आमितव ने 'Y' या चित्रपटाबद्दल चित्रपट धाग्यावर लिहिले होते तिथून विषय सुरु झाला. चित्रपट स्त्रीभ्रूण हत्या (?) या विषयावर आहे.
तिथली चर्चा अगदीच अवांतर असल्यामुळे हा धागा उघडण्याचे काम करतेय.
त्यावरुन मोरोबा या आयडी चे पोस्ट :
गर्भपात हे procedure आहे, हत्या नाही असं एकदा मान्य केल्यावर स्त्री भ्रूण removal ला तरी हत्या का म्हणायचं, असा प्रश्न पडला होता.
एकदा जर हे तत्व मान्य केलं की स्त्रीला कोणत्याही कारणामुळे गर्भपात करण्याची परवानगी असावी- निदान पहिले 20 ते 24 आठवडे तरी- तिथे सरकारने नाक खुपसू नये- तर मग स्त्रीभ्रूणहत्येला वेगळी ट्रीटमेंट का द्यावी हा प्रश्नच आहे.
समजा एखाद्या स्त्रीला भारतीय स्त्री म्हणून आयुष्यभर असुरक्षिता, abuse, दुय्यम वागणूक यांचा सामना करावा लागला असेल तर तिला वाटू शकतं की आपण आता परत female child ला जन्म देऊ नये आणि आयुष्यभरासाठी अतिरिक्त टेन्शन, जबाबदारी डोक्यावर घेऊ नये. तो चॉईस तिला असायला हवा. आणि तो चॉईस तिने घेऊ नये यासाठी तिला कायद्याचा धाक दाखवणं हा सोपा मार्ग झाला. याउलट स्त्रियांची स्थिती सुधारली तर कायद्याचा धाक नसला तरी ती तो चॉईस नाही निवडणार.
पुढच्या पिढीतील पुरुषांना स्त्रिया उपलब्ध असाव्यात यासाठी काही जोडप्याना नको असताना कायद्याचा धाक दाखवून मुली जन्माला घालायला लावणे हे हॅन्डमेड टेल टाईप वाटतं. Quick fix solution without addressing the root cause.
Submitted by WHITEHAT
प्रश्न हा आहे कि तो डिसिजन दोघांचा असावा...
Submitted by च्रप्स
मोरोबा,
मुलगी आहे म्हणून गर्भपात करणं आणि मूल नको म्हणून गर्भपात करणं, तसंच मुलगी नको हा सासरच्या/माहेरच्या लोकांचं प्रेशर असणं आणि मूल नको हा स्त्रीचा किंवा जोडप्याचा 'चॉईस' असणं यात फरक नाही का?
Submitted by अंजली
मुलगी नको असणे हा चॉईस असू शकत नाही का?
आणि स्त्री भ्रूण removal हे सासर माहेर च्या प्रेशर मुळेच होतं, असं जनरलिझेशन का? बऱ्याच वेळा स्त्रियांनाच/सुद्धा मुलग्याचा सोस असतो.
Whitehat thanks. मला एवढं नेमक्या शब्दांत सांगता आलं नसतं.
आपल्या पर्सनल कन्व्हिक्शन्स प्रमाणे आपण चॉईस आणि हत्या शब्द आलटून पालटून वापरत आहोत का?
Submitted by मोरोबा
आयसोलेशन मध्ये विचार केला तर मुलगी नको असणे हा चॉईस असू शकतो, मुलगाच हवा असणे हा ही नक्कीच चॉईस असू शकतो. गर्भपात करायला फक्त तेवढ्याच मुद्द्याचा विचार केला तर विरोध असायचं कारणच नाही.
पण विचार करा, हा लिंगसापेक्ष फक्त स्त्री गर्भाचा अंत हा मुळात गर्भपाताचा मुद्दाच नाही आहे. खोलात जाऊन विचार केला तर हा समाजात स्त्रीला, मुलींना दिला जाणारा... रादर दिला 'न जाणार्या' आदराचा मुद्दा आहे. आणि याचं शाश्वत उत्तर हे समाजाचं शिक्षण, प्रगती, स्त्री सबलीकरण यात आहे, ना की स्त्री भ्रूण हत्या कायद्याचा धाक दाखवून थांबणण्यात! दीर्घकालिन उत्तर हे समाजात त्यांच्या विचारात बदल हेच असणार आहे. कायद्याचा धाक-दपटशा दाखवुन काय साध्य होतंय हे बघतोच आहोत.
पण तरीही आजची भारताची परिस्थिती बघता कायदा असावाच याच मताचा मी आहे.
