशन इमारत ढासळतांना दाखवली आहे तसेच क्रिश3 मध्ये शेवटी मुंबईतील इमारती कोसळत असताना स्ट्रॉलरमधल्या लहान बाळाला क्रिश कसे वाचवतो ते आठवा!)

ब्रम्हास्रला ऑस्कर विजेत्या टीम ने VFX दिले आहेत. यातही असाच एक लहान मुलाचा थरारक सिन आहे जो इंटरव्हल नंतर लगेच येतो त्या पण त्याबद्दल जास्त काही सांगता येणार नाही कारण चित्रपटातील अनेक पैकी एक रहस्य उलगडले जाईल जे चित्रपट बघायला जाण्याआधी माहिती असणे योग्य नाही. (जसे गुप्त मध्ये काजोल खुनी आहे हे आधीच माहीत पडले तर चित्रपट बघण्यात अर्थ रहात नाही)

ब्रह्मास्त्रची स्टोरी अयान मुखर्जीने लिहिली आहे. चित्रपटात एकूण नऊ अस्त्रांचा यांचा उल्लेख आहे. सर्व अस्त्रांची प्रमुख देवता म्हणजे ब्रह्मास्त्र. प्राचीन काळापासून ब्रह्मास्त्रचे रक्षण करणारी एक टीम आहे ज्यांना ब्रह्मांश म्हणतात. चित्रपटाची कथा सध्याच्या काळात घडते.

सध्या त्या ब्रह्मास्त्रचे तीन तुकडे झाले आहेत. ते तुकडे का झालेत याची एक मोठी कथा आहे ती इथे सांगत नाही. त्या कथेचा संबंध रणवीर कपूरच्या म्हणजे शिवाच्या आईवडिलांशी आहे, ती कथा अमिताभ (ब्रह्मांशचा गुरु) आपल्याला थोडक्यात सांगतो परंतु या चित्रपटाच्या पुढच्या भागात कदाचित शिवाच्या आई वडिलांची पूर्ण कथा सांगण्यात येईल. रणबिर कपूर स्वतः सुद्धा एक अस्त्र आहे अग्निअस्त्र. मात्र त्याची पूर्ण शक्ती वापरण्यासाठी त्याच्या जीवनात आलिया भट यावी लागते. ब्रह्मास्त्रचे दोन तुकडे दोन जणांकडे सुरक्षित आहेत. एक तुकडा मुंबईत राहणाऱ्या सायंटिस्ट मोहन भार्गव (शाहरुख खान) यांच्याकडे आहे. चित्रपटाच्या अगदी सुरुवातीलाच मोहन यांचेकडून जुनून नावाची एक विलन आपल्या दोन साथीदारांसह (जोश आणि रफ्तार) तो तुकडा चोरते आणि इतर दोन तुकडे कुठे आहेत तसेच ब्रह्मांश टीम चा आश्रम कुठे आहे याबद्दल मोहन यांना बंदी बनवून विचारते. ते पूर्ण माहिती सांगत नाहीत आणि इमारतीचे टेरेसवरून उडी मारतात. दुसरा तुकडा असतो नागार्जुन म्हणजे एक आर्टिस्ट जे वाराणसीत राहत असतात त्यांच्याकडे! तिसरा तुकडा कुणाकडे असतो हे सुज्ञ वाचक येथे ओळखू शकतात पण तो ज्याच्याकडे असतो त्याला ते माहिती नसते, त्याला ते कसे माहिती पडते आणि तो तुकडा कशाच्या स्वरूपात असतो ते बघणे खूप मनोरंजक आहे.

