कथाशंभरी - सहधर्मचारिणी - प्राचीन

Submitted by प्राचीन on 3 September, 2022 - 23:00

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .......
.........
"हे हरीण अगदी तुझा पाठपुरावाच करतंय गं ताई. " मैत्रेयीचा कौतुकभरला स्वर.
" अगं त्याच्या आईचं नि माझं फार गूज असे. काय करणार! स्वामींकडून मिळणाऱ्या आत्मज्ञानाच्या ओढीने तू आश्रमात केवळ देहाने उपस्थित आणि स्वामी तर नेहमीच ज्ञानयज्ञात गुंतलेले.शिष्यांनी वेढलेले.. . मला बापडीला तुम्हा दोघांशी जे बोलावंसं वाटे ते हरिणीजवळ सांगायची मी.. "
". होगं.. पण काय करणार.. . साक्षात् याज्ञवल्क्यांजवळ बसून ज्ञानग्रहण करणं भाग्याचं होतं.. ."
"आणि आता या बहिणीकडून पायसग्रहण कर ." कात्यायनीच्या बोलण्यावर मैत्रेयीलाही हसू आलं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
नंतर सावकाशीने मूळ कथा काय आहे ते पण लिहा. मला माहित न्हवती. पायस ग्रहण म्हणजे तिला हरणाकडून काय मिळालेलं? ते हरिण नसून त्याच्या अवतारात दुसरं काही होतं का? पायसग्रहण म्हटल्यावर आता पोरं होणार डोक्यात आलं. Proud

अमितव, Happy
तुमच्या शंकेस उत्तर देते म्हणजे उबो आणि च्रप्स यांनाही जे प्रश्न पडलेत ते दूर होतील. Lol
ही गोष्ट तुम्ही वाचलेली नाही म्हणत आहात तर ते बरोबरच आहे हो. कारण ती काल्पनिक आहे.
पायस ग्रहण आणि हरीण यांतच काय, पण कुठल्याही तपशीलात कोणताही श्लेष किंवा सांकेतिक अर्थ न्हाय. कारण तसं काही योजून लिहिलंच नाहीये.
खरं तर मला वाटलेलं की याज्ञवल्क्य ऋषी आणि त्यांच्या दोन्ही पत्नींबद्दल कदाचित इथे वाचकांना माहीत असेल. इथल्या धोरणात बसत असेल तर लिंक देईन.
एकंदर सवती असूनही मत्सरग्रस्त नसलेलं असं या दोघींनी नातं जपलं होतं असं काहीसं ऐकलं होतं. तरीही कात्यायनीबद्दल मला नेहमीच कुतूहल वाटत आलेलं आहे जे इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. Happy

मैत्रेयी म्हणजे कोण? माहीत नाही.
कात्यायनी म्हणजे कोण? माहीत नाही.
त्या सवती होत्या? माहीत नाही.
स्वामी म्हणजे कोण? माहीत नाही.
याज्ञवल्क्य ऋषी म्हणजे कोण? माहीत नाही.
हरीण म्हणजे कोण? माहीत नाही.
सहधर्मचारिणी म्हणजे काय? माहीत नाही.
कथा समजायला या इतर फाफटपसाऱ्याची गरज आहे का? माहीत नाही.
स्पष्टीकरण दिल्यावर कथा समजली का? माहीत नाही.

मला लागलेला साधा सुद्धा अर्थ

मैत्रयी आणि कात्यायनी सवती.

मैत्रेयी त्यांच्या नवऱ्यासोबत ज्ञानदानाच्या (नावाखाली (?) त्याला बघायला म्हणून (?) ) आश्रमात दिवसभर जाऊन बसायची. नवरा नुसता शिष्यांमध्ये गुंतलेला असायचा. ही बिचारी इकडे एकटी.

बोलायला कोणी नाही म्हणून हरणाशी गप्पा मारत बसायची.

आता याला बराच काळ झालाय. सवत आणि नवरा दोघेही आता घरात असतात म्हणून आता तिला हरणाची गरज नाही तर आता त्याला खायची तयारी सुरू आहे .(हा ट्विस्ट)

समज चुकीची असेल तर सॉरी!

गूगल करून अथवा संस्कृत शिकून अथवा हिंदू धर्मातील इतर कथा इथंभूत शिकून मगच ही कथा समजत असेल, तर ती गंडली आहे, असे या अशिक्षित पामराचे मत आहे.

आता बघा ही कथा सामो ने वाचली असती तर तिला लगेच कळली असती की नाही?
म्हणजे लेखिकेचा दोष नाही तर वाचकाच्या अज्ञानाचा दोष झाला तो.
समलैंगिक संबंधांवरची कथा माझ्या आजीला वाचायला दिली तर तिलाही कळणार नाही. मग ती कथा फसली म्हणायचं का?

मलाही नीटशी कळली नाही कथा.

खरं तर मला वाटलेलं की याज्ञवल्क्य ऋषी आणि त्यांच्या दोन्ही पत्नींबद्दल कदाचित इथे वाचकांना माहीत असेल.
>>>
मलाही नव्हते माहीत हे. कदाचित फार कमी लोकांना माहीत असेल.

पण रीयाचा मुद्दा योग्य. वाचकांना संदर्भ माहीत नसतील तर कथा गंडली असे नाही. फार तर वाचकांना अमुकतमुक माहीत असेल हे गृहीत धरले हे चुकले म्हणू शकतो, कथा प्रकाशित करायचा प्लॅटफॉर्म चुकला असे म्हणू शकतो. पण मग मायबोली नाही तर कुठे??

तरी वाचकांनी काही नवीन समजले यात आनंद समजावा Happy
अमितव म्हणतात तसे त्या ऋषी आणि त्यांच्या दोन पत्नींबद्दल ईथेच वा स्वतंत्र लेखात सविस्तर लिहू शकता. तेवढेच काही वेगळे छान वाचायला मिळेल..

रीया, तळमळीने मुद्दे मांडल्याबद्दल धन्यवाद गं.
ऋ. चे आभार. आणि त्यांनी सुचवल्याप्रमाणे लिहिता येईल का ते बघते.

कळली नाही पण कॉमेंटी वाचून उलगडा झाला. कात्यायनी हे ठिकाणाचे नाव म्हणून आजवर माहित होते.
आता कळले ते कोणाचे मूळ नाव. छान लिहिली आहेत.

मागच्या काही दिवसात माबो मुळे सुलभा आणि कात्यायनी अशा दोन महाभारतकालीन व्यक्तींविषयी माहित झाले Happy