कॅनडात अठरापगड ठिकाणचे लोक रहातात, त्यांच्या मूळ ठिकाणच्या चालिरीती, समज गैरसमज इ. चे प्रतिबिंब गर्भपाताच्या निर्णयांत अर्थात पडते. दरकाही वर्षांनी लिंगसापेक्ष गर्भपाताची आकडेवारी तपासली जाते आणि अजुन तरी लिंग गुणोत्तरात फार फरक झालेला नाही. कॅनडात कुठल्याही कारणाशिवाय संपूर्ण प्रेगन्सीभर (अगदी फुल टर्म पर्यंत) गर्भपात विनामूल्य आणि सहज शक्य आहे. म्हणून मुद्दाम कॅनडाचं उदाहरण दिलं.
विचार करा, एक ४०० लोकं घेऊन मल्टिजनरेशन यान दूरच्या गॅलेक्सीच्या प्रवासाला निघालं आहे. तिकडे अबॉर्शनला परवानगी असेल का? अजिबात नसेल. जगात अॅब्स्युल्युट असं काही नसतं. सगळं रिलेटिव्ह, परिस्थिती प्रमाणे बदलतं.
Submitted by अमितव
मुलगी नको असणे हा चॉईस असू शकत नाही का?>>> याला तुम्ही चॉईस म्हणू शकता पण तो नसायला हवा कारण तो चॉईस लिंगभेद करतोय. 'मूल' हवं का नको (लिंगभेद न करता) हे 'मुलगी नको' यापेक्षा वेगळं नाही का?
आणि स्त्री भ्रूण removal हे सासर माहेर च्या प्रेशर मुळेच होतं, असं जनरलिझेशन का? बऱ्याच वेळा स्त्रियांनाच/सुद्धा मुलग्याचा सोस असतो.>> हे ही चुकिचेच आहे आणि ते थांबायला हवं.
आपल्या पर्सनल कन्व्हिक्शन्स प्रमाणे आपण चॉईस आणि हत्या शब्द आलटून पालटून वापरत आहोत का?>>> जेंडर नुसार गर्भपात करणे हे चुकीचे आहे. मूल हवं का नको - मुलगा असो वा मुलगी - हा चॉईस आहे. मला मूल हवं आहे पण ते मुलगाच हवा त्यानुसार घेतलेला निर्णय यालाही तुम्ही 'चॉईस' म्हणू शकता, फक्त या चॉईसचे परीणाम समाजावर किती दूरगामी, वाईट होऊ शकतात हे तुम्हाला माहित असेलच.
या धाग्याचा हा विषय नाही त्यामुळे इथे आता जास्त लिहीत नाही.
Submitted by अंजली
विचार करा, एक ४०० लोकं घेऊन मल्टिजनरेशन यान दूरच्या गॅलेक्सीच्या प्रवासाला निघालं आहे. तिकडे अबॉर्शनला परवानगी असेल का? अजिबात नसेल. जगात अॅब्स्युल्युट असं काही नसतं. सगळं रिलेटिव्ह, परिस्थिती प्रमाणे बदलतं.//
तो 400 जणांचा ग्रुप जर स्त्रियांना माणूस म्हणून किमान चांगली वागणूक देण्याच्याही capable नसेल तर मरू दे की तो ग्रुप. असला अभद्र समाज आणखी दुसऱ्या गॅलेक्सीत वाढवायला कशाला न्यायचा! Wink
फक्त या चॉईसचे परीणाम समाजावर किती दूरगामी, वाईट होऊ शकतात हे तुम्हाला माहित असेल////
होऊ देत की वाईट परिणाम. जोपर्यंत संपूर्ण समाजाला झळ पोचत नाही तोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही. इच्छा नसताना एखादं जोडपं केवळ संपूर्ण समाजाच्या भल्यासाठी मुलगी जन्माला घालण्याचा त्याग करत असेल तर त्यांना भक्कम आर्थिक मोबदला, मुलीच्या उत्तम खाजगी शिक्षणाला पुरेल इतका खर्च वगैरे तरी द्यायला हवं. जेलमध्ये टाकायच्या धमक्या देण्याऐवजी.
Submitted by WHITEHAT
इच्छा नसताना एखादं जोडपं केवळ संपूर्ण समाजाच्या भल्यासाठी मुलगी जन्माला घालण्याचा त्याग करत असेल >>>> ???? मुलगी जन्माला घालणे हा 'त्याग' आहे? बरं.
आणि हो मुलींचं शिक्षण भारतात (काही वर्षांपर्यंततरी) मोफत आहे ना?
Submitted by अंजली
तो चॉईस लिंगभेद करतोय.>>कॉज आणि इफेक्ट ची गल्लत होतेय इथे. चॉईस लिंगभेद करत नाहीये तर समाजात लिंगभेद ऑलरेडी आहे म्हणून चॉईस केला जातोय. जिथे लिंगभेद तुलनेने कमी आहे त्या देशांत का नाही हा प्रॉब्लेम?
