बरेच दिवस हा धागा काढायचा मनात होता.
कारण मी एखादी पोस्ट लिहावी आणि ती खोटी आहे सिद्ध करायला काहींनी धडपड करावी हे आता फार वाढू लागले आहे. मग तो धागा क्रिकेटचा असो, चित्रपटांचा असो, खाऊगल्लीचा असो वा एखादा कल्चरल शॉकच असो..
पण मग वाटायचे, जाऊ द्या. तिथले तिथे क्लीअर करूया. एक वेगळा धागा कश्याला स्वत:वरचे आरोप क्लीअर करायला...
पण आज एका धाग्यावर मी माझ्या लेकीचा किस्सा टाकला. त्यावरही काही वा त्याच काही लोकांनी अविश्वास दाखवताच म्हटले चला. फायनली हा धागा काढायची वेळ झाली. कारण माझ्यावर होणारे आरोप एकीकडे. पण ज्यात माझी मुले इन्वॉल्व्ह आहेत तिथे मला लागलीच दूध का दूध पाणी का पाणी करणे गरजेचे आहे.
तर दरवेळी धागे केवळ माझ्यावर दाखवण्यात आलेल्या अविश्वासामुळे भरकटू नयेत यासाठी हा वेगळा धागा. यापुढे ईथे असले मॅटर सॉल्व्ह करून त्याची नोंद करण्यात येईल.
तर आजची केस -
मी मुलं लाजवतात तेव्हा या धाग्यावर खालील किस्सा लिहिला होता
https://www.maayboli.com/node/24545?page=36
-------
मागे एकदा पोरांसोबत रिक्षाने कुठेतरी जात होतो.
रिक्षाच्या पुढच्या काचेवर बाहेरच्या बाजूने "आईचा आशीर्वाद", "साईबाबांची कृपा" लिहीतात तश्या टाईपचा एक सुविचार लिहिलेला - माय डॅड माय गॉड.
लेकीची त्यावर नजर पडताच तिने तो आतल्या बाजूने वाचला, आणि किंचाळली... हायला पप्पा ते बघ काय लिहिलेय.. माय डॅड माय डॉग Lol
-------
त्यावर असा आक्षेप आला.
My Dad My God ची मिरर इमेज ‘boӘ γM bɒႧ γM‘ अशी होते. ह्यातून ‘My Dad My Dog’ कसं तयार होतं सर? व्हॉट्सअॅपचे विनोद मुलांच्या नावावर तुम्ही ढकलताय असा आमचा नम्र वहीम आहे. Happy
>>>>>
तर आधी लॉजिकमध्ये घुसूया,
१) वर जे My Dad My God आणि त्याचे उलटे लिहिण्यात आले आहे ते स्मॉलमध्ये आहे. त्या रिक्षावर जे लिहिलेले ती ईंग्रजी कॅपिटल आद्याक्षरे होती. MY DAD MY GOD याने बराच फरक पडतो. संबंधितांनी करून बघावे
२) जेव्हा आपण एखादे पुर्ण वाक्य उलटे वाचतो तेव्हा आधीच आपल्या मेंदूने नोंद घेतली असते की ते उलटे वाचायचे आहे. त्यामुळे MY चे उलटे YM वाचूनही आपल्या मेंदूत त्याची नोंद माय अशीच होते. ते तसेच वाचले जाते. डॅड तर पुढून मागून डॅडच राहतात. पण गॉड आणि डॉग बाबत दोन्ही अर्थपुर्ण शब्द असल्याने गॉड ऐवजी डॉग क्लिक होणे स्वाभाविक आहे. वा त्याची पुरेपूर शक्यता आहे.
आता थेट पुराव्यांकडे वळूया
जेव्हा हा किस्सा घडलेला तेव्हा मी त्याची फेसबूकवर नोंद सुद्धा केली होती. तर असे नाही की आज तो मुलांचा धागा वर आला आणि मी काही किस्सा बनवून लिहीला.
...
