भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुसती दिसायलाच गोड आहेत Lol दंगा घुडगुस असतो नुसता फार लक्ष द्यावे लागते. कुठंही कडमडतात. डोक्याला त्रास नुसता Proud
नाही अजून कोणी घेतली नाहीत.
फेसबुक वर मांजर ग्रुप आहेत त्यावर, व्हॉट्सअपवर सगळीकडे पोस्ट टाकली पण अजून कुणाचाच रिस्पॉन्स नाही

थँक्यू अस्मिता..
आज असंच एक इन्स्टा रील बघून कॉपी म्हणून मी सॅमीशी बोलत होते ऑफिसला निघताना की तू एकटी राहशील ना निट? घर सांभाळशील ना? त्या इंस्टावरची माऊ अगदी समजल्यासारखं प्रत्येक वाक्याला म्यांव करत होती आणि आमचं हे ध्यान काही केल्या माझ्याकडे बघायलाच तयार नाही. कुठेतरी तिसरीकडेच लक्ष. टीपीकल टीनेज बिहेविअर! Lol

IMG_6957_0.jpeg

सिंबाचा लपून काढलेला फोटो, लपून या साठी कारण कॅमेरा दिसला कि एकतर तो कॅमेरामॅनलाच चाटायला धावतो किंवा मग पळून जातो

ओड्याची आजची मज्जा

आम्ही नेहमीच्या ठिकाणी फिरायला गेलो होतो. तिकडे भटक्या भुभ्यांचे गँगवॉर सुरु झाले. म्हणजे आमच्या मागून एक चार नवीन स्टॉँग भूभे आले ते बघताच तिथले स्थानिक भूभू चवताळून उठले आणि जोरदार भुंकाभुंक सुरु झाली. आम्ही मधे आणि दोन्ही बाजूने हा गदारोळ. आधी ओड्या आणि मला काही कळेच ना काय सुरु झालं अचानक. मग कळलं की हे आपल्यावर नाही एकमेकांवर भुंकाभुंक सुरु आहे.
त्यावर ओड्याची रिऐक्शन इतकी मजेदार होती. तो आधी एकदम टेन्स झाला, दोन्ही बाजूला बघत राहीला की कोण आपल्या अंगावर येतंय. मग एरवी जसा उद्दामपणे अल्फा मेल बनायला बघतो तसं करून पाहिलं, मग लक्षात आलं की हे प्रकरण वेगळं आहे अंगाशी येऊ शकतं, मग अक्षरश: अगदी आवाज फुटेल न फुटेल अशा आवाजात दोनदा भू भू केलं.

माझ्या मते त्याचा अर्थ होता - दादा, काय तुम्ही, मला जाऊ द्या ना, मी तर इथं फक्त शू करायला आलेलो ओ, आणि आता काय निघालोच होतो, जावं काय....???

आणि १०१ टक्के हेच होतं कारण स्थानिक भुभ्यांनी सरकून आम्हाला जायला जागा दिली आणि आपले अंग चोरून तिथून सटकलो.???
Happy

>>>>>>>आणि १०१ टक्के हेच होतं कारण स्थानिक भुभ्यांनी सरकून आम्हाला जायला जागा दिली
मस्त!!! एकेक किस्से इतके छान.

मवाळ नाहीये तो अजिबात, बारक्या भुभ्यांवर जाम दादागिरी करतो, ते शांतपणे कडेला झोपलेले असतील तरी त्यांना भो भो करून उठवून हुसकवतो
मी कितीदा ओरडलोय त्याला त्यासाठी
पण उलट चित्र असेल की जास्त भुभे असतील गॅंग मध्ये तर एकदम सभ्यपणे इकडे तिकडे न बघता मान खाली घालुन तो एरिया क्रॉस करतो, मी तुमच्याकडे बघत नाही, तुम्ही पण माझ्याकडे बघू नका असं

पक्का डाँबीस आहे Happy

Pages