सप्लाय ॲंड डिमांड च्या तत्वानुसार स्त्रिया कमी झाल्या तर उलट त्यांचा समाजात दर्जा वाढायला हवा ना? हा वाईट परिणाम कसा? पुरुषांसाठी वाईट परिणाम होत असेल तर व्हायलाच पाहिजे. (बाकी ते स्त्रियांची सुरक्षितता धोक्यात येईल, बलात्कार होतील वगैरे म्हणजे नुसता बागुलबुवा आहे. स्त्रियांना सिस्टिमिकली कंट्रोल करायला असे बागुलबुवे बरे पडतात)
Submitted by मोरोबा
कॉज आणि इफेक्ट ची गल्लत होतेय इथे. चॉईस लिंगभेद करत नाहीये तर समाजात लिंगभेद ऑलरेडी आहे म्हणून चॉईस केला जातोय. जिथे लिंगभेद तुलनेने कमी आहे त्या देशांत का नाही हा प्रॉब्लेम?>>> अहो, एक शब्द अलिकडे टाकला म्हणून फॅक्ट बदलतीये का? मूल नको असणे आणि मुलगी नको असणे यात निदान भारतात तरी फरक आहे ना? यातच तुमच्या पुढच्या प्रश्नाचेही उत्तर आहे.
सप्लाय ॲंड डिमांड च्या तत्वानुसार स्त्रिया कमी झाल्या तर उलट त्यांचा समाजात दर्जा वाढायला हवा ना? हा वाईट परिणाम कसा? >>> तो वाढत नाहीये, उलट दिवसेंदिवस कमी होत आहे हे वाईट फॅक्ट आहे.
तुम्ही तुमच्या कन्व्हिक्शन्स पायी इतरांचा चॉईस हिरावून घेत आहात, तर अमेरिकेतल्या अल्ट्रा-ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन्स ना बोलण्याचं मोरल ग्राउंड तुमच्याकडे उरतं का?>>> हो, उरतं. कारण मूल हवं आहे, पण मुलगाच हवा आहे याचे भारतात तरी मोठे दूरगामी परीणाम होत आहेत. उद्या अल्ट्रा-ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन्स देखिल मुलगाच हवा हा हट्ट धरू लागले तर त्यालाही तेव्हढाच विरोध होईल.
बाकी तेव्हढं ते 'कन्व्हिक्शन' म्हणजे काय ते समजले नाही
Submitted by अंजली
पण स्त्रीभ्रुणाच्या बाबतीत ते
पण स्त्रीभ्रुणाच्या बाबतीत ते बंधन झुगारून सरसकट मातेचं स्वातंत्र्य अनिर्बंध असावं अशी वेळ भारतात यायला अजून काही काळ जाऊ द्यावा लागेल. ///
ओके. हे ठीक आहे.
In that case, आम्ही मातेचं स्वातंत्र्य नाकारत आहोत कारण तसं करणं हे पुरुषांना सुधारण्यापेक्षा सोप्पं आहे हे सरळ सांगावं. थोडक्यात, आम्ही समाज म्हणून नालायक आहोत हे मान्य असावं. आम्ही प्रो चॉईस नाही हेही कबूल करावं.
तसं न करता उलट त्या परिस्थितीतील victim बाईला गुन्हेगार ठरवण्याचा propaganda का चालवावा? तिचं स्वातंत्र्य नाकारायचं आणि वर तिला, तिच्या डॉक्टरला खुनी, नराधम वगैरे म्हणून सगळा दोष त्यांच्यावर ढकलून समाज नामानिराळा राहतो हे गंमतीशीर आहे.
स्त्री स्वतंत्र चा आणि
स्त्री स्वतंत्र चा आणि गर्भपात करण्याचा हक्क ह्याचा संबंध काय हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
मुळात गर्भ pat करण्याची कारण बघितली
तर त्या च्या शी स्त्री चे व्यक्ती स्वतंत्र चा संबंध जुळत नाही.
गर्भपात करण्याची कारण.
१) लग्न च्या अगोदर गर्भ राहणे म्हणून गर्भपात.
कारण
ते समाजास अमान्य आहे लग्न अगोदर मुल म्हणून.
इथे स्त्री स्वतंत्र कुठे येते .
हा सामाजिक दबाव झाला.
गर्भपात केला नाही आणि मुलाला जन्म दिला तरी त्याला कोणी अडवत नाही.
फक्त स्वतः मध्ये हिम्मत हवी त्या मुलाचे पालन पोषण करण्याची.
ती हिम्मत नसते ही कमजोरी लपविण्यासाठी समाजाला दोष दिला जातो.
ही पण दुसरी बाजू आहेच.
