गर्भपात - एक मेडिकल प्रोसिजर, स्त्री अधिकार, की भ्रूण हत्या?

Submitted by maitreyee on 2 August, 2022 - 09:10

आमितव ने 'Y' या चित्रपटाबद्दल चित्रपट धाग्यावर लिहिले होते तिथून विषय सुरु झाला. चित्रपट स्त्रीभ्रूण हत्या (?) या विषयावर आहे.
तिथली चर्चा अगदीच अवांतर असल्यामुळे हा धागा उघडण्याचे काम करतेय.
त्यावरुन मोरोबा या आयडी चे पोस्ट :
गर्भपात हे procedure आहे, हत्या नाही असं एकदा मान्य केल्यावर स्त्री भ्रूण removal ला तरी हत्या का म्हणायचं, असा प्रश्न पडला होता.

एकदा जर हे तत्व मान्य केलं की स्त्रीला कोणत्याही कारणामुळे गर्भपात करण्याची परवानगी असावी- निदान पहिले 20 ते 24 आठवडे तरी- तिथे सरकारने नाक खुपसू नये- तर मग स्त्रीभ्रूणहत्येला वेगळी ट्रीटमेंट का द्यावी हा प्रश्नच आहे.
समजा एखाद्या स्त्रीला भारतीय स्त्री म्हणून आयुष्यभर असुरक्षिता, abuse, दुय्यम वागणूक यांचा सामना करावा लागला असेल तर तिला वाटू शकतं की आपण आता परत female child ला जन्म देऊ नये आणि आयुष्यभरासाठी अतिरिक्त टेन्शन, जबाबदारी डोक्यावर घेऊ नये. तो चॉईस तिला असायला हवा. आणि तो चॉईस तिने घेऊ नये यासाठी तिला कायद्याचा धाक दाखवणं हा सोपा मार्ग झाला. याउलट स्त्रियांची स्थिती सुधारली तर कायद्याचा धाक नसला तरी ती तो चॉईस नाही निवडणार.
पुढच्या पिढीतील पुरुषांना स्त्रिया उपलब्ध असाव्यात यासाठी काही जोडप्याना नको असताना कायद्याचा धाक दाखवून मुली जन्माला घालायला लावणे हे हॅन्डमेड टेल टाईप वाटतं. Quick fix solution without addressing the root cause.
Submitted by WHITEHAT

प्रश्न हा आहे कि तो डिसिजन दोघांचा असावा...
Submitted by च्रप्स

मोरोबा,
मुलगी आहे म्हणून गर्भपात करणं आणि मूल नको म्हणून गर्भपात करणं, तसंच मुलगी नको हा सासरच्या/माहेरच्या लोकांचं प्रेशर असणं आणि मूल नको हा स्त्रीचा किंवा जोडप्याचा 'चॉईस' असणं यात फरक नाही का?
Submitted by अंजली

मुलगी नको असणे हा चॉईस असू शकत नाही का?
आणि स्त्री भ्रूण removal हे सासर माहेर च्या प्रेशर मुळेच होतं, असं जनरलिझेशन का? बऱ्याच वेळा स्त्रियांनाच/सुद्धा मुलग्याचा सोस असतो.
Whitehat thanks. मला एवढं नेमक्या शब्दांत सांगता आलं नसतं.
आपल्या पर्सनल कन्व्हिक्शन्स प्रमाणे आपण चॉईस आणि हत्या शब्द आलटून पालटून वापरत आहोत का?
Submitted by मोरोबा