शाहरुखच्या घरी घडलेले सगळे रणवीरला आपोआप स्वप्नात दिसत राहते. जुनून (मौनी रॉय) आणि तिची दोन साथीदार वाराणसीत नागार्जुनच्या मागे लागतात त्यांना वाचवण्यासाठी रणवीर आणि आलिया भट वाराणसी पोहोचतात. मोहन यांच्याकडे वानर अस्त्र असते तर नागार्जुन याच्याकडे नंदी अस्त्र असते. या चित्रपटात हे अस्त्र जेव्हा जागृत होतात तेव्हा ते फक्त मूळ व्यक्तीच्या पाठीमागे अंधुक स्वरूपात दिसत राहतात मूळ व्यक्ती त्या अस्त्राच्या रूपात ट्रान्सफॉर्म होत नाही. हा एक युनिक कन्सेप्ट आहे आणि ओरिजनल आहे. बरेच जण म्हणतात की हा नुसता लेझर शो आहे परंतु ते खरे नाही. चित्रपट आणि त्यामागचा कन्सेप्ट पूर्णपणे नीट समजून न घेता अनेक लोक या चित्रपटावर टीका करत सुटले आहेत. परंतु गेल्या दोन दिवसांचे कलेक्शन बघता हा चित्रपट प्रेक्षकांना आवडल्याचे दिसत आहे. असो.

जेव्हा जेव्हा ते अस्त्र जागृत होतात तेव्हा पडद्यावर भव्य दिव्य स्पेशल इफेक्ट आपले डोळे दिपवून टाकतात. तसेच हिमाचल प्रदेशातील पहाडी रस्त्यांवर कारचा थरारक पाठलाग असलेला जो सिन आहे तो तर हॉलीवुडच्याही कुठल्या चित्रपटाला लाजवेल असा आहे. तसेच वाराणसीतील शिव मंदिरातील जूनून टीम आणि रणबीर आलिया नागार्जुन यांच्यातील भव्य दिव्य फाईट सीन, बाप रे!

हे तर फक्त इंटरवल पर्यंत झाले. चित्रपट मोठा आहे. जवळपास तीन तासांचा!!

सेकंड हाफ मध्ये ब्रह्मांशचे रक्षक असलेली टीम जिथे राहते तो आश्रम दाखवला गेलेला आहे. त्याबद्दल वापरलेली कल्पनाशक्ती सुद्धा वाखाणण्याजोगी आहे. सेकंड हाफ मध्ये अमिताभची एन्ट्री होते. त्यानंतर ही बरीच कथा बाकी आहे आणि खूप गोष्टी घडतात. खूप नवी रहस्ये कळतात. चित्रपटाच्या शेवटी तर भरपूर अग्नी म्हणजे आगीने भरलेले VFX आहेत. नंतर अनेक अस्त्रांची ओळख होते जसे धनुष नाग अस्त्र, बर्फ अस्त्र, पवन अस्त्र, जल अस्त्र, प्रभा अस्त्र (प्रकाश असलेले अस्त्र) आहेत. अर्थात या सगळ्याच अस्त्रांचे धारक आणि त्यांचे उपयोग या पहिल्या चित्रपटात दाखवलेले नाहीत ते कदाचित पुढच्या दोन चित्रपटांमध्ये नीट दिसून येतील.

रणवीर कपूर आणि आलिया भटचे आणि अमिताभचे थोडेफार सीन वगळता संपूर्ण चित्रपटच स्पेशल इफेक्टने भरलेला आहे. यातील तीन गाणी चांगली आहेत. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम प्रेक्षणीय झाली आहे. जेव्हा विजुअल इफेक्ट्स नसतात तेव्हा भारतातील विविध शहरातील भव्य दिव्य पद्धतीने साजरे होणारे सण (दसरा, दुर्गापूजा, दिवाळी वगैरे) आपल्याला रणबीर आलियाच्या प्रेमकथेत बॅकग्राऊंडला दिसत राहतात ते बघायला खूपच छान वाटते. थ्रीडी मध्ये तर आणखी तिथे प्रत्यक्ष गेल्यासारखे वाटते. या चित्रपटातील बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा खूपच छान आहे. कार पाठलाग सिनच्या वेळेस असलेले बॅकग्राऊंड म्युझिक आणखी थ्रिलिंग एलिमेंट ऍड करते.

या चित्रपटातील शेवटी आपल्याला पुढील भागाची कथा काय असेल याचा अंदाज दिग्दर्शक देतो. एकूणच एक भव्य दिव्य डोळे दिपवून टाकणारा एक वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर हा चित्रपट बघायलाच हवा. आणि कोणताही पूर्वग्रहदूषित चष्मा न लावता थ्रीडी वाला चष्मा लावून हा चित्रपट बघायला हवा.