आणि आता शेवटचा आय विटनेस पुरावा - अर्थात माझी लेक
जी त्यानंतर कित्येक दिवस मला चिडवत होती, माय डॅड माय डॉग... तिला तुम्ही हे नक्की विचारू शकता.
पण त्यासाठी तुम्हाला माझ्या घरी यावे लागेल. माझ्या घरी तुमचे नेहमी स्वागतच राहील. फक्त येताना रिकाम्या हाताने येऊ नका. पोरांसाठी भरपूर चॉकलेटस तेवढी आणा. बदल्यात हा आणि असे कैक किस्से ऐकूनच परत जा
हा धागाही अटेंशन सीकींगमुळे काढला आहे असे तुम्ही म्हणू शकता.
तर येस येस येस, हा आरोप मला मान्य आहे
धन्यवाद,
आपलाच ऋन्मेष
एक धागा काढून चर्चा सुरू करून
एक धागा काढून चर्चा सुरू करून स्वतःची आरती सुरू पण केलीस >>

त्याने “My DAD my GOD” मनावर घेतलं
नशीब पहिलंच वाक्य मनावर घेतलं
मी तर तिथेही फक्त शंका व्यक्त
मी तर तिथेही फक्त शंका व्यक्त केलीय
>>>
बरं मला नाही रुचली अशी माझ्या चारीत्र्यावर शंका घेणे असे समजा हवे तर
असो,
एखादा शब्द नजरचुकीनं अक्षरं ट्रान्सपोज करून वाचणं आणि आक्खं वाक्य, मिरर इमेजमधे......
>>>>>
पुन्हा गल्लत होतेय. लेकीला ते वाचताना ती मागून वाचतेय हे कळत होते. मिरर ईमेज वाचताना YM हे MY असणार हे समजून तिच्याकडून माय वाचले गेलेय. त्याला यम नाही म्हटले तिने. तुमच्या लॉजिकने यम म्हणायला हवे होते?
पण नाही म्हटले गेले. कारण तसा शब्दच नसल्याने आपला मेंदू तो शब्द चुकीचा वाचणे शक्य नाही. पण गॉड बाबत अक्षरांचा क्रम उलटा होत डॉग हा अर्थपुर्ण शब्द असल्याने तो चटकन तसा वाचला जाणे स्वाभाविक आहे.
एक धागा काढून चर्चा सुरू करून
एक धागा काढून चर्चा सुरू करून स्वतःची आरती सुरू पण केलीस >> Lol
>>>
यात ईतके हसण्यासारखे काही नाहीये. सगळ्या मायबोलीला माहीत आहे हे मी करतो. धाग्यातही कबूल केलेय. उगाच त्या मुद्द्यावर चर्चा होऊन मूळ गॉड vs डॉग ची चर्चा बॅकफूटला जायला नको..
>>डॉग या शब्दात नक्की वाईट
>>डॉग या शब्दात नक्की वाईट काय असते?<< +१
आमच्या इथे मोठ्या साहेबाला टॉपडॉग म्हणतात...
एक कलीग आहे तिचे कोणाशी पटत
एक कलीग आहे तिचे कोणाशी पटत नाही. एकजण तिच्यामागे तिला 'जंकयार्ड बुलडॉग' म्हणतो.
आपल्याकडे 'गव्हाणीवरचा कुत्रा' ही इसापनीतीमधली गोष्ट आहे ना. म्हणजे स्वतः चारा खात नाही पण गायींनाही खाऊ द्यायचा नाही. गव्हाणीवर बसून भुंकायचे. अशा प्रकारच्या व्यक्तीमत्वास 'गव्हाणीवरचा कुत्रा' म्हणतात.
“ बरं मला नाही रुचली अशी
“ बरं मला नाही रुचली अशी माझ्या चारीत्र्यावर शंका घेणे असे समजा हवे तर” -
किस्श्याच्या सत्यासत्यतेवर शंका घेतलीय.
DAD पुढे वाचली गीता, कालचा
DAD पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता.
