कथाशंभरी - केक! - मॅगी

Submitted by मॅगी on 3 September, 2022 - 11:42

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. 

लहानपण आठवून सोनालीचे डोळे पाणावले होते. आईबाबाची सततची भांडणे, बाबाचे पिणे, त्रास. शेवटी घटस्फोट झालाच. एका वाढदिवसाला ती बाबाकडे निघाली होती. वाटेत आईने ऑर्डर केलेला केक घेऊन ती घरी पोचली. केक खाल्ल्यावर बाबाने नेहमीप्रमाणे तिच्या शॉर्ट ड्रेसवरून आईला नावे ठेवलीच. ती वैतागून खोलीत जाऊन बसली. संध्याकाळी बाबाला नेहमीच्या गोळ्या देताना काहीतरी गफलत होऊन हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत तो गेलाच.

"बाबा..."

"अग्ग सोनूडी.. तुला त्याची पीनट बटर ऍलर्जी थोडीच माहीत होती..." आई म्हणाली.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages