अमेरिकेतील भारतीय आणि वर्णद्वेष

Submitted by उपाशी बोका on 25 August, 2022 - 22:42

https://mobile.twitter.com/davenewworld_2/status/1562841630713200646?s=2...

व्हिडिओ बघितला की विषय लगेच लक्षात येईल. मेक्सिकन अमेरिकन बाई ४ भारतीय बायकांना टपली मारून जात आहे.

पोलिस आले, पण तिला सोडून दिले. इंटरनेट वर आरडाओरडा झाला म्हणून दुसऱ्या दिवशी तिला अटक करण्यात आली आणि बाँडची रक्कम $१०,००० ठेवण्यात आली आहे.

मवाळ म्हणून भारतीयांना त्रास दिला जातो का? भारतीयांचा success इतरांना खुपतोय का? अशा परिस्थितीत काय करायला पाहिजे? उद्या तुमच्यावर अशी वेळ आली तर काय कराल?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>त्या मुळे काही भारता चा फायदा होणार नाही<<
मेनुवर ऑथेंटिक फिल्टर कॉफी (मद्रासी स्नॅक्स सकट) आणली तर भारतीयांचा होईल... Proud

भारताचा फायदा कोणत्या कंपनीचा भारतीय सीईओ करणार नाही
तो फक्त नोकरी कशी टिकेल इतकाच विचार करणार.
भारताचा फायदा भारतात राहणारी लोक च करणार.ती पण फक्त सामान्य लोक

कोणताही सीईओ तेच करतो. अमेरिकेन सीईओ सुद्धा अमेरिकेच्या भल्याचा विचार करत नाही. फक्त कंपनीच्या, शेअरहोल्डर्स वगैरेंच्या भल्याचा करतो. भारतीय सीईओ काही वेगळे करत नाही.

घटना धक्कादायक आहे. आधी संवाद काय झाला, तिच्याकडे बघून काही कमेंट केली आहे असा तिचा (गैर )समज झाला का? कॅमेर्‍यामधे दृष्य चित्रीत करत बसण्यापेक्षा सर्वात आधी स्वत: ची सुरक्षितता महत्वाची आहे म्हणून तिथून निघायला हवे.

जिथे रहातो त्या भागातल्या लोकल कल्चरचा अभ्यास महत्वाचा आहे, कारण नसतांना (हातवारे करत भारतीय भाषेत बोलणे) गैरसमज निर्माण करु शकतात. चार लोक सभोवताली असतांना बायकोसोबत मी इंग्रजीतच बोलणार... मराठीत बोलू शकतो, पण आसपासच्या अपरिचीत व्यक्तींचा गैरसमज झाला तर ?

कालच एक नेट वर बातमी वाचली .कतार मध्ये विदेशी कामगार लोकांचे शोषण होते.हे कामगार जास्त करून भारत,पाकिस्तान, बांगलादेश ह्या देशातील असतात.
त्यांना पगार न देणे,पासपोर्ट जप्त करणे,खूप कष्टाचे काम करून घेणे.
थोडक्यात वेठबिगारी सारखी वागणूक देणे.
असे प्रकार कतार मध्ये घडतात.
शेवटी माणूस एक प्राणी च आहे त्याला त्याच्या पेक्षा वेगळ्या भाषा,संस्कृती,असणाऱ्या व्यक्ती बद्धल प्रेम कमी आणि द्वेष जास्त वाटतो.
हे नैसर्गिक च असावे.
वाघ,चित्ते जसे हद्ध ठरवतात त्या मध्ये दुसरा कोणता चित्ता आला तर तुटून पडतात.
तोच प्रकार आहे
उदय पण वेगळ्या भाषेत तेच सांगत आहेत.अमेरिकेत इंग्लिश मध्ये बोला मराठी मध्ये बोलू नका.
जिथे राहतं आहात तेथील संस्कृती,भाषा आत्मसात करा.
त्या मुळे तुम्ही त्या समाजात मिसळून जाल.
प्रतेक भाषेचा ,संस्कृतीचा आदर केला पाहिजे हे अलंकार असलेले वाक्य आहे.
असा आदर कोणी करत नसते.
आपण च स्वतः मध्ये बदल करून त्यांच्यात मिक्स झाले पाहिजे
भारतात पण उत्तर भारतीय समाज कोणाला प्रिय नाही (यूपी,बिहारी)कारण हे दुसऱ्या राज्यात पण स्वतःची भाषा,विचार,संस्कृती सोडत नाहीत त्या मुळे ते परके वाटत असतात.
पण राजस्थानी ,गुजराती,अगदी दक्षिण भारतीय पण स्वतः मध्ये बदल करतात.
आणि जिथे राहतं असतात त्या समाजात मिक्स होतात.