आयसोलेशन मध्ये विचार केला तर मुलगी नको असणे हा चॉईस असू शकतो, मुलगाच हवा असणे हा ही नक्कीच चॉईस असू शकतो. गर्भपात करायला फक्त तेवढ्याच मुद्द्याचा विचार केला तर विरोध असायचं कारणच नाही.
पण विचार करा, हा लिंगसापेक्ष फक्त स्त्री गर्भाचा अंत हा मुळात गर्भपाताचा मुद्दाच नाही आहे. खोलात जाऊन विचार केला तर हा समाजात स्त्रीला, मुलींना दिला जाणारा... रादर दिला 'न जाणार्‍या' आदराचा मुद्दा आहे. आणि याचं शाश्वत उत्तर हे समाजाचं शिक्षण, प्रगती, स्त्री सबलीकरण यात आहे, ना की स्त्री भ्रूण हत्या कायद्याचा धाक दाखवून थांबणण्यात! दीर्घकालिन उत्तर हे समाजात त्यांच्या विचारात बदल हेच असणार आहे. कायद्याचा धाक-दपटशा दाखवुन काय साध्य होतंय हे बघतोच आहोत.
पण तरीही आजची भारताची परिस्थिती बघता कायदा असावाच याच मताचा मी आहे.
कॅनडात अठरापगड ठिकाणचे लोक रहातात, त्यांच्या मूळ ठिकाणच्या चालिरीती, समज गैरसमज इ. चे प्रतिबिंब गर्भपाताच्या निर्णयांत अर्थात पडते. दरकाही वर्षांनी लिंगसापेक्ष गर्भपाताची आकडेवारी तपासली जाते आणि अजुन तरी लिंग गुणोत्तरात फार फरक झालेला नाही. कॅनडात कुठल्याही कारणाशिवाय संपूर्ण प्रेगन्सीभर (अगदी फुल टर्म पर्यंत) गर्भपात विनामूल्य आणि सहज शक्य आहे. म्हणून मुद्दाम कॅनडाचं उदाहरण दिलं.
विचार करा, एक ४०० लोकं घेऊन मल्टिजनरेशन यान दूरच्या गॅलेक्सीच्या प्रवासाला निघालं आहे. तिकडे अबॉर्शनला परवानगी असेल का? अजिबात नसेल. जगात अ‍ॅब्स्युल्युट असं काही नसतं. सगळं रिलेटिव्ह, परिस्थिती प्रमाणे बदलतं.
Submitted by अमितव

मुलगी नको असणे हा चॉईस असू शकत नाही का?>>> याला तुम्ही चॉईस म्हणू शकता पण तो नसायला हवा कारण तो चॉईस लिंगभेद करतोय. 'मूल' हवं का नको (लिंगभेद न करता) हे 'मुलगी नको' यापेक्षा वेगळं नाही का?
आणि स्त्री भ्रूण removal हे सासर माहेर च्या प्रेशर मुळेच होतं, असं जनरलिझेशन का? बऱ्याच वेळा स्त्रियांनाच/सुद्धा मुलग्याचा सोस असतो.>> हे ही चुकिचेच आहे आणि ते थांबायला हवं.
आपल्या पर्सनल कन्व्हिक्शन्स प्रमाणे आपण चॉईस आणि हत्या शब्द आलटून पालटून वापरत आहोत का?>>> जेंडर नुसार गर्भपात करणे हे चुकीचे आहे. मूल हवं का नको - मुलगा असो वा मुलगी - हा चॉईस आहे. मला मूल हवं आहे पण ते मुलगाच हवा त्यानुसार घेतलेला निर्णय यालाही तुम्ही 'चॉईस' म्हणू शकता, फक्त या चॉईसचे परीणाम समाजावर किती दूरगामी, वाईट होऊ शकतात हे तुम्हाला माहित असेलच.
या धाग्याचा हा विषय नाही त्यामुळे इथे आता जास्त लिहीत नाही.
Submitted by अंजली

विचार करा, एक ४०० लोकं घेऊन मल्टिजनरेशन यान दूरच्या गॅलेक्सीच्या प्रवासाला निघालं आहे. तिकडे अबॉर्शनला परवानगी असेल का? अजिबात नसेल. जगात अ‍ॅब्स्युल्युट असं काही नसतं. सगळं रिलेटिव्ह, परिस्थिती प्रमाणे बदलतं.//
तो 400 जणांचा ग्रुप जर स्त्रियांना माणूस म्हणून किमान चांगली वागणूक देण्याच्याही capable नसेल तर मरू दे की तो ग्रुप. असला अभद्र समाज आणखी दुसऱ्या गॅलेक्सीत वाढवायला कशाला न्यायचा! Wink
फक्त या चॉईसचे परीणाम समाजावर किती दूरगामी, वाईट होऊ शकतात हे तुम्हाला माहित असेल////
होऊ देत की वाईट परिणाम. जोपर्यंत संपूर्ण समाजाला झळ पोचत नाही तोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही. इच्छा नसताना एखादं जोडपं केवळ संपूर्ण समाजाच्या भल्यासाठी मुलगी जन्माला घालण्याचा त्याग करत असेल तर त्यांना भक्कम आर्थिक मोबदला, मुलीच्या उत्तम खाजगी शिक्षणाला पुरेल इतका खर्च वगैरे तरी द्यायला हवं. जेलमध्ये टाकायच्या धमक्या देण्याऐवजी.
Submitted by WHITEHAT