- निमिष सोनार, पुणे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ फेरफटका, काय संबंध?

>>>>>>>>>>
ऋन्मेष म्हणाला - ब्रह्मास्त्रला वाईट म्हणणारेही शाहरूखचे भरभरून कौतुक करत आहेत.
फेरफटका म्हणाले - चुकताहात तुम्ही सर!! मी तर चुकूनही कुणाला असं काही करताना पाहिलेलं नाहीये.
>>>>

यात मी पिक्चर बघितला नाही आणि तुम्ही बघितला आहे याचा काय संबंध ?

मी म्हटले बघून आलेले लोकं शाहरूखचे कौतुक करत आहेत. तर त्यावर तुम्ही म्हणालात की तुम्ही पाहिले नाही. बर्र, तुम्ही पाहिले वाचले नसेल कुठे शाहरूखचे कौतुक तर त्यात तुमचा दोष. त्यात मी कसा चुकलो. त्यामुळे आता मी हे कुठे पाहिले ते मी दाखवणार आहे ईतकेच Happy

त्यात ते कौतुक आशूचँप यांनीही वाचले आहे. ते कबूल करायला नको म्हणून ते म्हणत आहेत की मी शाहरूखचे नाव वाचले की स्किप करतो.. सिरीअसली? ईथे तर ते तसे करत नाहीत. शाहरूख नाव आलेल्या सर्वच पोस्ट वाचतात. किंबहुना मला चिडवायला तर कैक वेळा तेच शाहरूखचा उल्लेख करतात Happy

ऋन्मेष, तुझं सिलेक्टीव्ह वाचनाचं आणि सबगोलंकार प्रतिसाद देण्याचं स्किल वादातीत आहे. प्रणाम!

"तुम्ही पाहिले वाचले नसेल कुठे शाहरूखचे कौतुक तर त्यात तुमचा दोष." - दोष??? हे जरा अति होतंय.

घ्या फेरफटका, मी वाचलेले शाहरूख कौतुक.
हे तुम्ही नाही पाहिले यात मी कसा चुकलो, उलट माझे वाचन जास्त आहे असे म्हणू शकता Happy

एक सूचना - शाहरूख न आवडणार्‍यांनी पोस्ट स्किप मारा. नुसते कवतुक आहे शाहरूखचे Happy

------------------------

सर्वात प्रथम शाहरुख खान येतो, कांहीसा वय वाढलेला तरीही लक्ष वेधुन घेणारा,व सुंदर दिसणारा, अभिनय लक्षात राहणारा,काम आहे फक्त पंधरा मिनीटाचंच पण शेवटी लक्षात राहतो शाहरुख !

- सौ.जयश्री
https://www.facebook.com/groups/360423554642670/posts/1053323378686014/

------------------------

तर चला लय झाली बुराई... आता काही अच्छाई पण बघूया.... तर SRK आणि त्याचे वानरास्त्र उत्तम... ते अजून १५ मिनिट दाखवले असते आणि आलिया रणबीरचा रोमान्स कमी केला असता तर खूप आवडले असते...
दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहतोय... SRK च्या मोहन भार्गवचे स्वदेश मधल्या मोहन भार्गवसोबत कनेक्शन जोडावे... हि इच्छा....

इति - फिल्मीराजे...
https://www.facebook.com/groups/360423554642670/posts/1055115568506795/

------------------------

जमेची बाजू - छोटीशी पण उत्कंठावर्धक शाहरुख आणि नागार्जुन सरांची भूमिका

- प्रविण घटे
https://www.facebook.com/groups/360423554642670/posts/1054362985248720/

------------------------

आम्ही शारक्या म्हणजेच शाहरूखच्या चित्रपटांवर पोषण झालेली जमात आहोत असं अभिमानाने सांगतो, म्हणूनच समाजमाध्यमांवर रॉकेट्री आणि ब्रह्मास्त्र अशा चित्रपटांसाठी दोन टोकाच्या राजकीय भूमिका घेऊन वाद घालणार्या प्रेक्षकांच्या सिनेमांना पाहण्याच कारणच केवळ आमचा शाहरूख असतो.

