अमेरिकेतील भारतीय आणि वर्णद्वेष

Submitted by उपाशी बोका on 25 August, 2022 - 22:42

https://mobile.twitter.com/davenewworld_2/status/1562841630713200646?s=2...

व्हिडिओ बघितला की विषय लगेच लक्षात येईल. मेक्सिकन अमेरिकन बाई ४ भारतीय बायकांना टपली मारून जात आहे.

पोलिस आले, पण तिला सोडून दिले. इंटरनेट वर आरडाओरडा झाला म्हणून दुसऱ्या दिवशी तिला अटक करण्यात आली आणि बाँडची रक्कम $१०,००० ठेवण्यात आली आहे.

मवाळ म्हणून भारतीयांना त्रास दिला जातो का? भारतीयांचा success इतरांना खुपतोय का? अशा परिस्थितीत काय करायला पाहिजे? उद्या तुमच्यावर अशी वेळ आली तर काय कराल?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अमेरिका किंवा युरोप हे प्रगत देश आहेत .उगाच नाकारण्यात काही अर्थ नाही.
अमेरिकेत जाणे हे प्रतेक भारतीयाचे चे स्वप्न असते.
अमेरिकेत राहणारा नवरा मिळावा ही प्रतेक भारतीय स्त्री ची ईच्छा असते.
अमेरिकन दूतावास समोर रात्री च रांगा लावणारे भारतीय खूप आहेत.
कोणत्या ही देशातील,कोणत्या ही राज्यातील ,कोणत्या ही गावातील लोकांनी .
उत्तम प्रशासन,उत्तम सरकार जागरूक राहून निवडले आहे.
लढा देवून निर्माण केले आहे.
त्याची फळं म्हणून तो देश ,ते राज्य ,ते गाव संपन्न झाले .
आणि ह्या उत्तम वातावरण चा फायदा दुसऱ्याच देशातील,राज्यातील,गावातील लोक घेवू लागले तर संघर्ष होणारच
उत्तम वातावरण निर्मिती,उत्तम सरकार.
ही खरी प्रगती ची किल्ली आहे
हुशारी,शिक्षण ,गाढव सारखी मेहनत ह्या नंतर chya बाबी.
एक भारतीय डॉक्टर किंवा झाडू मारणारा भारतात जितकी प्रगती करू शकत नाही,सुख उपभोगू शकत नाही,सुरक्षित जीवन जीवन जगू शकत नाही .तोच अमेरिकेत गेला तर उत्तम प्रगती करू शकतो,सुरक्षित जीवन जगू शकतो.
भारतीय आहे म्हणून भारताच्या आताच्या स्थिती लं उत्तम समजणे हे मूर्ख पणाचे लक्षण आहे
फालतू अभिमान असण्या पेक्षा ..भारतीय प्रशासन व्यवस्था,न्याय व्यवस्था,शिक्षण क्षेत्र,सामाजिक न्याय,चांगले सत्ताधारी .
हे सर्व bharta ल कसे लाभेल त्या साठी प्रयत्न करने महत्वाचे.
फालतू अभिमान काही कामाचा नाही.

अंबानी जगात इतक्या नंबर चा श्रीमंत.
अडाणी जगात इतक्या नंबर चा श्रीमंत.
असल्या बातम्या वाचून कोण भारतीय म्हणून अभिमान बाळगत असेल तर ते मूर्ख च.
आता असणाऱ्या त्यांच्या कंपन्यांच्या शेअर चा भाव ह्या वर ते आकडे आहेत.
शेअर मार्केट मध्ये भाव वाढवणारी पण दलालांची जमात आहे.
कर्ज ह्यांच्या वर किती आहे ,सरकार नी किती मदत केली आहे,सरकार नी कोणते टॅक्स माफ केले आहेत.
वीज,पाणी,जमीन सरकार नी फ्री तर दिले नाही ना.
ह्या सर्व बाबी ची विस्तृत बातमी कोणी देत नाही.
साधं आणि सरळ.
जेव्हा जग bharatil देशातील लोक भारतीय दूतावास समोर रात्र रात्र जागून व्हिसा मिळावा म्हणून रांग लावतील तेव्हा भारत हा उत्तम देश आहे असे समजावे.

अमेरिकेत इतके भारतीय डॉक्टर आहेत, नासा मध्ये इतके भारतीय आहेत, असल्या गोष्टी चा तर बिलकुल अभिमान नको.
इथे संधी नाही म्हणून ते तिथे गेले.
ती लोक अमेरिका कधीच सोडणार नाहीत .
उद्या हकल पट्टी चा निर्णय झाला तर पूर्ण शरणागती पत्करतील.

कोणता ही देश प्रगत समजला जातो.