"प्रतिसादासाठी कायपण" सिरीज
"प्रतिसादासाठी कायपण" सिरीज मधला सरांचा नवीन पैंत्रा
तुम्ही मायबोलीच्या राखी सावंत आहात सर. काय बोलल्याने चर्चेत रहाता येतं हे त्यांच्या सारखंच तुम्हाला पण चांगलं जमतं सर.
मला नाही रुचली अशी माझ्या चारीत्र्यावर शंका घेणे
पण सर, तुमच्या थापा मारायच्या सवयीवर तुमचाच एक धागा आहे ना सर?
तुम्ही मायबोलीच्या कंगना राणावत आहात सर. त्यांनीही स्वतःच्या झाशीची राणी भूमिकेसाठी स्वतःलाच नॅशनल अवॉर्ड घोषित केलेलं. आणि तुम्ही चारित्र्यवान असलेल्याच सर्टीफुकट स्वतःलाच देताय
आणि मायबोली सोडायच्या ऑफर वर कोणी का विश्वास ठेवेल? गेल्या वेळी तुम्ही मायबोली सोडूनही पुन्हा अवतीर्ण झालात!
तुम्ही मायबोलीचे मोदीजी आहात सर. अगर मेरी कोई गलती निकल जाये तो मैं झोला उठाके चला जाऊंगा असं ते पण म्हणतात ना सर. पण प्रत्येक चुकीला मास्टरस्ट्रोक ठरवून जात मात्र नाहीत
प्रतिसादांची संख्या वाढवून तुमचा इगो कुरवाळायला आम्ही आहोत ना सर, तुम्ही धागे काढत रहा सर..
आकाशातला बाप्पा सगळ्यांचाच
आकाशातला बाप्पा सगळ्यांचाच डॅड आणि गॉड आहे.
- सेंट कॉमी
कदाचित ह्या चायनीज पुस्तकाची
कदाचित ह्या पुस्तकाची जाहिरात असेल ती:
https://www.amazon.com/My-Dad-Dog-Rebecca-Warner-ebook/dp/B08H8V9RRH
किस्श्याच्या सत्यासत्यतेवर
किस्श्याच्या सत्यासत्यतेवर शंका घेतलीय.
>>>
one and the same thing फेरफटका
जेव्हा मी म्हणतो की आयपीएलचे काही सामने मला स्क्रिप्टेड वाटतात तेव्हा ईथलीच लोकं मला म्हणतात की तू अशी खेळाडूच्या ईंटेग्रिटी वर कशी काय शंका घेतोस.
मग आता जर तुम्ही माझ्या किश्यावर शंका घेत असाल तर यात माझ्या ईंटेग्रिटीचा पालापाचोळा नाही का होत?
कि तुम्हारा खून खून हमारा खून पाणी?
टॉपडॉग
टॉपडॉग
'जंकयार्ड बुलडॉग'
'गव्हाणीवरचा कुत्रा'
>>>>
किती कुत्र्यांचे प्रकार आले बघता बघता. नाहीतर मला आजवर डॉबरमॅन आणि दुसरा कोण तो केसाकेसांचा असतो तेच माहीत होते
तुम्ही मायबोलीचे मोदीजी आहात
तुम्ही मायबोलीचे मोदीजी आहात सर....
>>>>
प्लीज मला शाहरूखच राहू द्या, धाग्यावर राजकारण टाळा _/\_
पण सर, तुमच्या थापा मारायच्या
पण सर, तुमच्या थापा मारायच्या सवयीवर तुमचाच एक धागा आहे ना सर?
>>>>
कुठल्या धाग्याबद्दल बोलत आहात? लिंक द्या बघू... मी शोधतोय गेले पंधराह मिनिटे. सापडत नाहीये...
अतुल. >> भारीच! किंडलवर फ्री
अतुल. >> भारीच! किंडलवर फ्री आहे.
तुहाड्डा कुत्ता टॉमी, और सड्डा कुत्ता डॅडी???????
हपा
हपा
मी शोधतोय गेले पंधराह मिनिटे.
मी शोधतोय गेले पंधराह मिनिटे. सापडत नाहीये...