भारतात पण उत्तर भारतीय समाज कोणाला प्रिय नाही (यूपी,बिहारी)कारण हे दुसऱ्या राज्यात पण स्वतःची भाषा,विचार,संस्कृती सोडत नाहीत त्या मुळे ते परके वाटत असतात. >>>>>स ह म त

<<<.अमेरिकेत इंग्लिश मध्ये बोला मराठी मध्ये बोलू नका.
जिथे राहतं आहात तेथील संस्कृती,भाषा आत्मसात करा.>>>
हा हा हा!
लॅटिनो लोकांना सांगा हे!

अमेरिकेतले सगळे परदेशीय लोक आपआपसात स्वाभिमानाने स्वतःच्या भाषेत बोलतात.
फक्त भारतीयांनाच भारतीय संस्कृती, भाषा याची लाज, भीति वाटते. मराठी लोकांना तर मराठी भाषेचीच लाज वाटते नि आपाअपसात भारतात देखील हिन्दी, इंग्रजी मधे बोलतात.
ज्यांना भारतीय भाषा समजणार नाही, त्यांच्याशी भारतीय अस्खलित इंग्रजीतून बोलतात. ते समाजात पूर्णपणे मिसळले आहेत - रोटी-बेटी व्यवहारहि करतात!!
एका मूर्ख मेक्सिकन बाईने तमाशा केला यावरून सगळ्या अमेरिकन समाजाबद्दल काही समज करून घेणे योग्य नाही.

इथे अमेरिकेत एक गाव आहे तिथे इतके पुणेकर आहेत.. सेकंड लँग्वेज मराठी आहे... लोक तर अमेरिकन लोकांशी पण मराठीत बोलतात तिथे...

काहीवेळा देशी लोक खूप nuisance create करतात पण. अलीकडे हे जास्त नोटीस होतंय. आणि ते लोक स्वतः पूर्णपणे oblivious असतात. अर्थात बे एरियासारखा पूर्णपणे देशी भागच असेल तर जाणवत नाही पण मिक्स क्राऊडमध्ये जाणवतं. त्यात मग त्या बाईसारखं कोणी आधीच डोक्यात हललेलं असेल तर outburst करतं. बाकीचे लोक तिथुन काढता पाय घेत असतील. (याचा अर्थ रेसिस्ट लोकांचं समर्थन नाही.)
इथे लहानपणापासून मुलांना ज्या गोष्टी शिकवतात- use your inside voice- अगदी बेसिक - तेही देशी पब्लिकला शिकवलेलं नसतं. You are not entitled to anything, nobody owes you anything- हे डोक्यातच नसतं. सेन्स ऑफ एनटायटलमेंट भारतातून घेऊन येतात.

माझं मत विरोधी वाटेल. पण ह्या काकवा भारतीय भाषेत त्या बाईबद्दल कागाळ्या करत असाव्यात नी हे त्या बाईला सेंस झालं असावं. इंग्रजीत बोला म्हणून त्या बाईने हे ह्या काकवांना सांगीतलं असावं मग ह्यांनी प्रतिवाद करून त्या बाईला ऊचकवलं असावं न शेवटी त्या बाईने हे शब्द भारतीयांना ऐकवले. ऊगाच कुणी कुणावर असं डाफरत नाही. करीॲस पीपल हे ऐकून घेण्यासाठी ह्या काकवाच जबाबदार आहेत. त्या देशात त्या राज्यात त्यांचीच भाषा बोलायला हवी. इथे हिंदी भाषीक हिंदी लादतात एकाच देशात तरी डोकं ऊठतं.

Point एकदम क्लिअर आहे जिथे राहता तेथील भाषा संस्कृती स्वीकारा.
तेथील राजकारण,त्या देशातील ,राज्यातील प्रश्न ह्या वर जास्त व्यक्त होवू नका .
तिथे आपण नोकरी साठी गेलो आहोत
तेथील सत्ता ताब्यात घेण्यास नाही
ह्याचे भान हवे

"दिल्या घरी तू सुखी राहा" किंवा गेल्या घरी तू सुखी राहा हे सूत्र महत्वाचे.
मारवाडी समाज पूर्ण जगात आहे पण जिथे जातील तिथे मिक्स होतात.
वेगळे पण जपतात पण घरात आणि त्यांच्याच समाजात.
असेच वागले पाहिजे..
अमेरिकेत आमचे डॉक्टर, engineer, नासा आम्हीच चालवतो
ही बकवास बंद करा...
आपण इतके सक्षम असतो तर भारत सर्वात महान देश झाला असता हे विसरू नका..