अशी प्रतेक कारण चेक केली तर सहज लक्षात येईल .
स्त्री स्वतंत्र शी ह्या विषयाशी काही संबंध .नाही.
कारण वेगळी आहेत.
Whitehat, स्त्री-गर्भ असेल तर
Whitehat, स्त्री-गर्भ असेल तर (कितीही वेळा) गर्भपात "मातेचं स्वातंत्र्य" म्हणून केला जातो असं तुम्हाला खरोखरच वाटतं? का? पहिली मुलगी असेल तर दुसऱ्या वेळी हे प्रमाण वाढतं याचं काय कारण आहे मग?
आम्ही मातेचं 'अमुक एक'
आम्ही मातेचं 'अमुक एक' स्वातंत्र्य नाकारत आहोत कारण तसं करणं हे पुरुषांना
सुधारण्यापेक्षा सोप्पं आहेसुधारेपर्यंत सामाजिक समतोलासाठी गरजेचं आहे.आम्ही प्रो चॉईस नाही हेही कबूल करावं. >> कबूल आहे. तसा कोणताही दावा नाही. अनिर्बंध प्रो चॉइस अशी कुठली वस्तू भारतात अस्तित्वात नाही.
थोडक्यात, आम्ही समाज म्हणून नालायक आहोत हे मान्य असावं >> यावर रंग दे बसंती मधला 'कोई भी देश परफेक्ट नही होता' वाला डायलॉग मारण्याचा चान्स आहे. (ह घ्या)
भारतात स्त्रियांची परिस्थिती
भारतात स्त्रियांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्यांना कसलंही स्वातंत्र्य नाही.
त्याच वेळी त्यांना आपल्याला अपत्य कसं हवं हे ठरवायचं स्वातंत्र्य आहे.
इच्छित लिंगाचं अपत्य नसेल तर आणि तोवर गर्भपात करायचंही स्वातंत्र्य आहे.
त्यामुळे गर्भलिंगचिकित्सेवर बंदी व ती बंदी तोडून मुलीचा गर्भ आहे हे कळलं तर गर्भपातावर बंदी हा त्या स्त्रीच्या स्वातंत्र्यावर घाला आहे.
बरोबर ना?
खूप माग गेले म्हणजे आपल्या च
खूप माग गेले म्हणजे आपल्या च दोन पिढ्या मागे .
तेव्हा तर सामाजिक स्थिती खूप वेगळी होती.
पुरुष सत्तक समाज होता.
स्त्रीलिंगी अपत्य आहे हे गर्भात माहीत पडणे शक्य नव्हते.
मग अशा वेळी मुली नी जन्म घेतला की तिची हत्या केली गेली पाहिजे .
अशा हत्या च प्रमाण जास्त असायला हवं.
पण आपल्या पंजोबा ची पिढी बघितली तरी अनेक आत्त्या,मावशा होत्या हे लक्षात येईल.
म्हणजे मुलगी आहे म्हणून हत्या झाल्या नाहीत.
त्यांना वाढवले गेले.
'कोणत्याही कारणासाठी' स्त्री
'कोणत्याही कारणासाठी' स्त्री ने गर्भपात करू नये असं ज्यांना वाटतं (व्यक्ती, समाज, सरकार) त्यांनी त्या गर्भार स्त्रीच्या अन्न, वस्त्र, निवारा, मेडिकल इ ची सोय करून द्यावी आणि बाळंत झाल्यानंतर जन्मलेल्या बाळाला पण स्वतः सांभाळावं.
-----
WHITEHAT यांच्या पान 2 आणि 3 वरच्या प्रतिसादांशी पूर्ण सहमत आहे. (मूळ धागा आणि पान 1 वरचे प्रतिसाद वाचले नाही)
स्त्री गर्भपात च स्वतःच्या
स्त्री गर्भपात च स्वतःच्या इच्छे नी करत नाही. दबाव मुळे करतात त्या मध्ये त्यांचा पूर्ण निर्णय नसतो.
मग दबाव विविध प्रकार च असतो.
सामाजिक,नैतिक,आर्थिक,मानसिक
हा मुद्धा आहे.
दबाव आणि त्याची कारणं बदलता
दबाव आणि त्याची कारणं बदलता येत नसतील (विरोध करणाऱ्या व्यक्ती, समाज, सरकारला) तर त्यांनी त्या स्त्रीची आणि बाळाची जबाबदारी घ्यावी!!
जबाबदारी घेणार नसाल तर STFU!!
गर्भात असणाऱ्या भ्रूण ल जीव
गर्भात असणाऱ्या भ्रूण ल जीव समजले जाते का?
की जन्म झाल्यावर च त्याला जीव म्हणून मान्यता आहे?
