प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ३ - माझं झाड माझी आठवण

Submitted by संयोजक on 1 September, 2022 - 13:15

आजचा विषय:- माझं झाड माझी आठवण

चिंगीनं लावलं एक झाड,
झाडाला म्हणाली लवकर वाढ.
आठवतायत ना बालभारतीतल्या या ओळी Happy
सकाळी उठल्या उठल्या किंवा दमूनभागून आल्यावर हातात चहा/कॉफीचा कप घेऊन जेव्हा आपली नजर गॅलरीतल्या/ अंगणातल्या झाडाकडे जाते तेव्हा किती प्रसन्न वाटतं! ताजी, टवटवीत पानं ,फुलं बघून सगळा शीणवटा निघून जातो. जागा आणि आवड असेल तशी आपण झाडंझुडं लावतो. त्यांना ओंजारतो - गोंजारतो. ती पण भरभरून रंगीत, सुंगंधी दान आपल्या पदरात टाकतात. पूर्वी चाळीत डालडाच्या डब्यात एखादी तुळस तरी नक्की डोलत असायची. मग आता उचला कॅमेरा आणि करा क्लिक. तुम्ही लावलेल्या, तुम्हाला आवडलेल्या कुठल्याही झाडाचा फोटो आणि माहीत असेल तर त्याचं नाव इथं द्या आणि हो झब्बूशी निगडित असेल तर तुमची आठवण/प्रसंग/गंमत लिहायला विसरू नका.

मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया आपल्या सगळ्यांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू !

हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
६.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (https://www.maayboli.com/node/47635) पाहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या आमच्या आगरातल्या पोफळी . . ह्यांच्याकडे बघत मी किती ही वेळ बसू शकते.
>>>>
ममोताई एक नंबर फोटो आहे हा.. तिथे मी स्वतःच निवांत उताणे झोपून वर त्या झाडांतून दिसणारे आकाश बघतोय असे वाटले. असे मी देखील कितीही वेळ झोपू शकतो Happy

ममोताई एक नंबर फोटो आहे हा.. >> ऋ थॅंक्यु.

फोटोग्राफी मध्ये one third का असं काही तरी एक principle आहे. म्हणजे त्यात जे मेन ऑब्जेक्ट असतं ते मधोमध न घेता थोडं कडेला घेतलं तर फोटो अधिक उठावदार होतो. ऋ स्वरूप तुमचे फोटो छान च आलेत पण मी तसे imagine केले आणि कल्पनेत ही ते अधिक सुंदर दिसले.

11413696-D9C2-4A6B-B89F-DDDC092906CC.jpeg

हा (भूतपूर्व) वृक्ष. बहुदा LIC नाव असावे. तरीच ज़िंदगी के साथ भी, ज़िंदगी के बाद भी - नटलेलाच Happy

मुक्काम पोस्ट लालबाग, बँगलोर

स्वाती, मस्त फोटो! आनंदाचं झाड Happy
तुला झब्बू द्यायलाच हवा आता. हे माझं कढिपत्त्याचं झाड, अगदी सहा इन्चाचं रोप असताना एका गटगला बहुतेक तुझ्याच या झाडाचं पिल्लू मला मिळालं होतं Happy आता या झाडाची ३-४ पिल्लं मैत्रिणींना देऊन हे एक पिल्लू उरले आहे!
kadhipatta.jpg

Trees (by Joycee Kilmer)
~~~~~~~~~~~~~~~~~~

I think that I shall never see

A poem lovely as a tree.

A tree whose hungry mouth is prest

Against the earth’s sweet flowing breast;

A tree that looks at God all day,

And lifts her leafy arms to pray;

A tree that may in Summer wear

A nest of robins in her hair;

Upon whose bosom snow has lain;

Who intimately lives with rain.

Poems are made by fools like me,

But only God can make a tree.

हा घ्या. Happy
माझं अतिशय आवडतं झाड. अनेक आठवणी आहेत या झाडाच्या.

मस्त फोटो ,
हा धागा मी माझी हाड च वाचतेय प्रत्येक वेळी . Lol Lol Lol Lol

एकदा मला माझ्या किचनच्या खिडकीतून चक्क Brachiosaurus झाडाची पानं खाताना दिसला. तुम्हाला दिसतोय का बघा बरं! त्याच्या शेजारीच दोन भोचक मगरी कुंपणावरून दुसर्‍याच्या अंगणात डोकावतायत.

9ED32C8B-3B7F-46AD-8763-E3D303BA8167_4_5005_c.jpeg

तुम्हाला दिसली का ही मंडळी?

Pages