प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ३ - माझं झाड माझी आठवण

Submitted by संयोजक on 1 September, 2022 - 13:15

आजचा विषय:- माझं झाड माझी आठवण

चिंगीनं लावलं एक झाड,
झाडाला म्हणाली लवकर वाढ.
आठवतायत ना बालभारतीतल्या या ओळी Happy
सकाळी उठल्या उठल्या किंवा दमूनभागून आल्यावर हातात चहा/कॉफीचा कप घेऊन जेव्हा आपली नजर गॅलरीतल्या/ अंगणातल्या झाडाकडे जाते तेव्हा किती प्रसन्न वाटतं! ताजी, टवटवीत पानं ,फुलं बघून सगळा शीणवटा निघून जातो. जागा आणि आवड असेल तशी आपण झाडंझुडं लावतो. त्यांना ओंजारतो - गोंजारतो. ती पण भरभरून रंगीत, सुंगंधी दान आपल्या पदरात टाकतात. पूर्वी चाळीत डालडाच्या डब्यात एखादी तुळस तरी नक्की डोलत असायची. मग आता उचला कॅमेरा आणि करा क्लिक. तुम्ही लावलेल्या, तुम्हाला आवडलेल्या कुठल्याही झाडाचा फोटो आणि माहीत असेल तर त्याचं नाव इथं द्या आणि हो झब्बूशी निगडित असेल तर तुमची आठवण/प्रसंग/गंमत लिहायला विसरू नका.

मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया आपल्या सगळ्यांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू !

हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
६.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (https://www.maayboli.com/node/47635) पाहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटो सगळे मजा येतेय.
तुळशीचं रोप जनरली दीड दोन फुटांहून अधिक उंच वाढत नाही पण ही तुळस पुरुषभर उंचीपेक्षा जास्त वाढली होती आणि चहू अंगाने बहरली ही होती.
20220902_200339.jpg

हे ऑस्टीनचे राधामाधवधाम
Screenshot_20220902_085103.jpg

ड्यूप्लिकेट कालिंदीच्या काठी झाडाला बांधलेला झोका
Screenshot_20220902_084735.jpg

*
Screenshot_20220902_084754.jpg

woodline-1.jpg
सॅनफ्रान्सिस्को मधली एक आवडीची जागा. 'अँडी गोल्डस्वर्थर्स वुडलाईन'.
woodline-2.jpg

प्रेसिडिओ मध्ये आहे. प्रेसिडिओला जंगल तयार करायचं म्हणून आर्मीने निलगिरी आणि सायप्रसच्या रांगा लावल्या. काही कारणाने सायप्रस जगला नाही आणि निलगिरी उंचच उंच बहरली. या मधल्या जागेत अँडी गोल्डस्वर्थर्सने झाडांच्या बुंध्यापासुनच केलेली ही नागमोडी १२०० फूट लांब वुडलाईन. (फोटो कदाचित एसएफच्या सिग्नेचर धुक्यात आणखी चांगला आला असता. हा टळटळीत दुपारचा निरभ्र आकाशातला आहे.) एकदिवस ज्या मातीतुन आली त्याच मातीत विलीन होईल, पण तोवर आवर्जुन बघण्यासारखी जागा आहे.

बाजुच्या रस्त्याने जाताना चटकन जाणवणारही नाही. पण आत गेलं की शांत निवांत वाटतं. त्या नागमोड्या झाडांवरुन चालायला आबालवृद्धांना आवडेल. जवळ अगदी तीन चार पार्किंगच्या जागा आहेत. गोल्डन गेटला गेलात तर अवश्य जावी अशी जागा आहे.

झोका मस्त!
(कालिंदी वगैरे आठवण्याऐवजी 'येड लागलं' मधला पर्श्या आडवा झोपून आर्चीच्या विचारात हरवला आहे हेच डोळ्यासमोर आलं.) Happy

झोक्याचं तंत्र बिघडलेलं होतं, कुठेही जात होता तरी मी हट्टाने बसून झोके घेतले व उतरल्यावर ग्रेव्हल वरुन पाय घसरला. एकुण 'येडं लागलं' टाईपंच अनुभव होता. Lol

बंगलोरच्या जवळ एक खूप जुनं, म्हणजे ४०० वर्षांचं प्रचंड मोठं वडाचं झाड आहे. खूप पसरलेलं आहे. काही वर्षांपूर्वी मूळ खोड कोसळलं आणि पारंब्यांचंच आता झाडात रूपांतर झालं आहे.
कन्नडमध्ये दोड्डा अल्लद मरा. (मरा म्हणजे झाड, दोड्ड म्हणजे मोठं, अल्लद म्हणजे वडाचं असणार)
IMG-20210226-WA0012.jpg

सर्वच फोटो सुंदर !
धन्यवाद स्वरुप Happy
तुमचीही चित्रं अप्रतिम वाटली , झाड तर आहाहा !

हा काही वर्षांपूर्वी काढलेला फोटो. उन्हाळ्यात फुललेला बहावा. याची आठवण अशी की माझ्या तेव्हा 5 वर्षाच्या मुलाने एक चित्र काढले त्यात पिवळे झाड रंगवले होते. घरातल्या कोणीतरी कमेंट केली की पिवळं झाड कधी असतं का मग तो खट्टू झालेला. म्हणून त्याला दाखवायला आवर्जून हा फोटो काढून नेलेला.
हा फोटो काढला आणि दुसऱ्या दिवशी ही झाडं काढून टाकली गेली. कदाचित वेडीवाकडी वाढल्याने धोकादायक म्हणून असेल पण मला फार वाईट वाटलं होतं. त्या झाडांची अजूनही प्रत्येक उन्हाळयात आठवण येतेच.

Screenshot_20220902-210945.jpg

खिडकीतून दिसणाऱ्या झाडाची पानगळ वेगवेगळ्या अवस्थेत टिपली आहे. कोलाज करताना मूळ फोटोंची स्पष्टता गायब झाली, कृपया समजून घ्या.20220521_121153.jpg

सगळे फोटो मस्तच.
ह्या आमच्या आगरातल्या पोफळी . . ह्यांच्याकडे बघत मी किती ही वेळ बसू शकते.
20220902_125324_0.jpg

IMG_2823.jpgमाउई, हवाई मधला हा वटवृक्ष. हा १८७३ मधे भारतातून इथे आणून लावला गेला होता. लावला तेव्हा ८ फुटाचं असलेलं हे झाड आता ६० फूट उंच आणि जवळपास पाउण एकरात विस्तारले आहे.

Pages