पहिल्या प्रश्नच उत्तर हो असेल तर गर्भपात करणे ही हत्या आहे असा दावा चुकीचा कसा ठरेल.
हे पण आक्षेप आहेत च.
गर्भपात हा खूप किचकट विषय आहे
गर्भपात हा खूप किचकट विषय आहे.
१) गर्भपात म्हणजे जीव हत्या हा विचार प्रवाह आहे.
२) लिंग ओळखून केलेल्या गर्भपात मुळे मुल आणि मुली ह्यांचे प्रमाण बिघडून समाजाला आणि देशाला धोका निर्माण होवू शकतो
३) मुलाचे पालनपोषण कोण करणार हा प्रश्न असतोच.
४) ऐन तारुण्यात दोन तीन वर्ष स्त्री ल नोकरी व्यवसाय,शिक्षण,ह्या पासून लांब राहावे लागते मुल जन्माला घातले तर .
हा पण प्रश्न आहेच.
बाई !!!
बाई !!!
अंगावर शहाराच आला सगळे वाचून,
कसे बाई बोलावते तुम्हाला असे?
इतके वेळा हत्या, गर्भ** लिहिले आहे की एखाद्या गरोदर बाईचा फक्त वाचून गर्भ पडावा. शी!!
मुलं देवाची देणगी असते, तीकडे लोक मुले होत नाहीत म्हणून झुरतात आणि इथे या बाया गर्भ पाडणे आमचा अधिकार आहे म्हणून भांडतायत,
बायांनो, मुले होतायत तुम्हाला यात धन्यता माना गं!!
त्याहून कौतुक पुरुषांचे वाटते, मेल्यांनो, तुमचा काही संबंध आहे का?
तुम्हाला पाळी येते का? की तुम्ही 9 महिने गर्भ पोटात वाढवता? की जीवावर खेळून त्याला जगात आणता? की स्वत:च्या रक्त मासाचे दूध करून त्याला वाढवता?
किती अहिमहिकेने भांडताय रे बाबांनो,?बायांना पोट सपाट करता यावे म्हणून, कशाला?? तुम्हाला मोकळे रान मिळावे म्हणून? की दिसली बाई की कर तिच्या बरोबर चाळे, आणि फेक तोंडावर पैसे आणि सांग तिला बाई ग, आता कायदेशीर आहे सगळे, पाडून घे.
लाज नाही वाटत, बायकांबद्दल असा विचार करायला? समोर दिसले असते तर थोत्रवून काढले असते एकेकाला.
वर म्हणतात बायकांसाठी परिस्थिती चांगली नाही म्हणून मुलीचा गर्भ पाडा, भिकर्ड्यांनो, तुमच्या आज्यांनी असा विचार केला असता तर तुमच्या आया आल्या असत्या का या जगात? आणि मग तुम्ही आला असतात का? त्यावेळेला तर बायका खितपत पडल्या होत्या माजघरात, तरी मुली जन्माला घातलेल्याच ना तुमच्या आज्या पणज्यांनी?
आता जर तुम्हाला अचानक जग खराब झालंय वाटत असेल तर त्याला कारण तुम्ही आहात, गरत्या बायांना अब्रूने जगायची सोय ठेवली नाही मेल्यांनी.
बायांनो, असल्या पुरुषांकडे लक्ष देऊ नका ग!
ते मेले टपलेलेच असतात, त्यांनी कामं करायची, आणि आपण आपल्या तब्येतीची नासाडी करून घ्यायची
अहो अडमिन, ऐन चातुर्मासात असले अभद्र धागे कसे काढू देता हो तुम्ही.
सणासुदीच्या दिवसात असल्या अभद्र चर्चा करायच्या कशाला? बरोबर आमची व्रत वैकल्ये सुरू झाली की या forward लोकांना असे काहीतरी सुचायला लागते.
डिलिट करा हा धागा कृपया.
गर्भलिंगनिदान, स्त्री-गर्भ
गर्भलिंगनिदान, स्त्री-गर्भ असेल तर मुलगा होईपर्यंत गर्भपात हे गरोदर स्त्री स्वेच्छेने, स्वातंत्र्य म्हणून करत असते असं ज्यांना वाटतं त्यांनी त्या स्त्रीच्या कुटुंबीयांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा जाहीर सत्कार करावा, आपल्या मुलीला/सुनेला एक स्वतंत्र नागरिक म्हणून घडवल्याबद्दल.
असो.