इच्छा नसताना एखादं जोडपं केवळ संपूर्ण समाजाच्या भल्यासाठी मुलगी जन्माला घालण्याचा त्याग करत असेल >>>> ???? मुलगी जन्माला घालणे हा 'त्याग' आहे? बरं.
आणि हो मुलींचं शिक्षण भारतात (काही वर्षांपर्यंततरी) मोफत आहे ना?
Submitted by अंजली

तो चॉईस लिंगभेद करतोय.>>कॉज आणि इफेक्ट ची गल्लत होतेय इथे. चॉईस लिंगभेद करत नाहीये तर समाजात लिंगभेद ऑलरेडी आहे म्हणून चॉईस केला जातोय. जिथे लिंगभेद तुलनेने कमी आहे त्या देशांत का नाही हा प्रॉब्लेम?
सप्लाय ॲंड डिमांड च्या तत्वानुसार स्त्रिया कमी झाल्या तर उलट त्यांचा समाजात दर्जा वाढायला हवा ना? हा वाईट परिणाम कसा? पुरुषांसाठी वाईट परिणाम होत असेल तर व्हायलाच पाहिजे. (बाकी ते स्त्रियांची सुरक्षितता धोक्यात येईल, बलात्कार होतील वगैरे म्हणजे नुसता बागुलबुवा आहे. स्त्रियांना सिस्टिमिकली कंट्रोल करायला असे बागुलबुवे बरे पडतात)
Submitted by मोरोबा

कॉज आणि इफेक्ट ची गल्लत होतेय इथे. चॉईस लिंगभेद करत नाहीये तर समाजात लिंगभेद ऑलरेडी आहे म्हणून चॉईस केला जातोय. जिथे लिंगभेद तुलनेने कमी आहे त्या देशांत का नाही हा प्रॉब्लेम?>>> अहो, एक शब्द अलिकडे टाकला म्हणून फॅक्ट बदलतीये का? मूल नको असणे आणि मुलगी नको असणे यात निदान भारतात तरी फरक आहे ना? यातच तुमच्या पुढच्या प्रश्नाचेही उत्तर आहे.
सप्लाय ॲंड डिमांड च्या तत्वानुसार स्त्रिया कमी झाल्या तर उलट त्यांचा समाजात दर्जा वाढायला हवा ना? हा वाईट परिणाम कसा? >>> तो वाढत नाहीये, उलट दिवसेंदिवस कमी होत आहे हे वाईट फॅक्ट आहे.
तुम्ही तुमच्या कन्व्हिक्शन्स पायी इतरांचा चॉईस हिरावून घेत आहात, तर अमेरिकेतल्या अल्ट्रा-ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन्स ना बोलण्याचं मोरल ग्राउंड तुमच्याकडे उरतं का?>>> हो, उरतं. कारण मूल हवं आहे, पण मुलगाच हवा आहे याचे भारतात तरी मोठे दूरगामी परीणाम होत आहेत. उद्या अल्ट्रा-ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन्स देखिल मुलगाच हवा हा हट्ट धरू लागले तर त्यालाही तेव्हढाच विरोध होईल.
बाकी तेव्हढं ते 'कन्व्हिक्शन' म्हणजे काय ते समजले नाही
Submitted by अंजली

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

एकटी स्त्री तिच्या सहीने गर्भपात करून घेऊ शकते.

पण तिला काही झाले तर , असे म्हणून हॉस्पिटल घरच्या अजून एकाची सही घेतातच , मोस्टली ते नवरा / सासू असतात.

हे सगळ्याच ऑपरेशनला लागू आहे, नुसत्या एका सहिवर भागत नाही.

