विसरभोळे ...अबसेन्ट माईंडेड !

Submitted by छन्दिफन्दि on 28 August, 2022 - 22:19

विसराळू विनूची गोष्ट तर लहानपणापासूनच ऐकलीये. आपल्या आजूबाजूला बरेच लोक आपल्या विसराळूपणाने किंवा अबसेन्ट माईंडेड पणामुळे कधी गमती जमती तर कधी ताप देऊन ठेवतात, अशाच काही गमती!

गिरणीतून पीठ आणायला म्हणून ती आणि आई बाहेर पडल्या. पिशवी घेतली आणि गिरणीतून परत निघाल्या. ५ मिनिट झाली. मोठ्या क्रोससिंगपाशी आल्या तरी चालतेच आहोत बघतल्यावर लेकीने विचारलं, "आई, कुठे जातोय आपण ?"

"कुठे काय? आत्ता रात्रीच कुठे जाणार? घरी आपल्या!"

"अगं पण मग घर तर कधीच मागे गेलंय !!!"

अबसेन्ट माईंडेड आई

*****

दुपारी शाळेतून घरी आली तर आज बाबा उशिरा कामावर निघालेले. ती दार उघडून घरात शिरत्ये तर बाबा जिना चढून परत वर आले. "झालं नेहमीप्रमाणे काहीतरी विसरले" ती पुटपुटली, तर उघडपणे " काय झालं बाबा? "

"सॉरी सॉरी, अगं तसाच बाहेर पडलो. जेवायलाच विसरलो !!"

अबसेन्ट माईंडेड बाबा

*******

खोली भर सगळा पसारा. कपाट खाली आलेलं. "मला चांगलं आठवतंय मी नीट ठेवलेले. दर वेळी असाच होत नीट ठेवलेले आयत्यावेळी मिळत कसे नाहीत. उशीर होतोय मला..... ", दात ओठ खाऊन शोधणं चालू होतं. सगळा गोंधळ ऐकून आईसाहेबांनी प्रवेश केलेला. "काय झालं ?"

"गेल्या वेळी मी शेवटचे २ पॅड्स नीट ठेवलेले आता आयत्या वेळी मिळतच नाहीयेत...किती लेट होतोय.. आता काय करू??" तिचा त्रागा. "अगं , पण तू पॅड कुठे शोधत्येस?"

तिने चमकून आईकडे बघितलं. "अरे हा तर बाबांचा खण आहे " ती त्रागा विसरून आईबरोबर जोरजोराने हसायला लागली.

अबसेन्ट माईंडेड कन्या

************

सासूबाई खालून फिरून आल्या. "आज संगीता भेटली होती." तिचं डोकं "संगीता" नाव ऐकून काहीतरी शोधायला लागलं.

"संगीता , ओ ती सासूबाईंची मैत्रीण!.... अरे बाप रे"

"सॉरी सॉरी , अहो मी तुम्हाला सांगायलाच विसरले त्यांचा गेल्या आठवड्यात फोने येऊन गेला, तुमच्यासाठी निरोप दिलेला त्यांच्याकडे पूजेला बोलावलेलं तुम्हाला. कधी बरं ..??"

"हो कळलं ते , परवा झाली पूजा!" सासूबाईंचे थंड उत्तर ऐकून जीभ चावत सुनबाई पळाली .

अबसेन्ट माईंडेड सून

**************

ह्या वाढदिवसाला काहीतरी स्पेशल करायचं आईसाठी. विचार कर करून ती थकून गेली. शेवटी एकदाची आयडिया सुचली. ऑफिसमधून घरी जाताना तिने वाट वाकडी केली, फ्लोरिस्ट च्या दुकानाकडे. "सकाळी सकाळी वाढीदिवसाला जर मोठा फुलांचा बुके मिळाला तर त्यासारखं दुसरं सरप्राईज नाही. आईला नक्की आवडेल", स्वतः वर खुश होत तिने सुंदर बुके सिलेक्ट केला. त्याला मेसेज , पत्ता लिहून दिला आणि सकाळी सातलाच घरी पोहचवायला सांगितला. आपल्याला आधी कधी कसं नाही सुचलं वगैरे विचार करत हरखून गेली. दुसरया दिवशी कधी एकदा सात वाजतायत अस होऊन गेलं. आणि न राहवून तिने बरोबर ७.०५ ला आईला फोने लावला. "आवडलं सरप्राईज ???"

"हो फुलं खूपच छान आहेत. थँक यु . पण तू एक दिवस आधीच का बर पाठवलीस ?"

कोणीतरी थोबाडीत मारल्यासारखी ती खाडकन भानावर आली. अतिउत्साहाच्या भरात तिने तारखेचा घोळ घातला आणि एक दिवस आधीच दुकानात गेली .

अबसेन्ट माईंडेड अतिउत्साही लग्न झालेली मुलगी

**********************************

आमच्या घरात तर वस्तू कुठे ठेवल्यात हे न आठवल्याने बरेच गोंधळ होतात, जागेवर म्हणून ठेवलेल्या वस्तू जागाच कशी बदलतात हे न सूटलेलं कोडं आहे, तरी बर आजकाल फेसबुक आणि whatsapp च्या कृपेमुळे Birth डे किंवा अंनिवर्सरी (ठरवूनही) विसरता येत नाहीत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

तुमच्या विसरभोळे पणाने काही गमती जमती घडल्या असतील किंवा इतरांच्या एन्जॉय केल्या असतील तर जरूर लिहा.

>>>>"सॉरी सॉरी, अगं तसाच बाहेर पडलो. जेवायलाच विसरलो !!"
अर्र्र!!! माझं हे कधीच होणे नव्हे. खाणं म्हणजे जीव की प्राण.

>>>>>आमच्या घरात तर वस्तू कुठे ठेवल्यात हे न आठवल्याने बरेच गोंधळ होतात, जागेवर म्हणून ठेवलेल्या वस्तू जागाच कशी बदलतात हे न सूटलेलं कोडं आहे,
हाहाहा. कदाचित सर्वांकडे असेल, आमच्या कडे एक 'मिसलिनिअस ड्रॉवर' आहे. त्यात काय वाट्टेल ते सापडू शकते. ज्येष्ठागौरी म्हणता तशा सर्व अनाथ, अनिकेत वस्तूंनी गजबजलेला असा तो ड्रॉवर आहे.

मी कुठली वस्तू कुठे ठेवली हे आठवण्यासाठी उपरण्याला गाठी मारतो. मग ही गाठ कश्यासाठी मारली हे विसरु नये म्हणून अजून एक गाठ. असे करता करता उपरण्याची जपमाळ होते. मग जप करण्यासाठी वापरतो.....असा माझा विसरभोळा गोकूळ Rofl

छान धागा.

चिंटू प्रेमी कुणी आहे का इथे? एका चिंटूमध्ये तो पावसाळ्यात घाई गडबडीत रेनकोट चढवून शाळेत जायला निघतो आणि परत घरी येतो. आई विचारते काय झालं, तर हा म्हणे आत कपडे घालायलाच विसरलो! Lol

मी काही वेळा लोकांची नावंच विसरतो. आपला तो हा वगैरे करायला लागतं. काही वेळा आपला तो हा समोरच असतो आणि त्याला काय नावाने हाक मारावी कळत नाही.

एवढंच काय, हा धागा आज दुपारीच वाचू असं काही महिन्यांपूर्वी ठरवलेलं विसरून गेलो होतो. Happy