१) जो देश भ्रष्टाचार मुक्त आहे.
२) ज्या देशात स्वच्छ आणि गतिमान प्रशासन आहे.
३) ह्या देशातील नागरिक बुद्धिमान आणि जागरूक आहेत.मेंढरं आणि गाढव नाहीत.
४) ज्या देशातील न्याय व्यवस्था निःपक्ष आणि जलद आहे.
५) ज्या देशात शिक्षणाची सुविधा स्वस्त आणि दर्जेदार आहे.
६) ज्या देशात भेदभाव नाही.
७) ज्या देशात infrastructure उत्तम आहे.
अशा देशांना प्रगत समजले जाते.
आणि अशाच देशात समृद्ध पना असतो,सुख असते,सुरक्षा असते,प्रगती होण्याची शक्यता असते.कष्टाचे फळ मिळते.
भारतात ही अवस्था नाही.
मुंबई मध्ये वडापाव ,किंवा पाणी पुरी विकणारा श्रीमंत त्याच्या कष्ट मुळे नसतो मुंबई मधील उत्तम प्रशासन मुळे असतो
तीच यूपी,बिहार,मध्ये तोच व्यवसाय आणि तेवढेच कष्ट केले तरी .
मुंबई मधील इन्कम त्याला कधीच मिळू शकत नाही.
हुशारी,कष्ट ,ह्या सर्व दुय्यम बाबी आहेत.

मग अमेरिका प्रगत नाही. भ्रष्टाचार, भेदभाव ,महाग शिक्षण सगळं आहे इथे. मंगळावर बघु प्रगत आहेत का ते.

अमेरिका प्रगत नाही. भ्रष्टाचार, भेदभाव ,महाग शिक्षण सगळं आहे इथे. मंगळावर बघु प्रगत आहेत का .
अमेरिकेत जाण्यासाठी किती धडपड भारतीय करतात त्यांच्या दूतावास समोर किती मोठी रांग असते.
हे पॉइंट विसरलात.
भारतीय दूतावास समोर कोणत्या देशात प्रचंड लाईन असते.
सांगता का?

ते अमेरिका प्रगत आहे म्हणून नाही.. पैसे जास्त मिळतात म्हणून... पैसे के लिये लोग किधर भी जा शकते... मरणाची थंडी असणाऱ्या कॅनडा मध्ये पण भरपूर इंडियन आहेत...

आता भारतात मजबूत पैसे मिळायला लागले तर लोक परत भारतात येऊ लागले आहेत...

फालतू अभिमान अंध बनवतो .सत्य स्वीकारून चुका लक्षात घेवून त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करणे हे शहाणपण आहे
भारतीय राज्य व्यवस्था,निवडणुका,मतदान करणारे, खूप त्रुटी आहेत
मान्य करून त्या सुधारणे गरजेचे आहे
भारतीय मीडिया जगातील सर्वात जास्त मूर्ख मीडिया आहे.
जगातील सर्वोत्तम मीडिया हाऊस लं भारतात .
न्यूज चॅनेल चालवण्याची परवानगी immediately देणे गरजेचे आहे.
त्या मुळे थोडी तरी भारतीय लोक जागी होतील आणि त्यांना खरी स्थिती समजेल

मरणाची थंडी असणाऱ्या कॅनडा मध्ये पण भरपूर इंडियन आहेत... >>>> आमच्या भागात नसते हो मरणाची थंडी! म्हणजे आम्ही तरी इतके दिवस तगलो आहोत.. ! Wink

कष्टाचे ,हुशारी चे योग्य ते दाम मिळणे मोबदला मिळणे ह्याला च प्रगती म्हणतात.
भारतात चमचे गिरी,लबाडी, केल्यावर च प्रगती होते
म्हणजे भारत हा देश बुध्दीमान,कष्टाळू लोकांसाठी बिलकुल नाहीं.
त्या मुळे ही लोक देशाबाहेर जातात.
म्हणू.न. च नासा मध्ये बुद्धिमान भारतीय आहेत istro मध्ये नाहीत.
अमेरिकेत उत्तम भारतीय डॉक्टर,इंजिनिअर आहेत पण भारतात नाहीत.

मझ्या मते भारतातच बुद्धिमान लोक संख्येने जास्त आहेत, टक्केवारीने नगण्य आहेत,
अमेरिकेचा नि भारताचा इतिहास फार फार वेगळा आहे.
अमेरिकेची ही प्रगती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास दीडशे वर्षांनी झाली, साधारण १९२९ ची आर्थिक मंदी संपल्यावर, दुसर्‍या महायुद्धानंतर. तोपर्यंत भारतासारखेच - काही अती श्रीमंत, पण बहुतेक नाही. पण स्वातंत्र्य असणे महत्वाचे - बाकी वंशद्वेष इ. समस्या होत्याच.
भारताचे प्रश्नच निराळे. तरीहि केलेली प्रगती अभिमानास्पद आहे.

इस्रो किंवा istro नाही.. इसरो ... Indian Space Research Organisation (ISRO )

इसरो गव्हर्नमेंट इन्स्टिटयूट आहे- कास्ट रिझर्वेशन आहे जॉब साठी...
नासा इक्वल ओप्पोर्च्युनिटी एम्प्लॉयर आहे...

Houston, We've a problem !

अर्धवट माहिती, इस्रो मध्ये रिझर्व्हेशन पॉलिसी युनिक पद्धतीने राबवली जाते.. जणू ती आहे पण आणि नाही पण.