Ethe post karava ka .. Kal
Ethe post karava ka .. Kal amchya society chya group var ha msg alay
सात वर्षीय मुलगी बेपत्ता
कुमारी स्वरांजलि जनार्दन चांदेकर वय सात वर्षे राहणार कोथुरने तालुका मावळ जिल्हा पुणे ही इयत्ता दुसरी मध्ये शिकणारी मुलगी आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास घरासमोर खेळत होती तेव्हापासून घरी आली नाही तिचे अज्ञात व्यक्तीने अपहरन केले असण्याची शक्यता आहे मुलीचे वर्णन खालील प्रमाणे अंगामध्ये मोरपंखी रंगाचा टॉप व निळी जीन्स घातलेली असून केस बॉबकट केलेले आहेत कानामध्ये सोन्याच्या रिंगा व गळ्यात सप्तरंगी धागा बांधलेला आहे तिच्याबद्दल माहिती मिळाल्यास तात्काळ कामशेत पोलीस स्टेशनला कळवण्यात यावी विनंती आहे.
आणि आज...
आणि आज...
करा चर्चा.. स्त्री भृण हत्या?
करा चर्चा.. स्त्री भृण हत्या? बाल स्री हत्या?
मागे इकदा असाच मेसेज आला होता. पण पुढे 1-2 दिवसांनी मूल सापडले होते. म्हणून काल वाटले हि मुलगी सापडेल.
आज नेमके या धाग्यावर वाचत असताना हि बातमी आली
शीतल, अतिशय वाईट बातमी.
शीतल, अतिशय वाईट बातमी.
पण इथे ती पोस्ट करणं योग्य नाही असं माझं मत आहे.
ह पा, चांगला आढावा घेतला आहे
ह पा, चांगला आढावा घेतला आहे. धन्यवाद.
वरचे प्रतिसाद वाचुन माझा थोडा गोंधळ होतोय.
भारतात अमुक एका कालावधीत केलेला गर्भपात कायदेशीर आहे असे मी वाचलेय आणि पाहिलेयही. दवाखान्यात गर्भपाताला mtp असे नाव आहे व कुठलेही वैद्यकीय कारण नसताना केलेल्या गर्भपातासाठीच्या फॉर्ममध्ये कारण - for social reasons असे लिहितात हे पाहिलेले आहे.
भारतात गर्भलिंग चाचणीला मान्यता नाही, तसे करणारा डोक्टर आढळल्यास त्याच्यावर कारवाई होते हे लिहिलेले बोर्ड प्रत्येक सोनोग्राफि सेंटरमध्ये ठळकपणे लावलेले असतात.
एका डॉक्टरकडे गुपचुप गर्भलिंग परिक्षण करुन नंतर दुसरीकडे जाऊन गर्भपात केला तर कोणाला काय कळणार आहे? कारण कायद्याने मान्यता असलेल्या कालावधीत गर्भपात कोणी कुठेही जाउन करु शकते. मुलगाच हवा मानसिकतेचे लोक थायलंड की कुठेतरी जाऊन चाचणी करुन भारतात परतुन गर्भपात करतात असे मागे पेपरात वाचले होते.
मग ह्या पार्श्वभुमीवर मुलगी असली तर गर्भपातावर बंदी असे कुठे आहे? मुलगी आहे हे चेक करण्यावर बंदी आहे व तसे केल्यास शिक्षा होऊ शकते. डॉक्टर्सना शिक्षा झालेलीवाचलेले आहे पण करवुन घेणार्या दांपत्याला किंवा कुटुंबाला शिक्षा झालेली वाचले नाही. हल्ली पेपर वाचन होत नाही त्यामुळे या संदर्भात माहिती नाही.
गर्भलिंगनिदान, स्त्री-गर्भ
गर्भलिंगनिदान, स्त्री-गर्भ असेल तर मुलगा होईपर्यंत गर्भपात हे गरोदर स्त्री स्वेच्छेने, स्वातंत्र्य म्हणून करत असते असं ज्यांना वाटतं त्यांनी त्या स्त्रीच्या कुटुंबीयांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा जाहीर सत्कार करावा, आपल्या मुलीला/सुनेला एक स्वतंत्र नागरिक म्हणून घडवल्याबद्दल.
+१००
शिवाय अशा महिलेचा victim असा वारंवार झालेला उल्लेख वाचून धन्य झालो.
आजकाल अनेक ठिकाणी महिला नगरसेवक असतात, पण कारभार त्यांचे नवरेच हाकतात. हे निमशहरी ठिकाणी. लिंग सापेक्ष गर्भपाता सारखा मोठा निर्णय स्त्री स्वतः कोणत्याही दबावाला बळी न पडता घेते हे वाचून करमणूक झाली.
एखाद्या महिलेने पती निधना नंतर स्वेच्छेने सती जाण्याचा निर्णय घेतला तर bodily autonomy म्हणून मान्य कराल ?
