माझ्यावर होणारे आरोप प्रत्यारोप आणि माझे सत्याचे प्रयोग!

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 August, 2022 - 05:01

बरेच दिवस हा धागा काढायचा मनात होता.
कारण मी एखादी पोस्ट लिहावी आणि ती खोटी आहे सिद्ध करायला काहींनी धडपड करावी हे आता फार वाढू लागले आहे. मग तो धागा क्रिकेटचा असो, चित्रपटांचा असो, खाऊगल्लीचा असो वा एखादा कल्चरल शॉकच असो..

पण मग वाटायचे, जाऊ द्या. तिथले तिथे क्लीअर करूया. एक वेगळा धागा कश्याला स्वत:वरचे आरोप क्लीअर करायला...

पण आज एका धाग्यावर मी माझ्या लेकीचा किस्सा टाकला. त्यावरही काही वा त्याच काही लोकांनी अविश्वास दाखवताच म्हटले चला. फायनली हा धागा काढायची वेळ झाली. कारण माझ्यावर होणारे आरोप एकीकडे. पण ज्यात माझी मुले इन्वॉल्व्ह आहेत तिथे मला लागलीच दूध का दूध पाणी का पाणी करणे गरजेचे आहे.

तर दरवेळी धागे केवळ माझ्यावर दाखवण्यात आलेल्या अविश्वासामुळे भरकटू नयेत यासाठी हा वेगळा धागा. यापुढे ईथे असले मॅटर सॉल्व्ह करून त्याची नोंद करण्यात येईल.

तर आजची केस -

मी मुलं लाजवतात तेव्हा या धाग्यावर खालील किस्सा लिहिला होता
https://www.maayboli.com/node/24545?page=36

-------
मागे एकदा पोरांसोबत रिक्षाने कुठेतरी जात होतो.
रिक्षाच्या पुढच्या काचेवर बाहेरच्या बाजूने "आईचा आशीर्वाद", "साईबाबांची कृपा" लिहीतात तश्या टाईपचा एक सुविचार लिहिलेला - माय डॅड माय गॉड.
लेकीची त्यावर नजर पडताच तिने तो आतल्या बाजूने वाचला, आणि किंचाळली... हायला पप्पा ते बघ काय लिहिलेय.. माय डॅड माय डॉग Lol
-------

त्यावर असा आक्षेप आला.

My Dad My God ची मिरर इमेज ‘boӘ γM bɒႧ γM‘ अशी होते. ह्यातून ‘My Dad My Dog’ कसं तयार होतं सर? व्हॉट्सअ‍ॅपचे विनोद मुलांच्या नावावर तुम्ही ढकलताय असा आमचा नम्र वहीम आहे. Happy
>>>>>

तर आधी लॉजिकमध्ये घुसूया,

१) वर जे My Dad My God आणि त्याचे उलटे लिहिण्यात आले आहे ते स्मॉलमध्ये आहे. त्या रिक्षावर जे लिहिलेले ती ईंग्रजी कॅपिटल आद्याक्षरे होती. MY DAD MY GOD याने बराच फरक पडतो. संबंधितांनी करून बघावे Happy

२) जेव्हा आपण एखादे पुर्ण वाक्य उलटे वाचतो तेव्हा आधीच आपल्या मेंदूने नोंद घेतली असते की ते उलटे वाचायचे आहे. त्यामुळे MY चे उलटे YM वाचूनही आपल्या मेंदूत त्याची नोंद माय अशीच होते. ते तसेच वाचले जाते. डॅड तर पुढून मागून डॅडच राहतात. पण गॉड आणि डॉग बाबत दोन्ही अर्थपुर्ण शब्द असल्याने गॉड ऐवजी डॉग क्लिक होणे स्वाभाविक आहे. वा त्याची पुरेपूर शक्यता आहे.