- Aaditya
https://www.facebook.com/groups/360423554642670/posts/1053160172035668/

------------------------

सिनेमाच्या सुरुवातीलाच शाहरुख खान त्याच्या अभिनयाचं असं काही गारूड निर्माण करतो की, सिनेमा संपल्यावर सुद्धा शाहरुख खान लक्षात राहतो. हा माणूस किती ग्रेट, डोळ्यांनी सगळी कमाल करतो. रॉकेट्री आणि आत्ता
ब्रम्हास्र या दोन्ही सिनेमात शाहरुख खानची पाहुण्या कलाकाराची भूमिका छाप पाडून जातो.

- देवेंद्र
https://www.facebook.com/groups/360423554642670/posts/1053169022034783/

------------------------

पण सिनेमात खरी हवा केली आहे नागार्जुन आणि शाहरुखने. १५-२० मिनिटांचा दोघांचा रोल असेल पण अक्षरशः जलवा केलाय दोघांनीही.

- - कौस्तुभ सु. वाकोडकर
https://www.facebook.com/groups/360423554642670/posts/1052793922072293/

------------------------

मोहन भार्गव च्या भूमिकेत शाहरुख भाव खाऊन जातो.

- मंगेश गोगटे
https://www.facebook.com/groups/360423554642670/posts/1052725855412433/

------------------------

काही जमेच्या बाजू : काही action sequnce चांगल्या जमल्या आहेत. उदाहरणार्थ घाटातून कार चालवताना व्हीलन चा हल्ला आणि पाठलाग बरा वाटला, शाहरुख खान आणि नागार्जुन यांनी केलेले action scenes आणि sequence त्या मानाने उजवे वाटले बाकीच्या लोकांपेक्षा.. अर्थात . अनुभवी अभिनेते असल्यावर जमून येतात असे सीन. अमिताभ बच्चन ने पण बरा केला आहे त्याचा रोल. पण इतकं पुरेसं नाही वाटलं. त्यातला शाहरुख खान हा सायंटिस्ट असतो. आणि त्याचं नाव " मोहन भार्गव " असं दाखवलं आहे.. तेवढाच स्वदेस च्या फॅन लोकांसाठी एक ईस्टर एग.

- निखिल भोयरेकर
https://www.facebook.com/groups/360423554642670/posts/1052174318800920/

------------------------

बॉलिवूड सुपरस्टारची पाहुण्या कलाकाराची भूमिका एक चांगलं सरप्राईज आहे.

- डॉ.स्वप्नील देशमुख.
https://www.facebook.com/groups/360423554642670/posts/1051355628882789/

------------------------

सुरुवातीला ज्याचा cameo चित्रपटात आहे तो वगळता इतर कोणाची खास अशी अभिनयात चुणूक दिसली नाही.

- Abhimanyu Kulkarni
https://www.facebook.com/groups/360423554642670/posts/1051578035527215/

------------------------

गेम ओवर !
शुभरात्री Happy

“हे तुम्ही नाही पाहिले यात मी कसा चुकलो, उलट माझे वाचन जास्त आहे असे म्हणू शकता” - तू जे काही फेसबूक पेजेस फॉलो करतोस, ते मी करत नाही ह्याचा अर्थ तुझं वाचन जास्त आहे असा होत नाही. फेसबूक तसंही तुझ्या इंटरेस्ट्सचे फीड तुला दिसतील असंच वर्क होतं.

तू दिलेल्या फेसबूक पेजेस च्या लिंक्सविषयी इतकंच म्हणेन की आयएमडीबी वरच्या अनेक रिव्ह्यूजमधे शाहरूखचा उल्लेखही नाहीये. असल्या सिलेक्टीव्ह पुराव्यांनी काहीच सिद्ध होत नाही. चर्चा होण्यापेक्षा धागा मात्र भरकटतो.