<<<तेथील सत्ता ताब्यात घेण्यास नाही>>>
काय हरकत आहे सत्ता ताब्यात घ्यायला? एका बाजूने म्हणता समाजात मिक्स व्हा, मग राजकारणात का नको? भ्यायचे कशाला नि कुणाला?
<< इतके सक्षम असतो>>
काहीहि करायला सक्षम आहोत आपण.
भारताचा काय संबंध? इथे रहातो, इथे मिक्स होणार, स्वाभिमानाने जगणार!
भारतात इथल्यापेक्षा हजारो पटीने जास्त लोक आहेत, शंभर पटींनी जास्त सक्षम आहेत. काय करायचे ते करतात. सध्या तरी भारत जगात एक सामर्थ्यशाली देश आहे.
स्वस्तःबद्दल बोलायचे तर भारतात माझी डाळ शिजली नसती. सगळ्याच बाबतीत माझ्यापेक्षा उजवे लोक तिथे! इथे आलो म्हणून बरे झाले. वशिला किती दिवस चालणार?

इथे अमेरिकेत एक गाव आहे तिथे इतके पुणेकर आहेत.. सेकंड लँग्वेज मराठी आहे... लोक तर अमेरिकन लोकांशी पण मराठीत बोलतात तिथे>>>> Rofl धमाल चालुये इकडे!!

संस्कृत सोडा, जात आदिचे लोण अमेरिकेत आलेले आहे.

>>>>>>"​​Ambedkar once quoted, 'If Hindus migrate to other regions on earth, Indian caste would become a world problem.' That is precisely what is happening now in the United States," Rama Krishna Bhupathi of the US-based civil rights group Ambedkar International Center told the BBC.

https://www.bbc.com/news/world-asia-india-61241849

हा विषय फार वाढला व फाटे फुटले तर माझा सहभाग शून्य असेल. मी बातमी लिंकसकट दिली आहे विच इज इनफ. व वाद घालायला ना वेळ आहे ना इन्क्लिनेशन.

<<भाषेची गळचेपी >>
अहो काय राईचा पर्वत करताय्. चार लोक दुसर्‍या भाषेत बोलले तर इंग्रजीची गळचेपी होत नाही. नि स्पॅनिश बोलणारे? त्यांना सांगायची सोय आहे.
का? नि सग्गळे भारतीय घराबाहेर इंग्रजीतच बोलतात! गळचेपी मराठी भाषेचीच चालू आहे नि ते सुद्धा महाराष्ट्रातच मराठी मातृभाषा असलेल्यांकडूनच!

<<<अमेरिकन लोकांशी पण मराठीत बोलतात तिथे>>
हो, पण मराठी लोकांनाच ते कळत नाही मग कुणितरी हिंदी किंवा इंग्रजीत सांगतात!!

<<<तेथील सत्ता ताब्यात घेण्यास नाही>>>जर इंग्रज येऊन आपल्यावर १५० वर्ष राज्य करू शकतात तर मग आपण तिथे जाऊन असे काही केले तर आपण खूप चांगले सुसंस्कृत शासक होणार का ?

भारतात सुसंस्कृत ,सक्षम शासक असते तर इंग्रज इथे येवू च शकले नसते.आणि आपण
भारतीय किती ही आपण विकसनशील देश आहोत म्हणत असू तरी भारत आज पण अविकसित देश च आहे तो असा अविकसित राहायला नसता.

विकसित म्हणजे काय?
नवीन तंत्रज्ञान जनमानसात पसरले आहे. मंगळावर आंतरिक्षयान सोडले, आर्थिक क्षमतेत इंग्लंडला मागे टाकले.
आता लोकसंख्याच प्रचंड झाल्यावर त्यामानाने वाईट लोकहि संख्येने जास्तच असणार.

आपाआपसातील भांडणे, त्यासाठी परकीयांची मदत घेणे, लाचलुचपत, बेकायदेशीर वागणे, जाऊ तेथे घाण करू असले प्रकार ही सध्याच्या भारतीयांची संस्कृती आहे.

पण त्याचा अमेरिकेत येऊन मराठी बोलण्याशी किंवा अमेरिकेतल्या वर्णद्वेषाशी काही संबंध नाही. अमेरिकेत कसे वागावे याच्याशीहि त्याचा काही संबंध नाही.
त्यासाठी काही करणे हे भारतात रहाणार्‍यांनी करायला पहिजे, अमेरिकेशी त्याचा काय संबंध?

Pages