आता थेट पुराव्यांकडे वळूया

जेव्हा हा किस्सा घडलेला तेव्हा मी त्याची फेसबूकवर नोंद सुद्धा केली होती. तर असे नाही की आज तो मुलांचा धागा वर आला आणि मी काही किस्सा बनवून लिहीला.

my dad my god - 2.png

...

आणि आता शेवटचा आय विटनेस पुरावा - अर्थात माझी लेक Happy
जी त्यानंतर कित्येक दिवस मला चिडवत होती, माय डॅड माय डॉग... तिला तुम्ही हे नक्की विचारू शकता.

पण त्यासाठी तुम्हाला माझ्या घरी यावे लागेल. माझ्या घरी तुमचे नेहमी स्वागतच राहील. फक्त येताना रिकाम्या हाताने येऊ नका. पोरांसाठी भरपूर चॉकलेटस तेवढी आणा. बदल्यात हा आणि असे कैक किस्से ऐकूनच परत जा Happy

हा धागाही अटेंशन सीकींगमुळे काढला आहे असे तुम्ही म्हणू शकता.
तर येस येस येस, हा आरोप मला मान्य आहे Wink

धन्यवाद,
आपलाच ऋन्मेष Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एवढा वेळ कसा मिळतो?
>>>
धन्यवाद
आणि छे हो, अर्धा तास गेला फार तर. तो ही मजेत. कारण मला अश्या पोस्ट लिहीताना आनंदच मिळतो. नवीन उर्जाही मिळते. ती वापरून पुढच्या अर्ध्या तासात ऑफिसचे दोन तासांचे काम ऊरकले.
बाकी तिथेच किस पाडत बसलो असतो तुकड्या तुकड्यात तर अर्धा महिना हेच गुर्हाळ चालू असते.
आता हा धागा पुढेही वापरता येईल Happy

हेमंत
लिंक दिली आहे तिथे क्लिक करा. तिथे संदर्भ सापडेल.
मी लिहिलेल्या एका किस्यावर कोणी अविश्वास दाखवला त्यासाठी हा प्रपंच. संबंधितांनी आता तो छान धागा न भरकटवता ईथे यावे अशी विनंती.

@ फेरफटका, प्लीज ईथे या
तिथेच नको तो विषय वाढवू.
एण्ड ऑफ द डे
धागे भरकटायचे बिल माझ्या च नावावर फुटते.. Sad

डॉग या शब्दात नक्की वाईट काय असते?
व व व
चोर परवडला डॉग नको असे का वाटले? डॉग म्हणजे खरं तर एक प्रामाणिक मित्र आहे मनुष्याचा Happy

>>>>तर येस येस येस, हा आरोप मला मान्य आहे Wink
कमेन्टस मिळाल्या की मेंदूचे रिवॉर्ड सेंटर उत्तेजित होते हे जरी खरे असले तरी संपूर्ण सत्य नाही. बरेचदा आपण आपली 'इनसाईट' किंवा आपल्या मते छानशी कल्पना डॉक्युमेन्ट करण्याकरताही धागा काढतो. ब्लॉगमध्ये का लिहीत नाही मग तुम्ही? माबो वगैरे संस्थळे म्हणजे रोजनिशी आहेत का? वगैरे आरोपही मला मान्य आहेत पण ब्लॉग काढुन मेन्टेन करण्याचा आळस असतो एकेकाला. तेव्हा लिखाण हे फक्त कमेन्टसच्या ओढीने होत नसते. हां कमेन्टसमुळे इगो सुखावतो हे मान्य.

बरं अन्य लोकांची करमणुक होते ना? अर्थात सवंग करमणुकीची सवय लागू शकते वाचकांना पण मुद्दा तो नाही. ज्याला वाचायचे ते वाचतील. धागा ओलांडून जायचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. तो वाचकाचा हक्क आहे. Happy

बाय द वे, मी, ऋन्मेषचा ड्यु आय डी नाही. हे इथे नमूद करणे महत्वाचे आहे Wink
मी या धाग्याला सपोर्ट करते आहे. बस्स!!

