अमेरिकेतील भारतीय आणि वर्णद्वेष

Submitted by उपाशी बोका on 25 August, 2022 - 22:42

https://mobile.twitter.com/davenewworld_2/status/1562841630713200646?s=2...

व्हिडिओ बघितला की विषय लगेच लक्षात येईल. मेक्सिकन अमेरिकन बाई ४ भारतीय बायकांना टपली मारून जात आहे.

पोलिस आले, पण तिला सोडून दिले. इंटरनेट वर आरडाओरडा झाला म्हणून दुसऱ्या दिवशी तिला अटक करण्यात आली आणि बाँडची रक्कम $१०,००० ठेवण्यात आली आहे.

मवाळ म्हणून भारतीयांना त्रास दिला जातो का? भारतीयांचा success इतरांना खुपतोय का? अशा परिस्थितीत काय करायला पाहिजे? उद्या तुमच्यावर अशी वेळ आली तर काय कराल?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आता ब्रिटन मध्ये बघा .पाकिस्तानी आणि भारतीय दोघे पण विदेशी नागरिक.पण त्यांची भांडण तिसऱ्या देशात पण चालू आहेत जशी स्वतःच्या देशात करतात तशी.
देश सोडला तरी मुळ पकडुन आहेत.ते सुटत नाही

मोरोबा, खरे आहे,
कुणिहि बायकांनी पंजाबी ड्रेस किंवा साडी वापरू नये - शर्ट पँट किंवा स्कर्ट घालावे.
सर्व तरुण भारतीयांनी अभ्यास न करता ड्रग्स घ्यावीत, म्हणजे कसे मूर्ख होऊन अमेरिकेत लोकांच्यात मिसळून जातील.
मग फॉक्स न्यूज, क्यूअनॉन सांगतील ते खरे मानून इथे लिहीतील.
असे बहुतेक भारतात रहाणार्‍या नि कधीहि अमेरिकेत न आलेल्या लोकांचे मत असावे कारण इथे असलेल्या लोकांची मते वेगळी आहेत.

Pages