मुळातच कुठलंही कॅरेक्टर नीट डेव्हलप झालेलंच नाहीये. त्यामुळे कुणाचीच छाप पडत नाही हे मी सिनेमा पाहून माझं निरिक्षण नोंदवलंय. तू फॉलो करत असलेल्या फेसबूक पेजवरच्या ५-१० मतांनी त्यात काही फरक पडणार नाही.

सिनेमाविषयी काही बोलणार असशील तर ठीक, नाहीतर तुझे नेहमीचेच उपद्व्याप चालू दे.

बर्र. फेसबूक ग्रूपवर रिव्यू लिहिणाऱ्यांना काय कळतेय. भले त्यांनी सिनेमा पाहूनच लिहीले का असेना. छे त्यांच्या मताला काय किंमत. ती तर पेड रिव्यूजना. बॉयकॉट अजेंडा ठरवलेल्या ट्रोलर्सच्या रिव्यूंना किंमत... चित्रपटप्रेमींच्या मताला कसली किंमत Happy

आणि ती नुसती दहा जणांची मते नाहीत. तर त्या ग्रूपवर जे १२-१३ रिव्यू आलेले त्यातील १० जणांची मते आहेत. उरलेल्या २-३ जणांनी ट्रोलिंगचा अजेंडा ठरवून नुसते वाईटच लिहीले होते. पण त्यांनी टिका करतानाही शाहरूखचा उल्लेख टाळला. कारण मग कौतुकच करावे लागले असते असा त्याचा कॅमिओ होता Happy

असो, शाहरूखने हवा केलीय हे मात्र नक्की. शीर्षकात म्हटल्याप्रमाणे निगेटीव्ह रिव्ह्यूचे ब्रह्मास्त्र त्याने तोडले आहे..
गेम ऑन.. सुप्रभात Happy

बाई दवे,
ते आयएमडीबीचे सो कॉलड रिव्यू म्हणजे ते छोटे छोटे प्रतिसाद का? त्यात कश्याला कोण काही डिटेल लिहितेय.
मी आणले ते मायबोलीवर परीक्षणाचे लेख येतात तश्या फुल्ल लेंथ लेखातील उल्लेख आहे.
जवळपास सर्वच रिव्यू लिहीणारे चित्रपटाच्या संवाद कथा पटकथा आलिया रणबीर यांना नावे ठेवताना शाहरूखचे भरभरून कौतुक करत आहेत.

प्लिज imdb फॉलो करू नका... लोक न बघताच रेटिंग देतात तिथे.. अजेंडा असतो.. आठवा - छपाक 1.5 imdb ...

ब्रम्हास्त्रचा हिरो शारुक आहे का मग नकोच बघायला!
मी आजवर थेटरात ह्या नटाचा एकही सिनेमा बघितलेला नाही! आणि टिव्हीवर देखिल येता जाता तुकड्यात एखादा बघितला असेल. असो
अर्थात आजकाल थेटरात जाऊन अडीच तीन तास आणि बरेचसे पैसे वाया घालविणे आवडतच नाही. Happy

माझे उलट आहे. शाहृरूखचे जे चित्रपट मला बघावेसे वाटतात ते मी आवर्जून मोठ्या पडद्यावर बघतो. पडदा व्यापून टाकणारा, स्क्रीन खाऊन टाकणारा अदाकार आहे तो. त्याला मोठ्या पडद्यावर बघण्यात एक वेगळीच मजा Happy

दोघेही साठीत पोचताहेत, तोंडावर बोटॉक्स लावुन फिरताहेत.

त्यातल्या त्यात शाह्रुखकडुन अपेक्षा आहेत. त्याने मानेवरची शाहरुख खान नावाची झुल उतरवुन काम केले की मस्त काम करुन जातो. पण त्याला चाहते बेअक्कल भेटलेत.

सलमानकडुन कसलीही अपेक्षा नाही.

सलमानची एक क्रेझ होती ती आली आणि गेली.
शाहरूख हा ऑलटाईम सुपर्रस्टार आहे. त्याची तुलना सलमान वा अक्षय कुमारसारख्या हिरोंच्या हंगामी क्रेझशी बिलकुल होऊ शकत नाही.