मुळात हा निर्णय हा त्या स्त्रीचा आहे की सासर/माहेरचा दबाव हे कसे ओळखणार ? एक उपाय : ज्या महिलेने जातीबाहेर जाऊन प्रेम विवाह केला आहे अशाच महिलांना लिंग सापेक्ष गर्भपाताचा अधिकार असावा कारण त्यांनी आपली स्वतंत्र निर्णय क्षमता सिद्ध केलेली असते. हे उपरोधाने लिहिले आहे.
आजकाल जेंडर चेंज करून मिळते
आजकाल जेंडर चेंज करून मिळते
मग 4 मुली झालेले , दोघांना पुरुष का करून घेत नाहीत ?
>> भारतातील जोडपी नाईलाजाने
>> भारतातील जोडपी नाईलाजाने तसा विचार करतात कारण भारतात परिस्थिती भयानक आहे. >> याला आधार अजुन मिळालेला नाही.
>>तसं न करता उलट त्या परिस्थितीतील victim बाईला गुन्हेगार ठरवण्याचा propaganda का चालवावा? >> अस कायदा आहे बरोबर आहे. पण हा कायदा काही दशके अस्तित्त्वात असुनही अजुन एकाही तुम्ही म्हणता त्या 'व्हिक्टिम' बाईवर गुन्हा का बरं दाखल झाला नसेल?
कायदा हे एक हत्यार असतं. तो कधी आणि कसा वापरात आणायचा किंवा आणायचा नाही याचं स्वातंत्र्य पोलिसांना असतं. इम्प्लिमेंट न करण्याचं कारण उघड आहे... पोलिसांना क्रिमिनलायझेशन करायचं नाही. त्यामुळे तुमचा तो मुद्दा ही निकालात निघतो. प्रोसिजर करणारा डॉ. टेक्निशिअन दोषी आहेत आणि त्यांच्यावर खटले भरले गेले आहेत. प्रोपगंडा तुमचा काही नसेल तर मला कुठेच दिसत नाहीये.
प्लास्टिक सर्जरी करून सुंदर
प्लास्टिक सर्जरी करून सुंदर बनता येते.
सेक्स change करून स्त्री चे पुरुष होता येते.
एकच embryos मधून तीन चार मुल जन्माला घालतात. चार मुलासाठी चार वर्ष वाया घालवायची गरज नाही
सर्व आता शक्य आहे.
पण ह्या सर्व सुविधा वापरण्याची कुवत बहुसंख्य जनते मध्ये नाही
.आणि असली सर्व अनैतिक काम
जगाला व्यक्ती स्वतंत्र चे धडे देणाऱ्या प्रगत देशात च जास्त होतात
गर्भपात .
गर्भपात .
खर्च २५ ते ३० हजार.
बाळंतपण
खर्च ५० ते ७० हजार.
इतका खर्च येतो.
भारतात ३० करोड लोक अती गरीब ह्या श्रेणीत येतात.
त्यांना गर्भपात करण्याचा खर्च परवडणार पण नाही.
म्हणजे सुशिक्षित समजला जाणारा वर्ग च स्त्रीलिंगी चेक करून गर्भपात करत असतात.
ह्याचा खर्च लाख रुपया पर्यंत जाईल.
>>>>म्हणजे सुशिक्षित समजला
>>>>म्हणजे सुशिक्षित समजला जाणारा वर्ग च स्त्रीलिंगी चेक करून गर्भपात करत असतात.>>>
किंवा कमी उत्पन्न असणारे लोक. लिंग निदान करून घेऊन घरच्याघरी/असुरक्षित पद्धतीने गर्भपात करत असतील
ही शक्यता पण आहेच ना?
1) गर्भलिंग परीक्षेवर पूर्ण
1) गर्भलिंग परीक्षेवर पूर्ण बंदी
2) गर्भ राहिल्यानंतर पहिल्या 3 महिन्यात गर्भपात करायला मान्यता (यात केवळ गर्भवतीचा कंसेंत आवश्यक, बाकी कोणी , नवरा सुध्धा गरजेचं नाही) अर्थात हे लिंगनिरपेक्ष होईल
3) त्यानंतर पूर्ण टर्म मध्ये वैद्यकीय कारणासाठी प्रेगंनसी तर्मीनेत करायला मान्यता (परत एकदा ही लिंगनिरपेक्ष असावी) केवळ गर्भावतीच्या सही ने
हे इतके नियम पुरेसे आहेत, 3 Ra सोडता पाहिले 2 अस्तित्वात आहेत. (कन्सेंत टर्म वेगळ्या आहेत)
मग इतके गुऱ्हाळ का चालू आहे?
मोरोबा आणि whitehat यांना जे वाटत असेल ते त्यांनी स्वतः बरोबर किंवा स्वतच्या कुटुंबियां बरोबर खुशाल करावे की कोणी थांबवले आहे त्यांना?