सोशल मिडीयावर सेटींग पब्लिक ठेऊन किस्से लिहील्यावर त्याचे कुणी व्हॉट्सअ‍ॅप फॉर्वर्ड बनवले किंवा इतर डेरिव्हेटीव्ह काँटेंट (मीम, लोकगीत, इ) बनवले असे घडणे शक्य आहे. त्यामुळे तुम्ही आधी फेबु वर पोस्ट केले तरी माबो वाचकांनी व्हॉट्सॅप वरचे आधी पाहिले असे घडू शकते. त्यात मराठीत प्लेजरिझम ही संकल्पना फार रूजलेली नसल्याने डेरिव्हेटीव्ह कंटेंटचे श्रेय तुम्हाला मिळणे अवघड आहे. आता 'ओरिजिनल' आपलेच आहे म्हणून सिद्ध करण्यात किती वेळ आणि का घालवायचा हा खरा प्रश्न आहे. सोशल मिडीया विशेषतः मराठी सोशल मिडीया एक गंगा आहे. जे लिहू ते कृष्णार्पणमस्तु!!

प्लेजरिझम शब्द रुजला नसेल... किंवा त्यात काही वावगं असं ही जन्तेला वाटत नसेल. पण प्लेजरिझम ही परकीय संकल्पना आहे हे एक प्लेजरिझम आणि रिकर्शन झालं. Proud Wink

Lol मराठीत काय म्हणतात प्लेजरिझमला? वांग्मय चौर्य?? (तो "ड." उमटेना आता... ) पण प्लेजरिझम मध्ये केवळ कंटेंट (पूर्ण लेख्/पोस्ट इ वांग्मय!!! ...) अभिप्रेत नसून आयडिया/कल्पना ही येतात.

सामो धन्यवाद Happy
आणि हो, डॉग यात काय वाईट असते माहीत नाही. पण जे श्वानप्रेमी असतात त्यांनाही कुत्रा ही एक शिवी वाटते हे सुद्धा तितकेच खरे आहे. कदाचित तो शब्द शिवीस्वरुपात प्रचलित झाल्याने आणि त्याच उद्देशाने बोलले गेल्याने तसे झाले असावे.

अजून एक असाच गोंधळात टाकणारा शब्द म्हणजे साला. एकीकडे बायकोच्या भावालाही साला म्हणायचे दुसरीकडे तिलाच शिवी बनवून ठेवायचे Happy

बरेचदा आपण आपली 'इनसाईट' किंवा आपल्या मते छानशी कल्पना डॉक्युमेन्ट करण्याकरताही धागा काढतो.
>>>>
अगदी अगदी. लिहिले की छान वाटते. हलके वाटते. डोक्यातले विचार कागदावर शब्दांत उतरवण्यासारखे सुख नाही दुसरे. फक्त ते लागलीच सुचताच त्याक्षणीच वेळ मिळायला हवा. आधी मला मिळायचा. हल्ली संसारात गुरफटल्याने मिळत नाही हवे तेव्हा. पण एकदा यातून मोकळा झालो की निवृत्तीत हाच एक मोठा विरंगुळा असणार. लिखाण Happy

बार्सेलोना, धन्यवाद

पण मला त्या लिखाणाचे श्रेय नकोच आहे मुळी
फक्त असा किस्सा घडलाच नाही असे जे काही लोकांचे ठामपणे म्हणने होते ते खोडायचे होते.
आणि नुसता हाच किस्सा नाही, तर ही सुरुवात आहे. ईथून पुढे अश्या संशयांचे निराकरण ईथेच करता येईल.

अर्थात हे आरोप करणार्‍यांना पटावे यासाठी लिहित नाहीयेच. तर स्वतःचा समाधानासाठी लिहितोय, ईतर वाचकांसाठी लिहितोय असे समजा.