तुम्ही "वाईट सवयी थापा" असं शोधून बघितलं का?
मी... मी.... मी..... मी.....
मी... मी.... मी..... मी..... मी.....
धाग्याचा (अन लेखन कारकीर्दीचा) सारांश...
छान
छान
इतर एका मराठी संस्थळावर साहेब
इतर एका मराठी संस्थळावर साहेब मजकूर एकदाच अवतीर्ण झाले होते, पण तिथल्या चाणाक्ष वेब-मास्तर/ संपादक मंडळाने साहेबांना त्वरित बाहेरचा रस्ता दाखवला होता अशी एक कथा तिथेच ऐकली होती एकदा.
त्यावेळी क्षणिक वाईट वाटले होते की बुआ अरे जाऊ देत राहू दिले असते प्रतिसादच दिले नसते तर गेला असता कंटाळून इत्यादी इत्यादी
पण हल्ली हल्ली होऊ लागलेले साहेबांचे येथील विराटरूप दर्शन पाहून अस्मादिक अंमळ हबकले असून अस्मादिकांचा पलीकडील एका संस्थळाच्या संपादक मंडळा विषयी आदर परमोच्च वाढलेला आहे,
मायबोली संपादक पण आम्हाला त्यांच्याविषयी असलेला आदर अजून वृद्धिंगत करण्याची संधी देतील अश्या अपेक्षेने आमचा सादर जय हिंद जय महाराष्ट्र
(मर्त्य आयडी, पण कौंसेलिंगची गरज नसलेला)
- वांडो
“ यात माझ्या ईंटेग्रिटीचा
“ यात माझ्या ईंटेग्रिटीचा पालापाचोळा नाही का होत?”
इंटेग्रिटी का चारित्र्य (कॅरेक्टर)? दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
सतराशे साठ ड्यू आयडीज काढणे, सबगोलंकार लिहून चर्चा, धागे भरकटवणे, प्रतिसादांच्या संख्येसाठी काहीही लिहीणे अश्या आपल्या अनेक लीला असल्यामुळे मायबोलीवर त्याविषयी अनेकवेळा लिहीलं गेलंय. त्यात त्या इंटेग्रिटीविषयक शंकेची पाळंमुळं असू शकतील. बाकी आभासी जगात, एक मुखवटा घेऊन वावरणार्या कुणीच कुणाच्या चारित्र्याविषयी ग्वाही देऊ शकत नाही.
इतर एका मराठी संस्थळावर साहेब
इतर एका मराठी संस्थळावर साहेब मजकूर एकदाच अवतीर्ण झाले होते, पण तिथल्या चाणाक्ष वेब-मास्तर/ संपादक मंडळाने साहेबांना त्वरित बाहेरचा रस्ता दाखवला होता अशी एक कथा तिथेच ऐकली होती एकदा>> हे तर भारीच इंटरेस्टींग दिसते.
कालपरवाच एका हाटेलीची मेम्बरशीप घ्यायचा विचार मनात आला पण म्हटलं महामहिम तिथेही बागडत असले तर. मग गेल्यापावलाने परत आलो.
सतराशे साठ ड्यू आयडीज काढणे,
सतराशे साठ ड्यू आयडीज काढणे, सबगोलंकार लिहून चर्चा, धागे भरकटवणे, प्रतिसादांच्या संख्येसाठी काहीही लिहीणे अश्या आपल्या अनेक लीला असल्यामुळे
>>>>>>>
वेरी गूड !
आधी म्हणालात माझ्यावर काही आरोप नाही तर माझ्या किस्श्यावर संशय आहे.
पण आता मी माझ्या किस्श्यावर संशय घेणे म्हणजेच माझ्या ईंटीग्रीटीवर संशय घेणे झाले हे दाखवतातच मात्र तुम्ही भीड न बाळगता थेट माझ्यावर बेछूट आरोप केलेतच
आता यात गंमत अशी आहे की एकवेळ हे वरचे सारे खरे आहे असे समजले तरी त्याने तुम्हाला माझ्या ईंटीग्रिटीवर शंका घ्यायचा अधिकार प्राप्त होत नाही.