वाचनमात्र मोड मधे आहे. न राहवून प्रतिसाद देण्याचे कारण एकच.
एखादा ब्लॉक केलेला आयडी अचानक कसा प्रतिसाद देऊ शकतो ? ते पूर्वीच्या बेअरिंगला सोडून....

गर्भ पात कायदा २०२१ ची माहिती इथे आहे

----------

त्या बातमीतली माहिती चुकीची वाटत आहे.

आर्थिक व सामाजिक , परवडणार नाही , हे कारण दाखवून महिला/ जोडपे गर्भपात करू शकते, ही तरतूद खूप पूर्वीपासून आहे

"परदेशात जेंडर कळतं तरीही मोठ्या प्रमाणात तसे अबोर्शन होत नाहीत" हे फारसे खरे नसावे. कारण अमेरिकेतही अशियाई समाजात स्त्री:पुरूष गुणोत्तर बिघडलेले आहे. ब्लॅक/लॅटीनो इ समाज - ज्यांना आरोग्यसुविधा (ज्यात गर्भलिंगनिदान आणि गर्भपात येते) मिळण्याचा अभाव असतो, किंवा धार्मिक कारणांसाठी गर्भपात मंजूर नाही तिथे स्त्री:पुरूष गुणोत्तर बदलेले नाही.

सि, वाचला तो लेख.
मुलगा हाच वंशाचा दिवा, त्यामुळे एक तरी मुलगा हवाच, ही आपल्या समाजाची मानसिकता! सुदैवाने तिथे म्हटल्याप्रमाणे अमेरिकेत जन्माला आलेल्या आशियाई वंशाच्या लोकांमध्ये हा ट्रेंड नाही.

गर्भपात करून घेण्याचा पूर्ण अधिकार कोणतीच अट न टाकता स्त्री ल दिला तर कोणते चांगले आणि कोणते वाईट परिणाम स्त्री स्वतंत्र वर होतील?
अगदी dr ची शिफारस पण गरजेची नाही.
असा पूर्ण अधिकार.
असा अधिकार जगात कोणत्याच देशात नसेल असा अंदाज आहे
तरी प्रयोग म्हणून असा अधिकार दिला तर त्याचे परिणाम काय होतील.
१)सुरक्षित गर्भपात करण्याची सुविधा देणाऱ्या कोणावर च गुन्हा दाखल करता येणार नाही.
२) गर्भपात करून घेणाऱ्या व्यक्ती वर गुन्हा दखल करता येणार नाही
३) गर्भपात विषयी कोणतीच पोलिस चोकशी होणार नाही
४) गर्भपात करण्या साठी कोर्टाची परवानगी घेणे गरजेचे नाही कोर्टाने तिथे हस्तक्षेप करू नये.
अशी चार कलम टाकली की पूर्ण अधिकार मिळेल.
गर्भपात वर बंधन ही स्त्री च्या जीवाची सुरक्षा व्हावी म्हणून असतात .
असा युक्तिवाद विरोध करणारे करत असतात.त्यामुळे जगात जवळ जवळ सर्व देशात काही तरी बंधन आहेत

महत्वाचा प्रश्न.
गर्भपात करणे कायदेशीर करावे .
की
गर्भपात करणे हे कोणतेच गुन्हेगारी कृत्य नाही .
म्हणून गर्भपात विषयी कोणताच कायदा नसावा
कशामुळे स्त्री स्वतंत्र अबाधित राहील.
गर्भपात कायदेशीर करणे ह्याचा अर्थ असतो गर्भपात हा गुन्हा आहे .
गर्भपात विषयी काहीच कायदे नसणे ह्याचा अर्थ असतो.
गर्भपात करणे हा गुन्हा नाही.

मत व्यक्त करावीत.
स्त्री स्वतंत्र वादी लोकांनी खास करून.

कायदेशीर गर्भपात करण्यास परवानगी ह्याचा लपलेला अर्थ असतो गर्भपात करणे हे गुन्हेगारी कृत्य आहे
गर्भपात करणे करणे हे कायद्याच्या कक्षेत नसणे ह्याचा अर्थ असतो.
हे गुन्हेगारी कृत्य नाही .मग त्याचे परिणाम चांगले असू किंवा वाईट.
स्त्री स्वतंत्र वाल्यांना नक्की काय हवं आहे.

Pages