आजचा विषय:- माझं झाड माझी आठवण
चिंगीनं लावलं एक झाड,
झाडाला म्हणाली लवकर वाढ.
आठवतायत ना बालभारतीतल्या या ओळी
सकाळी उठल्या उठल्या किंवा दमूनभागून आल्यावर हातात चहा/कॉफीचा कप घेऊन जेव्हा आपली नजर गॅलरीतल्या/ अंगणातल्या झाडाकडे जाते तेव्हा किती प्रसन्न वाटतं! ताजी, टवटवीत पानं ,फुलं बघून सगळा शीणवटा निघून जातो. जागा आणि आवड असेल तशी आपण झाडंझुडं लावतो. त्यांना ओंजारतो - गोंजारतो. ती पण भरभरून रंगीत, सुंगंधी दान आपल्या पदरात टाकतात. पूर्वी चाळीत डालडाच्या डब्यात एखादी तुळस तरी नक्की डोलत असायची. मग आता उचला कॅमेरा आणि करा क्लिक. तुम्ही लावलेल्या, तुम्हाला आवडलेल्या कुठल्याही झाडाचा फोटो आणि माहीत असेल तर त्याचं नाव इथं द्या आणि हो झब्बूशी निगडित असेल तर तुमची आठवण/प्रसंग/गंमत लिहायला विसरू नका.
मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया आपल्या सगळ्यांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू !
हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
६.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (https://www.maayboli.com/node/47635) पाहा.
ssj काय सुंदर
ssj काय सुंदर
कोलंबसमधला सोनसळी फॉल
कोलंबसमधला सोनसळी फॉल

अवल, सुदर फोटो.
अवल, सुदर फोटो.
ह्या आमच्या आगरातल्या पोफळी .
ह्या आमच्या आगरातल्या पोफळी . . ह्यांच्याकडे बघत मी किती ही वेळ बसू शकते.
>>>>
ममोताई एक नंबर फोटो आहे हा.. तिथे मी स्वतःच निवांत उताणे झोपून वर त्या झाडांतून दिसणारे आकाश बघतोय असे वाटले. असे मी देखील कितीही वेळ झोपू शकतो
स्थळ - कोपरखैरणे
स्थळ - कोपरखैरणे
(No subject)
ममोताई एक नंबर फोटो आहे हा..
ममोताई एक नंबर फोटो आहे हा.. >> ऋ थॅंक्यु.
फोटोग्राफी मध्ये one third का असं काही तरी एक principle आहे. म्हणजे त्यात जे मेन ऑब्जेक्ट असतं ते मधोमध न घेता थोडं कडेला घेतलं तर फोटो अधिक उठावदार होतो. ऋ स्वरूप तुमचे फोटो छान च आलेत पण मी तसे imagine केले आणि कल्पनेत ही ते अधिक सुंदर दिसले.
फॉलमधलाच अजून एक. झाड अन आकाश
फॉलमधलाच अजून एक. झाड अन आकाश यांचा परस्पर विरोधाभास
माझं कढीपत्त्याचं झाड आणि
माझं कढीपत्त्याचं झाड आणि त्यावर माझं आनंदाचं झाड!
हा (भूतपूर्व) वृक्ष, बहुदा
हा (भूतपूर्व) वृक्ष. बहुदा LIC नाव असावे. तरीच ज़िंदगी के साथ भी, ज़िंदगी के बाद भी - नटलेलाच
मुक्काम पोस्ट लालबाग, बँगलोर
स्वाती, मस्त फोटो! आनंदाचं
स्वाती, मस्त फोटो! आनंदाचं झाड
आता या झाडाची ३-४ पिल्लं मैत्रिणींना देऊन हे एक पिल्लू उरले आहे!

तुला झब्बू द्यायलाच हवा आता. हे माझं कढिपत्त्याचं झाड, अगदी सहा इन्चाचं रोप असताना एका गटगला बहुतेक तुझ्याच या झाडाचं पिल्लू मला मिळालं होतं
Trees (by Joycee Kilmer)
Trees (by Joycee Kilmer)
~~~~~~~~~~~~~~~~~~
I think that I shall never see
A poem lovely as a tree.
A tree whose hungry mouth is prest
Against the earth’s sweet flowing breast;
A tree that looks at God all day,
And lifts her leafy arms to pray;
A tree that may in Summer wear
A nest of robins in her hair;
Upon whose bosom snow has lain;
Who intimately lives with rain.
Poems are made by fools like me,
But only God can make a tree.
अजून एक फॉल सिझन
अजून एक फॉल सिझन

झब्बु द्या की. मला पुढचा
झब्बु द्या की.
मला पुढचा फोटो टाकायचाय 
(No subject)
आहा मस्त
आहा मस्त

आहा मस्त
ड पो
हा घ्या.
हा घ्या.
माझं अतिशय आवडतं झाड. अनेक आठवणी आहेत या झाडाच्या.
मोहाची पालवी
मोहाची पालवी
काय सुंदर फोटो आहे अवल.....
काय सुंदर फोटो आहे अवल..... मस्तच!
अहाहा एकसे एक फोटो. अ-व-ल!!!!
अहाहा एकसे एक फोटो. अ-व-ल!!!! काय वैभव आहे रंगाचे.
थांकु
थांकु
जखरंडा
जखरंडा

मस्त फोटो ,
मस्त फोटो ,

हा धागा मी माझी हाड च वाचतेय प्रत्येक वेळी .
एकदा मला माझ्या किचनच्या
एकदा मला माझ्या किचनच्या खिडकीतून चक्क Brachiosaurus झाडाची पानं खाताना दिसला. तुम्हाला दिसतोय का बघा बरं! त्याच्या शेजारीच दोन भोचक मगरी कुंपणावरून दुसर्याच्या अंगणात डोकावतायत.
तुम्हाला दिसली का ही मंडळी?
एक मगर तर अचकट विचकट हसत्येय
एक मगर तर अचकट विचकट हसत्येय मला वाटतं.
(No subject)
मध्यप्रदेश मधील मांडू मध्ये
मध्यप्रदेश मधील मांडू मध्ये आढळणारी बाओबाबची झाडे
डोकावणाऱ्या मगरी खरेच दिसल्या
डोकावणाऱ्या मगरी खरेच दिसल्या
निल्स मस्त
निल्स मस्त
Pages