अगदीच थेट बोलायचे झाल्यास, एखाद्या मुलाच्या सतराशे साठ गर्लफ्रेंड असतील, त्याला दारू सिगारटेची व्यसने असतील, तो पक्का लफडेबाज असेल... वगैरे वगैरे... तरी त्याने कुठल्या मुलीला त्याच्याशी हवे तसे वागायचा, त्याची छेड काढायचा अधिकार प्राप्त होत नाही.
असो, पण ते आरोपही बिनबुडाचेच आहेत. पण आता केलेच आहेत तर ते खोडणेही भाग आहे
१) सतराशे साठ ड्यू आयडीज काढणे >>> तुमचा अभिषेक, ऋन्मेष, अंड्या, भन्नाट भास्कर, अर्चना सरकार याव्यतिरीक्त माझा कुठला आयडी माहीत आहे का तुम्हाला? बरं हे आयडी काढले म्हणजे काही अपराध आहे का? कायद्याने वा नैतिकदृष्ट्या वगैरे?
२) सबगोलंकार लिहून चर्चा, धागे भरकटवणे, >>> यातले धागे भरकटवणे म्हणजे काय हे क्लीअर कराल का? कारण दर चौथ्या दिवशी माबोबर दर दुसरा धागा भरकटताना मी बघतो. हे ऋन्मेष जन्माला यायच्या आधीपासून चालू आहे ते माझ्या मृत्युनंतरही चालू राहीलच.
अगदी ताजे उदाहरण द्यायचे झाल्यास तुमच्याच सो कॉल्ड संशयाने तो मुलांच्या किस्श्याचा धागाही भरकटला
तुमच्या त्या पोस्टनंतर ईतका वेळ त्या धाग्यावर एकही प्रतिसाद न दिलेले आयडीही हौसेने प्रतिसाद द्यायला उतरले. ते तर मी हा धागा काढला नाहीतर तो धागा भरकटलेलाच होता. त्यानंतरही मी हा धागा काढूनही तुम्ही ईथल्या मुद्द्यांना तिथेच प्रत्युत्तर देत होता. ते मीच विनंती करून तुम्हाला ईथे आणले आणि तो धागा आणखी भरकटण्यापासून वाचवला. तुम्ही त्या धागा भरकटण्याची जबाबदारी घेता का? आणि मला तो धागा आणखी भरकटण्यापासून वाचवल्याचे प्रामाणिकपणे क्रेडीट देता का? 
अन्यथा तुमची धागा भरकटायची व्याख्या काय आहे ते सांगा जे मीच त्याला जबाबदार असतो. मला जाणून घ्यायला आवडेल.
३) प्रतिसादांच्या संख्येसाठी काहीही लिहीणे >>> यातले काहीही लिहिणे म्हणजे काय हे जरा उलगडून सांगाल का? काहीही मध्ये काय येते?
बाकी प्रतिसादांच्या संख्येसाठी मी लिहीतोच. त्यात काय एवढे?
हे म्हणजे सचिन तेंडुलकर पैश्यासाठी जाहीराती करतो म्हटल्यासारखे झाले. ठिक आहे करतो पैश्यासाठी जाहीराती. त्यात काय एवढे?
असो,
तुम्ही हे आरोप देखील हवेत केलेले असतील तर त्यांचीही जबाबदारी झटकून कधीही ही चर्चा थांबवू शकता
तसे तर इथूनही कित्येक उडाले
तसे तर इथूनही कित्येक उडाले आहेत आणि "त्या तिथे पलिकडे " जाऊन सुखाने संसार करीत आहेत. तसेच इथे तिथे दोन्हीकडे असणारे आणखी काही आय डी तिथून उडवले गेले आहेत.