सोशल मिडीयावर आरोप करणारे सध्याच्या न्यूज मिडीयासारखे असतात. त्यांना खरे खोटे करायचेच नसते. त्यांना फक्त ट्रोलिंग, मनोरंजन, टी आरपी, धागे भरकटवणे आणि पळवणे यातच रस असतो. कदाचित ते ईथे खरेखोटे करायला येणारही नाहीत. त्यांना अगदी माझ्या घरी या असे अगत्याचे आमंत्रण दिले तरी ते येणार नाहीत. कारण मग विषयच संपेल. त्यामुळे जर हवेत आरोप करणे आणि धुरळा उडवत ठेवणे हाच मुख्य उद्देश असेल तर तो धुरळा ईथे तिथे सर्व धाग्यावर पसरू नये यासाठी एकच धागा असलेला उत्तम म्हणून हा धागा आहे Happy

अहो तुमची लेक तुम्हाला चिडवत नव्हती तर तुमच्यावर आरोप करत होती . Happy
>>>>
हाहा, तसेही असेल.
ईथे Dog is our best friend हा अर्थ बरोबर लागू होतो Happy
माय डॅड माय बेस्ट फ्रेंड Happy

>>त्यांना फक्त ट्रोलिंग, मनोरंजन, टी आरपी, धागे भरकटवणे आणि पळवणे यातच रस असतो. >> सुडोमी! कायसं ते वर्तुळ का काय म्हणतात ते पूर्ण झाले. काव्यात्म न्याय बिय म्हणतात तसं झालं. आता तोंडघशी पाडू नको म्हणजे झालं. Proud

पण रिक्षावाला अशी पाटी का लावेल - MY DAD IS MY GOD ? कॉन्व्हेंट वाला दिसतोय... आईची पुण्याई.. बाबांचा आशीर्वाद.. हे असलेच वाचलेय..

पण ख्रिश्चन ड्रॉप आउट असेल. म्हणजे फादर चं भाषांतर डॅड केलं म्हणून म्हणतोय
किंवा मग त्या स्टिकर वर १२ शब्दांचा मजकूर असेल तर १०० रु. तेरावा शब्द आला तर पर शब्द ५० रु वाढत असतील. मग या पंटरने फादरचं डॅड केलं असेल. तसं असलं तर मग ड्रॉप आउट नसेल.

स्वत:च्याच फेसबूकवरच्या पोस्टला पुरावा सादर करण्याला शून्य क्रेडिबिलिटी असते. त्यातून हा सगळा प्रकार 'पडलो तरी नाक वर' किंवा एनी पब्लिसिटी इज अ गूड पब्लिसिटी चा आहे. माय डॅड माय गॉड ची मिरर इमेज माय डॅड माय डॉग होत नाही हे तुला दाखवल्यावर त्यातून स्वतःच नवीन धागा काढायचा आणि इथे उत्तर दिलं नाहे तर तुम्हाला नुसताच धुरला उडवायचा वगैरे कांगावा करून प्रतिसादांची सोय करायची (मी त्याच ट्रॅप मधे अडकतोय) असले खेळ खेळायला तुला वेळ आणि उत्साह आहे ही कमाल आहे.

माय डॅड माय गॉड ची मिरर इमेज माय डॅड माय डॉग होत नाही हे तुला दाखवल्यावर
>>>>>>

बरे झाले हे तुम्ही मला दाखवले. अन्यथा मला हे माहीतच नव्हते Happy

पडलो तरी नाक वर म्हणता... तर या मध्ये पडले कोण कुठे आहे हे समजेल का? म्हणजे तुम्ही तो किस्सा खोटा आहे हे सिद्ध वगैरे करूनच बसला आहात अश्या थाटात हे म्हणत आहात Happy