तिथे प्रशासकीय पदांत जात आधारित आरक्षण आणि पदोन्नतीमध्ये आरक्षण असे दोन्ही लागू आहे, तसेच अभियांत्रिकी शाखेत फक्त इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल ह्या दोन शाखांत जात आधारित आरक्षण राबवले जाते, पण तिथे मुळातच कमी भर्ती होते ह्या दोन शाखांत. लक्षात घेण्यालायक गोष्ट म्हणजे इस्रो मध्ये इंजिनियरिंग संबंधी पदाचे नावच सायंटिस्ट - इंजिनियर असते, प्रत्येक पद रिसर्च मध्ये लिप्त असते असेही नाही.

बहुतेक रिसर्च भर्ती ही इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि कॉम्प्युटर सायन्स मधून होते तिथे. ह्या पदांना जात आधारित रिझर्व्हेशन नसते पण काही पदे ही पी.एच. उर्फ physically handicapped वर्गाकरता राखीव असतात.

इस्रोच्या वेबसाईट वरच, ह्या रिझर्व्हेशन पॉलिसी संबंधित राज्यसभेत विचारला गेलेला प्रश्न अन् त्याचे उत्तर सापडले ते खालीप्रमाणे

Screenshot_20220902-064209_Adobe Acrobat.jpg

तुम्ही इथल्या उत्तराचं भाषांतर केलं आहे. त्याच्या खाली अनेक जणांनी ती चुकीची माहिती आहे म्हटलं आहे.
वरचा राज्यसभेचा एक्सर्प्ट अत्यंत त्रोटक आणि फक्त पदोन्नती बद्दल दिसतो आहे. मला उत्तर माहित नाही. सरकारी ठिकाण असल्याने टिपिकल १५ - ७.५% आरक्षण असेल असं वाटतं. कोरा आणि विकी आणि व्हॉट्सअ‍ॅपवर हमखास चुकीचं उत्तर असेल याची जवळपास खात्री आहे.

अमितव,

होय मी तो अनुवाद केला आहे असे म्हणले तर चूक नाही अजिबात. पण ती माहिती चुकीची वाटत नाही, मागच्या वर्षीच्या इस्रो सेलेक्शन एक्झामला एक मित्र बसला होता, त्याने पण जवळपास सेम सांगितले होते.

बाकी, सरकारी आस्थापना आहे म्हणून आरक्षण असेलच असे नाही, डिफेन्स फोर्सेस मध्ये पण नसते, असे वाटते.

स्पष्टीकरण :- मी affirmative action, रिझर्व्हेशन वगैरेंच्या अजिबात विरोधात नसून त्याविरुद्ध लंगडे तर्क देण्याचा माझा काहीही मानस नाही, फक्त जे फर्स्ट हॅन्ड (मित्राकडून कळले) ते मांडायचा प्रयत्न करतोय मी.

हा पुण्यात जन्मला, वाढला आणि शिकला आहे म्हणे. एक पुणेरी 'स्टारबक्स' चा CEO झाला म्हणजे आता लवकरच Starbuck's coffee shops all over the world will be closed everyday from 1:00 to 4:00PM अशी बातमी येणार बहुधा.

भारतीय वंशाचा व्यक्ती अमेरिकन कंपनीचा सीईओ झाला ही अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे असे मला नाही वाटतं
त्या कंपन्यांना आशिया मध्ये व्यवसाय वाढवायचा असेल . बाकी काही नाही.
त्या मुळे काही भारता चा फायदा होणार नाही.पक्का माल भारतात विकणे ,भारताला स्वतःची बाजार पेठ बनवणे हाच शेवटी हेतू असणारा.
भारत हा production हब झाला पाहिजे जगात भारतीय बनावटीच्या वस्तू नी नाव कमावले पाहिजे, जगावर राज्य केले पाहिजे
कोणत्या तरी विदेशी कंपनीचा सीईओ बनून देशाला काही फायदा होणार नाही.
शेवटी धोरण.संचालक मंडळ आणि मालक च ठरवतात.
सीईओ नी फक्त ती धोरण अमलात आणायची असतात.

हेमंत,

Manufacturing hub होण्याची गाडी कधीच सुटली आहे.

भारताच्या मार्केट मध्ये भारत कुठे आहे?
गाड्या,मोबाईल,इलेक्ट्रॉनिक वस्तू,अगदी बुट,tv,, सौंदर्य प्रसाधने,सर्वच्या सर्व विदेशी.
हे कमी काय म्हणून आता ह्या गणेश उस्तावत बघायला मिळाले.
गजरे,हार,lights, फोकस,सर्व सजावटीच्या वस्तू पण चीन chya.
ह्या बारीक सारीक वस्तू च्या मध्ये पण भारत नाही
फुल कृत्रिम ती पण चीन ची.
भारत पूर्ण विदेशी वस्तू नी भरला आहे.

तरी भारतीय उद्योगपती जगातील श्रीमंताच्या लिस्ट मध्ये कसे असतात.
हे काही समजत नाही.

Pages