पण त्याला चाहते बेअक्कल भेटलेत.
>>>

चित्रपट हे मुळात मनोरंजनाचे माध्यम आहे हे ज्या प्रेक्षकांना कळलेय ते बेअक्कल कसे झाले Happy

शाहरूखच्या क्षमतेबाबत सहमत. त्याची रेंज अफाट नसली तरी त्याचा चेहरा स्पेशली डोळे बोलतात. तो सगळे भाव दाखवू शकतो. स्टाईल आहे, एक्स फॅक्टर आहे, डायलॉग डिलीव्हरी आहे, विनादाची जाण आणि टायमिंग आहे. स्क्रीन प्रेझेन्स आहे,... आणि या सर्वात ऊपर म्हणजे तो खळाळत्या उत्साहाचा झरा आहे जे त्याने अभिनयाची सेकंड ईनिंग सुरू केली तरी तो हिटच ठरेल.

पण शाहरूखनेच त्याच्या फार पूर्वीच्या एका मुलाखतीत सांगितलेले की त्याला स्वत:लाच पॉप्युलर हिरो बनायचे होते. कुठे रस्त्याने गेला तर शाहरूख शाहरूख लोकं ओरडताहेत अशी क्रेज आयुष्यभर अनुभवायची होती. आणि ते त्याने मिळवले. ईतके मिळवले की त्याच्या आसपासही नाही आज कोण. आपण सारे त्याने अमुक भुमिका करायला हवेत आणि तमुक पिक्चर करणे सोडून द्यायला हवेत अश्या कितीही चर्चा झाडल्या तरी त्याला माहीत आहे त्याला आयुष्यात काय बनायचे होते आणि तो यात नक्कीच खुश असेल. त्याचे चाहतेही खुशच असतील. कारण अभिनय बघायचा झाल्यास ईतर पर्याय कैक उपलब्ध आहेत. शाहरूख जे करतो ते करण्यात तोच बेस्ट आहे. तर त्याने आपले शाहरूख असणे कायम जपावे. ब्रह्मास्त्र जेव्हा बघणे होईल तो फक्त आणि फक्त शाहरूखसाठीच बघणे होईल Happy

पण त्याला चाहते बेअक्कल भेटलेत. >>>>>>
Lol Lol
मला खरेच आश्चर्य वाटतं याबद्दल !
दक्षिणेत तर आवडत्या हिरो साठी जीव देणारे चाहते असतात .
त्या मानाने बॉलिवुड हिरोंचे चाहते कमी पडतात असे वाटते Happy

पडद्यावर हिरो ,हेरॉईन ची प्रतिमा असते.सभ्य,गरिबांचे कैवारी,सू स्वभाव असलेले.ती लोकांना खरी वाटायची म्हणून लोक त्यांना देव मानायचे .
पण आता विविध सामाजिक माध्यम,इंटरनेट,टीव्ही चॅनेल त्यांचे खरे रूप पण दाखवतात.
आणि त्यांच्या प्रतिमेच्या प्रेमात पडलेली लोक सावध होतात.
त्या मुळे आता तरी जीवापाड प्रेम करणारे चाहते मिळणे मुश्कील च.
कोण इतके पार्टी मध्ये दारू पितात की चालता पण येत नाही.
खूप मोठ्या प्रमाणात अंग प्रदर्शन करणे .
अशी अनेक कारण आहेत.

“ त्यांच्या मताला काय किंमत.”- तू भांडायचं ठरवूनच येतोस का रे मायबोलीवर? का तुझ्या आवडीची मंडळी खाजगी मालमत्ता समजून त्यांना डिफेंड करतोस? मी आधीही सांगितलं की कुठल्याच अ‍ॅक्टरचा प्रभाव न पडण्यामागे कमकुवत कथा हे कारण आहे, तर तू निष्कारण, स्वतः सिनेमा न पहाता, शाहरूख खान ने चांगलं काम केलंय असं लोकं म्हणतात हा चर्चेत नसलेला मुद्दा लावून वाद घालतोयस! सिरियसली, तुला ह्यातून काय आनंद मिळतो?