ह्या आयडीने किंवा कदाचित दुसऱ्या नावाने पण त्याच व्यक्तीने फक्त एकच लेख तिथे लिहिला. आणि तो अजिबात आक्षेपार्ह नव्हता. मी तो वाचला होता. फक्त तिथल्या एक दोन आय डींचे म्हणणे पडले की ही व्यक्ती मायबोलीवर अनेक नावांनी वावरते, अनेक धागे काढते आणि वात आणते. अशी व्यक्ती इथे नको. ह्या मताला इतर आठ दहा जणांचा पाठिंबा मिळाला आणि संपादकांनी तो आय डी उडवला. त्या संस्थळावरचे तेव्हाचे वातावरण, संपादक मंडळ, तिथल्या सभासदांची दुसऱ्या संस्थळाच्या सभासदांविषयीची
त्या काळची मानसिकता ह्यावर बोलणे नको.
एखादा इथे आणि तिथे असा दोन्हीकडे वावरणारा डु आय डी तिथून उडाला ही काही एखाद्या "गुन्हेगाराला सजा मिळाली " अशा प्रकारची गोष्ट नाही, किंवा त्यामुळे त्या आय डी चा अपराध सिद्ध होत नाही अथवा गुन्हेगारी ( कोणत्याही प्रकारची) अथवा विकृत मानसिकता सिद्ध होत नाही.
ह्या मताला इतर आठ दहा जणांचा
ह्या मताला इतर आठ दहा जणांचा पाठिंबा मिळाला आणि संपादकांनी तो आय डी उडवला. त्या संस्थळावरचे तेव्हाचे वातावरण, संपादक मंडळ, ह्यावर बोलणे नको.
मिसळपाव का?
अर्रर्रर्रर्र .. असले कसले हे
अर्रर्रर्रर्र .. असले कसले हे संपादक.... निषेध आहे...
अर्रर्रर्रर्र .. असले कसले हे
अर्रर्रर्रर्र .. असले कसले हे संपादक.... निषेध आहे... >>> +१
रूनम्याचे वागणे आवडत नाही पण याला जोरदार अनुमोदन!
मिसळपाव का? >>>> होय.
मी ही डोकावलो होतो तिकडे पण काही खूप डेंजर आय डी आहेत तिकडे त्यामुळे सदस्यनाम नाही घेतलं आणि फक्त वाचनमात्र राहिलो
कालपरवाच एका हाटेलीची
कालपरवाच एका हाटेलीची मेम्बरशीप घ्यायचा विचार मनात आला पण म्हटलं महामहिम तिथेही बागडत असले तर. मग गेल्यापावलाने परत आलो.
बसा टेबल धरून, बिनघोर. आम्ही तर आहोत बुआ दोन्हीकडे एकच आयडी घेऊन, कारण दोन्ही मंच आपापल्या परीने लव्हेबल वाटले, पण त्यामुळे दोन्ही मंचांवर वावरण्याची जबाबदारी पण सांभाळायचे भान आहे बुआ आम्हाला तरी. मला ते एक मजेशीर बंधन वाटते प्रेमळ टाईप तिकडे एखाद धागा टाकला की इकडे तो प्रकाशित केल्याशिवाय चैन पडत नाही अन् इकडे केल्यास तिकडे.
- (अद्वैत आयडी साईट द्वैतवादी) १२००१ वांडबाबा जालकर
तसे तर इथूनही कित्येक उडाले
तसे तर इथूनही कित्येक उडाले आहेत आणि "त्या तिथे पलिकडे " जाऊन सुखाने संसार करीत आहेत. तसेच इथे तिथे दोन्हीकडे असणारे आणखी काही आय डी तिथून उडवले गेले आहेत.
असतील बुआ, मी सध्या सरांचा विषय सुरू असल्यामुळे कळले होते ते बोललो.