त्यांनी त्यांच्या परिघात पाहिलेल्या परिस्थितीबद्दल ते बोलत असतील, असेल त्यांच्या जवळच्या वर्तुळात स्त्रियांसाठी वाईट परिस्थितीअसे एकदम त्यांना तोडून टाकू नका. त्यांचा पण दृष्टिकोन बरोबर असु शकतो
अवांतर आहे.पण काहीतरी संबंध.
अवांतर आहे.पण काहीतरी संबंध. नक्की आहे.
सती जाण्याची प्रथा ..
ही प्रथा खूप भयानक होती एक जिवंत व्यक्ती नी आत्महत्या करणे ते पण मनाविरुद्ध.
किती भयानक आहे हे
ब्रिटिश लोकांनी बळाचा वापर करून ही प्रथा बंद केली ह्या विषयी त्यांचे खूप मोठे उपकार आहेत.
.कोणत्या ही युद्ध मध्ये ,हिंसाचार मध्ये स्त्री चा बळी जातो.
एक पाच सहाशे वर्षापूर्वी गुंड टोळ्या च भारतात होत्या रोज लढाया. कोणते ही नियम कायदे नाहीत.
सिव्हिल सेन्स नाहीत अशी अवस्था होती.
नवरा मेला तर स्त्री जगली तरी ती कोणाच्या तरी अत्याचार ची बळी ठरेल ही भीती आणि त्या मधून काढलेला मार्ग म्हणजे सती जाणे.
पण ती प्रथा बनली
परिस्थिती बदलली पण प्रथा तीच.
ब्रिटिश सरकार लं ती प्रथा बंद करावी लागली.
आज च्या आधुनिक युगात पण युद्धात,हिंसाचार मध्ये स्त्री चाचं बळी जातो.
म्हणजे वृत्ती काही बदलली नाही.
काही निरीक्षण
काही निरीक्षण
गर्भपात .
हा हक्क स्त्री लं असावा तो स्त्री स्वतंत्र शी निगडित आहे.
हे वाक्य बुद्धिभेद करणारे आहे.
स्त्री गर्भपात करते ती स्वतःच्या इच्छेने खूप कमी आणि बाकी कारणाने जास्त.
त्या मुळे गर्भपात करण्यास वीणा अट परवानगी दिली तर स्त्री वरचे अत्याचार अजून वाढण्याची जास्त शक्यता आहे.
मला वाटतं १८ वर्ष च्या आत वय असणाऱ्या मुलीला गर्भपात करण्याचा हक्क भारतात पण नसेल.
तो नाही म्हणूनच अनेक बलात्कार च्या केसेस ओपन होतात
एक उदाहरण.
अजून एक उदाहरण
अजून एक उदाहरण
एक मुलाचे एका मुली शी प्रेम प्रकरण आहे त्यांचे शारीरिक संबंध पण येतात.कारण ती दोघे लग्न करणार असे वचन मुलाने दिले आहे.
ती मुलगी गर्भवती राहिली.
आणि स्त्री च हक्क म्हणून वीणा अट गर्भपात करण्यास परवानगी आहे.
तो मुलगा अजून एक वचन देवून गर्भपात करून घेईल
आणि अशी वीणा अट परवानगी नसेल तर.
एक तर त्याला लग्न करावे लागेल किंवा बलात्कार चा गुन्हा दाखल होईल.
पुढच्या फसवणुकीचा प्रकार घडणार नाही.
हे उलट पण होईल मुलगी गर्भपात करून संबंध तोडेल आणि त्या मुलाला फसवेल.
त्या मुळेच गर्भपात करताना जोडीदार ची परवानगी लागावी असे वाटते.
एकटी स्त्री असा निर्णय घेवू शकतं नाही.
तसे एकटा पुरुष पण असा निर्णय घेवू शकतं नाही.
दोघांची मान्यता लागणे गरजेचे आहे
स्त्री वर तिच्या इच्छे विरुद्ध गर्भपात करण्यास सक्ती केली तर जन्मठेपेची कायद्यात तरतूद आहे
त्या मुळेच गर्भपात करताना
त्या मुळेच गर्भपात करताना जोडीदार ची परवानगी लागते.
एकटी स्त्री असा निर्णय घेवू शकतं नाही.
>> हे कधीपासून?
>>>> वाटतं १८ वर्ष च्या आत वय
>>>> वाटतं १८ वर्ष च्या आत वय असणाऱ्या मुलीला गर्भपात करण्याचा हक्क भारतात पण नसेल.>>>
1८ वर्षाखालील मुलीला गर्भवती राहण्याचा ही हक्क नाहीये ओ,
अश्या मुलींना कोणत्याही सरकारी योजनेचा फायदा मिळत नाही
Pages