शाहरूख खान ने चांगलं काम केलंय असं लोकं म्हणतात हा चर्चेत नसलेला मुद्दा लावून वाद घालतोयस!
>>>

कुठली चर्चा कुठला मुद्दा...
लोकं शाहरूखचे कौतुक करत आहेत ईतकेच मी म्हटले.
आणि ते खरेही आहे. वर मी पुरावेही दिलेत.
तुम्हीच मला चुकतोयस म्हणत कोणी कुठे त्याचे कौतुक करत नाही म्हणत वाद घालायला आलात.
आणि आता मी पुरावे दिल्यावरही ते मान्य करत नाही की हो लोकं शाहरूखचे कौतुक करत आहेत.
तुन्हाला नाही आवडले शाहरुखचे काम ही तुमची आवड तुमचे वैयक्तिक मत. त्याचा आदर आहेच Happy

“ तुन्हाला नाही आवडले शाहरुखचे काम ही तुमची आवड तुमचे वैयक्तिक मत.” - आता हे मी कधी म्हटलं बुवा? सिलेक्टीव्ह रिडींग? शाहरूख, नागार्जुन, अमिताभ, डिंपल - कुणाचंच कॅरेक्टर नीट फुलवलं नाहीये कथेत हे मी अनेकवेळा लिहिलंय.

जाऊ दे, तू तुझं चालू ठेव.

सहज म्हणून बुकमायशो वर थेटरचे बुकिंग गेले काही दिवस पाहिले. बरेचसे थेटर रिकामेच होते. मी अजून गेलो नाही पण जवळच्या काही लोकांनी अजिबात जाऊ नका असा सल्ला दिला आहे व तसेच कसला डोंबलाचा हिट, थेटर तर रिकामेच होते असेही सांगितले.

कदाचित चित्रपट सुरू व्हायच्या आधी त्या शोची उरलेली तिकीटे प्रोड्यूसर विकत घेऊन चित्रपट चांगला चालतोय असे दाखवत असेल का? समजा त्यांच्याकडे ढिगाने काळा पैसा आहे. मग तो पांढरा करण्यासाठी काही थातूर मातूर चित्रपट काढायचा. पहिले दोन-तीन आठवडे काळ्या पैश्याने त्याची तिकीटे घेऊन जो पैसा परत येईल (टॅक्स, थेटर व इतरांचे कमिशन वगैरे) तो पैसा पांढराच ना? म्हणजे २०० करोडची काळ्या पैश्याने (ती पण कॅश वापरून) तिकीटे घेतली व सगळे कट होऊन जरी ६०-७० करोड हातात आले तर ते त्यांच्यासाठी चांगलेच ना? शिवाय चित्रपट चांगला चालला अशी बोंबही मारता येते...

नुसती रूम घेऊन काय उपयोग
बाकी हाणामारी करायला काहीतरी द्या की Happy
>>>

ब्रह्मास्त्रच द्या Proud

जोक्स द अपार्ट,
आमच्या दोन्ही घरचे जायच्या विचारात आहेत उद्या.
पण मीच तयार होत नाहीये. थिएटरची तिकीट खूप महाग असते यार. असे सहकुटुंब गेले की अर्धा पगार तिथेच खल्लास.

समजा त्यांच्याकडे ढिगाने काळा पैसा आहे. मग तो पांढरा करण्यासाठी काही थातूर मातूर चित्रपट काढायचा. //

सगळीकडे चर्चा तर हीच आहे.
करण जोहर हेच करतो आहे असं वाटतंय. तो एकूणच अतिशय toxic, unethical व्यक्ती वाटतो.
धर्मा प्रोडक्शन, वायआरएफ, टीसीरिज कोणाचेच चित्रपट चालत नाहीत तरी या निर्मात्यांचं आर्थिक नुकसान होतंय असं दिसत नाही. त्यावरून नक्कीच वाटतं की त्यांचं cost model काहीतरी वेगळं असावं. Someone must be losing money. And if nobody in the chain is losing money,it's possibly a money laundering scheme.

Lol

मी जातोय उद्या
३५० रुपये तिकीट x ६ माणसे =. २१०० रुपये
ब्लॅकचा पैसा व्हाईट होऊ नये म्हणून माझ्यातर्फे थोडीशी देशसेवा.

Pages