ह्या आयडीने किंवा कदाचित दुसऱ्या नावाने पण त्याच व्यक्तीने फक्त एकच लेख तिथे लिहिला. आणि तो अजिबात आक्षेपार्ह नव्हता. मी तो वाचला होता. फक्त तिथल्या एक दोन आय डींचे म्हणणे पडले की ही व्यक्ती मायबोलीवर अनेक नावांनी वावरते, अनेक धागे काढते आणि वात आणते. अशी व्यक्ती इथे नको. ह्या मताला इतर आठ दहा जणांचा पाठिंबा मिळाला आणि संपादकांनी तो आय डी उडवला. त्या संस्थळावरचे तेव्हाचे वातावरण, संपादक मंडळ, तिथल्या सभासदांची दुसऱ्या संस्थळाच्या सभासदांविषयीची
त्या काळची मानसिकता ह्यावर बोलणे नको.
नकोच, कारण मी त्यावेळी तिथे नव्हतो त्यामुळे संपादकांच्या त्याही तिथल्या, ते ही इथे कॉमेंट करणेत तरी मी तोकडा पडेन.
एखादा इथे आणि तिथे असा दोन्हीकडे वावरणारा डु आय डी तिथून उडाला ही काही एखाद्या "गुन्हेगाराला सजा मिळाली " अशा प्रकारची गोष्ट नाही, किंवा त्यामुळे त्या आय डी चा अपराध सिद्ध होत नाही अथवा गुन्हेगारी ( कोणत्याही प्रकारची) अथवा विकृत मानसिकता सिद्ध होत नाही.
असा कुठलाही, कोणाचाही अन् कधीचाही गुन्हा सिद्ध करण्याचा माझा अधेलीचा मानस नाही, तसे वाटल्यास वरील वाक्य स्पष्टीकरण म्हणून वापरावे वाचायला पुन्हा एकदा. सरांच्या संबंधी एक कथा अजून कुठंतरी ऐकली होती तितकी इथे मांडली फक्त मी, तितके सोडून जुने जाणते आयडी जाणतात तसे इकडचे संपादक, तिकडचे संपादक, पॉलिसीज, इतर उडालेले न उडालेले आयडी, कोण कुठं किती बाण मारतो इत्यादी इत्यादी राजकारणात मला शून्य गती असून कदाचित तो माझ्या शांत अन् आनंदी असण्याचा स्त्रोत असावा. ते एक असोच.
सौजन्य, तारतम्य अन् सोशल मीडिया सोसेल तितकाच, इतकी त्रिसूत्री पाळली तर स्वतःला अन् इतरांनाही जालीय वावर सुसह्य होतो असे मात्र माझे राखीव मत मी ठेवतो बाळगून माझ्याच जवळ.
ईटस ओके. दुसर्या
ईटस ओके. दुसर्या संकेतस्थळावरची चर्चा ईथे नको म्हणून तो विषय मी टाळला होता.
तसेही माझा "तुमचा अभिषेक" हा ओरीजिनल आयडी तिथे आहेच, पण तो आयडी मी तिथे लेख आणि कथांपुरताच वापरलेला. जसे तुमचा अभिषेक ईथे तेवढ्यापुरताच वापरलेला.
ऋन्मेष जसा ईथे वावरतो तसे तिथे वावरायचा प्रश्नच नव्हता. मायबोली हे आपले कुटुंब आहे, ते घरासारखे वाटते. ती मजा मग दुसरीकडे नाही. पण अभिषेक आयडीच्या माध्यमातून तिथल्या काही जणांशी माझी ओळख झाली होती. अजूनही ओळखीत आहेत. त्यामुळे भन्नाट भास्कर आयडी बनवला तेव्हा त्यातून ऋन्मेषचे दोनेक चांगले लेख तिथे प्रकाशित केले होते ईतकेच
तर तो भन्नाट भास्कर उडाला. त्याचे ना सुख ना दुख. कारण ऋन्मेषमधून जी मजा मी ईथे करतो ती तिथे करायला गेलो नसतोच. तरी तिथल्या लोकांना वाटले असावे की हा आयडी नंतर डोईजड होईल त्यामुळे मग लागलीच उडवला असावा
ईटस अॅक्चुअली ओके फॉर मी .. तरी यावर ईथे गॉसिप करायचे असेल तर ते सुद्धा ओके फॉर मी
Pages