मिरर ईमेज जशीच्या तशी होत नाही म्हणता हे सर्वांनाच माहीत आहे.. त्यावरून तो किस्सा कसा खोटा होतो हे सांगाल का?
आपण कित्येकदा कर्रेक्ट स्पेलिंग असलेला शब्दही नजरचुकीने वेगळा वाचतो हा अनुभव आयुष्यात कधी घेतला नाही का तुम्ही?
उद्या जर कोर्टात ईतकाच युक्तीवाद करून तो किस्सा खोटा ठरवायला जाल तर त्याचीही क्रेडिबिलिटी शून्यच असेल Happy

बर्र, तुम्ही कधीतरी माझ्या घरी येऊनही हा किस्सा खरा खोटा करू शकता. ती सुद्धा ऑफर मी दिलीय ईथे..
अर्थात त्याचीही क्रेडीबिलीटी तुमच्या लेखी शून्य नसेल तर..

पण जर तुम्ही हा किस्सा खोटा ठरवू शकला, तर मी जे नेहमी बेस्ट डिल ऑफर करतोय तेच ईथेही देतो - मी मायबोली कायमची सोडून जाईन Happy

अवांतर - एखाद्यावर हवेत आरोप करायचा. खाली अजून एकदोघांनी येऊन त्याला ट्रोल करायचे. पण तेच त्याने स्वतंत्र धागा काढून तो आरोप सिद्ध करायला सांगितले की त्याला कांगावा म्हणायचा? कमॉन मान, धिस ईज नॉट फेअर...

पण रिक्षावाला अशी पाटी का लावेल - MY DAD IS MY GOD ? कॉन्व्हेंट वाला दिसतोय... आईची पुण्याई.. बाबांचा आशीर्वाद.. हे असलेच वाचलेय..
>>>>

असू शकेल कॉन्व्हेंटवाला. ईथे बरेच शाळा आहेत जुन्या. फादर अ‍ॅग्नेल, सेंट मेरी, रायन वगैरे.
तो नाही तर त्याचा पोरगा तरी असू शकतो.
बाकी हल्लीच्या पिढीत कुठे राहीलेय आईबाबांची पुण्याई आणि आशीर्वाद... हल्ली मॉम डॅड मम्मी पप्पाच चालते.. बोलायचे एक आणि रिक्षावर दुसरे हे आणखी चुकीचे आहे

पण ख्रिश्चन ड्रॉप आउट असेल. म्हणजे फादर चं भाषांतर डॅड केलं म्हणून म्हणतोय
>>>>
डॅड आणि गॉड हे र्हाईमिंगला घेतले असेल. अक्षरांच्या समान संख्येमुळे मीटरमध्येही बसते.

खरे तर मला फोटोही काढायचा होता त्या स्टिकरचा. कारण मला असे किस्से फेसबूकवर शेअर करायला आवडतात. पण त्या रिक्षावाल्याने हे ऐकलेय का आणि तो चिडलाय का याचा मला अंदाज न आल्याने मी उगाच आणखी आगाऊपणा करून फोटो काढणे टाळले Happy

"तुम्ही तो किस्सा खोटा आहे हे सिद्ध वगैरे करूनच बसला आहात" - स्वतःला हवं तसा अर्थ काढणं हा तर तुझ्या डाव्या हातचा मळ आहे. मी तर तिथेही फक्त शंका व्यक्त केलीय पण त्यावरून एक धागा काढून चर्चा सुरू करून स्वतःची आरती सुरू पण केलीस.

"आपण कित्येकदा कर्रेक्ट स्पेलिंग असलेला शब्दही नजरचुकीने वेगळा वाचतो हा अनुभव आयुष्यात कधी घेतला नाही का तुम्ही?" - एखादा शब्द नजरचुकीनं अक्षरं ट्रान्सपोज करून वाचणं आणि आक्खं वाक्य, मिरर इमेजमधे, शब्दांमधे काहीही साम्य नसताना चुकीचं वाचणं ह्यात काही साधर्म्य नाहीये. हेच मी दाखवलंय (मिरर इमेजमधे अक्षरांत काही साधर्म्य नाही, हे).

Pages